तू हसत रहा
क्रांतीच्या विचारांवर 
मी पेटवत जातो
एक एक रान 
तू ओढत जा 
तुझ्या कुजल्या विचारांची 
एक एक रेघ आडवी 
नवनिर्माणाच्या स्वच्छ फळ्यावर 
मी पुसत जातो 
ती हर एक रेघ आडवी
तू बोल छाती फुगवून 
आम्ही करोडोंमध्ये आहोत 
मी ढोल लावून 
एक एक जमवीत जाईन
तू करत जा चर्चा 
आमच्यावरील खोट्या आरोपांची 
मी चिरत जाईन 
तुझ्या  वाफाळ शब्दांच्या 
तुफानी वादळांना 
तू फवारत जा 
विष फुटीरतेचं 
मी सावरत जातो 
पडत चाललेल्या 
प्रत्येक  खिंडारीला
तू मारत जा 
एका एका बिनीच्या शिलेदाराला 
तोंडावर काळे बुरखे घालून 
मी वावरत जाईन 
असाच निधड्या छातीने 
तुझ्या कुजक्या परंपरेला तोडण्यासाठी 
रावतभाटा, राजस्थान.
