मासिक संग्रह: मार्च, २०१६

मुली

आता आणखी वाट नाही पाहणार मुली
त्या घरातून बाहेर पडतील
बिनधास्त रस्त्यांवरून धावतील
उसळतील, कुदतील, खेळतील, उडतील
मैदानांतून निनादतील त्यांचे आवाज
आणि हास्यध्वनी   

मुली थकल्याहेत
रांधावाढाउष्टीकाढा करून व रडून   
त्या आता नाही खाणार मार
नाही ऐकून घेणार कोणाचेही टोमणे
आणि रागावणे

ते  दिवस, जेव्हा मुली
चुलीसारख्या जळायच्या
भातासारख्या रटरटायच्या 
गाठोड्यासारख्या कोपऱ्यात पडून राहायच्या
केव्हाच संपले 

आता नाही ऐकू येणार दारांमागचे त्यांचे हुंदके
अर्धस्फुट उद्गार किंवा भुणभुण
आणि आता भिजणार नाहीत उश्यादेखील

‘बोल्ड’ हे ‘ब्युटिफूल’च हवे

‘बाबा, एक फ्रेंड येणार आहे. आम्हाला काही discuss करायचे आहे.’ मुलाचा फोन.

माझा मुलगा ‘टीन’ वयोगटातला.

‘हो. येऊ दे की.’ मी.

बेल वाजल्यावर दरवाजा उघडला. समोर माझा मुलगा आणि एक मुलगी. मुलगी असणं मला अनपेक्षित होतं. फ्रेंड म्हणजे मुलगाच असणार असं मी गृहीत धरलं होतं. का? – माझा समज. संस्कार. मुलाचा मित्र मुलगाच असणार. जास्तीकरून समाजात असंच असतं ना. आमच्यावेळी तर हे असंच अधिक होतं. शिवाय त्याने लिंगनिरपेक्ष फ्रेंड शब्द वापरला होता. मैत्रीण असे म्हटले असते, तर प्रश्नच नव्हता. मी काही जुन्या विचारांचा नाही.

पुढे वाचा

आत्मशोधार्थ शिक्षण

शिक्षणव्यवस्था, आत्मशोध, युवकांना आवाहन
—————————————————————————–
शिक्षण स्वतःचा शोध व समृद्धी ह्यांसाठी तसेच जनसामान्यांच्या हितासाठी कसे उपयोजित करता येईल, विद्याशाखांमधील कृत्रिम भिंती कशा तोडता येतील, शिक्षणक्षेत्रात प्रेरणा व स्वातंत्र्य ह्यांचे महत्त्व काय, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेत व त्याला स्वानुभव जोडत आंतरराष्ट्रीय एका युवा विख्यात शास्त्रज्ञाने मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात केलेल्या भाषणाचा संपादित अनुवाद.
—————————————————————————–
तुमच्यापैकी बहुतेकांना ठाऊक असेल की दीक्षान्त संदेशाला संयुक्त राष्ट्रांमध्ये शुभारंभाचे भाषण म्हणतात. विविध विषयांतील स्नातकहो, पदवी प्राप्त करून आज तुम्ही बाहेरच्या जगात स्वत:ची ताकद आजमावण्यासाठी, स्व-गुणवत्तेच्या बळावर व्यक्ती म्हणून उत्क्रांत होण्यासाठी, जीवनात नव्या वाटेवर शुभारंभ करण्यासाठी पाऊल टाकत आहात.

पुढे वाचा

ग्राउंड झीरो: जे एन यु

जे एन यु, देशद्रोह, शैक्षणिक स्वातंत्र्य
—————————————————————————–
गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ — जे एन यु – सर्वत्र गाजते आहे. तेथील विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार ह्याला देशद्रोहाच्या आरोपावरून झालेली अटक, तीस हजारी कोर्टाच्या आवारात वकिलांनी त्याच्यावर चढवलेला हल्ला, काही दूरचित्रवाहिन्यांनी व संसेदेच्या व्यासपीठावरून खुद्द सत्ताधारी पक्षाने जेएनयुची देशद्रोह्यांचा अड्डा म्हणून केलेली संभावना व्यथित करणाऱ्या आहेत. सादर आहे ह्या घटनाक्रमाचा जेएनयुत जाऊन मुळापासून घेतलेला आढावा.
—————————————————————————–
नवी दिल्लीच्या महरौली-वसंतकुंज भागात वसलेले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे.

