विषय «विवेक विचार»

एक प्रकट चिंतन

अलीकडेच मी नथुराम बोलतोय ह्या नाटकाच्या निमित्ताने उठलेले वादळ, झालेला गदारोळ व त्यावर बंदी घालून ते शमविण्याचा झालेला प्रयत्न ह्यासंबंधी वृत्तपत्रातून वृत्त, प्रतिक्रिया वाचताना एक विचार सतत मनाला भेडसावत होता. हे सत्यान्वेषण की विकृती?

गांधींवर एकामागून एक तीन नाटके आली. पैकी गांधी विरुद्ध गांधी, गांधी आणि आंबेडकर ह्या नाटकांचे प्रयोग झाले आहेत. गांधी विरुद्ध गांधी ह्यावर तज्ज्ञांच्या प्रतिक्रियाही प्रसिद्ध झाल्या. ‘नथुराम’ च्या वेळी सहनशक्तीचा अंत झाला आणि गांधीवादी किंवा गांधीवादी नसले तरी ते राष्ट्रपिता आहेत हे मानणारे ह्यांनी कडाडून विरोध केला अन् तो सफल झाला.

पुढे वाचा

प्रा. रेगे आणि ईश्वर

‘कालनिर्णय’ ह्या दिनदर्शिकावर (१९९५, १९९६ आणि १९९८) प्रा. मे. पुं. रेगे ह्यांचे अनुक्रमे ‘मी आस्तिक का आहे?’, ‘परंपरागत श्रद्धा’ आणि ‘देवाशी भांडण’ हे तीन लेख प्रसिद्ध झालेले आहेत. ह्या लेखांमधील विषयाशी संबंधित आजचा सुधारक (एप्रिल, १९९१) या मासिकात प्रसिद्ध झालेला ‘विवेकवादाच्या मर्यादा’ हा लेख असे एकूण चार लेख माझ्या डोळ्यांसमोर आहेत. ह्या लेखांमधून रेगे सरांची ईश्वरविषयक भूमिका स्पष्टपणे व्यक्त झालेली आहे. कोणत्याही श्रद्धाळू व्यक्तीला जेवढ्या स्वच्छ शब्दांत स्वतः स्वीकारीत असलेली भूमिका मांडता आली नसती तेवढ्या स्पष्ट शब्दांत रेगेसरांनी ती मांडलेली आहे.

पुढे वाचा

निमित्त मुलाच्या विवाहाचे

आमच्या मुलाचा विवाह २४ डिसेंबर १९९७ रोजी नोंदणी पद्धतीने झाला. आमचे कुटुंबच पुरोगामी विचारांचे, विवेकवादी विचारसरणीवर चालणारे! आम्हाला व्याहीही समविचारी मिळाले.

विवाह किती साध्या पद्धतीने साजरा करावा ह्याचा विचार केल्यानंतर ठरले की फक्त सख्खी बहीण भावंडे बोलवायची. मामा, मामी, मावशी, आत्या, काकू कोणीही नाही. मित्रमैत्रिणींचे प्रतिनिधित्व करणारी एक मैत्रीण व एक मित्र! ते दोघेही साक्षीदार म्हणूनही होते. दोन डॉक्टर्स, ज्यांनी आमच्या कुटुंबाला अडचणीच्या वेळी अगदी आपलेपणाने मदत केली. त्यांच्या प्रती कृतज्ञता दर्शविण्यासाठी म्हणून त्यांना आमंत्रण दिले. (आमंत्रणपत्रिका छापल्या नाहीत. सर्वांना घरी जाऊन विवाहाला येण्याविषयी सांगून आलो.)

पुढे वाचा

समान नागरी कायद्याचा मसुदा : एक चिकित्सा (२)

श्री. सत्यरंजन साठे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती जया सागडे आणि श्रीमती वैजयन्ती जोशी ह्यांच्या चमूने जो नवीन, भारतातील सर्व नागरिकांसाठी समान, असा विवाहविषयक कायदा सुचविला आहे त्यामुळे विवाह एक अत्यन्त गंभीर असा विधी होण्याला, त्याचे ऐहिक स्वरूप स्पष्ट होण्याला त्याचप्रमाणे त्याचे पावित्र्य आणि मांगल्यसूचक पारलौकिकाशी आजवर असलेले नाते संपुष्टात यावयाला मदत होईल ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे हे मान्य करून त्याविषयीची चर्चा पुढे चालू ठेवू या.
(२)एकपतिपत्नीक विवाहालाच मान्यता देण्याच्या तरतुदीमध्ये असा विवाह सहसा कोणाला मोडूद्यावयाचा नाही हा विचार प्रामुख्याने कार्य करताना दिसतो.

पुढे वाचा

मी आस्तिक का आहे?

कवळे येथील श्रीशांतादुर्गा ही आमची कुलदेवता. शांतादुर्गा आमच्या कुटुंबातीलच एखादी वडीलधारी स्त्री असावी तसं तिच्याविषयी माझे आजोबा-आजी, आई-वडील आणि इतर मोठी माणसं, माझ्या लहानपणी बोलत आणि वागत. अतिशय करडी, सदैव जागरूक असलेली पण अतीव प्रेमळ, संकटात जिच्याकडे कधीही भरवशाने धाव घ्यावी अशी वडीलधारी स्त्री. ती आदिशक्ती, आदिमाया, विश्वजननी आहे हे त्यांना माहीत होते. पण हे विराट, वैश्विक अस्तित्व कुठेतरी दूर, जिथे वाणी आणि मनही पोहोचू शकत नाही अशा दुर्गम स्थानी विराजमान झालेले आहे, तिथून ते आपल्याला न्याहाळत असते, आपले आणि इतरांचे नियंत्रण करते असे त्यांना वाटत नव्हते.

