डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी भारतीय विवेकवादाचं मुख्य स्वरूप सातत्यानं लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संकुचित भूमिका घेतली म्हणून दुसऱ्या संकुचितांनी त्यांच्यावर हल्ला केला असं अजिबात नाही. त्यांनी व्यापक भूमिका घेतली. ती सहन न झाल्यामुळे जी संकुचित विचारांची मंडळी आहेत, त्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे भारतीय विवेकवादाचं व्यापक स्वरूप लक्षात घेताना याची उभी विभागणी करण्याची जी पद्धत आहे, ती मुळातून तपासली पाहिजे. उभ्या विभागणीत विवेकवादी एकीकडे आणि अविवेवकवादी दुसरीकडे किंवा अमूक एक परंपरा एकीकडे आणि दुसरी परंपरा दुसरीकडे अशी विभागणी केली जाते.
विषय «विवेक विचार»
‘अस्तित्त्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’
आपल्या भोवतालची संपूर्ण सजीवसृष्टी “आहार, निद्रा, भय मैथुनं च” या चार प्राथमिक प्रेरणांच्या चौकटीत वावरत असते. मानवही त्याला अपवाद नाही. परंतु त्या चौकटीबाहेर पाऊल टाकून आजूबाजूच्या सृष्टीची ओळख करून घेणे विकसनशील बुद्धी असलेल्या मानवालाच जमले आहे. सर्व सृष्टीची माहिती करून घेण्याच्या उत्सुकतेपोटी त्याने अनेक ज्ञानशाखा विकसित केल्या. प्रत्येक शाखा वेगवेगळ्या विषयांचा वेध घेण्याचा प्रयत्न करीत असते. अशाच एका ज्ञानशाखेने विषय निवडला, “सजीवांची निर्मिती आणि विकास.” सजीवांच्या उत्पत्तीविषयींचे कुतूहल माणसाला फार प्राचीन काळापासून वाटत आले आहे. अनेक संस्कृतींनी , तत्त्ववेत्त्यांनी, धर्मग्रंथांनी ह्या विषयाचा वेध घेणाचा प्रयत्न केला आहे.
पत्रसंवाद
प्रिय मिलिंद,
कसा आहेस? आज फार अस्वस्थ व्हायला झालं म्हणून तुझ्याशी बोलावस वाटलं…
काल कर्नाटकात डॉ.कलबुर्गी सरांचा खून केला दोघाजणांनी सकाळीच. अगदी डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांना मारलं ना तसच… काही लोक आता त्यांना बदनाम करणारे मेसेज फिरवत आहेत. तुला खर वाटेल त्यांनी संगितलेसं… डॉ. कलबुर्गी हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक तर होते पण त्या पलीकडे अनेक चांगले विद्यार्थी घडवणारे शिक्षक होते. ते मुलांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि समाज चांगला कसा होईल यासाठी कृती करायला शिकवत होते. अगदी डॉ.दाभोलकर
स्वातंत्र्य म्हणजे काय?
“स्वातंत्र्य म्हणजे काय? ते इतके मोलाचे का वाटते? स्वातंत्र्याची ओढ मानवी स्वभावांत उपजतच आहे, कीं विशेष परिस्थितीमुळे घडणारा तो एक संस्कार आहे? स्वातंत्र्य हे अंतिम साध्य आहे कीं दुसरे काही संपादन करण्याचे ते एक साधन आहे – स्वातंत्र्याबरोबरच काही जबाबदाऱ्या अपरिहार्य ठरतात काय? आणि अधिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी एकादा समाजचा समाज स्वातंत्र्यावर पाणी सोडायला सहज राजी व्हावा इतक्या त्या जबाबदाऱ्या अवजड असतात काय? स्वातंत्र्यसंपादन आणि स्वातंत्र्यरक्षण यासाठी करावयाचे प्रयत्न टाळण्याकडे बहुसंख्य माणसांचा कल सहज व्हावा, इतके स्वातंत्र्यासाठी झगडणे हे सायासाचे असते काय – अन्न, वस्त्र, निवारा अथवा चैनही, यांचे म्हणजेच चरितार्थाच्या हमीचे जितके महत्व वाटते तितकेच स्वातंत्र्याचे आणि त्याच्या अनुषंगाने लाभणाऱ्या गोष्टींचे महत्त्व वाटते काय ?….
सूफी परंपरा
वर्तमान काळात धार्मिक समूहभानाचा उपयोग राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी केला जात आहे. मग मुद्दा दहशतवादी हिंसेचा असो वा संकीर्ण राष्ट्रवादाचा, जगाच्या सर्व भागांमध्ये धर्माच्या मुखवट्यांआडून राजकारण केले जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत धर्माला राजकारणापासून वेगळे करण्याच्या, ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला जात होता. पण आता अगदी उलट झाले आहे. धर्म आणि राजकारणाची सरमिसळ वाढतच गेली. या संदर्भात दक्षिण आशियात फार गंभीर स्थिती आहे. एप्रिल 2015 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांनी अजमेरच्या गरीब नवाझ ख्वाजा मोइनुद्दिन चिश्तीच्या दर्ग्यावर ठेवण्यासाठी चादर पाठविली. गेल्या 22 एप्रिलच्या वर्तमानपत्रांतील वृत्तानुसार सोनिया गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनीही दर्ग्यावर चादर चढविली आहे.
विकास साधू या विवेकानं!
