Author archives

उपजत प्रवृत्ती

आजचा सुधारक मधील लेखनात ‘उपजत प्रवृत्ती’ (Instinct) या मानवी वर्तनावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घटकाकडे पूर्ण दुर्लक्ष होते आहे असे वाटते. मानवी वर्तनावर परिणाम करणाऱ्या बुद्धी व भावना या दोन घटकांकडे आजचा सुधारक मध्ये पुरेसे लक्ष दिले जाते.
प्राण्यांचे वर्तन प्रामुख्याने उपजत बुद्धीने ठरत असते. आई-मुलांनी परस्परांना ओळखण्याच्या क्रियेपासून पिलांना पाजणेभरवणे, घरटे बांधणे, काय खावे काय खाऊ नये, अन्न कसे मिळवावे, लैंगिक जोडीदाराची निवड, आपल्या स्वामित्व-क्षेत्राचे मर्यादीकरण व रक्षण, शत्रूला ओळखणे व त्याच्यापासून संरक्षण वगैरे सर्वच क्रियांमध्ये सर्व क्षेत्रात उपजत बुद्धीच महत्त्वाची असते व शिक्षणाचे, अनुभवा-पासून शिकण्याचे महत्त्व गौण असते.

पुढे वाचा

परिचायक:

द्वितीय युद्धपूर्व साम्राज्यवादातून मुक्त झालेले गरीब देश पूर्वीच्याच राज्यकर्त्या देशांच्या (काही देश त्यात जोडले गेले) कडून घेतल्या गेलेल्या कर्जाच्या (मुद्दल + व्याजाची परतफेड) विळखात सापडले आहेत. १९५५ साली ९ अब्ज डॉलर्स असलेले हे कर्ज १९८० मध्ये ५७२ अब्ज डॉलर्स झाले आणि १९९८ पर्यंत ते २२०० अब्ज डॉलर्स इतके वाढले. १९९७ मध्ये एक असा अंदाज व्यक्त केला गेला की हे वार्षिक देणे जर नसले तर एकट्या आफ्रिका खंडात दर वर्षी ७० लक्ष मुलांचे प्राण वाचतील आणि सुमारे ९ कोटी स्त्रिया व मुलींना प्राथमिक शिक्षण मिळू शकेल.

पुढे वाचा

कुटुंबकेन्द्रित समाज आणि स्त्री-केन्द्रित कुटुंब (भाग १)

चिं. मो. पंडित यांनी (आ.सु. ११.११, १२.३) एका मोठ्या व महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडले आहे. भविष्यातली समाजव्यवस्था ‘स्त्री-केन्द्री कुटुंबव्यवस्थे’ वर आधारित असावी असे मत मांडणाऱ्यांचा भूमिकेची ते वेगवेगळ्या अंगांनी पाहणी / तपासणी करतात. यासाठी जो ‘अप्रोच’ त्यांनी घेतला आहे व जी पद्धती अवलंबिली आहे ती फलदायी ठरण्याची शक्यता आहे.
कुटुंब हे समाजाच्या बांधणीचे पूर्वापार प्राथमिक व पायाभूत एकक राहिले आहे. पण या सामाजिक संस्थेवर गेल्या पन्नास वर्षांमध्ये सैद्धान्तिक आघातही केले जात आहेत. स्त्रीला पुरुषांच्या प्रभुत्वापासून मुक्त करावयाचे असेल तर तिला नवरा नावाच्या पुरुषाशी बांधून, जखडून ठेवणाऱ्या विवाह बंधनातून सोडविण्याची आवश्यकता मांडली गेली आहे.

