चार्वाकाविषयी आजच्या अनेक माणसांना विशेष आकर्षण का वाटते? ह्याचे सरळ उत्तर असे की तो निखळपणे जडवादी होता. ‘निखळपणे ’ असे म्हणायचे कारण असे की इतर काही भारतीय दर्शनेही जडवादाकडे झुकणारी आहेत. उदाहरणार्थ, वैशेषिक दर्शन. जे काही आहे ते सर्व परमाणूंचे बनलेले आहे, असे ते मानते, असे स्थूलमानाने म्हणता येईल. पण प्रारंभी जरी ते ईश्वर मानीत नव्हते असे समजायला जागा आहे, तरी पुढे त्याने ईश्वराला सामावून घेतले. शिवाय ते कर्मसिद्धांतही स्वीकारते. म्हणजे व्यक्तींच्या कर्मानुसार त्यांना सुखदुःखरूप फळे भोगावी लागतात असे ते मानते.
विषय «इहवाद»
नास्तिकवादः एक अल्प परिचय
अगदी लहानपणापासूनच आपल्यावर संस्काराच्या नावाखाली देव-धर्म यांची शिकवण दिली जाते. पालकांना जरी देव-धर्माचे अवडंबर पसंद नसले तरी समाजात वावरताना त्यांच्या मुलां/मुलींची कळत-नकळत देव-धर्माची, पुसटशी का होईना ओळख होते. सण-उत्सव साजरा करत असताना देव-धर्माच्या उदात्तीकरणाला पर्याय नसतो. कुठल्याही गावातील वा शहरातील गल्लीबोळात एक फेरी मारली तरी कुठे ना कुठे देऊळ दिसते. या देवळाच्या गाभाऱ्यातील देवाच्या/देवीच्या मूर्तींची मनोभावे पूजा-अर्चा करणाऱ्यांची कधीच कमतरता नसते.
परंतु एकविसाव्या शतकात वावरताना आजच्या पिढीतील विचार करू शकणाऱ्या तरुण/तरुणींच्या मनात देव-धर्म, पूजा-अर्चा, सण-उत्सव, जत्रा-यात्रा इत्यादींच्याबद्दल नक्कीच प्रश्न पडत असतील.
आपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का?
आपल्या देशाची घटना सेक्युलर आहे असे सर्व पुरोगामी विचारवंत सांगतात; पण ती खरोखरच शंभर टक्के सेक्युलर आहे का?
सेक्युलर शब्दाचा अर्थ निधर्मी, धर्म न मानणारा किंवा ईहवादी असा आहे. आपल्या देशाला केवळ अधिकृत धर्म नाही म्हणून आपला देश/घटना सेक्युलर आहे असा याचा अर्थ होत नाही. तेव्हा नेमकी परिस्थिती काय आहे ते पाहू या.
ईहवादी (सेक्युलर) राज्याच्या संकल्पनेचा उगम
मध्ययुगात युरोपमध्ये राज्य आणि चर्च यांच्यामध्ये जो सत्तासंघर्ष झाला त्यात ईहवादी राज्याच्या संकल्पनेचे मूळ सापडते. ‘द मोनार्किया’ या पुस्तकात डान्टे याने आधुनिक काळातील ईहवादी राज्याची कल्पना प्रथमच मांडली.
बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन
बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : जगाला प्रभावित करू शकणाऱ्या अलौकिक शक्तीचे, व्यक्तीचे वा वस्तूचे अस्तित्व बुद्धिगम्य नाही म्हणून ते स्पष्टपणे नाकारणे. परंतु ज्यावेळी आपण ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ठळकपणे उद्धृत करत आहोत त्यावेळी अलौकिक शक्तीसहीत धर्म/पंथ/धम्म/दीन/रिलिजन (religion) अशा धर्माधीष्ठित जीवनपद्धतीसुद्धा नाकारत आहोत आणि म्हणूनच हिंदू-नास्तिक, मुस्लिम-नास्तिक, बौद्ध-नास्तिक, ख्रिश्चन-नास्तिक इत्यादी संभ्रमात टाकणारे शब्द आणि ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ही संज्ञा यातील फरक स्पष्ट करता येईल. धर्माचे अस्तित्व स्वीकारून फक्त ईश्वर नाकारणे हे अपुरे आहे. ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ हे अलौकिक शक्तीपुरते मर्यादित नसून मानवी जीवनातील इतर घटकांनासुद्धा लागू होते अशी पूर्ण आणि स्पष्ट मांडणी बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्यात अपेक्षित आहे.
विवेकवादाच्या मर्यादा
[गेल्या फेब्रुवारी महिन्यात प्रा. मेघश्याम पुंडलीक रेगे यांनी नागपूर येथील धरमपेठ महाविद्यालयात ‘भारतीयांचा पुरुषार्थ विचार’ व ‘विवेकवादाच्या मर्यादा’ या दोन विषयांवर दोन व्याख्याने दिली. प्रा. रेगे यांची गणना केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अखिल भारतीय अग्रगण्य विद्वानांत केली जाते ही गोष्ट सुपरिचित आहे. त्यांचा पाश्चात्त्य आणि भारतीय दोन्ही तत्त्वज्ञानांचा व्यासंग अतिशय विस्तृत आणि सखोल असून व्याख्यानांच्या विषयांवरील त्याचा अधिकार निर्विवाद आहे. त्यांनी केलेले विवेकवाद आणि त्याच्या मर्यादा यांचे विवेचन ‘आजचा सुधारक’च्या वाचकांना उद्बोधक वाटेल, म्हणून ते व्याख्यान येथे उद्धृत करीत आहोत. – संपादक]
रॅशनलिझमचे (rationalism) ‘विवेकवाद’ हे भाषांतर आहे अशी कल्पना मी करतो.
