संपादक-१९९४ - लेख सूची

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक,स.न.वि. वि.आजचा सुधारक नोव्हेंबर ९४ च्या अंकातील स्त्रीपुरुषसमता व स्त्रीमुक्तीसंबंधी सर्वेक्षण’ या संबंधातील डॉ. र.वि. पंडित यांची प्रश्नावली वाचली. डॉ. पंडित कोणत्या कालखंडात वावरत आहेत?आज २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर खरोखरी सुखवस्तु मध्यमवर्गीय, विशेषतः ब्राम्हण, समाजात पुरुषमुक्तीची गरज आहे. परंतु या बटबटीत वास्तवाकडे कोणीच लक्ष देत नाही ही खेदाची बाब आहे. विवेकवाद वास्तवाकडे डोळेझाक …

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक स.न. ‘अंधश्रद्धानिर्मूलन आणि धर्म या लेखामधून मधून तुम्ही ‘अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांना धर्मविरोध करावाच लागेल असे प्रतिपादिले आहे. गेल्या ७ वर्षातल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला काही मते नोंदवावीशी वाटतात. हिंदू म्हणून समजल्या जाणार्या. इथल्या समाजात हिंदू धर्माची समजली जाणारी मूळ बैठक आणि धर्मग्रंथ एकीकडे, आणि विचित्र/विकृत कर्मकांड आणि भ्रष्ट धर्मग्रंथ दुसरीकडे अशी …

पत्रव्यवहार

संपादक,आजचा सुधारक,स.न.वि.वि. जून ९४ च्या अंकांतील श्री. वर्हारडपांडे ह्यांचा लेख आणि जुलै ९४ च्या अंकांतील श्री. देशपांडे आणि मोहनी ह्यांचे लेख मला खूप आवडले. ना. सी. फडके ह्यांची भाषा सोपी होती. देशपांडे ह्यांची पण तशीच आहे. मोहनींनी त्यांच्या भाषेचा बोचरेपणा कमी का केला? त्यांनी बोचरे पणानेच लिहावे.‘आज सर्व धर्माचा आढावा घेतला तर हिंदू धर्मच बरा …

पत्रव्यवहार

श्री. सम्पादक आजचा सुधारक यासस.न.वि.वि.ऑगस्ट ९४ च्या आजच्या सुधारकमध्ये श्री. पळशीकर ह्यांचे ‘निसर्गाकडे परत चला ह्या मथळ्याखाली आजचा सुधारकमध्ये दिलेल्या अवतरणाविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त – करणारे पत्र प्रसिद्ध झाले आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी रसेल यांचे “अडाणीपण” वऔद्धत्य” वरील अवतरणात व्यक्त झाले आहे असा आरोप केला आहे. वस्तुतः पळशीकरांच्या प्रतिक्रियेवरून त्यांचा रसेलच्या विचारांशी फारसा परिचय नाही व …

चर्चा – अंधश्रद्धानिर्मूलन आणि धर्म

(१) मा. संपादक “आजचा सुधारक स.न.वि.वि. अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्म” या आपल्या जुलैच्या अंकातील लेखानिमित्ताने हे पत्र. (याच विषयी मी आपल्याला पूर्वीही एक पत्र लिहिले होते जे प्रसिद्धीसाठी नव्हते.) मी आजचा सुधारकचा नियमित वाचकव उत्साही प्रचारक आहे हे आपल्याला ठाऊकआहेच. आपल्याविषयी संपादक म्हणून माझ्या मनात आदराची भावना आहे. परंतु आपला हा लेख वाचून मात्र प्रथमच …

संपादकीय

आमच्याकडे गेल्या महिन्यामध्ये दोन महत्त्वाची पत्रे आली. दोन्ही आमच्या चांगल्या मित्रांची आहेत. त्यांपैकी एक श्री. ग. य. धारप ह्यांचे; ते जुलै अंकात प्रकाशित झाले आहे. त्यानंतर आमच्याकडे पोचलेले, पण त्याहून महत्त्वाचे पत्र आहे श्री. वसंतराव पळशीकरांचे. ह्या दोन पत्रांच्या निमित्ताने आमच्या संपादकीय धोरणाचा आम्हाला पुनरुच्चार करावा लागणार आहे. श्री. धारप ह्यांच्या पत्राचा परामर्श घेण्याच्या अगोदर …

पत्रव्यवहार

स.न.वि. वि. ‘आजचा सुधारक’ च्या जून ९४ च्या अंकात प्रा. श्री. गो. काशीकर यांचे सातारच्या विचारवेध संमेलनाविषयी एक पत्र प्रकाशित झाले आहे. त्यातील सर्व मुद्द्यांचा परामर्श येथे घेत नाही. त्यांच्या शेवटच्या वाक्याविषयी थोडेसे लिहितो. ते वाक्य असे, “एकंदरीत हे विचारवेध संमेलन विचारवेधाऐवजी विचारवध करणारे व विकारव्याधी जडलेले संमेलन झाले, असे खेदाने म्हणावे लागेल.” प्रा. काशीकरांच्या …

पत्रव्यवहार

प्रा. दि. य. देशपांडे यांस,स. न. वि. वि.आपले दिनांक १२ एप्रिल, ९४ चे पत्र आणि त्यासोबतचे देवदत्त दाभोलकर यांचे पत्र मिळाले. प्रा. दाभोलकरांचे पत्र आजचा सुधारक या मासिकाच्या ताज्या अंकातही प्रकाशित झालेले आहे. आपल्या पत्रास ताबडतोब उत्तर पाठवू शकलो नाही याबद्दल क्षमस्व.(१) “सुधारकाचे सर्व अंक उपलब्ध नाहीत हे सीतारामपंत देवधर यांचे म्हणणे खरे आहे.(२) ३० …

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, स. न. वि. वि. श्री. के. रा. जोशींचा “संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ” हा लेख संभ्रमात टाकणारा आहेच, शिवाय त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय निर्माण करणारा आहे. पहिल्या भागात त्यांनी केलेले “शौच” चे आंतर-बाह्य स्वच्छता हे भाषांतर मनुस्मृतीतीलआशौच” या शब्दापासून बरेच दूरचे आहे. आशौच ही धार्मिक (religious) क्रिया असून त्याचा शिवाशिवाशी (स्पर्शजन्य विटाळ) …

पत्रव्यवहार

संपादक आजचा सुधारक ह्यांस, आपल्या मार्च ९४ च्या अंकांतील प्रा. प्र. ब. कुळकर्णी ह्यांनी लिहिलेला ‘गोमंतकातील रथोत्सव’ हा लेख वाचून एक-दोन गोष्टी सहज लक्षात आल्या. (१) मराठी माणसे (व-हाडातली काय, पश्चिम महाराष्ट्रातील काय) मराठीसाहित्याभिमुख झाली आहेत किंवा होत आहेत हा कुळकर्ण्यांचा आशावादी विश्वास फार मोहवणारा आहे ह्यात शंका नाही. वर्हामडाचे मला काही सांगता यायचे नाही, …

पत्रव्यवहार

संपादक आजचा सुधारक यांस, स. न. वि. वि. श्री. प्रमोद सहस्रबुद्धे यांनी ‘मनस्मृती व विवेक’ (आजचा सुधारक, फेब्रु. ९४) या लेखात म्हटले आहे त्याप्रमाणे मनुस्मृतीचा त्याग करणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच तिचा विसर न पडू देणे हेही महत्त्वाचे, कारण तिच्यासंबधीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पुनरुज्जीवनवादी शक्ती तिच्या समर्थनार्थ पुढे येत राहतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पण त्याकडे …