श्रीमती कल्पना कोठाऱ्यांचा ‘ब्रेन-ड्रेन’ वरील लेख (आ.सु. डिसें. ९७) वाचून सुचलेले काही मुद्दे नोंदत आहे. मुळात या महत्त्वाच्या विषयावर अशी तुकड्या-तुकड्याने चर्चा होण्याने फारसे साध्य होत नाही याची पूर्ण जाणीव ठेवून हे वाचावे.
(१) कोठाऱ्यांची समजूत दिसते की GREv TOEFL (TOFFEL नव्हे) या परीक्षा गुणवत्ता ठरवण्याच्या फार उच्च प्रतीच्या कसोट्या आहेत. कोठाभ्यांनी IIT चा उल्लेख करून उदाहरण अभियांत्रिकीचे दिले आहे. IIT व इतर अभियांत्रिकी संस्थांच्या पदवीधरांना पुढे शिकायचे झाले तर त्यांना भारतातच ‘गेट’ (Graduate Aptitude Test in Engineering) ही परीक्षा देऊन भारतीय संस्थांमध्ये पुढे शिकता येते.