मासिक संग्रह: नोव्हेंबर, १९९३

वृत्त आणि विवेक

एन्.टी. रामाराव यांचे लग्न ही मोठीच खबर आहे. राष्ट्रीय आघाडी आणि तेलगू देसम् या राजकीय पक्षांचे अध्यक्ष, आंध्राचे माजी मुख्यमंत्री असे हे बडे प्रस्थ आणि मुख्य म्हणजे त्यांचे (जवळपास ‘अवघे पाऊणशे वयमानं’. असे असताना त्यांनी ३६ वर्षाच्या घटस्फोटिता लक्ष्मी शिवपार्वती या आपल्या चरित्र – लेखिकेशी दुसरे लग्न केले आहे. सदान्कदा भगवे कपडे परिधान करून स्वामी विवेकानंदांची मधून मधून आठवण द्यायला ते विसरत नसत. या प्रौढा- वृद्धविवाहाने त्यांची प्रतिमा आणि निवडणुकीच्या मोसमात मते खेचण्याचे सामर्थ्य यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याची त्यांना जाणीव नसेल असे कोण म्हणेल ?

पुढे वाचा

विवाह संस्था आणि स्त्री

प्रश्न : विवाहसंस्था नष्ट झाली तर मुलांचा प्रश्न निर्माण होईलही; पण स्त्रियांचा तरी विकास होईल का ?

गीता साने: हो, विवाहसंस्था नष्ट झाली तर स्त्रीवरच्या जबाबदाऱ्या कमी होतील आणि विकास होईल. आज बायकांना हे करावसं वाटतं, ते करावस वाटतं, पण जमत नाही. उर्मी एकदा निघून गेली की गेली! हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. माझ्यासारख्या बाईचं सुद्धा मुलं लहान असताना हेच झालं. पण मुलींची जबाबदारी समाजावर व्यवस्थितपणे सोपवून मगच विवाहसंस्था नष्ट करता येईल. दुसरं असं की, बाईला कुणा पुरुषाचं आकर्षण वाटलं की आज समाज तिला धारेवर धरतो.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक,आजचा सुधारक यांस स.न.वि.वि. आपल्या मासिकाच्या ऑगस्ट १९९३ च्या अंकात श्री. शांतिलाल मुथ्था ह्यांचा ‘समाजातील मुलींची घटती संख्या: कारणमीमांसा व उपाययोजना’ ह्या शीर्षकाचा लेख व त्यावरील श्री. दिवाकर मोहनी ह्यांचे भाष्य वाचावयास मिळाले. श्री. मुथ्था ह्यांची चिंता सार्थ आहे व त्यांनी केलेली कारणमीमांसा व सुचविलेली उपाययोजनाही बुद्धीला पटणारी आहे. पण श्री. मोहनींनी ह्या संदर्भात व्यक्त केलेले विचार मात्र तर्कसंगत वाटले नाहीत.

मूळ प्रश्नाचा विचार करणे व त्यावर उपाय कोणते करावेत ह्याचा शोध घेणे सोडून, श्री. मोहनी ‘पुरुषांकडून स्त्रियांची होणारी छेडखानी’ ह्या विषयाकडे वळले आहेत.

पुढे वाचा

नागपूरपासून दूर – मागे, मागे

सध्याची पंचायत समिती, ‘राष्ट्रीय विस्तार योजना’ या दुर्बोध नावाने जन्माला आली. चारपाच वर्षांत तिचेच ‘सामूहिक विकास योजना’ असे नामांतर झाले. आणि तिला सध्याचे नामरूप येऊनही आता तीस वर्षे उलटली आहेत. या विकास योजनेत मी उमेदीची सहासात वर्षे घालवलेली. मधूनच जुने सोबती भेटतात. कुणी मोठ्या पदापर्यंत पोचलेले असतात. असेच एकदा जोशी भेटले. मी उत्सुकतेने विचारले, ‘खेड्यांचे चित्र आता पार पालटले असेल नाही ?’ माझा आशावाद पाहून म्हणाले, ‘मेड इन इंडिया वाचली का ? आपल्या अकोल्याच्या पुरुषोत्तम बोरकरची ती कादंबरी वाचा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.’

पुढे वाचा

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ८)

उद्गमन (Induction)

सहाव्या प्रकरणात आपण विधानांचे दोन प्रमुख प्रकार पाहिले. ते म्हणजे (१) विश्लेषक- अवश्य-प्रागनुभविक विधाने आणि (२) संश्लेषक आयत्त-आनुभविक विधाने. त्याआधी तिसऱ्या प्रकरणात आपण निगामी आणि उद्गामी अनुमानप्रकारांची ओळख करून घेतली होती. आता या प्रकरणात विधानांच्या वरील विभाजनाच्या साह्याने निगामी व उद्गामी अनुमानप्रकारांचे स्वरूप अधिक विस्ताराने समजाऊन घेऊ.

