Category Archives: पत्र-पत्रोत्तरे

पत्रोत्तरे

‘सुधारक’च्या कोरोना विशेषांकातील लेखांवर आलेल्या प्रतिक्रियांवर मूळ लेखकांनी पाठवलेली पत्रोत्तरे तसेच इतरांचे अभिप्राय प्रकाशित करीत आहोत.

सकारात्मक बदल घडवून आणण्यात वैचारिक द्वंद्वांची महत्त्वाची भूमिका असते. आपले विचार परत परत तपासून घेऊन त्यास अधिक धारदार करणे वा विरूद्ध विचार पटल्यास त्यांना आत्मसात करणे असे सतत होत राहिले पाहिजे.

सुधारकच्या माध्यमातून असे होत असलेले बघून आनंद वाटतो.

समन्वयक – प्राजक्ता अतुल
09372204641
aajacha.sudharak@gmail.com

पत्रोत्तर – हीलर्सचा डॉक्टरांवरील दोषारोप

अंबुजा साळगावकर व परीक्षित शेवडे या लेखकद्वयांचा ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मार्गानेच जाऊ या ’ हा प्रतिसादवजा लेख वाचत असताना डॉ. शंतनू अभ्यंकरांच्या लेखातील मुद्द्यांचा त्यांनी केलेला प्रतिवाद हा आताच्या प्रचलित राजकारणातील वितंडवादासारखा आहे की काय असे वाटू लागते. काँग्रेसने केलेल्या चुका आम्हीही (पुनःपुन्हा) केल्या तर बिघडले कुठे? याच तालावर ॲलोपॅथीतही  दोष असताना (पर्यायी) देशी औषधोपचार पद्धतीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे का करतात हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे व त्यासाठी संविधानातील वाक्यांचा आधार ते घेत आहेत.  

स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मार्गानेच जाऊया – अंबुजा साळगांवकर आणि परीक्षित शेवडे

(डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या “या मार्गानेच जाऊया” या लेखाच्या पुन:प्रसिद्धीनिमित्ताने)

२४ एप्रिल २०२०च्या महाराष्ट्र टाइम्समधील डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा “या मार्गानेच जाऊया” हा लेख ‘सुधारक’च्या १ मे २०२०च्या कोरोना विशेषांकांत पुन:प्रकाशित झाला. तेव्हा म.टा.ला कळवायची राहून गेलेली प्रतिक्रिया ‘सुधारक’च्या सुजाण वाचकांसाठी सत्वर पाठवत आहे. ‘जागतिक आरोग्य संघटना’ पारंपरिक-पूरक वैद्यकांस नीटसपणे पुढे आणून, येणार्‍या काळात प्रत्येक देशाचा आरोग्यांक वाढावा यासाठी प्रयत्नशील आहे. [https://www.who.int/traditional-complementary-integrative-medicine/strategy/en/] असे असता लेखाच्या सुरुवातीपासून इतक्या कडवटपणे देशी औषधांचा तिरस्कार करण्याचे कारण कळत नाही. 

कोण्या उच्चविद्याविभूषित म्हणविणार्‍याने एका सामाजिक व्यासपिठावरून केलेली मांडणी ही भाषेचाही दर्जा सोडून झाली की तेथेच काही काळेबेरे असावे अशी शंका येते. चीनचे… पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक,
स.न.वि. वि.
आजचा सुधारक नोव्हेंबर ९४ च्या अंकातील स्त्रीपुरुषसमता व स्त्रीमुक्तीसंबंधी सर्वेक्षण’ या संबंधातील डॉ. र.वि. पंडित यांची प्रश्नावली वाचली. डॉ. पंडित कोणत्या कालखंडात वावरत आहेत?आज २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर खरोखरी सुखवस्तु मध्यमवर्गीय, विशेषतः ब्राम्हण, समाजात पुरुषमुक्तीची गरज आहे. परंतु या बटबटीत वास्तवाकडे कोणीच लक्ष देत नाही ही खेदाची बाब आहे. विवेकवाद वास्तवाकडे डोळेझाक करून भावनांच्या आहारी कधीच जात नसतो. खालील कवितेत, स्त्रीमुक्तीच्या अतिरेकाने ब्राह्मण युवक कसा अगतिक बनला आहे हे पहायला मिळेल.
।। मॉडर्न ब्राह्मण युवक ।।
(चाल – चोली के पीछे ची)
आपलं चांगलं सोडलं । हीन पाश्चात्त्य घेतलं ।।।
करुनी पत्नीची गुलामी । स्वतः समजे पुरोगामी ।।
पत्नी पतीला दटावी । निमुटपणे ऐकून घेई ।।।
शब्द काढिता चकार । दावी त्राटिका अवतार ।।।
काय करतो बिचारा । सदा तिचाच दरारा ।।
उपमर्द सदा करी । पती तोही सहन करी ।।
पती सदा अँड्जस्ट होतो । तिची कृत्ये खपवुनं घेतो ।।
पत्नी असते सर्वेसर्वा । याला वाटत नाही हेवा ।।।
सगळ्याची ह्या परिणती । कशामध्ये तरी होई ।।
संसाराचा खुळखुळा । करून घेतो मॉडर्न खुळा ।।
करू घातलेले सर्वेक्षण बैल दुभवण्यासारखे आहे.… पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक स.न.
‘अंधश्रद्धानिर्मूलन आणि धर्म या लेखामधून मधून तुम्ही ‘अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांना धर्मविरोध करावाच लागेल असे प्रतिपादिले आहे. गेल्या ७ वर्षातल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला काही मते नोंदवावीशी वाटतात.
हिंदू म्हणून समजल्या जाणार्या. इथल्या समाजात हिंदू धर्माची समजली जाणारी मूळ बैठक आणि धर्मग्रंथ एकीकडे, आणि विचित्र/विकृत कर्मकांड आणि भ्रष्ट धर्मग्रंथ दुसरीकडे अशी काहीशी विभागणी झालेली आहे. इथला हिंदू वेद-उपनिषदे, दर्शने जाणणारा क्वचित आढळतो. ग्रामीण भागात तर नगण्यच! पण ‘निर्मला मातेचे अध्यात्म ‘गाणगापूरचे माहात्म्य’, ‘ज्ञानेश्वरी, संतोषी माता व्रत/स्तोत्र अशी व्रतवैकल्ये व ग्रंथ तो उराशी कवटाळून असतो.… पुढे वाचा