मासिक संग्रह: जुलै, २०२१

काही कविता

(१) येणारा काळ कठीण असेल

चक्रमांची पैदास जाणूनबुजून केली जातेय
एक एक मेंढरू, कळपात सापळा लावून ओढलं जातंय
टाळ्या वाजवायच्या हाळ्या देऊन
उपकाराची फेड केली जातेय,
हात टाळ्यांत गुंतल्याने, करायचे काम बाजूला पडतंय.

दिवे लावा, दिवे मालवा म्हणत
देशाला जागं केलं जातंय
अंधाराची अफू देऊन 
प्रकाशाला दूर पळवलं जातंय

कित्येक अडकलेले, 
दूर कोठे घरापासून
आपली माणसं, आपलं गाव
पाहिलं नाही डोळे भरून.

अशांचा काही विचार हवा
भरीव रोकडे धोरण आखा.

येणारा काळ, काळ ठरेल 
अशी आजची परिस्थिती आहे.
भविष्यात पोट भरायचं कसं,
हा रोकडा सवाल आहे.

पुढे वाचा

अर्थव्यवस्था : नवी आव्हाने

कोरोना महामारी (वा साथ) म्हणजे एक भले मोठे अरिष्ट आहे. गेले साधारण १५-१६ महिने आपण एका विचित्र सापळ्यात अडकलो आहोत. एका बाजूला आपल्यापैकी बहुतेक जण या ना त्या प्रकारच्या बंधनात आहेत आणि त्यामुळे आपल्या क्षमता आपण वापरू शकत नाही. दुसऱ्या बाजूला पुढे काय होणार आहे याबद्दल अनिश्चितता आहे.

कोरोना साथीचा सर्वांत मोठा फटका कोणाला बसला आहे याचा विचार केला तर पुढील समाजघटक आपल्यासमोर येतात:
(१) असंघटित क्षेत्रातील लाखो कामगार
(२) लाखो छोटे व्यावसायिक, व्यापारी आणि स्वयंरोजगारावर अवलंबून असणारे हजारो फेरीवाले
(३) घरकाम करणाऱ्या लाखो महिला
(४) खासगी क्षेत्रातील शाळांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, इतर खासगी आस्थापनातील कंत्राटी पद्धतीने नोकरी करणारे हजारो कर्मचारी

या सर्व घटकांतील बहुतेकांचे उत्पन्न गेल्या १५ महिन्यांत कमी झाले, एवढेच नव्हे तर असंख्य नागरिकांना नवीन समस्यांचा सामना करावा लागत आहे.

पुढे वाचा

असं केलं तर..

करोनाच्या लाटांवर लाटा फुटत आहेत. या साथीने आपल्या आरोग्यव्यवस्थेतल्या अनेक त्रुटी उघड्या पाडल्या आहेत. यातील काही आपल्याला आधीच माहीत होत्या. लोकसंख्येच्या मानाने डॉक्टरांची कमतरता ही त्यातली एक.  

पण ज्या साथीमुळे ही कमतरता ठसठशीत झाली, त्याच साथीदरम्यान, साथीसारख्याच पसरलेल्या तंत्रज्ञानाने, यावर मात करणे शक्य आहे. इंटरनेट आणि आभासी उपस्थितीतील शिक्षण आता अचानक पुढ्यात आले आहे. ह्याचे तोटे आहेत तसे फायदेही आहेत.  

आपल्याकडे फॅमिली डॉक्टरांची कमतरता आहे यामागील कारण अर्थातच आर्थिक आहे. एक एमबीबीएस डॉक्टर निर्माण करण्यासाठी प्रचंड पायाभूत सुविधा आणि भरपूर संसाधने लागतात. याला अवाच्यासवा खर्च येतो. तो सरकारला परवडत नाही. यावर

पुढे वाचा

‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..!

आज मानव ‘विज्ञान’रूपी साधनांचा वापर करून निसर्गात घडणाऱ्या घडामोडींचा वेध घेऊ शकतो. माणूस जेव्हा आदिम अवस्थेत होता तेंव्हा भोवताली घडणाऱ्या घटनांचा अर्थ समजून घ्यायला त्याच्या ‘मेंदू’ला कसरत करावी लागत होती. मग काय? मेंदूच्या आवाक्यातील गोष्टींनुसार तो या साऱ्या जगाचा अर्थ लावायचा प्रयत्न करू लागला. तदनुसार तग धरून राहण्यासाठी उपाययोजनाही करू लागला. अर्थातच हे सारे ‘चुका आणि शिका’ स्वरूपात सुरू असताना मानवी मेंदूने अनेक क्लृप्त्या लढवण्यास सुरुवात केली. एकप्रकारे मानवप्राणी त्याच्याकडे असलेले ‘मेंदू’ नामक अजब अस्त्र वापरून या गजब दुनियेत दिमाखात वाटचाल करू लागला.