‘उद्गमन’ हा शब्द काहीसा शिथिलपणे वापरला जातो. त्याच्या प्रमुख अर्थी त्याने निगमनाच्या पूर्ण विरुद्ध प्रकारच्या अनुमानाचा बोध होतो. निगमन हा अनुमानप्रकार पूर्णपणे निर्णायक आहे, हे आपण पाहिले आहे. त्याला ‘demonstrative inference’ म्हणजे सिद्धिकारक (सिद्धिक्षम) अनुमान असेही म्हणतात, कारण त्याची साधके जर सत्य असतील तर वैध निगमनाचा निष्कर्ष अवश्यपणे सत्यच असतो.

पुढे वाचा

फलज्योतिषावर शोधज्योत

फलज्योतिष हे एक शास्त्र आहे असा अनेक लोकांचा विश्वास असतो. त्याचे उदाहरण म्हणून कधी काळी कोणीतरी सांगितलेले खरे ठरलेले भाकित लोक सांगतात. पण त्यानेच किंवा इतरांनी सांगितलेली शेकडो चुकीची ठरलेली भाकिते ते सोइस्करपणे विसरून जातात. वास्तविक खरेपणा खोटेपणा ठरविण्यासाठी खरी आणि खोटी दोन्ही भाकिते लक्षात घेतली पाहिजेत.

फलज्योतिष सांगण्याच्या अनेक पद्धती आहेत. पाश्चात्य, भारतीय, चिनी इ. त्यांत एकवाक्यता नाही. भारतीय पद्धतीचा विचार केला तरी तिच्यातील सायन-निरयन वाद, दशांचे प्रकार, नक्षत्रपुंज आणि त्यांचे प्रदेश – या व अशा अनेक तपशिलातील विरोधाभास श्री रिसबूड यांनी १९९१ मध्ये लिहिलेल्या फलज्योतिष काय आहे व काय नाही या पुस्तकामध्ये अतिशय सुबोध रीतीने स्पष्ट करून दाखविला आहे.

पुढे वाचा

खुळा प्रश्न

सगळ्या विश्वात बातमी पसरली की प्रश्नांची उत्तरं देणारं एक यंत्र निघालं आहे. यंत्र कुणी घडवलं, कसं घडवलं, काही माहीत नाही. यंत्राबद्दलची माहिती विश्वातल्या सर्व सुजाण जीवांना कशी कळली हेही माहीत नाही. फक्त येवढंच कळलं, की कोणताही योग्य आणि नेमका प्रश्न विचारा, आणि प्रश्नोत्तरयंत्र तुम्हाला उत्तर देईल. सोबत पत्ताही होता.

तरुण सेवकानं वृद्ध शास्त्रज्ञाला रॉकेटच्या खुर्चीत बसवलं. म्हणाला, “चला. प्रश्नोत्तर यंत्राकडे नेतो तुम्हाला. काय विचारायचं ते ठरवलं असेलंच, ना ?” शास्त्रज्ञ म्हणाला, “ हो तर ! दोनच प्रश्न, जीवन म्हणजे काय ?

पुढे वाचा

समान नागरी कायदा

६ डिसेंबर १९९२ ला धर्माच्या नावाखाली उसळलेल्या जातीय दंगली व हिंसाचारामुळे, स्त्री-संघटनांनी समान नागरी कायद्याच्या मागणीचा प्रश्न पुन्हा एकदा जोराने धसास लावण्याचा निर्णय ८ मार्चच्या निमित्ताने घेतला आहे. धार्मिक शक्तींनी सामाजिक जीवनावर जर वर्चस्व गाजवले तर त्याचा पहिला बळी ठरणार आहेत स्त्रिया! आणि म्हणूनच धर्माचे समाजातील स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने समान नागरी कायद्याच्या प्रश्नांची सांगोपांग चर्चा करणे सद्यःपरिस्थितीत महत्त्वाचे ठरते. वास्तविक समान नागरी कायद्याचा प्रश्न आज काही प्रथम चर्चेला आलेला नाही. परंतु तरीही समान नागरी कायदा म्हणजे काय? तो आणणे का जरुरीचे आहे?

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक, यांना स.न. वि मुस्लिम समाजाचे मन वळवण्यासाठी म. गांधींनी अनुसरलेला मार्गच आजही आवश्यक आहे अशी श्री. पळशीकरांची श्रद्धा आहे. ऑगस्ट १९९३ अंक, पृष्ठ १३७ वर त्यांनी काहीशा डौलाने प्रश्न विचारला आहे की, “सनातन धर्माच्या कोणत्या तत्त्वानुसार मुस्लिम समाजाचे मन वळवण्याचे कोणते प्रयत्न झाले, त्या प्रयत्नांना अपयश का आले, व अपयशाची जबाबदारी सर्वस्वी मुस्लिम समाजावर कशी ?” या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी देत नाही, पण एक अवतरण देतो. नोव्हेंबर – डिसेंबर १९९२ अंक, पृष्ठ २६९, शेवटचा परिच्छेद यात श्री.

पुढे वाचा