मासिक संग्रह: जून, २००३

पत्रसंवाद

एप्रिल 2003चा आजचा सुधारक वाचला. दि. 13.9 च्या आजचा सुधारक या अंकातील श्री. मधुकर देशपांडे यांचा ‘मी नथुराम बोलतोय’ हा लेख वाचून श्री. शांताराम कुळकर्णी, पुणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नथुराम नाटकाला सर्व प्रेक्षक नथुराम विचाराचे होते असे कळते आणि नथुराम संख्या आताच का वाढली असा प्र न श्री कुळकर्णी यांनी केला आहे. मला असे वाटते या नाटका-अगोदर ही नथुराम म्हणजे नथुराम विचार होतेच पण ते छुपे होते कारण उघडपणे उदात्तीकरण (त्या विचाराचे) करण्याची धास्ती वाटत होती. आता केन्द्र सरकारात नथुरामप्रणीत सरकार असल्यामुळे त्यांना उघडमाथ्याने प्रचार करण्याची संधी मिळत आहे आणि संख्या नथुरामधर्माची वाढत आहे, पण ती संधीसाधूंच्या रूपात.

पुढे वाचा

क्रिकेट हा खेळ की स्वार्थाचा बाजार

दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या काही घटनांचे अस्तित्व आपल्या देशात आज ही कायम आहे. ब्रिटिशांनी जाता जाता आपल्या देशाची फाळणी केल्यामुळे न भरून निघणाऱ्या जखमांचे व्रण आजही आपल्याला त्रास देत आहेत. तसेच ब्रिटिशांनी आपल्या देशाला क्रिकेट या खेळाची देणगी दिल्यामुळे या खेळाने सध्या कहर माजविला आहे. 1975 पासून सुरू झालेल्या विश्वचषकामुळे अलिकडच्या काळात क्रिकेटच्या स्पर्धा ह्या खेळाडू वृत्तीने खेळण्याच्या स्पर्धा न राहता त्यामध्ये व्यावसायिक व धंदेवाईक प्रवृत्तीने शिरकाव केला आहे. क्रिकेटच्या वेडाने शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, शासकीय कार्यालयातील शिपायापासून ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत, तसेच लहान मोठ्या विविध व्यावसायिकांना झपाटून टाकले आहे.

पुढे वाचा

. . . जर परवडत असला तर . . .

ज्या ऐतिहासिक प्रक्रियेने भारताला तरल, नाजुक, नखरेल दर्शने, धर्मशास्त्र, वास्तुकला आणि संगीत दिले; त्याच प्रक्रियेने उपाशी, मरगळलेली खेडी, संधीसाधू आणि हावरट ‘सुसंस्कृत’ (नागर) वर्ग, नाराज कामगार, ढासळती मूल्ये, अंधश्रद्धा यांनाही जन्म दिला. एक अंग दुसऱ्या अंगाचा परिणाम आहे. एक अंग दुसऱ्याची अभिव्यक्ती आहे.

अगदी अनघड, प्राथमिक हत्यारांमुळे अतिरिक्त उत्पादन तुटपुंजे राहिले, आणि तेही (तंत्रज्ञानाला) समरूप अशा जुन्यापुराण्या समाजव्यवस्थेने हिरावून घेतले. बहुसंख्यकांच्या दारिद्र्यावर आपला ऐषारामी सुसंस्कृतपणा रचलेला आहे, हे विसरून उच्च वर्गाला आपला उच्चपणा अंगभूत श्रेष्ठतेतून आला, असे वाटू लागले. इतिहास म्हणजे स्वैर, विस्कळीत घटनांची माळ नव्हे.

पुढे वाचा

न्यायपालिका की अन्यायपालिका?

