यशोदाबाई आगरकर ह्या थोर समाजसुधारक कैलासवासी गोपाळ गणेश आगरकर यांच्या पत्नी होत. आगरकर बी.ए. च्या वर्गात असताना कऱ्हाडजवाज गावातील मोरभट फडके यांची कन्या अंधुताई हिच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर तिचे नांव यशोदाबाई ठेवण्यात आले. या विवाहाच्या वेळी यशोदाबाईचे वय दहा वर्षांचे होते. आगरकर पुण्याला शिकत असल्यामुळे आणि यशोदाबाईचे वय लहान असल्यामुळे त्या या काळात माहेरी म्हणजे उंब्रजला रहात असत. आगरकर सुट्टीत आले की, मग त्या टेंभूला सासरी जात.
सन १८८० मध्ये आगरकर एम.ए. झाले आणि वर्षभरात ते पुण्याला न्यू इंग्लिश स्कूल व केसरी या कार्यांत गुंतल्यावर त्यांनी पुण्याला संसार थाटला.