शर्मिला वीरकर - लेख सूची

मन, मेंदू आणि सर्ल

‘न्यूरोसायन्स’ किंवा ‘मेंदू-विज्ञान’ ह्या क्षेत्रात झपाट्याने जे नवे शोध लागत आहेत, त्यांची दखल तत्त्वज्ञान घेते का, असा प्रश्न जेव्हा ऐकला, तेव्हा नजरेसमोर नाव आलेते सर्ल यांचे. अर्थात जे. जे. सी. स्मार्ट, डेनेट, चर्चलन्ड, डेव्हिडसन, नागेल ही नावेही नजरेआड करता येणारी नाहीत; पण ‘चायनीज रूम आर्युमेंट’ मांडणाऱ्या सर्ल यांचे नाव ठळकपणे नजरेत भरते. वैज्ञानिक दृष्टी ढळू …

आय.सी.एस.ई.-इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह स्टिम्युलेटिंग एज्युकेशन?

मागील वर्षीचे पर्सेंटाईल सूत्र, ह्या वर्षीचे ९०:१० च्या कोट्याचे प्रकरण, तसेच कपिल सिबलांची वक्तव्ये विचारात घेता मुळात प्रत्येक बोर्डाची अंगभूत वैशिष्ट्ये समजून घेणे गरजेचे आहे. आय.सी.एस.ई.बोर्ड विविध इयत्तांमध्ये गणित, भाषा, विज्ञान आदि विषयांची हाताळणी कशा प्रकारे करते, हे जवळून पाहायची संधी मिळाल्याने गेली बारा वर्षे मला जाणवलेल्या वैशिष्ट्यांवर प्रकाशझोत टाकत आहे. माझा अनुभव सार्वत्रिक असेल, …

पुस्तक परीक्षणः ‘ऑपरेशन यम्’ एकविसाव्या शतकाची कादंबरी

‘ऑपरेशन यमू’ ही मकरंद साठेलिखित अवघ्या एकशेसहा पानांमध्ये आटोपणारी कादंबरी हाती आली नि एक अप्रतिम कादंबरी वाचल्याचे अपूर्व समाधान देऊन गेली. “ही खरीखुरी एकविसाव्या शतकाची कादंबरी आहे” अशा शब्दात महेश एलकुंचवारांनी मलपृष्ठावर तिचा गौरव केलेला दिसतो. निवेदिका ललिता नि तिचा मित्रपरिवार एकविसाव्या शतकातील जिणे जगतात. ललिता एका दूरचित्रवाणीची वार्ताहर आहे (वय वर्ष बेचाळीस). प्रत्येक घटनेत …

राष्ट्रीय विद्यापीठे

भारतात केंद्रीय तसेच राष्ट्रीय विद्यापीठे सुरू होणार असल्याचे वृत्त १९ ऑगस्टच्या लोकसत्ते त (पृ.२) वाचले, आणि आठवण झाली डॉ. वीणा पुनाचा यांची. देशात चौदा नवीन राष्ट्रीय विद्यापीठे स्थापन करण्याला त्यांचा तसेच डॉ. वीणा मजुमदार, डॉ. सुकांता चौधरी इत्यादी अन्य मान्यवरांचा तत्त्वतः विरोध नसला, तरी समाजात होऊ घातलेल्या बदलांची दखल घेऊन त्यावर विचारमंथन होणे अवश्य आहे, …

मे. पुं. रेगे : स्मृतिसभा

२८ डिसेंबरला (मे. पुं.) रेगेसरांच्या स्मृतिदिनी परममित्र प्रकाशनाने प्राज्ञ पाठशाळेच्या सहकार्याने दिवसभराचा कार्यक्रम आयोजित केला आहे, व त्या निमित्ताने अनेक मान्यवर रेगेसरांविषयी बोलणार आहेत, हे कळायचाच अवकाश, की जाणे निश्चित केले. परतले, ती अतीव समाधानाने, कार्यक्रम संपल्यावरही भैरवीचे सूर मनात रेंगाळतच राहिले. प्रास्ताविकानंतर प्रा. मिलिंद मालशे ह्यांनी सरांच्या व्यावसायिक जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. केवळ …

मुंबई मेरी जान’

‘डोंबिवली फास्ट’सारखा चांगला सिनेमा पाहायला मिळेल, एवढ्याच अपेक्षेने ‘मुंबई मेरी जान’ पाहायला गेलो नि एक अप्रतिम सिनेमा पाहिल्याचे समाधान घेऊन परतलो. हल्लीच्या मल्टिप्लेक्समध्ये पूर्वीप्रमाणे एक नि एकच सिनेमा दाखवत नाहीत म्हणून.. नाहीतर, तिथल्या तिथे बसून पुन्हा, वेगळ्या दृष्टीने, पाहावेत अशा सिनेमांची वानवा असताना अशा एखाद्या सिनेमाचा लाभ म्हणजे पर्वणीच. योगेश विनायक जोशी नि उपेंद्र सिधयेंनी …

पुस्तक-परीक्षण एक होता कारसेवक

एक होता कारसेवक ही अभिजित देशपांडे यांनी सांगितलेली त्यांच्यातील कारसेवकाची कहाणी आहे. ६ डिसेंबर १९९२ च्या उन्मादी कारसेवेत अभिमानपूर्वक सहभागी होऊन मशीद पाडणारा हा कारसेवक ज्यावेळी अयोध्येहून परतला, त्यावेळी पेटलेला देश पाहून पुरता हादरला, नि तेथून सुरू झाला त्याचा अजूनही न संपलेला वैचारिक प्रवास. आपण ज्यासाठी अयोध्येला गेलो होतो, ते हेच होते का ? यातून …

फायनल ड्राफ्ट

मी मांसकांची ग्रंथतात्पर्यनिर्णयपद्धती वर्गात शिकवली नि त्याच दिवशी फायनल ड्राफ्ट नाटक पाहिले. कदाचित त्यामुळे मीमांसकांनी दिलेल्या सात कसोट्यांच्या आधारे नाटकाचे मूल्यमापन करण्याचा मोह झाला. उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, अर्थवाद, उपपत्ती व फल ह्या सात कसोट्या ग्रंथांचे तात्पर्य ठरविण्यासाठी वापरता येतात. ग्रंथांप्रमाणेच एखाद्या नाटकाचे तात्पर्य ठरविण्यासाठीही त्यांचा वापर करता येईल. सुरूवात (उपक्रम) व शेवट (उपसंहार) यांचा …

डॉ. लागू-एक ‘लमाण’?

‘लमाण’ नुकतेच प्रसिद्ध झाले. रूढार्थाने ज्याला आत्मचरित्र म्हटले जाते, तसे प्रस्तुत ग्रंथाचे स्वरूप नसून ‘मनोगता’त म्हटल्याप्रमाणे त्यांच्या एकूण नाट्यप्रवासाचा तो धावता आढावा आहे. आपले खाजगी जीवन चित्रित करण्यात लेखकाला स्वारस्य नाही. साडेतीनशेहून अधिक पृष्ठसंख्या असलेल्या ह्या पुस्तकात कौटुंबिक उल्लेख अपवादात्मकच आहेत. नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यावसायिक जीवन शब्दबद्ध करण्यासाठी, सुहृदांच्या आग्रहानुसार ‘लमाण’ची निर्मिती झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या …