आपण बलात्काराबद्दल बोलतो तेव्हा कशाबद्दल बोलतो? आता आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. १६ डिसेंबर २०१२ नंतर भीतीचे एक राष्ट्रीय शोकनाट्य सादर झाले. स्त्रीद्वेषाचे सहसा दिसणारे परिणाम-भीती, जखमा आणि असुरक्षितता सगळीकडे व्यक्त झाले. विरोधाभास असा की, किंवा कदाचित विरोधाभास नाहीच, की दिल्लीतल्या त्या भयंकर रविवारनंतर जास्त विनयभंग, जास्त बलात्कार आणि जास्त खून घडले. या प्रश्नाच्या उत्तरातून कृती (अॅक्ट) आणि धारणा (अटिट्यूड) यातला फरक शोधण्याचा मी प्रयत्न करतो. या दोन्हीचा काही संबंध आहे का? मला माहीत नाही. पण आपण कृती आणि धारणा समांतर आहेत असे मानतो.
विचार तर कराल
डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा आणि माझा परिचय साधारणपणे १९९४-९५ च्या दरम्यान झाला. आम्ही सारे त्यांना डॉ. दाभोलकर वा नुसते डॉक्टर म्हणत असू पण त्यांच्या पुस्तकांवर दाभोलकर असे लिहिले जाते. त्यावेळी वास्तुशास्त्रावर दादरला एक सभा होती. एक वास्तुशास्त्रावर बोलणारे वकील, एक प्रतिवाद करणारे आर्किटेक्ट, दाभोलकर आणि अध्यक्ष एक निवृत्त न्यायमूर्ती अशी ती सभा होती. दाभोलकरांचे भाषण विनोदी आणि वास्तुशास्त्राची खिल्ली उडवणारे होते. मुद्दे इतके बिनतोड होते की प्रतिवाद करण्याची संधी मिळूनही वकील महाशयांना फारसे काही बोलता आले नाही.
ह्याच दरम्यान माझा ‘आजचा सुधारक’शी परिचय झाला.
विज्ञान व वैज्ञानिक दृष्टी
विज्ञान व वैज्ञानिक दृष्टी
विज्ञान हेच एकमेव असे मानवी ज्ञानाचे स्वरूप आहे असा आक्रमक विवेकवाद (सायंटिसिझम) आणि अतीत तत्त्व माणसांतच अंतर्भूत असते हे मानणारा विवेकवाद यांत फरक आहे. हे न जाणल्याने विज्ञान व आत्मज्ञान यांची एकता तर सोडाच, पण शांततामय सहजीवन मान्य करणे अनेक पुरोगाम्यांना जड जाते. मुळात नीतिनिरपेक्ष असलेल्या विज्ञानाला आत्मज्ञानच योग्य ते सामाजिक वळण लावू शकते. या आत्मज्ञानाचा मंत्रतंत्रसिद्धी, गूढविद्या, पारलौकिक विश्व यांच्याशी तिळभरही संबंध नाही हे परत एकदा सांगितले पाहिजे. विज्ञान जेवढे वाढेल, तेवढे वाढवले पाहिजे. त्याची विनाशशक्ती रोखून विधायक शक्ती जोपासण्याचे काम आपण सांभाळले पाहिजे.
समज – गैरसमज
‘महाराष्ट्र’ नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतअधिनियम’ असा या विधेयकाचा मथळा आहे पण सोयीसाठी आपण ‘जादूटोणा विरोधी कायदा’ असा या विधेयकाचा उल्लेख करू. इ.स.२००५ मध्ये हे विधेयक विधिमंडळात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हापासून अनेक प्रकारचे आक्षेप घेण्यात आले. गेल्या ८ वर्षात निर्माण झालेल्या वा हितसंबंधीयांनी मुद्दाम निर्माण केलेल्या पसरवलेल्या समजासंबंधी अचूक वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत पोहचवणे नितांत गरजेचे आहे. आजवर विधिमंडळपरिसरात विरोध करणाऱ्या पत्रकां धून, भाषणां धून वा प्रामाणिक धार्मिक माणसांनी उपस्थित केलेल्यापैकी काही प्रश्नांची निवड केली आहे.
जादूटोणाविरोधी अध्यादेश (मूळ पाठ)
सन २०१३ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.१४ अज्ञानावर पोसल्या जाणाऱ्या अनिष्ट व दुष्ट प्रथांपासून समाजातील सर्वसामान्य लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आणि समाजातील सर्वसामान्य लोकांचे शोषण करण्याच्या व त्याद्वारे समाजाची घडीच विस्कटून टाकण्याच्या दुष्ट हेतूने भोंदू लोकांनी सर्वसामान्यत: जादूटोणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथाकथित अलौकिक शक्तीच्या किंवा अद्भुत शक्तीच्या किंवा भूतपिशाच्च यांच्या नावाने निर्माण झालेल्या नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, दुष्ट व अघोरी प्रथांचा मुकाबला करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने, समाजामध्ये जनजागृती व सामाजिक जाणीव निर्माण करण्याकरिता तसेच समाजात निकोप व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याकरिता आणि त्यांच्याशी संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता अध्यादेश.
