पेटंटशाही व आपण हे डॉ. सुनीती धारवाडकरांचे पुस्तक समीक्षणासाठी म्हणून जेव्हा मिळाले तेव्हा त्याचे आकर्षक व समर्पक मुखपृष्ठ व समर्पण-पत्रिका ह्यांनी प्रथमदर्शनीच लक्ष वेधून घेतले. नावावरून असे वाटले की ह्यात पेटंटबद्दल सविस्तर माहिती मिळेल परंतु ‘शाही’ ह्या शब्दाचे महत्त्व पुस्तक वाचायला लागल्यावर लक्षात आले. ह्या पुस्तकाचे कंसातील (शेती व जीवनाची कोंडी) हे सहशीर्षकही सयुक्तिक आहे.
हे पूर्ण पुस्तकच माहितीपूर्ण आहे, ज्ञानवर्धक व चिंतनीय (म्हणजे काळजी करायला लावणारे) आहे. परंतु सर्व पुस्तक ललित-लेखनासारखे एका बैठकीत वाचून होत नाही. ते अर्थातच पुस्तकातील मजकूर ओघवता नाही म्हणून नव्हे तर ते वाचकाला बऱ्याच गोष्टींची माहिती देणारे आहे म्हणून.
राष्ट्रीय विद्यापीठे
भारतात केंद्रीय तसेच राष्ट्रीय विद्यापीठे सुरू होणार असल्याचे वृत्त १९ ऑगस्टच्या लोकसत्ते त (पृ.२) वाचले, आणि आठवण झाली डॉ. वीणा पुनाचा यांची. देशात चौदा नवीन राष्ट्रीय विद्यापीठे स्थापन करण्याला त्यांचा तसेच डॉ. वीणा मजुमदार, डॉ. सुकांता चौधरी इत्यादी अन्य मान्यवरांचा तत्त्वतः विरोध नसला, तरी समाजात होऊ घातलेल्या बदलांची दखल घेऊन त्यावर विचारमंथन होणे अवश्य आहे, हा विचार त्या कळकळीने मांडतात. शिक्षणक्षेत्रातील ह्या स्थित्यंतराविषयी काहीसा नाराजीचा सूर तीन्ही विदुषींनी लावलेला दिसतो. भारतातील ३७८ विद्यापीठे आज १४,३२३.६ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. जात-पात, धर्म, लिंग, मासिक/वार्षिक उत्पन्न ह्यांपैकी कुठलीही बाब शिक्षणाच्या आड न येता.
इतिहास
इतिहास म्हणजे भूतकाळात जे घडले त्या विषयीची माहिती, ज्ञान, आकडे (data), इ. इ. सर्व. भूतकाळाशी संबंधित वस्तू (भांडी, शस्त्रे, नाणी, कपडे, दागिने, इ.), वास्तू (भवने, राजवाडे, किल्ले, रस्ते , इमारती, शिलालेख, इ.) आणि माहिती, आकडे, ज्ञान (दस्तावेज, पत्रव्यवहार, लेख, विचार, इ.) या सर्वांची जुळवाजुळव करून भूतकाळात काय घडले असावे हे वर्तमानात सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इतिहासकार किंवा इतिहासतज्ज्ञ म्हणतात.
जगाचा आद्य इतिहासकार म्हणून महर्षी व्यासांकडेच पाहता येईल. ज्याकाळी लिहून ठेवण्याच्या सोयीच नव्हत्या त्या इ.पू. जवळपास १०,००० वर्षांपासून विभिन्न ऋषिमुनींनी जे श्लोक रचले त्यांत त्या काळातील अनेक घटनांचे वर्णन व ज्ञान, कला, इ.
