राजीव कालेलकर - लेख सूची

मार्क्सवाद आणि संस्कृती

मार्क्सवाद म्हणजे खरे तर शास्त्रीय समाजवाद. त्याचा आणि संस्कृतीचा घनिष्ठ संबंध आहे. मार्क्सने माणसाची व्याख्याच स्वतःला आणि जगाला निर्माण करणारा, अशी केली आहे. निर्मिती ही सर्जनशील गोष्ट आहे. त्यामुळे मार्क्सवादात किंवा शास्त्रीय समाजवादात माणूस सर्जनशील आहे हे गृहीतकच आहे. दि. के. बेडेकर म्हणतात, माणूस हा केवळ समाज-क्रांतिकारक किंवा तर्कशास्त्र- निर्माता नाही तर तो दिव्यकथा-निर्माता, प्रतीक-निर्माताही …

भांडवलशाही टिकते कशी?

एकोणिसाव्या शतकात युरोपात सुरू झालेली भांडवलशाही, विसावे शतक संपता संपता केवळ युरोपीय देशातच नव्हे, तर सर्व खंडांत, सर्वनैव नांदू लागली. खऱ्या अर्थाने ती जागतिक अर्थव्यवस्था झाली. भांडवलशाही ही अर्थव्यवस्था म्हणून राष्ट्राच्या सीमा ओलांडणार व जागतिक होणार हे मार्क्सने आधीच लिहून ठेवले आहे. तेव्हा प्रश्न भांडवलशाही जागतिक होण्याचा नाही, तर ती इतक्या वेळा अरिष्टात सापडूनही त्यातून …

मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी यांच्यातील संवाद

आज आपण २१ व्या शतकात जागतिक भांडवलशाहीच्या अवस्थेत जगत आहोत. आज प्रचंड प्रमाणात महागाई, मोठ्या प्रमाणात बेकारी, रुपयाची कमालीची घसरण, त्याबरोबरच राजकारणाचे गुन्हेगारीकरण, रोज होणारे खून, अपघात, घातपात, बलात्कार, दलित, अल्पसंख्यक व दुर्बल घटक ह्यांवर अत्याचार, अशी परिस्थिती आहे. धनदांडगे, बिल्डर लाबी, वाळू माफिया, अंडरवर्ल्ड आणि देशी-परदेशी भांडवलदार आणि व्यापारी हे सारे आपल्यावर राज्य करत …

हिंसाचार व मार्क्सवाद

गेल्या महिन्यात छत्तीसगडमध्ये जे हत्याकांड झाले, ते माणुसकीला काळिमा फासणारे होते. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. हिंसाचार आणि दहशतवादाचे समर्थन होऊच शकत नाही. छत्तीसगडमधील हिंसाचार भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी लेनिनवादी) – यांना माओवादी किंवा नक्षलवादी असेही म्हणतात – यांनी केला असल्यामुळे साधारणपणे समाजात हे कृत्य मार्क्सवाद मानणाऱ्या, माओत्सेतुंग विचाराच्या, स्वतःला मार्क्सवादी लेनिनवादी (नक्षलवादी) म्हणवून …

स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, आणि मार्क्सवाद

मार्क्सवादाविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यापैकी एक म्हणजे मार्क्सवादात किंवा साम्यवादी राज्यकर्ता असलेल्या देशात व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य नसते. मार्क्सवाद हा लोकशाहीविरोधी आहे; असे मत होण्याला अर्थात काही कारणे आहेत. काही मार्क्सवाद्यांच्या भूमिकाही त्याला कारणीभूत आहे. एका विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत अप्रगत अशा भांडवली देशात म्हणजे रशियात क्रांती झाली. तिकडे झारशाही होती. भांडवली लोकशाही नव्हती. प्रगत भांडवली देशात पहिली …

भांडवलशाही आणि मार्क्सवाद

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस युरोपात भांडवलशाहीचा उदय झाला. तेव्हापासून तिच्याविरुद्ध निरनिराळे मतप्रवाह समाजात प्रचलित आहेत. युरोपातील भांडवलशाहीने सरंजामशाहीशी मोठा लढा दिला. औद्योगिक क्रांती होऊन नवीन उत्पादनपद्धती प्रचलित झाल्यानंतर अर्थव्यवस्थेच्या नाड्या भांडवलदारांच्या हातात आल्या व त्यांना राज्यसत्ता ताब्यात घेण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. तेव्हा त्यांनी केलेली पहिली गोष्ट म्हणजे गुलामांची मुक्तता. त्यांना गुलामांबद्दल प्रे होते म्हणून नव्हे, तर …