मासिक संग्रह: मार्च, १९९५

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक,
स. न. वि. वि. आजचा सुधारक डिसेंबर ९४ च्या अंकातील माझ्या पत्रावर व प्रत्रातील कवितेवर सर्वेक्षणाचे प्रवर्तक डॉ. र. वि. पंडित व अमरावतीच्या सत्यबाला माहेश्वरी अशा दोघांच्या जानेवारी ९५ च्या अंकात आलेल्या प्रतिक्रियात त्यांनी बरेच आक्षेप घेतले आहेत. तसेच दोघांनीही बरेच असंबद्ध (irrelevant) मुद्दे उपस्थित केले आहेत. उदा. डॉ. पंडित यांनी स्वतःच्या विज्ञाननिष्ठेविषयी दिलेली ग्वाही. या दोघांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर देत बसल्यास उत्तर खूपच लांबलचक होईल. म्हणून प्रतिक्रियेतील त्या दोघांच्या असंबद्ध मुद्द्यांसकट सर्व मुद्द्यांचा थोडक्यात परामर्श घेत आहे.

पुढे वाचा

ईश्वर, धर्म आणि अंधश्रद्धा

आगरकरांच्या अज्ञेयवादी भूमिकेतून ईश्वरावरील श्रद्धा अप्रमाणितच असते – असिद्धचअसते. आगरकर हे समाजसुधारक असल्याने समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा यांच्यावर त्यांनी सातत्याने प्रहार केले. सती, बालविवाह, बळी देण्याची प्रथा, शिमगा यांपासून तो स्त्रियांचे पोषाख, मृतासंबंधीचे विधि इत्यादि विषयांवर त्यांनी लिखाण केले. सर्वसाधारणपणे समाजासंबंधीचे विधि इत्यादि विषयांवर त्यांनी लिखाण केले. सर्वसाधारणपणे प्रचलित असणार्याे रूढी, पंरपरा, चालीरीती, सणवार हे धर्मसंकल्पनेशी निगडित असल्याने व धर्म सर्वसामान्यपणे ईश्वरनिष्ठ, ईश्वरवादी असल्याने तात्त्विकदृष्ट्या किंवा ‘इंद्राय तक्षकाय स्वाहा’ या नात्याने अ-धार्मिक निरीश्वरवादाची भलावण समाजसुधारकांकडून केली जाते. परिणामतः समाजसुधारणा ही ईश्वर आणि धर्म या विरोधी असलेले तत्त्वयुद्ध आहे असे समाजसुधारक आणि धार्मिक मानतात.

पुढे वाचा

संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ! आक्षेपकांचा परामर्श

आजच्या सुधारकच्या मे व जून १९९४ च्या अंकात ‘संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ या शीर्षकाने ‘धारणाद्धर्म इत्याहुः’, ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति आणि ‘रक्षण की राखण’ या विषयांचा ऊहापोह करण्यात आला होता. या तीनही विषयांची चर्चा आजच्या सुधारकमधून यापूर्वी श्रीमान् संपादकांसहित इतरांनी वरचेवर सदैव एकपक्षीय केलेली होती. ती अधिक समग्र व्हावी म्हणून या विषयाची संदर्भसहित दुसरी बाजू पूर्वोक्त लेखात मांडली आहे. त्या विषयी प्रा. सुनीती देव (जून ९४), श्री मधुकर देशपांडे, श्री. प्रमोद सहस्रबुद्धे आणि श्री. दिवाकर मोहनी (जुलै ९४), श्री. मा.

पुढे वाचा

चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?

दिवाकर मोहनी ह्यांच्या लेखामधली स्त्री ही “स्वतःची लैंगिक स्वातंत्र्याच्या बाबतीत स्वामिनी’ ही कल्पना भारतीय स्त्रीपुरुषांना समजणेच (माझ्या अनुभवाप्रमाणे) अशक्य आहे. भारतीयांच्या दृष्टिकोणाप्रमाणे स्त्रीचा पतिव्यतिरिक्त पुरुषाशी संबंध आला की ती वेश्या नसली तरी वेश्येसारखीच होते. लैंगिक स्वातंत्र्य व स्वैराचार ह्यातला फरक समजणे भारतीयांना (एवढेच नव्हे तर आशियातल्या अनेक समाजांना) कठीण जाते. अमेरिकेत स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य आहे, म्हणून त्या “लूज’ आहेत, असे अनेक भारतीय म्हणतात.
“वेश्या परतंत्र आहे. तिला नकार देण्याचा अधिकार नाही” हा मुद्दा मात्र मला मान्य नाही. वेश्येलाही नकार देण्याचा अधिकार आहे व तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी समागम केल्यास तो बलात्कार होतो.

पुढे वाचा

चर्चा -भक्ती हे मुल्य आहे काय?

