मासिक संग्रह: नोव्हेंबर, २००७

सार्वजनिक सत्य 

ज्योतिबा फुल्यांनी ‘सार्वजनिक सत्य’ नावाचा सुंदर विचार सांगितला आहे. देवाची आराधना करून एका माणसाने मोक्ष किंवा स्वर्ग मिळवण्याला अर्थ नाही. त्यातून देवाचेही मोठेपण सिद्ध होत नाही आणि त्या माणसाचेही नाही. परंतु जेव्हा सार्वजनिक सुखासाठी प्रयत्न होतो त्या वेळीच त्या आराधनेला किंमत असते, गावची जत्रा जशी साऱ्या गावाला सुख देऊन जाते त्याचप्रमाणे गावची विहीर सर्वांना पाणी देऊन गेली पाहिजे. एका माणसाला उत्तम वैद्यकीय मदतीची सोय असावी, पैशाच्या बळावर त्याला धन्वंतरी विकत घेता यावा आणि उरल्या गावाने औषधावाचून तडफडावे ही लोकशाहीची रीत नाही.

पुढे वाचा

प्रासंगिक —रिझवानुरचे रहस्य 

ही कलकत्त्याची गोष्ट आहे. पण ती मुंबईची असू शकते. हैद्राबादची असू शकते किंवा दिल्लीची देखील असू शकली असती. ही एका प्रेमविवाहाची आणि त्याच्या दुःखान्ताची कहाणी आहे. कलकत्त्याच्या प्रियंका तोडी नावाच्या तरुणीने रिझवानुर्रहमान ह्या मुस्लिम तरुणाशी लग्न केले. सिव्हिल मॅरेज केले. आपापले धर्म कायम राखून हे लग्न करता येते. लग्नातून घटस्फोट मिळविणेही सोपे आहे. रिझवान कॉम्प्युटर विद्येतील ग्राफिक डिझाइनर होता. मध्यमवर्गीय कुटुंबातला जबाबदारी उचलणारा तरुण प्रियंकाचे वडील उद्योगपती अशोक तोडी. ‘यह अंदर की बात है’ अशा व्यंजक शब्दांनी ज्यांची जाहिरात केली जाते अशा स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांची निर्मिती करणारा तो एक कारखानदार, सालिना दोनशे कोटींची आय असणारा.

पुढे वाचा

क्रिकेट 

मूलभूत शारीरिक क्षमतांचा विकास करण्यासाठी जो खेळ खेळला जातो त्या खेळास फिजिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मान्यता मिळते. ह्या खेळातून (1) शारीरिक क्षमतांचे दमसास, (2) स्नायूंचा दमदारपणा (3) वेग (3) ताकद (5) चपळाई (6) सांधे चलनवलन, दीर्घ आयुष्य इ. सर्व साध्य झाले पाहिजे. कुस्ती, हुतूतू. खोखो, आट्यापाट्या, फुटबॉल, बॉस्केटबॉल, मुष्टियुद्ध इ. खेळ योग्य आहेत. क्रिकेटसारख्या मनोरंजक खेळास फिजिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मान्यता नाही. आलिंपिकमध्ये तो खेळत नाहीत. 

परंतु आज पेप्सी, हिरोहोंडा, सहारा, सोनी अशा साम्राज्यावाद्यांच्या बाजूच्या कंपन्या क्रिकेटसाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात; आणि समाजपुरुषाची शारीरिक क्षमता खऱ्या अर्थाने वाढू न देण्यास मदत करतात.

पुढे वाचा

राजकारण जातींसाठी की जात्यंतासाठी? 

