विषय «युवा»

लिव्-इन विथ AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स

२०२२ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून AI च्या चर्चा रंगल्यात. चॅटजीपीटीमुळे सर्वांचे लक्ष जणू या एका बिंदूपाशी येऊन थांबले आणि आपण सर्वांनी कळत नकळत या कृत्रिमप्रज्ञेला डेट करायला सुरुवात केली आणि आता साधारण ७-८ महिन्यांनी हे नाते या टप्प्यावर आले आहे की ‘लिव्-इन’मध्ये राहून पाहूयात जरा. 

कारण कृत्रिमप्रज्ञा हा आपल्या आयुष्यातला होऊ घातलेला नवीन जोडीदार आहे यात शंका नाही. पण संसार थाटायच्या आधी जोडीदाराला समजून घेणे गरजेचे आहे.

तर २०२२ च्या किती आधीपासून आपण कृत्रिमप्रज्ञा हे तंत्रज्ञान वापरत आहोत? मग ते गूगलने पुरवलेले नकाशे असूदेत नाहीतर ऑनलाइन चॅट-बॉट्स असूदेत किंवा टायपिंग करताना स्वतःहून दुरुस्त होऊन येणारे शब्द असूदेत.

पुढे वाचा

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली तरुणाई 

डिसेंबर २०२२ पासून जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेची म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची म्हणजेच एआयची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. त्याला कारण आहे कृत्रिमप्रज्ञेचा नवा अवतार. यंत्रमानव हा तसा जुना प्रकार आहे. त्यावर अनेक चित्रपटही आले. मायक्रो चिपमधील प्रोग्रामिंगनुसार आधीच देऊन ठेवलेल्या सूचनांप्रमाणे ठरलेली कामे करणारा यंत्रमानव आपण पाहिलेला आहे. पण प्रोग्रामिंगमध्ये दिलेल्या सूचनांपेक्षा वेगळी परिस्थिती उद्भवली तर विचार करून वेगळा निर्णय घेत त्याची कार्यवाही करणारा परिपूर्ण यंत्रमानव अद्याप बनलेला नाही. यंत्रमानव बनवणे हे प्रकरण खर्चिक आहे. सध्या सुरू असलेली कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा यंत्रमानवापेक्षा फारच वेगळी आहे.

पुढे वाचा

जग कुठे आणि भारत कुठे…

असं म्हटलं जातं, जगभरामध्ये सर्वांत शक्तिशाली देशांपैकी भारत हा तिसरा सगळ्यांत मोठा देश आहे. पण खरं वास्तव काय आहे आपल्या देशाचं? या देशातल्या शेवटच्या घटकांत राहणाऱ्या माणसांमधले भय अजूनही संपलेले नाही. इतिहासातल्या घटनांना वर आणून त्याला पुष्टी व पाठबळ देण्याचं काम आपल्या देशातली व्यवस्था सध्या करत आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठं भय म्हणजे अंतर्गत सामाजिक सुरक्षेचं. या देशातले अल्पसंख्याक, इथले भटकन्ती करणारे आदिवासी माणसं सध्या सुरक्षित नाहीत. या बांधवांवर कुठेही झुंडीने हल्ले होतात. अश्या घटनांमुळे भारत सध्या जगामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

पुढे वाचा

देशाला काय हवे- ऐक्य की एकरूपता?

‘एक धर्म, एक वंश, एक भाषा, एक संस्कृती व एक भूप्रदेश’ या घटकांचे मिळून राष्ट्र तयार होते. इटलीचा स्वातंत्र्यसेनानी जोसेफ मॅझिनी याचे हे मत. सावरकरांनी मॅझिनीवर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रभाव मराठी ब्राह्मण तरुणांवर एकेकाळी फार मोठा होता. हाच वर्ग पुढे हिंदू सभा व संघाच्या माध्यमाने देशभर स्वयंसेवक वा शाखाप्रमुख म्हणून गेला. परिणामी मॅझिनीची भाषा ही संघाची व त्याच्या परिवाराचीही भाषा झाली. त्याआधी भारत हे हिंदू राष्ट्र आहे ही भाषा संघाचे संस्थापक डॉ. के. ब. हेडगेवार यांनीही वापरली होती. संघाच्या आरंभीच्या व नंतरच्याही स्वयंसेवकांना तश्या प्रतिज्ञा त्यांनी दिल्या व घ्यायला लावल्या होत्या.

पुढे वाचा

आपण विद्यापीठे घडवतो, विश्वविद्यालये नाही!

जे एन यु, उच्च शिक्षण, विचारस्वातंत्र्य
—————————————————————————–
प्रचंड राजकीय मरगळ असण्याच्या ह्या काळात एखादा कन्हैया कुमार कसा तयार होतो, ह्याचा माग घेतल्यास आपण थेट जेएनयुच्या प्रपाती, घुसळणशील वातावरणापर्यंत जाऊन पोहचतो. तिथल्यासारखे विद्रोही, प्रश्न विचारण्यास शिकविणारे वातावरण उच्च शिक्षणाच्या सर्वच केंद्रांत असणे का आवश्यक आहे, हे सांगणारा हा लेख.
—————————————————————————–
“रस्त्याने चालताना किंवा बागेतल्या बाकांवर बसून जर दोन माणसे वाद घालत असतील तर त्यांपैकी विद्यार्थी कोण, डॉन (= प्राध्यापक) कोण, हे ओळखणे सोपे आहे. जास्त आक्रमक तो विद्यार्थी आणि पडेल, मवाळ तो डॉन.”

