विषय «संपादकीय»

संपादकीय

एकोणीसशे पन्नास-साठच्या दशकात वादविवेचनमाला नावाची एक ग्रंथमाला काही घरांमध्ये दिसत असे. जॉर्ज बर्नार्ड शॉचे अॅन इंटेलिजंट वुमन्स गाईड टु कॅपिटॅलिझम, सोशलिझम एट् सेटरा (नेमके नाव जरा वेगळेही असेल!) हे पुस्तकही इंग्रजी वाचणाऱ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात ओळखीचे असे. नंतर मात्र विनय हर्डीकरांच्या शब्दांत ‘सुमारांची सद्दी’ सुरू झाली. अभ्यास थांबला आणि अडाणी अतिसुलभीकरणे वापरात आली.
कॅपिटॅलिझम म्हणजे मुक्त बाजारपेठ किंवा पाशवी पिळवणूक, समाजवाद म्हणजे भोंगळ सद्भाव (मृणाल गोरे, डॉ लोहिया) किंवा बनेल अवसरवाद (अमरसिंग-मुलायमसिंग!), साम्यवाद म्हणजे श्रमिकांचा स्वर्ग किंवा आडमुठे लालभाई, अशी सुलभीकरणे आज वापरात आहेत.

पुढे वाचा

संपादकीय उद्याची जबाबदारी

२६ ते २८ जून २००८ या काळात मुंबईत नेहरू सेंटर येथे भविष्याप्रत जबाबदारी(Responsibility to the Future) या नावाने एक चर्चासत्र भरवले गेले. धोरण दूरदृष्टी गट (Strategic Foresight Group), राष्ट्रसंघाची ग्लोबल कॉम्पॅक्ट (UN – Global Compact) ही उपसंघटना आणि मुंबई विद्यापीठ यांनी मिळून हा कार्यक्रम करवला. इतर दहा संस्था, काही भारतीय, काही आंतरराष्ट्रीय, या सहभागी होत्या; तर आणखी चार संस्थांनी पाठिंबा जाहीर केला होता.
२६ जून सायंकाळचे सत्र औपचारिक उद्घाटनाचे होते. राष्ट्राध्यक्षा कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रम अपेक्षित उपचार म्हणून पार पडला.

पुढे वाचा

जात – आरक्षण विशेषांकासंबंधी

मानसोपचारात रोग्याची पहिली अवस्था “छे! मला कुठे काय झाले आहे!’ अशी नकाराची असल्याचे मानले जाते. भारतात जातिव्यवस्थेबाबत असे नकार फार दिसतात. “मुळात जातिव्यवस्थेत ताणतणाव नव्हतेच, आज अस्पृश्यता पाळली जात नाही, सामाजिक तणावांमध्ये आरक्षण भर घालते. आरक्षणाने आज उच्च असलेली गुणवत्ता खालावेल” अनेक रूपांमधले नकार!

मागे लॅन्सी फर्नाडिस आणि सत्यजित भटकळ यांच्या ‘The Fractured Civilization’ या पुस्तकाच्या गोषवाऱ्यातून हे नकार नाकारायचा एक प्रयत्न आसु ने केला. आता पुन्हा एक प्रयत्न करतो आहोत, टी.बी.खिलारे व प्रभाकर नानावटी यांच्या संपादनाखाली जात व आरक्षण या विषयावर एक विशेषांक काढून.

पुढे वाचा

संपादकीय संवाद ग्यानबाचा विवेकवाद

प्रिय वाचक,
स.न.वि.वि.
विवेकवाद ह्या नावाचे एक पुस्तकच प्रा. दि.य.देशपांडे ह्यांनी लिहिलेले आहे. प्रा. दि.य.देशपांडे आजचा सुधारक ह्या आपल्या मासिकाचे संस्थापक संपादक होते. आ.सु.त सुरुवातीपासून विवेकवाद म्हणजे काय, ती कोणती विचारसरणी, ह्याचे विवेचन करणारे शक्यतो सुबोध व सविस्तर लेख त्यांनी लिहिले. अशा वीस-बावीस लेखांचा तो संग्रह आहे. असे जरी असले तरी अधून मधून आमचे वाचक, क्वचित् लेखकही हा प्रश्न विचारत असतातच. कधी कधी तुम्ही समजता तो विवेकवादच नाही असे उद्गारही कोणी काढतात. “तुमच्या विवेकवादात भलेही ते बसत असेल, हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा भाग आहे.”