आजकाल राजकारणात जातीचे महत्त्व तसेच जातीयवाद फार वाढत चालला आहे, जातिसमूहातील तडजोडीचे राजकारण वाढत चालले आहे, जातिनिर्मूलनापेक्षा जात टिकविण्याकडे व जातींचा विनाश करण्यापेक्षा त्यांचे संघटन करण्याकडे आपण वेगाने वाटचाल करू लागलो आहे, विळ्या भोपळ्याचे सख्य असलेल्या जाती राजकारणात एकत्र येऊ लागल्या आहेत, त्यावर उच्चजातीबरोबरच जुळवून घेतल्याने सत्ता मिळेल पण त्यामुळे मनुवादाला खतपाणी घातले जाईल, ब्राह्मणांसारखा उच्चवर्णीय मनुवादी जातींना शोषक व सर्व समस्यांना जन्म देणारे, समस्या टिकवून ठेवणारे समूह म्हणून विरोध करणे गरजेचे असताना सर्व स्थानांपासून हटवणे हे आद्य कर्तव्य असताना त्यांचाच सत्तेत सहभागी करून घेणे हे अत्यंत अश्लाघ्य आहे, निषेधार्ह आहे, अशा प्रतिक्रिया उत्तरप्रदेशात निवडणुका पार पडल्यावर ऐकू येऊ लागल्या आहेत.

पुढे वाचा

सुहासिनीची सत्त्वपरीक्षा 

माझी मुलगी एका सरकारी मनोरुग्णालयात समुपदेशक म्हणून नोकरीला आहे. तेथे भरती होऊन कालांतराने बऱ्या झालेल्या मध्यमवयीन स्त्रीकडून तिला कळलेली माहिती मला धक्का देणारी वाटली. 20 व्या शतकात आणि 21 व्या शतकाच्या आरंभी स्त्रियांना या कोटीचा सासुरवास सहन करावा लागत असेल तर त्याला आ. सु.ने वाचा फोडली पाहिजे आणि त्याविरुद्ध काही उपाययोजना सुचविली पाहिजे असे मला वाटते. त्या रुग्णाला आपण सोयीसाठी ‘सुहासिनी’ म्हणू. एखाद्या फुलराणीसारखी ती एका मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात जन्माला आली. घरातील मंडळी इतकी समंजस की आजी म्हणे, 

‘कन्या झाली म्हणून करू नको हेळसांड। बापाशेजारी लेकीचं पान मांड ॥” 

अशी लाडाकोडात वाढलेली ती फुलराणी.

पुढे वाचा

मायावतीच्या बहुजन समाज पक्षाचे यश ! 

उत्तरप्रदेशातील 2007 च्या विधानसभा निवडणुकीत मायावती व त्यांच्या बहुजनसमाज पक्षाला अभूतपूर्व यश मिळून त्यांच्या पक्षाच्या हाती सत्ता आली. निवडणूकपूर्व इतर कुठल्याही राजकीय पक्षांशी समझौता न करता स्वबळावर त्यांनी निवडणूक लढवली व सत्ता मिळवली. बहुजन समाज पक्ष (बसप) म्हणजे जातीचे विष बीज पेरणारा, तत्त्वशून्य, सत्तापिपासू, आंबेडकरांचे पुतळे व उद्याने यांतच गुरफटलेला, जन्मतिथी-पुण्यतिथींचे सोहळे करून राजकीय लाभ उठवून घेणारा म्हणून बदनाम झालेला पक्ष होता. यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हा पक्ष नामशेष होणार असे भाकित केले जात होते. परंतु तसे काही न होता आज हा पक्ष सत्तेवर आला आहे.

पुढे वाचा

मराठी साहित्यविश्व : एक विश्लेषण 

मराठी साहित्यविश्व एका अरिष्टात सापडले आहे. बहुतांश लेखनामध्ये कसदारपणा नाही आणि मोजक्याच चांगल्या साहित्याला वाचक नाहीत. या पार्श्वभूमीवर राजा पिंपरखेडकर यांनी मराठी साहित्याचे परखड मूल्यमापन केले आहे (संदर्भ: ‘उदंड आनंदाचा सोहळा’, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी अंक, 2006) त्याच दरम्यान वसंत आबाजी डहाके यांचा (संदर्भ: ‘स्वातंत्र्यानंतरचे मराठी साहित्य एक लेखाजोखा’, लोकमत दिवाळी अंक, 2006) लेख आला. त्यानंतर साधना साप्ताहिकातून राजन खान (संदर्भ: यथा प्रकाशक तथा लेखक’ व ‘हा गाडा ओढणं थांबवलं पाहिजे!’ हे दोन लेख 3.2.2007 चा अंक) व पंकज कुरुलकर (संदर्भ: ‘म्हणून स्वतःबद्दल लाज वाटते’, हा लेख 14.4.2007 चा अंक) यांनी मराठी साहित्या विश्वाची चिरफाड केली आहे. 