पुढे वाचा

मराठवाड्यातील दुष्काळ : एक आकलन

मृदसंधारण, गरजा आधारित पीक पद्धती, नैसर्गिक शेती

—————————————————————————–

तीन दशकांपासून स्वावलंबी, पर्यावरणस्नेही शेती करणाऱ्या ‘कर्त्या’ विचारकाने मराठवाड्यातील दुष्काळाची  प्रत्यक्ष पाहणी करून लिहिलेला हा लेख दुष्काळाच्या भीषणतेचे चित्रण करून त्यामागील राजकीय-आर्थिक-पर्यावरणीय राजकारणही उलगडून दाखवितो. सोबतच ह्या आपत्तीच्या निवारणासाठी कंटूर बांधबंदिस्ती आणि कंटूर पेरणी, पीकपद्धतीत बदल असे उपायही सुचवितो.

—————————————————————————–

पाण्याशिवाय माणूस, पशुपक्षी कसे जगतील? मराठवाड्यातील तांबवा (ता. केज. जि. बीड) गावात याची प्रचीती आली. एका अध्यापकाच्या तरुण मुलाने चहासाठी बोलावले होते. त्याच्या घरासमोर ३०० फूट खोल ट्यूबवेल होती. दिवसभरात ३-४ घागरी पाणी मिळते म्हणे.

पुढे वाचा

संपादकीय

आपल्या सभोवताली विलक्षण वेगाने इतक्या काही घटना घडत आहेत की सुजाण व संवेदनशील माणसाला हतबुद्ध होण्याशिवाय पर्यायच उरू नये. रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडू लागतात न लागतात, तेव्हढ्यात जे एन यु घडते. तेथील एका छोट्या घटनेचे निमित्त करून देशातील ह्या अग्रगण्य शिक्षणसंस्थेला देशद्रोह्यांचा अड्डा म्हणून बदनाम करण्यात येते. तेथे नेमके काय घडले हे चित्र स्पष्ट होईपर्यंत आता अलिगढ मुस्लीम विद्यापीठाची पाळी आलेली दिसते. एकूण देशप्रेमाचे हाकारे देत जे कोणी आपल्याला कोणत्याही कारणाने विरोध करतील त्या सर्वांविरुद्ध रान पेटवत देशद्रोही म्हणून त्यांची शिकार करायची हाच उद्देश असावा अशी शंका येते.

पुढे वाचा

प्रतिसाद

तलवार दाम्पत्त्य,आरुषी व हेमराज, चित्रपट
—————————————————————————–
फेब्रुवारी महिन्याच्या ‘आ सु’ च्या अंकात धनंजय मुळी ह्यांचा ‘तलवारच्या निमित्ताने’ हा लेख वाचला. त्यामध्ये त्यांनी गतेतिहासपरिणाम ह्या संकल्पनेचे मानसशास्त्रीय विवेचन करून एका वेगळ्या दृष्टिकोनातून सिनेमाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आज काही काळ गेल्यानंतर, काही गोष्टी घडून गेल्यावर आपल्याला वाटते की हेच तर आपण आधी म्हटले होते. परंतु वास्तविक तेव्हा आपल्याला तसे वाटलेले नसते. एवढेच नव्हे तर तेव्हा तसे वाटले नव्हते हे आपण आज विसरूनही गेलेलो असतो.
हे तथ्य ‘तलवार’ सिनेमा ज्यावर आधारित आहे त्या घटनेला लागू करून ते म्हणतात की–आरुषी व हेमराज ह्यांचे हत्याकांड घडल्यानंतर पोलिसांनी अगदीच शून्यापासून सुरुवात केली होती.

पुढे वाचा