पौर्वात्य आत्मविद्याः धन आणि ऋण

हा लेख वाचकांना दिलासा देण्यासाठी किंवा एखादी उपचारपद्धती (थेरपी) समजावून सांगण्यासाठी लिहिलेला नाही. अनेक उपचारपद्धती अशा आहेत, की ज्या तात्कालिक विश्राम व शुश्रूषा मिळवून देण्यात यशस्वी ठरतातही; पण थेरपीजना लगटून थिअरीजही (सिद्धान्त) डोक्यात घुसतात. त्यातील अनेक धारणा, जीवनदृष्टीबाबत दिशाभूल करणाऱ्या आणि म्हणूनच सामाजिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या घातक ठरणाऱ्या असतात. परिणामतः मनःस्वास्थ्याचे जे नुकसान होते ते थेरपीतून मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा बरेच जास्त ठरते. म्हणूनच या ‘लगटून घुसणाऱ्या’ सिद्धान्ताची/धारणांची समीक्षा करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. हा लेख अशा समीक्षेच्या अंगाने जाणारा आहे.
मनःशांती म्हणजे भावनिक सपाटीकरण नक्कीच नव्हे.

पुढे वाचा

मानवी इतिहासातील सर्वांत घातक शोध – शेती

मानवी इतिहासात डोकावून पाहिल्यास आजच्या सतत वाढत जाणाऱ्या गोंगाटाच्या व गोंधळाच्या सामाजिक स्थितीस कीड लागण्यास नेमकी कधीपासून व कोणत्या शोधापासून सुरुवात झाली, ह्याचे जर आपण तटस्थपणे चिंतन केले तर काय दिसते ? मोबाईल फोन्स्, दूरचित्रवाणी, जैविक अभियांत्रिकी आणि सुपरमार्केट्स ह्या सर्व गोष्टी आपल्याला एका मोठ्या आगीच्या ठिणग्या आहेत असे जाणवेल. मग मोठ्या आगीचे, सामाजिक नाशाच्या स्थितीचे खरे कारण शोधण्यासाठी मानवी इतिहासातील सुरुवातीच्या शोधांपासून सुरुवात करावी लागेल.

काहीजण म्हणतील की मानवाच्या नाशास अणुबॉम्बचा शोध किंवा औद्योगिक क्रांती कारणीभूत आहे. इतर काहीजण म्हणतील की भांडवलशाही किंवा पैसा किंवा बंदुकीची दारू (gun powder) कारणीभूत आहे.

पुढे वाचा

गवत पेटू लागले आहे…

गेल्या काही वर्षांत १६० जिल्ह्यांत आपली मुळे रोवणारी आणि विस्तारत राहिलेली ही नक्षलवादी चळवळ म्हणजे प्रस्थापित संसदीय लोकशाही व्यवस्थेला दिले गेलेले अह्वान आहे. कोणताही राजकीय पक्ष यापुढे नक्षलवादी चळवळीला नजरेआड करू शकणार नाही. नक्षलवादी चळवळ ही ‘देशद्रोहा’ची चळवळ नाही. तो गुन्हेगारीचा प्रश्न नाही आणि पोलीस वा सुरक्षा दलांच्या आवाक्यात येऊ शकणारा मुद्दा नाही. हे नव-नक्षलवादी आंदोलन हा अव्वल दर्जाचा राजकीय प्रश्न आहे. राजकीय प्रश्न म्हणजेच विकासाचा, विषमता व दारिद्र्यनिर्मूलनाचा आणि प्रशासनाचा. हल्ली ज्याला ‘क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स’ या प्रतिष्ठित संकल्पना-संज्ञेने ओळखले जाते तो आता कळीचा मुद्दा बनू लागला आहे.

