ग्रंथावरील परीक्षणात्मक टीकालेख वाचला. (आजचा सुधारक, नोव्हें. डिसे.९२) या ग्रंथाबद्दलचा त्यांचा अभिप्राय जाणून घेण्यास आम्ही अगोदरच उत्सुक असल्यामुळे त्यांच्या या परीक्षणाने आम्हाला साहजिकच आनंद झाला.
परीक्षणकर्त्याने आपल्या ग्रंथाचे कौतुक करावे अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. आमच्यापुरते बोलायचे तर आमच्या ग्रंथावर टीकाकारांनी कठोर टीका करावी असे आम्हाला वाटत असते. ‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’ या आपल्या १९८८ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथावर अशी कठोर टीका कुणीही केली नाही याचे आम्हाला दुःखच वाटत आले आहे. मोघम कौतुकापेक्षा कठोर टीका विचारप्रवर्तक व म्हणूनच उपयुक्त असते.