गेल्या काही वर्षांतील वृत्तपत्रांत किंवा नियतकालिकांत प्रसिद्ध होणाऱ्या न्यायपालिकेतील निरनिराळ्या न्यायाधीशांबद्दलच्या बातम्या बघा—–
1. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या कार्यकलापांवर राम जेठमलानींचे पुस्तक
2. पंजाब उच्च न्यायालयाच्या तब्बल तीन न्यायमूर्तीवर लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये आपल्या संबंधितांना उत्तीर्ण करून घेऊन नोकरी लावून घेतल्याचा आरोप; त्यांच्याकडील न्यायालयीन कामकाज काढून घेतले
3. राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तीची एका स्त्रीला तिच्या बाजूने निकाल देण्यासाठी त्यांची लैगिक भूक भागवण्याची मागणी; चौकशी सुरू
4. कर्नाटक उच्च न्यायालयाचे काही न्यायमूर्ती निर्दोष
5. महाराष्ट्रात न्यायदान करणाऱ्या शेकडो न्यायाधीशांची नेमणूक करणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर पैसे खाऊन नोकऱ्या देण्याचा आरोप.

पुढे वाचा

शतखंडित शहरे

[शहरे टिकवावयाची असतील तर त्यासाठी शहरी प्रक्रियांकडे सर्वाधिक लक्ष द्यावे लागेल. कारण या प्रक्रियांचे प्रवाही स्रोतच शहराचे स्वरूप आणि भवितव्य ठरवितात.]
स्पिरो कोस्तोफ –1992
विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत विकसित प िचमी जगांत मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. त्यामागे लपलेल्या आर्थिक कारणांचा शोध पा चात्त्य अभ्यासक नानाविध प्रकारांनी घेत असतात. अमेरिकेतील रीगनचा अध्यक्षीय काळ आणि इंग्लंडमधील मार्गारेट थैचर यांची राजवट एकाच वेळी तेथील आर्थिक धोरणांना मोठेच क्रांतिकारी वळण देणारी होती. सर्वप्रथम खाजगीकरणाची हाक त्यांनी दिली आणि बघता बघता जगातील बहुसंख्य देशांत ती लाट पसरली.

पुढे वाचा

राष्ट्राचे आरोग्य मुलाखत

1986 मध्ये डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून सार्वजनिक आरोग्याची पदवी संपादन करून भारतात परतले. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील गडचिरोलीसारख्या अति मागास भागात त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. ग्रामीण आणि आदिवासी स्त्रियांच्या आरोग्याचा स्त्री-रोग-विज्ञानाच्या (gynaecological) दृष्टिकोनातून अभ्यास करायला डॉ. राणी बंग ह्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारची चिकित्सा ही त्या क्षेत्रातील नवी पायवाट तर ठरलीच पण जागतिक पातळीवरही त्यांनी केलेले काम अनन्य स्वरूपाचे मानले गेले. ह्या अभ्यासाचा आधार घेऊनच भारत सरकारने आपले जननारोग्य आणि बालकांचे आरोग्य (Reproductive and Child Health – RCH) विषयी धोरण आखले.

पुढे वाचा

मानवतेविरुद्ध गुन्हा (लेख-१)

२२ फेब्रुवारी २००२ ला करसेवकांचा एक जथा साबरमती एक्स्प्रेसने अमदावादहून अयोध्येला गेला व २६-२७ फेब्रुवारीला परतला. दोन्ही प्रवास होत असताना जागोजागी करसेवकांनी इतर प्रवासी, स्थानकांवरील विक्रेते वगैरेंशी गैरवर्तन केले. विशेषतः मुस्लिमांशी हे वर्तन नारेबाजी व अरेरावीच्या बरेच पलिकडचे होते. फैजाबादच्या २५ फेब्रुवारीच्या वृत्तपत्रात अयोध्येकडील प्रवासातील गैरव्यवहाराची नोंदही झाली.

२७ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ला गोध्रा स्थानकावर मुस्लिम स्त्रिया व विक्रेत्यांशी करसेवकांच्या दुर्वर्तनाच्या अनेक घटना घडल्या. गाडी सुटली व एखादा किलोमीटर जाऊन थांबली—-का थांबली हे कळलेले नाही. चालकाने बाहेरून एक जमाव गाडीवर गोटमार करताना पाहिला, पण ही गोटमार एस-६ डब्यावर होत नव्हती.