पुढे वाचा

पत्रचर्चा

गरीब, श्रीमंत व अतिश्रीमंत
परवा एका शिक्षक मेळाव्याबरोबर भारतीय संस्कृतीविषयी बोलताना चांगल्या, सुसंस्कृत नागरिकाचे पुढील गुण मी सांगितले. १) निरोगी सुदृढपणा २) स्वच्छता ३) सौंदर्यप्रेम ४) श्रीमंती ५) नियम/कायदे पाळण्याची वृत्ती अर्थात् भ्रष्टाचारी नसणे ६) स्त्रियांचा मान राखणे ७) सुशिक्षण.
यांपैकी श्रीमंती वगळता सर्व लक्षणांबद्दल एकमत झाले, व या लक्षणांचा निकष लावता भारतीय संस्कृती निकृष्ट आहे, ‘‘गर्वसे कहो हम भारतीय हैं” असे अभिमानाने म्हणण्यासारखी परिस्थिती नाही, व अधिक चांगले नागरिक घडवण्यासाठी डोळसपणे प्रयत्न केले पाहिजेत याबद्दलही चर्चेअंती एकमत झाले. ‘भारतीय असल्याबद्दल मला अभिमान वाटतो” असे सुरवातीला सर्वचजण म्हणत होते, पण चर्चेअंती सर्वांचे मतपरिवर्तन झाले.

पुढे वाचा

जीवन-मरणाचे प्रश्न आपण कसे सोडवतो?

कोणत्याही परिस्थितीत कोणते वागणे इष्ट, कोणते अनिष्ट, याबद्दलचे आपले दृष्टिकोन विवेकातून येतात असे आपण मानतो. मुळात मात्र ते भावनांपासून उपजतात. हे म्हणाला डेव्हिड ह्यूम. तो नीतिविचारांबद्दल लिहिताना “विचारा’ भोवती अवतरण चिह्न घालून तो भाग शंकास्पद असल्याचे ठसवत असे.
ह्यूमचे म्हणणे खरे की खोटे यावर तत्त्वज्ञ अडीचशे वर्षे वाद घालत आहेत, पण निर्णय होत नाही आहे. आता वेळ संपली आहे. मेंदूतले व्यवहार तपासणारी उपकरणे वापरत वैज्ञानिक त्या वादात उतरत आहेत. आज तरी असे दिसते आहे की ह्यूमला काहीतरी योग्य असे सुचले होते.

पुढे वाचा

स्त्री-भ्रूणहत्याः कोल्हापुरातले वास्तव (भाग ३)

[अमृता वाळिंबे यांनी मालतीबाई बेडेकर अभ्यासवृत्ती २००५-२००६ वापरून केलेले संशोधन आम्हाला प्राप्त झाले. त्याचा जुजबी संक्षेप करून आम्ही काही भागांमध्ये ते संशोधन प्रकाशित करीत आहोत. या प्रकारचे संशोधन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकरिता व्हायला हवे.]
सोनोग्राफी केंद्राची संख्या व स्त्री-पुरुष यांचे ‘अतूट’ नाते
जिल्हा सोनोग्राफी केंद्राची संख्या दरहजारी मुलग्यांमागे
तुलनेने जास्त मुलींचे प्रमाण (०-६ वयोगट)
कोल्हापूर २११ ८५९
अहमदनगर २११ ८९०
सातारा २०९ ८८४
सांगली १८३ ८५०

तुलनेने कमी

भंडारा १९ ९५८
नंदुरबार १५ ९६६
गोंदिया १० ९६४
गडचिरोली ५ ९७४

(संदर्भः ‘अ स्टडी ऑफ अल्ट्रा साऊंड सोनोग्राफी सेंटर्स इन महाराष्ट्र’, केंद्रशासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागासाठी पॉप्युलेशन रिसर्च सेंटर, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटक्स अँड इकॉनॉमिक्सने सादर केलेला अभ्यास.