सकारात्मक दृष्टीतून इतिहासलेखन
इतिहास लिहिण्याच्या पद्धतींमागच्या भूमिकांचा आढावा घेणारा रा.ह.तुपकरींचा लेख या अंकात आहे. त्यांच्या आगामी ग्रंथातील इतिहास या प्रकरणाचा तो संक्षेप आहे. इतिहासकार व त्याचा वर्तमानकाळ यांचा त्याने लिहिलेल्या इतिहासावर परिणाम होणारच. पण व्यक्तिसापेक्षता मान्य करूनही ते कल्पकतेतून लावलेला अर्थ आणि बुद्धिपुरस्सर केलेली मोडतोड…… (यांतील) सीमारेषा फार पुसट असतात, असा महत्त्वाचा इशारा देतात.
कथाकथनात्मक, मार्क्सवादी, आधुनिकतावादी व आधुनिकोत्तरवादी अशा चार भूमिका तुपकरी नोंदतात. कथाकथनात्मक, मार्क्सवादी व आधुनिकतावादी भूमिकांमध्ये त्रुटी तर आहेतच. परंतु त्या कोणत्याही भूमिकेत व्यक्तिसापेक्षता हा गुण मानून त्याला मान्यता दिली जात नाही.
इतिहासातील नवेजुने
अॅक्टन व त्याच्या सहकाऱ्यांना (१८९६ साली) वाटत असे की भविष्यात कधीतरी ‘अंतिम इतिहास’ लिहिता येईल. साठ वर्षांनी सर जॉर्ज क्लार्कने यावर टिप्पणी केली –
“भावी पिढ्यांतील इतिहासकारांना (अंतिम इतिहास लिहिता येईल) असे वाटत नाही. त्यांना त्यांचे कार्य वारंवार उल्लंघून नवनवे इतिहास लिहिले जात राहतील असे वाटते. त्यांच्या मते भूतकाळाबाबतची माहिती एका वा अनेक माणसांच्या मनांच्या प्रक्रियेतूनच आपल्यापर्यंत येते. त्यामुळे ती मूलभूत, व्यक्तिनिरपेक्ष, अपरिवर्तनीय तथ्य-कणांच्या रूपात असू शकत नाही. इतिहास संशोधन ही अंतहीन प्रक्रिया आहे. काही घाई झालेले विद्वान यामुळे संशयवादी होतात.
संपादकीय नवे गडी, नवा राज!
आजचा सुधारक चालवण्याशी अनेकांचे, वेगवेगळ्या पातळ्यांवरचे, वेगवेगळ्या प्रकारचे संबंध असतात. वाचक/ग्राहक हा संबंधितांच्या संख्येने सर्वांत मोठा प्रकार. यांतही आजीव, दरवर्षी वर्गणी देणारे, परदेशस्थ, संस्थासदस्य, (ज्यांच्याशी आसुचे आदानप्रदान होते अशी) नियतकालिके, (ज्यांनी आसु वाचावा असे वाटल्याने अंक सप्रेम पाठवले जातात, असे) विचारवंत, इत्यादी प्रकार असतात. या सर्वांकडून येणारे प्रतिसाद, हा आसु चे धोरण ठरण्यातील एक महत्त्वाचा घटक असतो. पण कागदोपत्री एक व्यक्ती मासिकाची प्रमुख असावी लागते, आणि तिने शेवटी प्रकाशनाची सर्व जबाबदारी घ्यायची असेत. ही व्यक्ती म्हणजे प्रकाशक. आसु च्या सुरुवातीला काही वर्षे दिवाकर मोहनी व काही वर्षे विद्यागौरी खरे यांनी प्रकाशक म्हणून काम केले.आज
पत्रसंवाद
पत्रसंवाद
कृ.अ.शारंगपाणी, ३९१, शिवाजीनगर, पुणे ४११ ००४.