पुढे वाचा

मी आस्तिक का नाही?

प्रा. मे. पुं. रेगे यांचा ‘मी आस्तिक का आहे?’ हा लेख ‘कालनिर्णय’ कॅलेंडरच्या १९९५ च्या आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. (हा लेख प्रारंभी उद्धृत केला आहे.) प्रा. रेगे यांचा तत्त्वज्ञानातील व्यासंग व अधिकार लक्षात घेता त्यांच्या या लेखाने आस्तिक लोकांना मोठाच दिलासा मिळेल यात शंका नाही. परंतु म्हणूनच आस्तिक्य न मानणाऱ्या विवेकवादी लोकांवर त्या लेखाची दखल घेण्याची गंभीर जबाबदारी येऊन पडते. ती जबाबदारी पार पाडण्याकरिता हा लेख लिहावा लागत आहे.

‘मी आस्तिक का आहे?’ या प्रश्नाचे प्रा. रेगे काय उत्तर देतात? ते उत्तर थोडक्यात असे आहे की आपली वडील मंडळी आस्तिक होती.

पुढे वाचा

चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (४)

स्त्रीपुरुषसमागमाची किंवा योनीची व पावित्र्याची जी सांगड आमच्या मनामध्ये कायमची घातली गेली आहे ती मोडून काढण्याची, त्यांची फारकत करण्याची गरज मला वाटते, कारण मी पूर्ण समतेचा चाहता आहे. माझ्या मते समता आणि पावित्र्य ह्या दोन्ही एकत्र, एका ठिकाणी नांदू शकत नाहीत. एका वस्तूला कायमची पवित्र म्हटले की दुसरी कोणतीतरी नेहमीसाठी अपवित्र ठरते. म्हणजेच एक श्रेष्ठ आणि दुसरी कनिष्ठ ठरते – आणि समतेच्या तत्त्वाला बाधा येते. समतेच्या तत्त्वाला बाधा असणारे कोणतेही वर्तन त्याज्य आहे ह्या मतावर मी ठाम आहे.
हे जे योनीचे पावित्र्य आहे ते गंगेसारखे किंवा अग्नीसारखे पावित्र्य नाही.

पुढे वाचा

वैज्ञानिक दृष्टिकोन

भौतिक विज्ञानामुळे जो निर्माण होतो तो वैज्ञानिक दृष्टिकोन असा समज सार्वत्रिक आहे. भौतिक विज्ञान ज्यांना उपलब्ध झालेले आहे त्यांच्यात तो दृष्टिकोन निर्माण होतोच असे म्हणता येत नाही, आणि त्याच्या उलट ज्यांना भौतिक विज्ञानाचे रीतसर शिक्षण मिळालेले नाही, त्यांच्यात तो असल्याचे अनेक वेळा ध्यानांत येते. असे जर आहे तर हा वैज्ञानिक शब्द सोडून देऊन त्याऐवजी चिकित्सक दृष्टिकोन, किंवा चिकित्सक बुद्धी, हा शब्द वापरणे जास्त अर्थवाही होणार नाही काय? ही चिकित्सक बुद्धी अगदी निरक्षर अशा खेडूत माणसांच्या अंगी असलेली मी पाहिली आहे, आणि त्याचबरोबर विद्वान आणि विज्ञानाची उच्च पदवी धारण केलेल्यांच्या अंगी ती नसल्याचेही अनुभवले आहे.

पुढे वाचा

चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (३)

मागच्या लेखांकात प्रा.म.ना. लोही ह्यांच्या सविस्तर पत्राचा मी उल्लेख केला होता. त्यांच्या लेखामधील महत्त्वाचा अंश घेऊन त्यावर मी माझे म्हणणे पुढे मांडणार आहे. मजकडे आलेले लेख किंवा पत्रे ही स्वतंत्रपणे लिहिलेली व वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेली असल्यामुळे त्यात कोठे कोठे पुनरुक्ती आहे, तसेच त्यांच्या काही भागांचा संक्षेप करता येण्याजोगा आहे असे वाटल्यावरून त्यांच्या मुद्द्यांचा तेवढा परामर्श घेण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे हा वादविवाद नाही; मी कोठलाही पवित्रा घेतलेला नाही. म्हणून मला एखादा मुद्दा महत्त्वाचा वाटला नाही आणि त्यामुळे तो माझ्या विवेचनातून गळला तर तो पुन्हा माझ्या लक्षात आणून द्यावयाला हरकत नाही.

पुढे वाचा

खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?

साधना साप्ताहिकाच्या २८ मे १९९४ च्या अंकामध्ये श्रीमती शांता बुद्धिसागर ह्यांचा ‘खरी स्त्रीमुक्ति कोठे आहे?’ हा लेख प्रकाशित झाला आहे. त्यांनी चारचौघीह्या नाटकाची सविस्तर चर्चा करून शेवटी आपले मत व्यक्त केले आहे. त्यात त्या म्हणतात की, “काही मूल्येविचार हे शाश्वत स्वरूपाचे असतात. सध्या आपण अशा तर्‍हेची विचारधारा तरुणांच्या पुढे ठेवीत आहोत की स्त्रीपुरुष कोणत्याही जातिधर्माचे असोत, सुखी कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने एका वेळी एकाच स्त्री-पुरुषाचे सहजीवन होणे हीच आदर्श कुटुंबरचना असली पाहिजे.

पुढे वाचा