ख्रिश्चन धर्म, रोमन कॅथॉलिक, पोप फ्रान्सिस
—————————————————————————-
प्रत्येक धर्मातील परंपरा व परिवर्तन ह्यांच्यातील संघर्षाचा वेध घेणाऱ्या लेखमालेतील कॅथॉलिक पंथातील ह्या प्रक्रियेचे चित्रण करणारा व त्यातील पोप फ्रान्सिस ह्यांचे कर्तृत्व अधोरेखित करणारा हा लेख..
—————————————————————————–
हिंदू धर्माच्या मोकळ्याढाकळ्या रचनेमुळे, अनेकेश्वरी उपासनापद्धतींमुळे व सर्वसमावेशक लवचिकतेमुळे त्यात परंपरा आणि परिवर्तन ह्यांमधला लढा दीर्घकाळ चालत राहू शकला. इंग्रजी राजवट आल्यावर येथील सामाजिक-राजकीय -आर्थिक संरचनांना मुळापासून हादरे बसले व त्यातूनच हिंदू धर्मीयांनी आपल्या धर्माच्या चिकित्सेला प्रारंभ केला. भक्तिसंप्रदायाचा वारसा मानणारे गांधी-विनोबा-साने गुरुजी, अन्य पुरोगामी परंपरांतून आलेल्या अरविंद –विवेकानंद-कृष्णमूर्ती प्रभृतींनी हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाची व आचाराची पुनर्मांडणी केली.