पूर्वी साहित्यिक विश्राम बेडेकरांच्या ‘सिलिसबर्गची पत्रे’ या पुस्तकात ‘ब्रहा म्हणजे सीमातीत केवळ जागृती’ असे वाक्य वाचले होते. परंतु ते काय सांगत आहेत, हे कळले नव्हते. आता आपल्या ऑगस्टच्या अंकात प्रसन्न देवदत्त दाभोलकर “मी आहे आणि माझे अनुभव आहेत.’ हा व्यक्तिगत अनुभव ज्यामुळे शक्य होतो ते चैतन्यस्वरूप ब्रह्म, असे सांगतात. हेही कळले नाही. कृपया मार्गदर्शन करावे. चैतन्यस्वरूप नसणारे ब्रह्मही असते काय, हेही कळवावे. म.ना.गोगटे, .पसेसरींश.लो साहित्य संमेलन ….पत्रक ऑगस्ट २००९
नमस्कार ! मराठी साहित्य संमेलनाने मराठी विज्ञान संमेलनास प्रेरणा दिली.
मालिकाबद्ध पुस्तकातले डोह
आजचा सुधारक ची पहिली दोन वर्षे (एप्रिल ‘९० ते मार्च ‘९२) पानांचे क्रमांक दर महिन्यात नव्याने सुरू केले जात. एखाद्या महिन्यात एक ते बत्तीस क्रमांक दिले, की पुढील महिना परत एक पासून सुरू केला जाई. नंतर असा विचार आला, की लेखांवरील चर्चा, पत्रे, प्रतिक्रिया, असे करत एखाद्या विषयावरील सर्वांचे सर्व मुद्दे समजून घेण्यामुळे मासिक खरे तर मालिकाबद्ध पुस्तकासारखे रूप घेते. त्यामुळे एकेक वर्ष तरी पानांचे क्रमांक सलग द्यावेत. एप्रिल ‘९२च्या अंकापासून आजवर ही पद्धत सुरू आहे. त्यावेळी मी आसु चा वाचकही नव्हतो, पण दि.य.देशपांडे,
स्लमडॉग करोडपती
D: It is written पण नेमकं काय? पाण्याच्या वाफेवर लिहिलेला जमालचा संघर्षमय भूतकाळ की फसवा वर्तमानकाळ की उज्ज्वल भविष्यकाळ ??
जमाल… एक अमिताभवेडा क्रिकेटप्रेमी, तर सलीम, त्याचा मोठा भाऊ, आईसोबत ‘आमची’ मुंबईच्या झोडपट्टीत राहात असतात. हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये जीव वाचवताना राम भेटतो. पण आईला गमावून अनाथ, निष्पाप भावंडे – द टू मस्केटीयर्स – आणि लतिका – द थर्ड – जगण्यासाठी एकांडा संघर्ष सुरू करतात.
पोटासाठी कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या या मुलांना भिकारी बनवण्यासाठी एक दिवस ममनचे लोक घेऊन जातात. मुलांचे डोळे काढून काहींना पांगळे करून भिकेला लावण्याच्या या धंद्याचा ममन बादशाह असतो.
नैतिकतेची वैश्विकता
मार्क हॉसर हे नामवंत मानसतज्ज्ञ असून मन, मेंदू व वर्तणूक यांविषयी विशेष अभ्यास करत आहेत. त्यांच्या मॉरल माइंड्स (Moral Minds: How Nature Designed Our Universal Sense of Right and Wrong) या पुस्तकात नीतिमत्तेच्या वैश्विक स्वरूपाबद्दल विस्तृतपणे चर्चा केली आहे. या पुस्तकाच्या अनुषंगाने केलेल्या काही प्रश्नोत्तरांतून नैतिकतेविषयी त्यांना काय म्हणायचे आहे ते अधिक स्पष्ट होईल. माणसांमध्ये नीतिमत्ता उपजतच असते असे विधान आपण करत आहात. आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे?
सर्वांत प्रथम नीतिमत्तेचे मूळ कुठे असेल याचा विचार करायला हवा. बरोबर वा चूक असे निकाल देत असताना त्यामागील मानसिक प्रक्रिया कोणती असेल?