पुढे वाचा

संपादकीय प्र.ब.कुळकर्णी

प्रिय वाचक,
ह्या अंकात अव्वल इंग्रजीतील समाजसुधारक आणि प्रबोधनकार भाऊ महाजन यांचा त्रोटक परिचय दिला आहे. तसेच त्यांच्या ‘धूमकेतु’ या साप्ताहिकातील ‘गुजराथ्यांचे महाराज’ हा लघुलेखही पुनर्मुद्रित केला आहे. नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. तिच्या अनुषंगाने आपल्या संस्कृतीतील गुरु ह्या संस्थेबद्दल काही विचार मनात येतात. सर्वप्रथम जाणवते ते हे की आपल्या संस्कृतीत गुरुमाहात्म्य म्हणा किंवा गुरुमहिमा म्हणा ह्याचे अतोनात स्तोम आहे. सगळे लहान-मोठे गुरु, महाराज, संत-महंत, आपल्या शिष्यमंडळींना स्वतःच्या गुरुची महानता वर्णन करण्याची एकही संधी दवडत नाहीत. जेणकरून श्रोत्यांच्या किंवा शिष्यांच्या गुरुचे माहात्म्य म्हणजे स्वतःचे माहात्म्य आपोआपच वाढते.

पुढे वाचा

संपादकीय

प्रिय वाचक
पुनश्च हरि:ओम्

हे टिळकांनी म्हणणे ठीक आहे, पण सुधारकाला ही शब्दावली घेण्याचा अधिकार आहे का, असा विचार क्षणभर मनात चमकून गेला. सुधारकाला ‘श्री’वरही हक्क नाही असे बऱ्याच मंडळींना वाटते. ते पत्राच्या अग्रभागी ‘श्री’कार घालत नाहीत. पण लिखाणात ‘अथश्री’, ‘इतिश्री’चा प्रयोग वा मानत नसतील अशी आशा आहे.
‘भाषा बहता नीर है’ हा मुखपृष्ठावरचा विचार कसा वाटतो?
श्री. नंदा खरे ह्यांना काही एका अत्यावश्यक कामासाठी निदान वर्षभर सुटी हवी आहे त्यामुळे मला पुनश्च हरि:ओम् म्हणावे लागले आहे.
संपादकाच्या व्यक्तित्वातले उणेअधिक नियतकालिक उतरणे स्वाभाविक आहे.

पुढे वाचा

संपादकीय

जातिव्यवस्थेवरच्या लेखांना आजचा सुधारक ने प्रसिद्धी द्यावी, अशी इच्छा काही वाचक वेळोवेळी व्यक्त करतात. दुसऱ्या टोकाला त्या आग्यामोहोळात हात घालू नये, असे एक मत आहे ! एकूणच भारतीयांना जातींबाबत तटस्थपणे लिहिणे अवघड जाते. लेखांतील एखादे निरीक्षण, एखादा निष्कर्ष, एखादे मत, मान्य करावे की नाही याचा निर्णय बहुतांश वेळी लेखकाची जात पाहून घेतला जातो. हे जातींबद्दलच्या लेखांबद्दल नव्हे, तर साहित्यासकट सर्व प्रकाशित मजकुराबद्दल घडत असते. हे अर्थातच विवेकी नाही.
लॅन्सी फर्नाडिस आणि सत्यजित् भटकळ यांचे The Fractured Civilisa-tion : Caste in the Throes of Change (भारतीय जनवादी आघाडी, १९९९) हे पुस्तक जातिसंस्था, तिच्यातले बदल, तिचे परिणाम, यांच्याबद्दलचा एक महत्त्वाचा दृष्टिकोण मांडते.