आमचा देवा-धर्माला विरोध नाही – अखिल भारतीय अंधश्रद्धा-निर्मूलन समिती
का हो तुम्ही देवाच्या धर्माच्या का विरुद्ध आहात? अंधश्रद्धांच्या नावाखाली तुम्ही देवाविषयीची श्रद्धा व आमचा धर्मच उखडवायला निघाला आहात का? तुम्ही समाजातील देव, धर्म घालवून सारी अनीती माजवणार आहात काय? असे प्रश्न १९८२ पासून सातत्याने आम्हाला विचारले जात आहेत. कधी केवळ कुतूहलाने तर अनेकदा गर्भित धमकीसह, कधी व्यक्तिगत पातळीवर असे प्रश्न विचारले जातात. कधी धार्मिक संघटनांर्फत विचारले जातात. प्रश्न कसाही विचारला जावो, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी या प्रश्नाचे एक अतूट नाते निर्माण झाले एवढे मात्र खरे. का हो, तुम्ही तर देव-धर्म यांना मुळीच हात लावत नाही.
शहाणपण
हिंदु धर्मात बरीच व्यंगें आहेत म्हणून यहुदी, महंमदी, क्रिस्ती किंवा अशाच प्रकारच्या दुसऱ्या एखाद्या धर्माचा अंगीकार करणाऱ्या मनुष्यास विचारी ही संज्ञा सहसा देता येणार नाही. तसेंच, आमचे कांहीं रीतीरिवाज मूर्खपणाचे आहेत, म्हणून प्रत्येक गोष्टींत परकीयांचे अनुकरण करणे हेही कोणत्याही दृष्टीने त्याचे त्याला किंवा इतरांला परिणामी विशेष सुखावह होण्याचा संभव नाही, असे आम्हांस वाटते.
उदाहरणार्थ, कित्येक प्रसंगी धोतरें नेसणे सोईस्कर नाही म्हणून युरोपियन लोकांप्रमाणे दिवसभर पाटलोण घालून बसणे, किंवा ते लोक विशेष कामाकडे कागदांचा उपयोग करतात म्हणून आपणही तसे करणें हें केवढे मूर्खपण आहे बरें?
अंधश्रद्धा निर्मूलन हा वारकऱ्यांचा धर्मच!
(अंधश्रद्धा निर्मूलन-विधेयक आणि वारकरी या मुद्द्यावरून काही जण वाद निर्माण करायचा प्रयत्न करत असले तरी वारकरी ज्याला अनुसरतात त्या भागवत धर्मात कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा नाही. उलट समाजातल्या अशा अपप्रवृत्तीवर घाला घालण्याचे कामच या धर्माने शतकानुशतके केले आहे. त्या संदर्भातले विवेचन. )
राज्यातील अंधश्रद्धेचा मुद्दा कायद्याच्या कक्षेत यावा, या चांगल्या उद्देशाने अंधश्रद्धा-निर्मूलन समितीने कायद्याचा मुद्दा लावून धरला. सुरुवातीस त्याचे नाव अंधश्रद्धा निर्मूलन-विधेयक असेच होते. मात्र नंतर ते महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम या नावे आणण्यात आले.
माझे आध्यात्मिक आकलन
दोन महिन्यापूर्वी मी पुणे येथे माझे विज्ञान : माझे अध्यात्म या विषयावर भाषण दिले. कार्यकर्त्यांना व नागरिकांना ते आवडले. नवीन वाटले. यापूर्वी मी महाराष्ट्रात काही ठिकाणी ‘आम्हीच खरे धार्मिक’ या विषयावरही बोललो होतो. विषयाचे शीर्षक थोडे चकवा देणारे होते हे खरेच. धर्म न मानणाऱ्या व्यक्तीने मी खरा धार्मिक आहे असे उच्चारवाने सांगणे यात अंतर्विरोध वाटतोच. असे असतानाही हा विषय घेतला होता याचे कारण होते. एकतर धर्मभावनेचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण व राजकारण करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न चालू होता. महाराष्ट्रात व दिल्लीतही त्याच मंडळींच्या हातात सत्ता होती.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा
धर्माचा पाया श्रद्धा आहे हे खुद्द धार्मिकच मान्य करतात. फक्त त्याचे म्हणे असे असते की ती श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे, डोळस श्रद्धा असते. पण हे म्हणणे अनाकलनीय आहे. श्रद्धा म्हणजे ज्या गोष्टीच्या सत्यत्वाचा कसलाही पुरावा नाही तिच्या सत्यत्वावरील अढळ विशास.
धर्मावरील श्रद्धा याच जातीची आहे. ईशर, पापपुण्य, स्वर्गनरक, परलोक, पुनर्जन्म, इत्यादि कोणत्याही गोष्टीचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही. या सर्व गोष्टींची साधक प्रमाणे देण्याचे असंख्य प्रयत्न मी-मी म्हणणाऱ्यांकडून आजवर केले गेले आहेत. परंतु त्यांपैकी एकही अंशतः देखील निर्णायक नाही हे असंख्य वेळा दाखवून झाले आहे.