पुढे वाचा

मेरसोलचा सूर्य 

‘आऊट सायडर’ ही कादंबरी माहीत आहे ना? अल्बेर कामूची ? तिचा नायक मेरसोल. कामूने त्याच्याबद्दल म्हटले आहे, “आजच्या युगाला हवा असेलला तो येशू ख्रिस्त आहे. ” मेरसोल तर एक सामान्य कर्मचारी होता. सामान्याचे आयुष्य जगणारा. बहुधा परवडत नाही म्हणून लग्न न केलेला. त्याच कारणासाठी बहुधा आईला वृद्धाश्रमात ठेवणारा. सिनेमे पाहणे, पोहायला जाणे आणि मैत्रिणीबरोबर भटकणे असे चार-चौघांसारखे आयुष्य जगणारा. तो आजच्या युगाचा येशू कसा? 

त्याच्यावर खुनाचा आरोप असतो; तो खराच असतो-मेरसोलही ते नाकारत नाही. त्याला फाशीची शिक्षा होते- मेरसोलची त्याबद्दलही तक्रार नसते; उलट तो म्हणतो, मला फाशी द्याल तेव्हा माझ्या निषेधाच्या घोषणा देणारा जमाव माझ्याभोवती राहील एवढी व्यवस्था करा.

पुढे वाचा

राष्ट्रपतिपदाची तिरकी चाल: बाबूजी ते बीबीजी! (भाग-३) 

निवृत्तलेले जनाब ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि व्याकरणतज्ज्ञांना आणि फलक रंगाऱ्यांना बुचकळ्यात टाकणाऱ्या (कारण राष्ट्रपती’ या शीर्षकात ‘बीबीजी’ला कसे बसवणार?) सौ. प्रतिभा देवीसिंग शेखावत (पूर्वीच्या कु. प्रतिभा नारायण पाटील) या दोघांचा या लेखात समाचार घ्यायचा आहे. तत्पूर्वी काही फुटकळ बाबी स्पष्ट केल्या पाहिजेत. 

प्रस्तुत वैचारिक मासिकाशी अत्यंत घनिष्ठता असणाऱ्या खरे टाऊनच्या विख्यात विचारक मित्राने ‘तुमच्या लिखाणात अंतर्मुख करणारे काही नाही’ असा सूर काढला आहे. त्याचप्रमाणे इतरांनी ‘इंडिया टुडेच्या ओंजळीने पाणी पिण्यावरही आक्षेप घेतला आहे. (नुकत्याच संपन्न झालेल्या प्रांतिक थिऑसॉफिस्ट फेडरेशन’ आणि ‘अंताराष्ट्रिय संस्कृत संमेलना’त भेटलेल्या परग्रामस्थ मित्रांनी पाठही थोपटली आहे.)

पुढे वाचा

राज्यघटनेत सुधारणा – प्रतिक्रिया 

डॉ. सुभाष आठले यांचा राज्यघटनेत सुधारणा हा लेख वाचला. ह्या सुधारणा अमलात येणे शक्य नाही हे स्पष्टच दिसते व त्याच्या कारणांची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. अगदी या सुधारणा अंमलात आल्या तरी मिळणारा राजधर्म सध्यापेक्षा नक्की चांगला असेल असे सांगणे अवघड आहे. (उदा. समजा कॉंग्रेस निवडून आली तर सगळ्या गोष्टी ठरवणार कोण? सोनियाजीच ना!) असल्या किरकोळ गोष्टी आपण सोडून देऊ. 

साधारणपणे या लेखातून व्यक्त झालेला मुद्दा हा बुद्धिमत्तेचा आहे. म्हणजे तुम्ही एक पक्ष निवडून द्या आणि तो पक्ष बुद्धिमान लोकांचे (मग ते खासदार नसेनात का) एक मंत्रिमंडळ तुम्हाला देईल.

पुढे वाचा