पुढे वाचा

कुटुंब-व्यवस्था – मुलांना वाढविणे (भाग २)

१०. परीकथा, कहाण्या, गोष्टी
मुलांचे जग स्वप्नांचे, अद्भुतरम्यतेचे असते. आजूबाजूच्या जगाविषयी कुतूहल अचंबा वाटत असतो. शिवाय स्वतःचे काल्पनिक जगही ती उभी करू शकतात. कल्पनेनेच चहा करून देतात, बाजारात जाऊन भाजी आणतात, घर घर खेळतात, फोन करतात. शहरातल्या मुलांचा परिसर म्हणजे रहदारी, गोंगाट, भडक जाहिराती असा धामधुमीचा असतो. आजकाल घरचे वातावरण पण धावपळीचे आणि यंत्राच्या तालावर नाचायला लावणारे असते (दूरदर्शन, पंखे, गीझर, मिक्सर, फ्रीज, वॉशिंग मशीन, नळ, वीज . . . .) आयुष्याची गतीच ‘चाकांवर’ आधारित. अशा मुलांना स्वप्ने तरी शांत, कल्पनारम्य, अद्भुत कोठून पडणार?

पुढे वाचा

देवांची गरज आणि ‘पदभ्रष्टता’

अज्ञात प्रदेशातून ध्वनी ऐकू आला, माणूस दचकला, आजारी पडला, आजाराचे स्पष्ट कारण कळेना, सबब भूताची कल्पना केली. निरनिराळ्या अज्ञातोद्गम ध्वनींना, हावभावांना, आकाशचित्रांना, रोगांना, दुःखांना, सुखांना, जन्माला व मरणाला एक एक भूत कल्पिले. सुष्ट भुते व दुष्ट भुते निर्माण झाली. त्यांची उपासना सुरू झाली. नंतर रोग्यांची, सुखांची व दुःखाची खरी कारणे व तन्निवारक उपाय जसजसे कळू लागले, तसतशी सुष्ट भूतांची म्हणजे देवांची व दुष्ट भुतांची म्हणजे सैतानाची टर उडून जरूरी भासतनाशी झाली. . . . देवाची आणि देवीची जरूर कोठपर्यंत, तर संकटनिवारणाचे उपाय सुचले नाहीत तोपर्यंत.

पुढे वाचा

नागपूर पत्रसंवाद

नाना ढाकुलकर, १७४, तारांगण, विवेकानंद नगर, वर्धा मार्ग, नागपूर–४४० ०१५ सीता जोस्यम्! एक प्रभावी परीक्षण
आजचा सुधारकच्या जून २००१ च्या अंकात ‘सीता जोस्यम्’ या नाटकाचा परिचय चास्ता नानिवडेकर ह्यांनी करून दिला आहे. श्रीमती नानिवडेकर यांच्या शेवटच्या अभिप्रायाशी ‘विचारप्रवृत्त करणारे हे नाटक मनाला उच्च प्रतीचा बौद्धिक आनंद देते’ मी पूर्ण सहमत आहे. मी विचारप्रवृत्त तर झालोच पण लगेच कार्यप्रवृत्तही जालो. १९८० च्या सुमारास मी ‘रक्षेद्र’ (रावण) हे संगीत नाटक लिहून रंगभूमीवर आणले होते. आणि मी रक्षेद्र (रावण) ही ५०० पानाची कादंबरी लिहिली.

पुढे वाचा

दूरदर्शन आणि स्त्रीची दुर्गती

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवरील एका अतिशय लोकप्रिय मालिकेच्या संदर्भात एक विस्मयकारक घटना घडली. “क्योंकि सास भी कभी बहू थी’ ह्या मालिकेतले पात्र मिहिर ह्याचा अपघाती मृत्यू घडल्याचे एका भागात दाखवताच संपूर्ण देशभर हाहाःकार उडाला. आपल्या घरचेच कोणी गेल्यासारखे दुःख अनेकांना झाले. लोकांनी फोन, पत्र, ई मेल ह्यांद्वारेच नव्हे तर अगदी मोर्चा काढून मिहिरला पुन्हा जीवदान देण्याची मागणी मालिकेच्या निर्मात्यांकडे केली. एखाद्या मालिकेच्या कथानकाशी आणि पात्रांशी अशा मोठ्या प्रमाणात भावनिक तादात्म्य होण्याची ही घटना अभूतपर्व अशीच म्हटली पाहिजे. छोट्या पडद्यावर प्रथमच दीर्घ मालिका (soap operas) सुरू झाल्या तेव्हाही ‘हम लोग’, ‘बुनियाद’, ‘खानदान’ यांना अशीच अफाट लोकप्रियता लाभल्याचे आता आठवते.