विकास आज देशाच्या राजकारणात, अर्थकारणात, समाजकारणात विकास हा कळीचा मुद्दा बनला आहे. भरघोस बहुमतानं निवडून आल्यावर घेतलेल्या पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते: ‘सरकार विकासाचं जनांदोलन उभारेल.’ खूष झालो. विचार केला की, आधीच्या सरकारनं विपर्यास केलेल्या आमच्या पश्चिम घाट परिसरतज्ज्ञ गटाच्या शिफारशींना आता न्याय दिला जाईल, कारण हा अहवाल म्हणजे सर्व सह्यप्रदेशात विकासाचं जनांदोलन कसं उभारावं, याचा उत्तम आरखडा आहे. मात्र, जरी विकासाच्या जनांदोलनाबद्दल बोललं गेलं, तरी ते प्रत्यक्षात आणणं हे मर्यादित हितसंबंधांना जपण्यासाठी झटणाऱ्यांना बोचतं आणि म्हणून गेली साडेतीन वर्षं या अहवालाविरुद्ध आधी दडपादडपी आणि मग ‘आमच्या अहवालानुसार कोकणात एका विटेवर दुसरी वीटही ठेवता येणार नाही,’ अशा पठडीचा धादांत अपप्रचार यांचा गदारोळ चालला आहे.
जुने ते सोने (?)
पुराणमित्येव न साधु सर्वम् (जुने ते सर्वच चांगले असते असे नाही.) असे कविकुलगुरु कालिदास दोन हजार वर्षांपूर्वी सांगून गेला आहे. परंतु आमच्या पुराणप्रिय समाजाच्या काही ते पचनी पडले नाही. उलट एखादी गोष्ट जितकी जुनी तितकी ह्या समाजाला जास्त प्रिय असते. काळाची पुटे चढून ती जेवढी अंधुक होईल तेवढी ती आम्हाला अधिक आकर्षक वाटते. निराधार परंपरांवर डोळे मिटन विश्वास ठेवलण्यात आम्हाला अतिशय आनंद वाटतो. प्राचीन काळापासून रूढ झालेली गृहीतके हे आमचे आवडते विचारधन आहे. कुठलीही प्रायोगिक सिद्धता न लाभलेल्या गूढ, गहन, अनाकलनीय, धूसर अशा गोष्टींचे विलक्षण आकर्षण आमच्या समाजाला असते .सुबोधतेपेक्षा
त्रुटित जीवनी..
“जनतेच्या मनावर नियंत्रण मिळवण्याकरिता दरवर्षी हजारो कोटी खर्ची पडत असतात. काय घडत आहे यापासून सर्वसामान्य जनता अनभिज्ञ असते आणि याची त्यांना जाणीवदेखील नसते.”
– नोम चोमस्की
व्यक्ती व नाती दोन्हींचं वस्तुकरण झाल्यामुळे आपल्याला कुणाशीही जोडून घेण्यासाठी (कनेक्ट) उपयोगिता हा एकमेव निकष झाला आहे. बाजारपेठेत आपल्या मूल्यात वृद्धी कशी होईल, या काळजीनं सगळे ग्रासून गेले आहेत. घरापासून दारापर्यंत, संस्थेपासून यंत्रणेपर्यंत उदारतेची हेटाळणी, सहिष्णुतेची नालस्ती व करुणेची अवहेलना वृद्धिंगत होत आहे. जिव्हाळा आटत जाऊन वरचेवर परिपूर्ण शुष्क (सॅच्युरेटेड ड्रायनेस) होत चाललेल्या वातावरणात संवेदनशीलतेची ससेहोलपट होत आहे.
साडेसाताळलेले, ‘शन्याळलेले ‘ दिङ्मूढ प्राणी
‘कुंडल्या कागदी असोत, नाही तर तळहाती असोत; त्यात चितारलेल्या प्रारब्ध-मर्यादेबाहेर मनुष्याला केव्हाही जाता येणार नाही. त्यातील भोग भोगल्याशिवाय सुटका नाही’, हा प्रवाद जर खरा मानला, तर मनुष्याच्या पुरुषार्थाला वाव तरी राहिला कोठे? सगळाच जर दैववाद, तर यत्नवाद हा शब्द जन्मला तरी कधी? आणि का? आणि कोणाकोणाच्या पोटी? बरे, प्रत्येकाचे दैव आणि सुखदु:खाचे फेरे हे जर घडय़ाळातल्या यंत्राप्रमाणे ठाकठीक आणि यथाकाळ, यथाक्रम घडणारे, तर त्यासाठी माणसाने आपले हात-पाय तरी का हलवावे? दु:ख येणार तर ते अगत्य येणारच येणार आणि सुखाचा मुसळधार पाऊस अमुक वेळी कोसळणार म्हणजे धो धो कोसणारच.
“विचारां”चा विचार
(प्रा. दि.य.देशपांडे यांच्या विवेकवादास…)
कधी आला आहे का तुझ्या मनात असा विचार,
विचार…की करू यात आता विचारांचा संचार, विचारांचा विचार!
जेव्हा वास्तवतेचा आधार देतोस तू डावलून, तेव्हा उरतात ते फक्त अनिर्बंध, निराधार तर्क
अन मग त्यातून येतात जन्माला पूर्वजन्म, पुनर्जन्म, ईश्वर, स्वर्ग आणि नरक!
का ठेवतोस तू अशा संकल्पनांवर विश्वास ज्याला नाही काही पाया,
अन दुर्देवाला कोणत्या आधारावर म्हणतोस तू “भूत का साया”?
जर करत बसलास तू मागचा-पुढचा जन्म, पाप अन पुण्य,
तर या निराधार विचारात करून घेशील हे मिळालेले जीवनही नगण्य!