पुढे वाचा

संपादकीय ‘आजचा सुधारक

मनुष्याची एक पूर्णावस्था असते आणि ती घडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कृती म्हणजेच सुधारणा, ही आगरकरांच्या कामांमागील मुख्य संकल्पना. ही मुक्ती, मोक्ष, अशी पूर्णावस्था नसून पूर्णपणे ऐहिक आणि सामाजिक संदर्भापुरतीच आहे. या पूर्णावस्थेकडे जाणाऱ्या वाटेवर कोणत्या देशातले लोक कुठपर्यंत पोचले आहेत, ते आगरकर तपासतात. आज आपण जगाकडे मुख्यतः इंग्रजी भाषेच्या चष्म्यातून पाहतो. आगरकरांच्याही काळी हीच स्थिती होती, आणि त्यातही मुख्यतः इंग्लंड देशाकडेच जास्त लक्ष दिले जाई. आगरकर त्यांना जास्त प्रगत वाटलेल्या देशांच्या वाटचालीबाबत एक छोटीशी यादी देतात “अनेक देशांतील उद्योगी पुरुषांनी अहर्निश परिश्रम करून पदार्थधर्माचे केवढे ज्ञान संपादिले आहे, विपद्विनाशक व सुखकारक किती साधने शोधून काढिली आहेत, व राज्य, धर्म नीति वगैरे विषयांतील विचार किती प्रगल्भ झाले आहेत.

पुढे वाचा

अभ्यागत संपादकाचे संपादकीय : आपली आरोग्यव्यवस्था दिशा व प्रश्न

आजचा सुधारक हे आगरकरांचा वारसा सांगणारे विवेकवादाला वाहिलेले मासिक आहे. त्यात सर्वसाधारणपणे आरोग्याखेरीजचे अन्य सामाजिक विषय आजपर्यंत आलेले आहेत. आज आरोग्याचे नवनवे सामाजिक प्रश्न व आरोग्यसेवादेखील समाजाच्या सर्वच अंगांना भिडते आहे. त्याचे सध्याचे स्वरूप काय आहे, त्याचे भविष्य काय, त्याचा समाजावर आता व पुढे काय परिणाम होणार आहे या विषयांची चर्चा आवश्यक वाटल्याने ह्या अंकाचे प्रयोजन ! आरोग्यसेवेतील समस्या काय ? त्यावर उपाय काय ? अशा ढोबळ स्वरूपात या अंकातील लेख लिहिले गेलेले नाहीत. ह्यातील बहुतेक लेख कुठल्या ना कुठल्या स्वरूपात एकेका विषयाच्या काही मूलभूत पैलूंबद्दल विचार करताना आढळतील.

पुढे वाचा

लेखक परिचय

डॉ. अनंत फडके, एम.बी.बी.एस.: ‘सेहत’ या स्वयंसेवी संस्थेमध्ये कार्यरत. लोकविज्ञान चळवळ, जनआरोग्य अभियान यासाठी चळवळ. जनतेच्या आरोग्यासाठी वेगळ्या वाटा शोधण्यात आयुष्यभर काम. औषधांच्या प्रश्नांवर लिखाण. ८, अमेय आशिष सोसायटी, कोकण एक्सप्रेस हॉटेल लेन, कोथरूड, पुणे ४११ ०३८. ०२०-२५४६००३८

डॉ. मोहन खामगांवकर, एम.डी. : सध्या लातूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये सामाजिक व प्रतिबंधक औषधी वैद्यक विभागाचे प्रमुख प्रभारी प्राध्यापक. या विभागात विशेष रस. एम.बी.बी.एस.च्या विद्यार्थ्यांसाठी डेलळरश्र । शिर्शीशपींळींश मेडिसिनचे पुस्तक लिहिलेले. आणखी एक पुस्तक आहाराबद्दल, कौटुंबिक आहारमित्र’ प्राध्यापक व विभागप्रमुख, पी.एस.एम.डिपार्टमेंट, शासकीय मेडिकल कॉलेज, लातूर.

पुढे वाचा