मासिक संग्रह: डिसेंबर, १९९१

संपादकीय – फाटलेले आभाळ ?

श्री दिवाकर मोहनी यांचे आम्हाला आलेले एक पत्र आम्ही अन्यत्र छापले आहे. त्यांनी त्या पत्राद्वारे एका अत्यंत गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाला भ्रष्टाचाराची जी लागण झाली तिची तीव्रता गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे सतत वाढतच आहे, आणि आज जीवनाचे एकही क्षेत्र असे राहिलेले नाही की जे भ्रष्टाचारामुळे किडलेले नाही. राजकारण आणि व्यापार ही भ्रष्टाचाराची पारंपारिक क्षेत्रे. पण आता शासन आणि शिक्षण यातही हे विष बेसुमार शिरले आहे. आजची तरुण पिढी या वाढत्या भ्रष्टाचाराच्या वातावरणात लहानाची मोठी झाली असल्यामुळे तिच्या ते पूर्ण अंगवळणी पडले आहे, आणि त्यात काही अनिष्ट आहे अशी जाणीवही तिला नाही.

पुढे वाचा

वास्तव देवकल्पना

वास्तव देवकल्पना
एकटा देवधर्म घेतला आणि त्याकडे पाहू गेले तर, कातकरी पिशाचपूजक होता, यहुदी, मुसलमान व ख्रिस्ती मनुष्याकार एकदेवपूजक होते, पारशी अग्निपूजक ऊर्फ पंचभूतांपैकी एका भूताचा पूजक होता, आणि हिंदू पशुपक्षिमनुष्याकार अनेकदेवपूजक असून शिवाय अग्न्यादिपंचभूते, पिशाच्चे, एकदेव, झाडे व दगड, ह्यांचा भक्त होता, इतकेच नव्हे तर स्वतःच देव, ईश्वर व ब्रह्मही होता. देव एक हे जितके खरे तितकेच ते कोट्यवधी आहेत हेही खरे असल्यामुळे, म्हणजे दोन्ही कल्पना केवळ बागुलबोवाप्रमाणे असत्य असल्यामुळे, कातकरी, यहुदी, मुसलमान, पारशी, ख्रिस्ती व हिंदू हे सारेच अनेक निराधार व अवास्तव कल्पनांच्या पाठीमागे धावत होते व आपापल्या कल्पनांचा अनिवार उपभोग घेण्यात सौख्य मानीत होते.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

पत्रव्यवहार
संपादक, आजचा सुधारक स.न.वि.वि.
तमचा “धर्मनिरपेक्षता” अंक मिळाला. त्यात अनेक व्यासंगी विद्वानांचे लेख आले आहेत. त्यात डावे उजवे आहेत. तरी त्यांच्यांत आगरकर यांचा बुद्धिप्रामाण्यवाद गोमारोमातून भिनलेला दिसत नाही. कारण ते सर्वजण हिंदूंच्या सहिष्णुतेची अपरंपार स्तुती करताना दिसतात.
वास्तविकरीत्या जगाच्या इतिहासावरून हे स्पष्ट होते की जेते अत्याचार करतात आणि हिंदु जेते कधीच नव्हते. नवराबायको या जोडीमध्येसुद्धा हुशार जो असतो किंवा अर्थार्जन करतो तो दुसऱ्यावर कुरघोडी करतो, स्त्रियांनी पुरुषावर केलेल्या कुरघोडीची अनेक उदाहरणे आहेत.
पुराणकाळी खांडववन जाळणे किंवा नागांची हत्या करणे अशा अनेक गोष्टी जेत्यांनी केलेल्या आहेत.

पुढे वाचा

सेक्युलॅरिझम आणि भारत – लेखांक पहिला

एप्रिल १९९१ च्या ‘आजचा सुधारक’च्या अंकात ‘धर्मनिरपेक्षता : काही प्रश्न‘ या विषयावरील परिसंवादासाठी काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्या संदर्भात प्रस्तुत लेख लिहीत आहे. प्रश्नावलीतील मुद्द्यांना तुटक तुटक उत्तरे देण्याऐवजी सेक्युलॅरिझम या संकल्पनेचा उद्गम कोणत्या परिस्थितीत झाला, या संकल्पनेचा मध्यवर्ती आशय कोणता, ही संकल्पना कोणत्या मागनि विकसित होत गेली आणि मुख्यतः भारतात तिला कोणते स्वरूप आले. भारतातील धार्मिक संघर्षाची समस्या सोडविण्यात ही संकल्पना पूर्णपणे यशस्वी का होऊ शकली नाही, सेक्युलॅरिझम ही संकल्पनाच येथील परिस्थितीच्या संदर्भात सदोष आहे की शासन आणि विविध राजकीय पक्ष यांच्या चुकीच्या धोरणामुळे सेक्युलॅरिझमची यशस्वी अंमलबजावणी होऊ शकली नाही यासारख्या प्रश्नांची चर्चा केल्यास प्रश्नावलीतील बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १६)

लोकसंख्या
‘विवाहाचे प्रमुख प्रयोजन म्हणजे पृथ्वीवरली मानवाची संख्या भरून काढणे, काही विवाहव्यवस्थांत हे प्रयोजन अपुऱ्या प्रमाणात साधले जाते, तर काही जास्तच प्रमाणात ते पुरे करतात. या प्रकरणात मी लैंगिक नीतीचा विचार या दृष्टिकोणातून करणार आहे.
व नैसर्गिक अवस्थेत मोठ्या सस्तन प्राण्यांना जिवंत राहण्याकरिता दरडोई बराच मोठा भूभाग लागतो. त्यामुळे मोठ्या सस्तन प्राण्यांच्या कोणत्याही जातीत प्राणिसंख्या अल्प असते. मेंढ्या आणि गाई यांची संख्या बरीच मोठी आहे; पण त्याचे कारण मनुष्याचे कर्तृत्व. मनुष्याची संख्या अन्य कोणत्याही मोठ्या प्राण्यांच्या तुलनेने प्रमाणापेक्षा फारच जास्त आहे.

पुढे वाचा

विवेकवाद – १८

नैतिक मूल्यांविषयी आणखी थोडेसे

आजचा सुधारक च्या नोव्हेंबर १९९१ च्या अंकात नागपूर येथे भरलेल्या एका वाचक मेळाव्याचा वृत्तांत आला आहे. त्यात झालेल्या चर्चेचे संचालन आमचे मित्र प्रा. अ.ना. लोथे यांनी केले. त्यांनी प्रारंभीच काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्या अनुषंगाने चर्चा व्हावी असे सुचविले. वेळेच्या अभावी त्यांपैकी काही प्रश्नांना मी संक्षेपाने उत्तरे दिली, परंतु त्यांचा पुरेसा विस्तार मला करता आला नाही, प्रा. लोथे यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे असल्यामुळे, आणि ते अन्यही अनेकांच्या मनात उपस्थित झालेले असणार असे वाटल्यावरून त्यांची काहीशी सविस्तर चर्चा करण्याचे येथे योजले आहे.

पुढे वाचा