पुढे वाचा

भय इथले संपत नाही…

घटना पहिली
राजा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा. तो चार वर्षांचा असताना त्याच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले. आईने अतिशय काबाडकष्ट करून भावाच्या शेजारी राहून अनेक खस्ता खात राजाला लहानाचा मोठा केला. कामापुरते शिक्षण घेतल्यावर तो बऱ्यापैकी कमावू लागला. वयात येताच आईने त्याचे लग्नही लावून दिले. राजाला साजेशी पत्नीही मिळाली. सासूने खाल्लेल्या खस्तांची तिला जाणीव होती. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुलेही उमलली. सारे सुरळीत असताना ४ एप्रिल २०२१ रोजी राजाला कोरोनाचे निदान झाले. तेथून पुढे १० दिवस दवाखान्यात भरती होऊन पाच लाख रुपये त्यांनी खर्च केले.

पुढे वाचा

कोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम

चीनच्या वूहान शहरातून २०१८मध्ये सुरुवात झालेल्या कोविदची लाट जगभरात पसरली. जगभरात १५ जून २०२१ पर्यंत १७.७ कोटी लोक बाधित झाले व ३८.४ लाख लोक मरण पावले. कोविदचा सामना करण्यासाठी बहुतेक देशातील आरोग्ययंत्रणांवर प्रचंड ताण आला. हा विषाणू नवीन असल्याने व तो मानवी शरीरावर कसा परिणाम करतो, याविषयी माहितीचा अभाव होता. कोणती औषधे यावर प्रभावी ठरतील याविषयी माहिती नव्हती. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सामाजिक अंतर, साबण व सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण असे उपाय सुचविण्यात आले. या नियमांचे पालन लोकांनी न केल्यामुळे रुग्णसंख्या वाढू लागल्यावर टाळेबंदीचा उपाय करण्यात आला.

पुढे वाचा

करोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल !

२०१९ च्या नोव्हेंबरमध्ये संपूर्ण जगात करोना विषाणूचा उद्रेक झाला आणि जगाबरोबरच आपल्या देशातसुद्धा जानेवारी, फेब्रुवारी २०२० दरम्यान त्याची चाहूल लागू लागली. यापूर्वीसुद्धा जगात आणि आपल्या देशातसुद्धा महाभयंकर साथींचा उद्भव झाला होता आणि त्या त्या वेळी त्या रोगांमुळे अपरिमित मनुष्यहानीही झाली होतीच. पण त्या काळात त्या साथींचा उद्रेक एकाच वेळी संपूर्ण विश्वात कधीही झालेला नव्हता. पण आता हा करोनाचा उद्रेक एकाच वेळी संपूर्ण जगात झाला आणि अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे संपूर्ण विश्वात हाहाकार माजला. बरे या रोगाचा उद्भव नैसर्गिक जीवाणूमुळे नाही तर कृत्रिम विषाणूमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावर औषधोपचार काय करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. 

पुढे वाचा

गुलाम संस्कृतीच्या लोकांनो

गुलाम संस्कृतीच्या लोकांनो 
तुमच्यातून जात नाहीत आरपार किरणं
नसतो तुम्हाला कुठल्याच जाणिवेचा मागमूस
चामडी वाचविण्याच्या नादात असता मश्गूल

उजेडाला फाटे देऊन
गुंडाळून घेता अंधाराचं कवच
वर्तमान नाही भूतकाळासारखा
भविष्य नसेल वर्तमानासारखे
मग काळोखाच्या दरवाज्याआड
कुठल्या पिढीचं भविष्य दडवून ठेवलंय?

गुलाम संस्कृतीच्या लोकांनो
षंढपणाच्या बाजारात लागेलही तुमचा वाढीव भाव
तरीही बुधवारपेठ, कामाठीपुरा किंवा गंगा-जमुनामधील
भाकरीचं मोल नसेल तुमच्या घरंदाजपणाला

एकवेळ काळोखातून उजेडात आले तरीही
अंधाऱ्या खोलीची ओढ
सोडता सोडवत नाही
कुठल्या भीतीच्या सावटाने पोखरलंय?

आदिपणाचा बाजार उठवून
मुद्दाम पाडल्या जातोय भाव
तरीही तुम्ही शांत?

पुढे वाचा