उत्तरा सहस्रबुद्धे - लेख सूची

अरब जगाताल उठाव : वादळ की वावटळ?

डिसेंबर 2010 च्या उत्तरार्धात उत्तर आफ्रिकेच्या टोकावर वसलेल्या लहानशा ट्यूनिशिया देशातल्या जनतेने त्या देशावर 23 वर्षे सत्ता गाजविणारे अध्यक्ष झिने अल अबिदिन बिन अली यांच्याविरुद्ध उठाव केला, तेव्हा पुढे घडणाऱ्या महाभारताची ती नांदी आहे असे फारच कमी लोकांना वाटले असेल. पण ट्युनिशियापाठोपाठ शेजारच्या लिबिया आणि इजिप्तमध्येही या उठावाची लागण झाली. 17 जानेवारी 2011 रोजी ट्युनिशियाचे …

आधुनिक अंधश्रद्धा, दंतकथा, मिथके, इत्यादि

नवस, चमत्कार, मांत्रिक-तांत्रिक, ज्योतिषविद्या, वेगवेगळ्या प्रकारचे स्वामी-महाराज, या अंधश्रद्धांच्या परिचित प्रकारांपलिकडे इतरही अनेक प्रकार आहेत. या प्रकारातल्या ‘अंधश्रद्धा’ समाजातील प्रचलित चालीरीती, रूढीपरंपरा, धार्मिक कर्मकांडे, यांच्याशी संबंधित नसतात. त्यांचा उगम तुलनेने अलिकडच्या काळात झालेला असतो. त्यातील अनेक समजुतींना ‘अंधश्रद्धा’ मानायला शिक्षित समाजही पटकन तयार होत नाही. या ‘आधुनिक’ अंधश्रद्धा कधी नवीन दंतकथांच्या स्वरूपात समोर येतात. तर …

अस्थिर, अस्वस्थ पाकिस्तान

प्रपाठक, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई. (सध्या व्हिजिटिंग फेलो, सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज, जकार्ता, इंडोनेशिया.) बेनझीर भुत्तो यांची हत्या ही राजकीय हत्यांमध्ये निश्चितच सर्वाधिक सनसनाटी गणली जाईल. पाकिस्तान, आणि दक्षिण आशियाच नव्हे तर सगळ्या जगात या घटनेचे पडसाद उमटले. पाकिस्तानातील सध्याच्या नाट्यपूर्ण घटनांना त्यामुळे एक वेगळेच वळण लागले आहे. सीमेवरील दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाया, …

इराक युद्ध आणि जागतिक व्यवस्था

१९९१ मध्ये पश्चिम आशियात पहिले आखाती युद्ध भडकले. इराकने आपल्या दक्षिणेकडे असलेल्या कुवैत नावाच्या टीचभर देशावर हल्ला करून तो प्रदेश गिळंकृत केल्याचे निमित्त झाले, आणि अमेरिकाप्रणीत आघाडीने इराकवर हल्ला करून कुवैतला मुक्त केले. दोन महिन्यांपूर्वी याच प्रदेशात दुसरे आखाती युद्ध झाले. इराककडे सर्वसंहारक शस्त्रास्त्रे (weapons of mass destruction), म्हणजे अण्वस्त्रे, रासायनिक अस्त्रे, जैविक अस्त्रे प्रचंड …

११ सप्टेंबर आणि भारतापुढील पर्याय

११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवादाने अमेरिकेत हाहाकार उडवून दिला. अमेरिकेच्या आर्थिक सामर्थ्याचा मानबिंदू असलेले जागतिक व्यापार केंद्र आणि लष्करी सामर्थ्याचे मानबिंदू पेंटॅगॉन, हे दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य बनले. कॅपिटॉल हॉल आणि राष्ट्राध्यक्ष निवास हे राजकीय सामर्थ्याचे मानबिंदू या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. तालिबानच्या आश्रयास असलेला ओसामा बिन लादेन हा या हल्ल्यांमागील प्रमुख सूत्रधार असल्याचे अमेरिकेने घोषित केले. …

अमेरिका, रशिया आणि भारत

यावर्षी मार्च महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन भारतात येऊन गेले. तर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताला भेट दिली. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीचा एक वर्षाहूनही कमी काळ राहिला असताना क्लिंटन भारतात आले. तर अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर एक वर्ष व्हायच्या आतच पुतिन भारतात आले. दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या भेटीला समान महत्त्व देण्याचा सरकारी पातळीवरून आटोकाट …

चर्चा -खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?

ऑगस्ट ९४ च्या सुधारकातील “खरी स्त्रीमुक्ती कशात आहे” या लेखाद्वारे स्त्रीमुक्तीच्या संदर्भातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावरील चर्चेस सुरुवात केल्याबद्दल दिवाकर मोहनी यांना धन्यवाद. या लेखात व्यक्त करण्यात आलेली काही मते अधिक स्पष्ट व्हावयास हवी होती, असे वाटते. उदा. मोहनींनी स्त्रीपुरुष संबंधाच्या संदर्भात पुढील दोन मुद्दे मांडले आहेत – (अ) स्त्रीपुरुषांना लैंगिक संबंधाचे स्वातंत्र्य असावे, (ब) एकपतिपत्नीव्रत …