पुढे वाचा

आपुलकीने वागणाऱ्या माणसांची अखेर

विसाव्या शतकाची ती सुरुवात होती. लाल-बाल-पाल व नंतर गांधी-नेहरू इत्यादींनी राष्ट्रीय चळवळीत दिलेल्या योगदानामुळे जनसामान्यांना स्वातंत्र्याची चाहूल लागली होती. स्वातंत्र्य म्हणजे केवळ ब्रिटिशांना हुसकावून लावणे नव्हे तर त्याचे उद्दिष्ट होते स्वयंशासनाचे, सुशासनाचे, राष्ट्रीय पुनर्बाधणीचे, विकासाचे, प्रगतीचे. यासाठी केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नव्हते तर समाजजीवनाच्या प्रत्येक दालनात स्वदेशीचा पुरस्कार आवश्यक ठरवला जात होता. आर्थिक जगतात हॉटेल ‘ताज’ घ्या की जमशेदपूर येथील टाटांचा पोलादाचा कारखाना घ्या, अनेक आर्थिक उपक्रम हाती घेतले जात होते. ज्यांमध्ये स्रोत एकच होता तो म्हणजे ‘स्वदेशीचा’. हेच ध्येय उराशी बाळगून पश्चिम भारतातील सातारा जिल्ह्यातील विमा महर्षी म्हणून ओळखले जाणारे अण्णासाहेब चिरमुले यांनी १९३६ साली युनायटेड वेस्टर्न बँकेची स्थापना केली.

पुढे वाचा

मानवी स्वभाव व डार्विनवाद (३)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. सं.]
वादविवादाच्या भोवऱ्यात डार्विनवाद व मानवी स्वभाव
डार्विनच्या सिद्धान्ताचा नैसर्गिक निवडीचा भाग हा त्या सिद्धान्ताचा मूळ गाभा आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. तरीसुद्धा एकूणच या सिद्धान्ताबद्दलचे वाद अजून संपलेले नाहीत, डार्विनचा सिद्धान्त ख्रिश्चनांच्या सर्व पारंपरिक श्रद्धांना धक्का देत होता, हे मात्र निर्विवाद आहे.

पुढे वाचा

सामाजिक सुरक्षा: अमेरिकन अनुभव (भाग ३)

“सव्वीस वर्षांपूर्वी या देशाने सर्व श्रमिक आणि त्यांची कुटुंबे यांना निवृत्ती, मृत्यू, बेरोजगारीमुळे बुडणाऱ्या निर्वाहवेतनाच्या भीतीपासून मुक्त करण्याचे तत्त्व मान्य केले. पण आजही वार्धक्यातल्या आजारपणाच्या खर्चापासूनचे संरक्षण फार थोड्या श्रीमंतांनाच उपलब्ध आहे. ही मोठीच त्रुटी आहे.” हा आहे जॉन केनेडी,१९६१ साली काँग्रेसपुढे अध्यक्षीय भाषण करताना. अमेरिकन मेडिकल असोसिएशन (अचअ), चेंबर ऑफ कॉमर्स, नॅशनल असोसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरर्स, साऱ्यांनी केनेडीविरुद्ध दंड थोपटले. जनमतचाचण्या सांगत होत्या की दोन-तृतीयांश लोक वृद्धांच्या आरोग्यविम्यासाठी कर द्यायला तयार होते, पण हे लोकसभेतल्या विधेयकावरच्या मतदानात दिसायला हवे होते.
“नवरा आयुष्यभर कठोर मेहनत करून निवृत्त झाला आहे.

पुढे वाचा

पॉपरचे विश्व

प्रत्येक घटनेमागे काही कारण असते, ही समजूत अनेकांची असते. सोबतच माणसे काही वेळा तरी आपल्या कृती स्वेच्छेने निवडतात, ही आपली खात्री असते. वरकरणी पाहता या दोन धारणांमध्ये एक विरोधाभास जाणवतो. हा विरोधाभास शमवण्याचा प्रयत्न, हा कार्ल पॉपरच्या द ओपन युनिव्हर्स : अॅन आर्म्युमेंट फॉर इंडिटर्मिनिझम या ग्रंथाचा गाभा आहे. पॉपर सांगतो की हा ग्रंथ म्हणजे “मानवी स्वातंत्र्याच्या व सर्जनशीलतेच्या प्रश्नाचा तत्त्वविवेचक उपोद्घात आहे.” (a prolegomenon to the question of human freedom and creativity).
नियतवादाचे टोकाचे रूप लाप्सास मांडले. त्याचे खंडन पॉपरने कितपत यशस्वीपणे केले, ते आपण पाहू.

पुढे वाचा