पुढे वाचा

ग्रंथ-परिचय

हंग्री फॉर ट्रेड (हाऊ पुअर पीपल पे फॉर फ्री ट्रेड) (१) (जॉन मेडेली, पेंग्विन बुक्स इंडिया, २००१, पृ. १७८, किं. रु. २००/-.)
परिचायक: श्रीनिवास खांदेवाले
प्रस्तावना
ह्या छोटेखानी ग्रंथात प्रसिद्ध ब्रिटिश लेखक जॉन मेडेली ह्यांनी १९९४ साली झालेला जागतिकीकरणाचा करार विषम कसा आहे व तो विकसित देशांच्या —- व त्यातल्या त्यात तेथील बहुराष्ट्रीय खाजगी कंपन्यांच्या —- अधिक फायद्याचा कसा आहे ह्याचे अतिशय सखोल व गंभीर असे विवेचन केले आहे. ह्या कराराच्या मूलभूत असमतोलामुळे विकसनशील देशांतील लहान कास्तकारांचा शेती व्यवसाय व मुख्यत्वेकरून ग्रामीण लोकांची सध्याची अन्नसुरक्षा धोक्यात कशी आली आहे, येत आहे व येणार आहे ह्याचे —- विषयाचा केंद्रबिंदु मानून —- असंख्य संदर्भासह विश्लेषण त्यांनी केले आहे.

पुढे वाचा

मेपुरे आणि दियदे

अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये झालेले मेळाव्यातील प्र. ब. कुळकर्णी यांच्या वृत्तांताबद्दल हे पत्र लिहीत आहे. पुढची चर्चा आचार्य रेगे व प्रो. दि. य. देशपांडे यांच्या मतभेदाविषयी आहे. आचार्य रेगे यांचे मत ‘धर्मसुधारणेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन साधणे योग्य असे होते.’ तर प्रो. दि. य. देशपांडे हे ‘समाजास’ “धर्म, देव हानिकारक असल्याने समाजसुधारणेसाठी विवेकवादाकडे समाजास वळवावे’ ह्या (कडव्या) मताचे आहेत.
या विषयावर मेळाव्यात झालेल्या चर्चेत मला दोन मुद्दे उपस्थित करायचे आहेत.
१. गेल्या शतकात चीन व रशियात कम्युनिस्ट क्रान्ती झाली. रशियात ७४ वर्षे (१९१७ ते १९९१) व चीनमध्ये १९५० ते आजतागायत कम्युनिस्ट तत्त्वांना अनुसरून जनतेला निधर्मी करण्याचे महाप्रयत्न झाले.

पुढे वाचा

अमेरिकेत आ.सु. वाचकांशी हृदयसंवाद (२)

आ.सु.च्या वतीने सर्व चर्चकांचे आभार मानणे आणि काही आणखी खुलासे करणे ही कामे उरली होती. आप्तवचन तुम्ही मानत नाही. पण धर्मग्रंथांतून तुम्ही वेळोवेळी वचने उद्धृत करता हे कसे असा एक आक्षेप या पूर्वीच्या व्याख्यानात, ‘विवेकवाद धर्माची जागा घेऊ शकेल?’ या विषयावर बोलताना घेतलेला होता. आजच्या चर्चेतही श्रद्धेची दृढनि चयाशी गफलत करून टीका झालेली होती. त्या संदर्भात मी म्हणालो : धर्मग्रंथ व धर्मगुरू म्हणतात म्हणून आपण एखादे वचन स्वीकारतो तेव्हा ती श्रद्धा असते. बुद्धिवाद्याचे त्याने समाधान होत नाही. ‘जनीं निंद्य तें सर्व सोडोनि द्यावें । जनीं वंद्य तें सर्व भावें करावें ।।’ ह्या म्हणण्यावर मला प्रश्न पडतो की एखादी गोष्ट निंद्य का ठरते किंवा वंद्य का समजावी ह्याचे उत्तर येथे नाही.

पुढे वाचा