‘विवेक व विज्ञान’ ‘श्रद्धा व अध्यात्म’ हा वाद अनेक शतकांपूर्वी चालू झाला व अजूनही चालू आहे. या प्रक्रियेमध्ये पाश्चात्त्य-भारतीय हा फरक स्पष्ट दिसतो. युरोप अमेरिकेतील वादांत लोक केवळ पुरातन तत्त्वज्ञानावर विसंबून राहत नाहीत. दोन्ही पक्षाचे लोक विरुद्ध पक्षातील आजच्या नवीन विचारांचा संदर्भ लक्षात घेऊन वाद-प्रतिवाद करतात. भारतात ही स्थिती नाही. उदाहरणार्थ, श्रद्धा-धर्म-अध्यात्म मानणारे लोक विवेकी साहित्य वाचत नाहीत. एवढेच नव्हे तर अशा साहित्यात नवनवीन विचारांची भर पडत आहे, हेही त्यांना माहीत नसते, व माहीत करून घ्यायचे नसते. गेल्या सहासात दशकांत नव्याने आलेल्या तत्त्वांची संक्षिप्त माहिती सोप्या शब्दांत देण्याकरिता हा लेख लिहीत आहे.
Author archives
शिक्षणहक्क कायदा : पाच निवडक मुद्दे
बालकांना निःशुल्क आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क देणारा कायदा एप्रिलपासून लागू झाला. गेल्या एक वर्षात ह्या कायद्याची माहिती देणारे तसेच त्याच्या अनेक पैलूंची चर्चा करणारे अनेक लेख, पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अतिशय क्रांतिकारक बदल घडेल अशा आशावादापासून विषमतेला बळकट करणारा कायदा अशा टोकाच्या प्रतिक्रिया ह्या चर्चामध्ये दिसून आल्या आहेत. परंतु ही सर्व माहिती परत एकदा संक्षिप्त रूपात सांगणे हा काही ह्या लेखाचा हेतू नाही.
सोमवारपासून मी काय करू? अशा अर्थाचे शीर्षक असलेले जॉन होल्ट या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञाचे एक इंग्रजी पुस्तक आहे. लांबलचक, उलटसुलट तात्त्विक चर्चा झाल्यावर आता नक्की काय करू हे शिक्षकांना, पालकांना समजत नाही ह्याकडे त्या नावाचा रोख आहे.
धनशुद्धीः स्वप्नरंजन आणि वास्तविकता
प्रामाणिक नागरिकाला एकीकडे सरकारदप्तरी छळवणूक सहन करावी लागते आहे आणि दुसरीकडे विक्रमी आकड्यांचे घोटाळे त्याच्या कानांवर (वाहिन्यांमुळे डोळ्यांवरही) पडत आहेत. संताप होणे अगदी स्वाभाविक आहे. या संतापातून निर्माण होणारी भ्रष्टाचार-विरोधी राजकीय ऊर्जा मोठी आहे व मोलाची आहे. ही ऊर्जा, सध्याची भ्रष्ट-दुरवस्था सुधारणाऱ्या विधायक प्रक्रियेचे इंजिन चालविण्यात वापरायची की डोळे दिपवणाऱ्या(स्पेक्टॅक्युलर) व दणदणीत काही केल्यासारखे वाटावे अशा विघातक स्फोटात उधळायची? हा खरा प्रश्न आहे. परंतु वलयांकित, एककल्ली, एककलमी आणि ‘एककिल्ली’ नेतृत्वाखाली होणारी आंदोलने, ही ऊर्जा स्फोटात उधळण्याचेच काम करत आहेत. इतकेच नव्हे तर ते समांतर अर्थव्यवस्थेचे कारण म्हणजे ‘उच्चपदस्थांचा लोभीपणा’ व उपाय म्हणजे त्यांना वठणीवर आणणे’ असे सुटसुटीत आकलन प्रसृत करून ‘अर्थशास्त्रीय निरक्षरता’ अधिकच वाढवीत आहेत.
ग्रामीण संस्कृती
‘संस्कृती’ हा मोठा सर्वसमावेशक शब्द आहे! त्यात काय काय अंतर्भूत होते हे एखाद्या व्याख्येत बसविणे कठीण! तरीपण हा शब्द सर्रास वापरला जातो व बहतेक ठिकाणी त्याचा उपयोग योग्य त-हेनेच झालेला असतो. एका मताप्रमाणे या शब्दाचे अनेक अर्थ संभवतात व संदर्भाने त्याचा अर्थ लावला जातो! साधारणपणे संस्कृती म्हणजे ‘कोणत्या प्रसंगी कोणा व्यक्तीने कसे वागावे, बोलावे विचार करावा या बाबतीत असलेले संकेत’ अशीही या शब्दाची व्याख्या होऊ शकेल! आता ग्रामीण संस्कृती अथवा ग्रामीण सांस्कृतिक जीवन यात अनेक भाग येऊ शकतात, धार्मिक, शैक्षणिक, श्रमिक, संगीतविषयक खेळविषयक, शेती-विज्ञानविषयक, राजकारणाविषयक इत्यादी.
व्याघेश्वरीचे पुराण
या वर्षाच्या सुरुवातीला Battle Hymn of the Tiger Mother नावाचे एक पुस्तक ब्लूम्सबरी पब्लिशिंग तर्फे बाजारात आले आहे, आणि बालसंगोपनाबद्दलचे पुस्तक म्हणून बहुवितरितही होते आहे. त्या पुस्तकाच्या लेखिका अॅमी चुआ ह्या मूळ चिनी वंशाच्या आणि त्यांच्या वडलांपासून अमेरिकेत स्थायिक झालेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या दोघी मुलींना खास चिनी पद्धतीने शिस्तीच्या धारेवर धरून कसे वाढवले, आणि मुलांना वाढवण्याची ही चिनी पद्धतच कशी योग्य आणि किफायतशीर आहे हे त्यांना सांगायचे आहे. पुस्तकाची सुरुवात त्यांनी तशीच केली आहे. पुस्तक लिहिण्याच्या भरात आपल्या विषयाशी सुसंगती ठेवणे मात्र त्यांना साधलेले नाही.