अध्यात्म आणि विज्ञान
लेखाचे शीर्षक पाहिल्याबरोबर अनेक वाचक बुचकळ्यात पडतील. ‘अध्यात्म आणि तत्त्वज्ञान?’ ते उद्गारतील. ‘म्हणजे ती दोन आहेत की काय? आमची तर अशी माहिती आहे की त्या दोन गोष्टी नाहीतच; एकाच गोष्टींची दोन नावे आहेत.’ आणि अशी समजूत आपल्या समाजात प्रसृत झालेली आहे हे मान्य केले पाहिजे. एखादा ग्रंथ तत्त्वज्ञानाचा आहे असे ऐकल्याबरोबर त्यात अध्यात्माविषयी, आत्म्याविषयी, त्याचा बंध आणि मोक्ष यांविषयी विवेचन असणार हे गृहीत धरले जाते. पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर तत्त्वज्ञानाची पुस्तके हवीत अशी मागणी केल्याबरोबर विक्रेता आपल्यापुढे अध्यात्माची पुस्तके टाकील हे खरे आहे.
निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (उत्तरार्ध)
भारतीय धर्मनिरपेक्षतेचा राजकीय आशय
Secularism – धर्मनिरपेक्षता याला भारतात वेगळा अर्थ व त्याचे वेगळे परिणाम आहेत. पाश्चात्याप्रमाणे हा शब्द येथे कार्यान्वित होत नाही. कारण भारत हा एक बहुधार्मिक देश असून याला उपनिषदांचे, सर्वधर्मसमभावाचे जबरदस्त अधिष्ठान आहे. याचबरोबर येथील संरंजामशाही राज्यव्यवस्थेमध्ये सर्व धर्मांमध्ये समन्वयाची व बंधुभावाची भावना असल्यामूळे धर्मनिरपेक्षतेचा प्रश्नच कधी आला नाही.
पण १९व्या शतकात ब्रिटिश राजवटीत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पट बदलून गेला. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ‘फोडा व झोडा’ची राजनीती स्वीकारली. यामुळे मध्ययुगीन संस्कृतीच्या इतिहासावर परिणाम होऊन नवीनच विस्कळीत इतिहास निर्माण झाला.
निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (पूर्वार्ध)
आजकाल सेक्युलॅरिझम व सेक्युलर ह्यांबद्दल बरेच बोलले जाते. ज्येष्ठांच्या बैठकीत यावर चर्चा होणे स्वाभाविक होते. ज्यांना जशी माहिती तशी त्यांनी सांगितली. यांतून कांही गोष्टी जाणवल्या त्या अशा.
• सेक्युलर हा भारतीय शब्द नसून पाश्चात्य देशाकडून आपल्याकडे आला आहे. व हा शब्द जीवनशैलीबरोबरच राज्यशासनव्यवस्थेशी जोडला गेला आहे.
• या शब्दाला बरेच अर्थ आहेत. जसे, इहवाद येथपासून ते कांही सामाजिक तुष्टीकरणाबरोबर याचा संबंध जोडला जातो.
• पाश्चात्य व भारतीय विचारसरणी सेक्युलरबाबत भिन्न आहे. पण आपल्याला भारतीय संविधानाने यासाठी मान्य केलेला सर्वधर्मसमभाव हा शब्दच मान्य करावा लागतो.
इहवादः मानवी प्रतिष्ठेचा महाप्रकल्प
पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक माणसाचं जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जीवन म्हणजे इहजीवन. एकेका माणसाचं जीवन इथं संपतं, पण अशा संपण्यानं मानवी जीवनाचा प्रवाह संपत नाही. जीवनाची शृंखला कोणत्याच कडीला शेवटची कडी मानत नाही. सतत नवनव्या कड्या उगवत राहतात. त्यामुळं ऐहिक मानवी जीवन कधी विझून जात नाही. जीवनाची वाहिनी कधी आटूनही जात नाही.
माणसाचं इहजीवन हाच इहवादाचा एकमेव विषय आहे. इहजीवनाची उज्ज्वलता हाच त्याचा ध्यास आहे. माणूस हाच जीवनाचा नायक आहे. भोवतीचं मानवी जीवन त्यानंच निर्माण केलं आणि ही अधिकाधिक उज्ज्वल मानवी जीवन निर्माण करण्याची प्रक्रियाही खंडित होणं त्यानं मान्य केलं नाही.
अध्यात्म आणि विज्ञान (पूर्वार्ध)
अध्यात्म आणि विज्ञान यांचे परस्परांशी संबंध काय आहेत ? या प्रश्नाला अनेक उत्तरे दिली गेली आहेत. एक उत्तर आहे : ती मूलतःच परस्परविरुद्ध आहेत; दुसरे उत्तर आहेः ती स्वतंत्र आहेत, आणि म्हणून त्यांच्यात कसलाही संबंध नाही; आणि तिसरे आहेः ती स्वतंत्र आहेत, पण ती परस्परपूरक आहेत. या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते ? पण या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी अध्यात्म म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय हे पाहिले पाहिजे.
अध्यात्म आणि विज्ञान यांपैकी विज्ञान म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर बरेच निश्चित आहे, आणि म्हणून ते देणे सोपे आहे.