पुढे वाचा

आत्मशोधार्थ शिक्षण

शिक्षणव्यवस्था, आत्मशोध, युवकांना आवाहन
—————————————————————————–
शिक्षण स्वतःचा शोध व समृद्धी ह्यांसाठी तसेच जनसामान्यांच्या हितासाठी कसे उपयोजित करता येईल, विद्याशाखांमधील कृत्रिम भिंती कशा तोडता येतील, शिक्षणक्षेत्रात प्रेरणा व स्वातंत्र्य ह्यांचे महत्त्व काय, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेत व त्याला स्वानुभव जोडत आंतरराष्ट्रीय एका युवा विख्यात शास्त्रज्ञाने मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात केलेल्या भाषणाचा संपादित अनुवाद.
—————————————————————————–
तुमच्यापैकी बहुतेकांना ठाऊक असेल की दीक्षान्त संदेशाला संयुक्त राष्ट्रांमध्ये शुभारंभाचे भाषण म्हणतात. विविध विषयांतील स्नातकहो, पदवी प्राप्त करून आज तुम्ही बाहेरच्या जगात स्वत:ची ताकद आजमावण्यासाठी, स्व-गुणवत्तेच्या बळावर व्यक्ती म्हणून उत्क्रांत होण्यासाठी, जीवनात नव्या वाटेवर शुभारंभ करण्यासाठी पाऊल टाकत आहात.

पुढे वाचा

‘बोल्ड’ हे ‘ब्युटिफूल’च हवे

‘बाबा, एक फ्रेंड येणार आहे. आम्हाला काही discuss करायचे आहे.’ मुलाचा फोन.

माझा मुलगा ‘टीन’ वयोगटातला.

‘हो. येऊ दे की.’ मी.

बेल वाजल्यावर दरवाजा उघडला. समोर माझा मुलगा आणि एक मुलगी. मुलगी असणं मला अनपेक्षित होतं. फ्रेंड म्हणजे मुलगाच असणार असं मी गृहीत धरलं होतं. का? – माझा समज. संस्कार. मुलाचा मित्र मुलगाच असणार. जास्तीकरून समाजात असंच असतं ना. आमच्यावेळी तर हे असंच अधिक होतं. शिवाय त्याने लिंगनिरपेक्ष फ्रेंड शब्द वापरला होता. मैत्रीण असे म्हटले असते, तर प्रश्नच नव्हता. मी काही जुन्या विचारांचा नाही.

पुढे वाचा

विवाहाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’!

अलीकडे एक चर्चा अचानक उफाळून आली, ती अशी की, विवाह अंतर्गत पतीची शरीरसंबंधाबाबत असणारी पत्नीवरची जबरदस्ती हा ‘बलात्कार’ समजायचा का? मात्र पतीच्या या जबरदस्तीच्या मुद्दय़ावर बोलण्यापूर्वी, पहिल्या प्रथम विवाहाविषयी थोडं प्राथमिक जाणून घ्यायला हवं. स्त्री-पुरुषांना एकमेकांच्या साथीने आणि पुढे आधाराने सहजीवन जगता यावे, म्हणून तरुणपणातच त्यासाठी जी निष्ठेची आणि प्रेमाची बैठक घातली जाते, तिला ‘लग्न’ म्हणतात.

तसं म्हटलं तर, मानवाच्या बाबतीत लग्न म्हणजे फक्त शरीरसंबंध असा अर्थ असू नये. कारण तसे संबंध प्राचीन काळापासून विवाहाशिवायच होत होते आणि आजही होऊ शकतात.

पुढे वाचा

नेटिझन्स इतक्या उर्मटपणाने का वागतात?

संगणक (यात संगणकाशी संबंधित मोबाइल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, वाय फाय, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग व इतर सर्व माहिती तंत्रज्ञान सुविधांचा समावेश आहे.) माणसांना चांगली माणसं बनण्यासाठी मदत करतात, हे संगणक क्षेत्रातील एका तज्ञाचे विधान आहे. परंतु निदान ब्लॉगोस्फेरमधील अनुभवावरून तरी नेटवरील माणसं उदात्त, शहाणे, संवेदनशील झाले आहेत, याबद्दल शंका घ्यावीशी वाटते. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक आपल्या आयुष्याला व्यापलेले आहे. संगणक निरक्षरता हद्दपार होत आहे. नेट आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत आहे. तरीसुद्धा नेटवर वावरणाऱ्यांसाठी काही नीती – नियम, आचारसंहिता वा स्वनियंत्रण असे काहीही नसल्यासारखे नेटिझन्सचे वर्तन असते.

पुढे वाचा

‘केस तर केस – भीमजयंतीला वाजणार २४ बेस’

१४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिवस. मध्यरात्रीपासूनच शुभेच्छांचे संदेश व्हॉट्सअपवर यायला सुरुवात झाली. त्यातला हा एकः ‘केस तर केस-भीमजयंतीला वाजणार २४ बेस’ या ओळी व खाली स्पीकर्सचे एकावर एक थर असलेला फोटो. पाठवणाऱ्याला लिहिलेः ‘मला हे मान्य नाही. आपण कायदा पाळायला हवा. इतरांना आपला त्रास होता कामा नये.’ त्याचे उत्तर आलेः ‘मलाही तसेच वाटते. आपल्या लोकांच्या काय भावना आहेत, हे कळावे, म्हणून तो फोटो पाठवला.’
दुपारीच याचा प्रत्यय आला. कानठळ्या बसवणारा डीजेचा आवाज जवळ येत गेला तसा अधिकच असह्य होऊ लागला.

पुढे वाचा