नियंत्रण आणि विश्वास
नियंत्रणाच्या हेतूबद्दलची शिक्षकाची कल्पना काय, यावर बरेच काही अवलंबून असते. नियंत्रणाची गरजच नसल्याचे लक्षात आणून देणे हाच त्याचा अंतिम हेतू असेल; मुलांनी ठाम, समर्थ, जबाबदार बनावे असे शिक्षकाला वाटत असेल आणि ती तशी बनू शकतात असा त्याला विश्वास असेल, तर शिकण्याला मुलांनी नकार देण्याचा असा धोका खूपच कमी होईल याची मला खात्री आहे. शिक्षक मुलांची कदर करतात का आणि मुलांना त्याची जाणीव आहे का, या मुद्द्याकडेच आपण पुन्हा एकदा येतो. एवढी एक गोष्ट सांभाळली गेली तर बांधीव वातावरणात शिकण्यास मार्गदर्शन करणे तुरुंगरक्षकाच्या कामासारखे भयावह वाटणार नाही.
संपादकीय
आजचा सुधारक चा पाण्यावरचा हा विशेषांक वाचकांपुढे ठेवताना मी जरा बेचैन झालो आहे. पाणी हा विषय इतका मोठा आणि आपल्या जिव्हाळ्याचा आहे की एकट्यादुकट्या माणसाने त्याला न्याय देणे अवघड आहे. तरीदेखील हे धारिष्ट्य आसु वरील प्रेमापोटी आणि वाचकांच्या उदारपणावर विश्वास ठेवून करत आहे.
पाणी हा पदार्थ मोठा विचित्र आहे. घन, द्रव आणि वायुरूप (बर्फ, पाणी, वाफ) अशा तिन्ही अवस्थेत तो आढळतो. त्याला स्वतःची ना चव ना रंग. पाण्यात जेवढे पदार्थ विरघळतात तेवढे आणि तितके विविध (रसायने, खनिजे -) पदार्थ इतर कुठल्याच द्रवात विरघळत नाहीत.
लेखक परिचय
चिं.मो.पंडित : स्थापत्य विशारद, सल्लागार म्हणून निवृत्तीनंतर शेती व त्यासंबंधी प्रश्न सोडवू पाहणाऱ्यांशी संपर्क राखून असतात.
आसुचे जुने लेखक पत्ता : 6, सुरुचि, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई 400 057 दूरध्वनी – 26147363
सुहास परांजपे : मुंबई आय.आय.टी.मधून केमिकल इंजिनिअरिंग चे पदवीधर. नोकरी न करता अनेक वर्षे स्वयंसेवी संस्थांत कार्य.
SOPPECOM (Society for Peoples Porticipatory Ecosystem Management) चे संस्थापक सभासद, K. Joy यांचेबरोबर कार्यरत. पाणी व्यवस्थापनावर पुस्तक, अहवाल.
पत्ता : 9, सर्वेष को.सो. India Hume Pipe Co. शेजारी, ठाणे (पूर्व), 400 603, दूरभाष 25324538
सीमा कुलकर्णी : SOPPECOM बरोबर कार्यरत.
पाव नाही? केक खा!
पाव नाही? केक खा!
आजकाल एक गैरसमज प्रचलित झाला आहे, की विज्ञान-तंत्रज्ञानाचे गतकाळातील यश पाहता पुढेही सर्व प्रश्न नेहेमीच विज्ञान-तंत्रज्ञानाने सुटत राहतील; भलेही पृथ्वीची लोकसंख्या कितीही वाढो. विज्ञानाबाबतच्या अपुऱ्या आकलनातून हा गैरसमज विश्वव्यापी झाला आहे. जसे, सिक्युरिटी अॅण्ड ग्रोथ या पुस्तकाचे लेखक बार्नेट व मोर्स हे थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा नियम थेट उलटा करून ही भूमिका मांडतात. ते लिहितात, “संसाधनांमध्ये फरक असतो आणि सर्व संसाधने सारखीच नसतात, हे विज्ञानाने खोटे पाडले आहे. आजच्या जगात तुम्ही कोणत्या संसाधनापासून सुरुवात करता याला महत्त्व उरलेले नाही.”
गावगाडा : सहकार (भाग-२)
शेतीसारखा व्यवसाय करणारा समाज हा, हा व्यवसाय करण्याइतका सक्षम असला पाहिजे. कारण दर १-२ वर्षांनी त्याच्यावर काहीतरी अस्मानी संकट येत असते. कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी, तर कधी बेमोसमी पाऊस, तर एखादी कीड, तर कधी कमी पिकलेल्या धान्याची परदेशातून आयात. सरकारच्या सर्व विभागांकडून, म्हणजे नियोजन खाते, अर्थखाते, पाणी-पाटबंधारे, वीज या सर्व विभागांकडून त्याच्याविषयीचा दृष्टिकोन हा योग्य असा नसतो. कशासाठी? जर धान्य महाग झाले तर नागरी मतदार नाराज होतात म्हणून! धान्याचे भाव कमी करण्यासाठी धान्य आयात करण्यात येते. मध्यंतरी कांद्याचे भाव खूप वाढले होते तेव्हा टी.व्ही.वर