आजचा सुधारकच्या डिसेंबर ९४ अंकात प्रसिद्ध झालेल्या “भक्ती हे मुल्य आहे काय?” या माझ्या लेखावर प्रा. बा. वि. ठोसर यांनी लिहिलेले एक चर्चात्मक टिपण याच अंकात अन्यत्र छापले आहे. हे टिपण लिहिल्याबद्दल मी प्रा. ठोसरांचा अतिशय आभारी आहे. कोणत्याही विषयातील सत्य त्याच्या साधकबाधक चर्चेशिवाय हाती लागत नाही ही गोष्ट प्रसिद्ध आहे. म्हणून प्रा. ठोसरांच्या लेखाचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.
आपल्या लेखात प्रा. ठोसरांनी प्रथम कार्ल पॉपर या थोर तत्त्वज्ञाचे सार्थ (किंवा अर्थपूर्ण – meaningful) विधान आणि वैज्ञानिक विधान यासंबंधीचे मत उद्धृत केले आहे.

पुढे वाचा

चर्चा- भक्ती हे मूल्य आहे काय?

आ. सु. च्या डिसेंबर १९९४ अंकात “भक्ती हे मूल्य आहे काय?” हा प्रा. दि. य. देशपांडे यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे भक्तीला आपल्या देशांत पुरातन कालापासून तो आजवर इतके महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे की यासंबंधी केवळ विवेकवादांतूनच नव्हे तर सर्व दृष्टिकोनांतून सखोल चर्चा होणे हे अगत्याचे आहे.
हा लेख वाचल्यावर मनांत आलेले काही विचार, प्रश्न आणि शंका अशा : प्रथम लेखाच्या उतरार्धातील कांही विधाने घेतो. (१) “परंतु ईश्वर (मग तो कोणत्याही वर्णनाचा असेना) आहे असे मानायला कांही आधार आहे काय?

पुढे वाचा

सी. पी. स्नो ह्यांच्या दोन संस्कृती” ह्या पुस्तकाच्यानिमित्ताने (उत्तरार्ध)

गेल्या वीस वर्षांतील ‘नवीन भौतिकीमुळे भौतिक शास्त्राच्या पारंपारिक कल्पनेतही महत्त्वाचे बदल घडून आले आहेत. ह्या बदलांचे वर्णन कॉलिनी पुढील शब्दांत करतो,क्वाँटम भौतिकी” “आणि “केआस थिअरी” सारख्या नवीन कल्पनांनी द्रव्याच्या (matter) गुणधर्माचे जुने जडवादी (mechanistic) रूप – जे न्यूटनपासून प्रचलित होते – टाकून द्यायला भाग पाडले आहे. शिवाय सैद्धांतिक भौतिकी (Theoretical Physics), खगोलशास्त्र (Astronomy) आणि विश्वरचनाशास्त्र (Cosmology) ह्यांसारख्या विषयांमधील क्रांतिकारक प्रगतीमुळे अनुभवजन्य निरीक्षणातून, अचूक निगमनाने नियंत्रित अनुमान काढण्याची जुनी वैज्ञानिक विचारपद्धतीही सदोष असल्याचे लक्षात आले आहे. रूपक, समरूपता, अंतःस्फूर्ती ह्यासारखे मानव्यशास्त्रात वापरले जाणारे मानसिक व्यवहार विज्ञानातही उपयोगी पडतात हे जाणवल्यामुळे ह्या दोन ज्ञानशाखांमधील साधम्र्याची चर्चा सध्या जास्त महत्त्वाची ठरू पाहात आहे.

पुढे वाचा

बंडखोर पंडिता (भाग १)

पंडिता रमाबाईंच्या कार्याची ओळख आजचा सुधारकच्या वाचकांना करून देण्याचा विचार तसा लांबणीवरच पडत गेला. मध्यंतरीच्या एका घटनेने ते काम आणखी रेंगाळले.आजचा सुधारकच्या सल्लागार मंडळावरील एका विदुषीने धर्मांतर केले. ही गोष्ट सुधारकाला खटकली. समाजसुधारणेसाठी धर्माचे माध्यम आवश्यक समजणे ही गोष्ट त्याच्या धोरणात बसत नाही तर मग धर्मांतर करून ख्रिस्ती झालेल्या रमाबाई सुधारक कशा? आणि आंबेडकर, गांधी यांना तरी तुम्ही सुधारक समजता की नाही? त्यांची धर्मनिष्ठा तर जगजाहीर आहे. अशी बरीच भवति न भवति (मनाशी) केली. शेवटी निष्कर्ष निघाला तो असा:
आजचा सुधारकला स्वतःचे धोरण ठरविण्याचा अधिकार आहे.

पुढे वाचा

देव कसा आहे?

‘एथिओपियन लोक म्हणतात की आमचे देव बसक्या नाकाचे आणि काळ्या रंगाचे आहेत, तर श्रेसचे लोक म्हणतात की आमच्या देवांचे डोळे निळे आहेत आणि त्यांचे केस लाल आहेत. आणि जर गुरे, घोडे किंवा सिंह यांना मनुष्यासारखे हात असते, त्यांना चित्रे काढता आली असती, आणि मूर्ती कोरता आल्या असत्या, तर घोड्यांनी आपले देव घोड्यांसारखे आणि गुरांनी गुरांसारखे चितारले असते, आणि प्रत्येक पशूने आपल्या देवाच्या शरीरांना आपापल्या शरीराचा आकार दिला असता.’
(इ. पू. ५००)