‘आजचा सुधारक’ने नेहेमीच असे मानले आहे की वाचकांचे लेखक होऊ शकतात व हा क्रम पुढे सल्लागार, संपादक वगैरेंपर्यंतही जाऊ शकतो. मी (नंदा खरे) असाच वाचक, पत्रलेखक करत कार्यकारी संपादक झालो आहे.
पत्रे, चर्चा, लेख यांचे एकूण प्रमाण 63% सुमारे दोन-तृतीयांश आहे. संपादक व सहकारी 25% भाग व्यापतात. संपादक व सहकाऱ्यांचा भाग कमी होऊन वाचक-लेखकांचा भाग वाढावा, ही आमची नेहेमीचीच इच्छा आहे.
पत्रांपैकी बरीचशी चर्चेत भाग घेऊन खंडनमंडन करणारी असतात. हे आवश्यकच आहे, पण तेवढ्यावर पत्रलेखकांनी थांबू नये. नुसतेच खंडनमंडन बरेचदा अतिशय आग्रही, कधीमधी व्यक्तिगत पातळीला जाते.