पुढे वाचा

मराठीला वाचवायचे? आणि ते का बरे?

‘मराठी भाषेला वाचवा!’ अशा प्रकारची हाकाटी हल्ली केली जात आहे. या हाकाटीतले आवाहन जसे सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय नेतृत्वाला केलेले असते तसेच ते थेट लोकांनाही केलेले असते. त्यापुढे जाऊन, मराठी भाषा कशी वाचवायची याबद्दल लोकजागृती करणे, काही धोरण स्वीकारणे, आणि निरनिराळे नियम बांधणे अशाप्रकारचे कार्यक्रम आखले जातात. मराठी भाषा कशापासून वाचवायची याही प्र नाची विविध उत्तरे दिली जातात –इंग्रजीच्या किंवा हिंदीच्या आक्रमणापासून वाचवायची, अरबी-फार्सीच्या प्रभावापासून भाषा शुद्ध करायची, अगदी संस्कृत भाषेच्या अतिरेकी प्रभावापासून तिला वाचवायची अशी काही उत्तरे मिळत असतात. मराठी-भाषकांना कोणत्या न्यूनगंडाने पछाडले आहे याची चिंता केली जाते.

पुढे वाचा

सर्व प्राणी समान आहेत

[1974 मध्ये प्रकाशित झालेल्या प्राध्यापक पीटर सिंगर यांच्या ‘All Animals are Equal’ या लेखाचा स्वैर अनुवाद व संक्षेप. सिंगर हे ऑस्ट्रेलिया-तील मेलबोर्न येथे मोनॅश युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आहेत.]
अलीकडच्या काळात पीडित वर्गांनी विषमतेविरुद्ध जोराचे लढे दिले आहेत. त्यांचे एक अभिजात (classic) उदाहरण म्हणून अमेरिकी संस्थानांतील कृष्णवर्णीयांनी केलेल्या चळवळींचे देता येईल. काळ्या लोकांना दुय्यम नागरिक ठरविणाऱ्या पूर्वग्रह आणि पशुतुल्यव्यवहार या प्रवृत्तींचा उच्छेद झाला पाहिजे अशी या चळवळीची मागणी होती. तिच्या पाठोपाठ आपण अनेक अन्यही लढे पाहिले आहेत.
मोचक चळवळींची मागणी आपल्या नैतिक क्षितिजाच्या विस्तारांची आणि समानतेच्या मूलभूत तत्त्वाच्या पुनर्विवरणाची असते.

पुढे वाचा

काहीतरी ओळखीचे वाटते आहे का?

सामाजिक सेवा आणि (पहिल्या महा-)युद्धासाठी (शत्रुराष्ट्रांना) द्यावा लागणाऱ्या नुकसान भरपाईसाठी सरकारने ‘पोकळ पैसा’ छापल्यामुळे प्रचंड भाववाढ झाली. प िचमी राष्ट्रांनी भाववाढ रोखण्यासाठी लादलेल्या उपयांमुळे अनेक जण बेकार झाले. लोकांच्या भ्रमनिरासातून मतदारांचे उजव्या व समाजवादी पक्षांमध्ये ध्रुवीकरण झाले. दोन्ही पक्ष पहिल्या युद्धातून वाचलेल्या युद्ध साहित्याने सज्ज अशा मोठाल्या खाजगी सेना बाळगू लागले. यांच्यातील झटापटींपासून दूर राहणे (टागीसारख्या) तरुण प्राध्यापकाला काही काळ शक्य होते.
दुभंगलेल्या लोकशाही ऐवजी टोटॅलिटेरियन हुकूमशाही ऑस्ट्रियात प्रस्थापित होणे हे नोकरशाही, सेना, कॅथलिक चर्च आणि उजव्या राजकीय पक्ष-यंत्रणांना
आ चर्यकारकपणे ‘रुचकर’ वाटले.

पुढे वाचा