डॉ. प्रदीप पाटील : नास्तिकतेची मर्यादा आणि सामर्थ्य या विषयाचा परिसंवाद आपण इथे घेतला. प्रसारमाध्यमं, समाज आणि राजकारण या अंगांनी आपण मर्यादा काय आहेत आणि ताकद काय आहे ते जाणून घेतलं. हा परिसंवाद घेण्यामागचं कारण हे होतं की नास्तिकता ही नकारात्मक आहे असं नेहमी म्हटलं जातं. न आणि अस्तित्व – अस्तित्व न मानणारा – असं ते नास्तिकत्व असतं. तुम्ही जर सगळ्या गोष्टींना नकारच देणार असाल तर तुमच्याकडे काय आहे? प्रश्न आहे हा, परत एकदा ऐका. जर तुम्ही नकारच देणार असाल तर तुमच्याकडे फक्त नकारच आहे का?
विषय «नास्तिक्य»
नास्तिकतेचे सामर्थ्य आणि मर्यादा आणि प्रसारमाध्यमांतील नास्तिक्याची भूमिका
शिवप्रसाद महाजन : नास्तिक कायमच गंभीर असतो असा आपल्याकडे साधारणपणे बऱ्याचजणांचा समज असतो. किंवा बरेचजण तसे जाहीरपणे बोलतदेखील असतात. आपले सकाळपासूनचे कार्यक्रम बघितले तर त्यामध्ये चर्चासत्रं झालीत, परिसंवाद होतोय, काही गाण्यांचे कार्यक्रम झाले, नंतर एकांकिका आहे, रात्री पुन्हा गाण्याचे कार्यक्रम आहेत. तर असं काही नसतं की नास्तिक नेहमी गंभीरच असतो. तो सर्व क्षेत्रात आपापल्या परीनं आपापली भूमिका बजावत असतो. बरेचजण त्यापैकी यशस्वीपण झालेले आहेत. नास्तिक यशस्वी झालेला आहे असं म्हटलं की समोरून एक प्रश्न हमखास येतो, त्यांची नावे सांगा. आणि मग इथे आपली जरा पंचाईत होते.
चिथावणीला बळी पडू नका
नमस्कार. मला प्रथम माझी एक आठवण सांगायची आहे. आमच्याकडे एकदा पाहुणे येणार होते. तर त्यांना चहाबरोबर काहीतरी खायला द्यावे लागणार! संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे कशासोबत हे सांगायची गरज नाहीये. काहीतरी मागवायचं होतं खायला. तर आईने मला सांगितलं, “अरे, घरातले काजू आणि बदाम संपले आहेत तर पटकन् जाऊन घेऊन ये.” मी गेलो तर दुकानात काजू-बदाम नव्हते, संपले होते. मी तिथून फोन केला माझ्या भावाला आणि म्हणालो, “आईला विचार की तिथे काजू-बदाम नाहीयेत. तर काय करू?” आईने झटकन् सांगितलं, “दाणे असतील तर दाणे तरी घेऊन ये.”
बहुसंख्याकवाद आणि धार्मिक हिंसेला सामोरे जाताना
प्रश्न : आज बहुसंख्याकवाद आणि धार्मिक हिंसेला सामोरे जाताना हा विषय आपण घेतला आहे, तेव्हा हा जो बहुसंख्याकवाद आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय काय येतं?
विश्वंभर चौधरी : आपल्याला एक सवय झाली आहे की बहुसंख्याकवाद हा आपण फक्त धार्मिक अंगानी पाहतो. पण आपल्या सोयीसाठी तो आपण जातीय अंगानीपण पहायला पाहिजे. मला एक चर्चा आठवते – एबीपी माझा ह्या चॅनेलसाठी झालेली आणि ठाण्याच्या एका हिंदुत्ववादी ग्रुपसोबत – त्या चर्चेत मी होतो आणि नाव बदलण्याचा मुद्दा त्यात होता. औरंगजेब रोडचं नाव बदलण्याचा असा काहीतरी मुद्दा होता.
धर्म और सामाजिकता – जावेद अख़्तर के साथ बातचीत
ज्ञानेश पाटील : जावेद सर, आपका बहुत बहुत स्वागत. हमारा समाज मुख्यतः धार्मिक, श्रद्धालु, ईश्वरीय कल्पना पर आस्था रखनेवाले लोगों का है. इस समाज की एक विशेषता है कि नास्तिकता को या नास्तिक होने को वो kindly नहीं लेता है. दूसरी तरफ जो नास्तिक समाज है वो भी कहीं ना कहीं धर्म से घिरा हुआ ही रहता है. धर्म से, अंधश्रद्धाओं से परेशान रहता है. और फिर धीरे धीरे अपने समाज के बहुत बड़े हिस्से से वो डिस्कनेक्ट हो जाता है.
एकांकिका – सत्य असत्याशी मन केले ग्वाही…
[या एकांकिकेचे कथाबीज, संकल्पना ही लेखकाची आहे. सदर एकांकिका सादर करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्याकरिताच लेखकाचा मोबाईल नंबर, पत्ता व ईमेल आयडी सोबत दिलेला आहे. परवानगीशिवाय सदर एकांकिका, एकांकिकेतील कोणताही भाग कोणत्याही माध्यमांमध्ये किंवा माध्यमांद्वारे सादर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व वादासाठी न्यायालयीन क्षेत्र सांगली राहील.]
‘जेव्हा एखाद्या माणसाला भ्रम होतो, तेव्हा त्याला मनोविकार म्हणतात आणि जेव्हा बऱ्याच माणसांना भ्रम होतो, तेव्हा त्याला धर्म म्हणतात’
– रॉबर्ट पिर्सिग ( ‘झेन अँड आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटेनन्स’ चे लेखक)
प्रसंग १
(तालुक्यामधील एक सधन घर.
परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास
आपला नास्तिकवाद आपण तपासून पाहिला पाहिजे
नमस्कार.
मला खूप अवघडल्यासारखं झालंय. कारण, एक तर सभेत बोलायची माझी सवय मोडली आहे. आणि आज तुमच्यासमोर बोलताना तर मला आणखीन भीती वाटतेय. कारण, मी गेली ५० वर्षे जरी चळवळीत काम करत असले तरी, ज्या असोशीने तुम्ही नास्तिकतावादाचा पुरस्कार करताय, त्याचा प्रचार करताय, त्या प्रकारे मी नास्तिकतावादाचा पुरस्कार किंवा प्रचारही केलेला नाहीये. एकतर मी ज्यावेळेला चळवळीमध्ये पडले त्यावेळेला मुंबईमध्ये गिरणी कामगारांची चळवळ फोफावलेली होती. चळवळीमध्ये भाग घेणारे कार्यकर्ते घरी गेल्यानंतर काय करतात त्यापेक्षा गिरणीच्या दरवाज्यावर ते काय करतात, काय बोलतात यावरच सगळं लक्ष केंद्रित झालेलं असायचं.
परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास
विचाराने जगायचे तर किंमत चुकवावी लागते
सर्वांना सस्नेह नमस्कार.
‘माझा नास्तिकतेचा प्रवास’ या परिसंवादाच्या निमित्ताने आज आपण जमलेलो आहोत. मी नास्तिक कसा झालो? इकडे माझा प्रवास कसा झाला? हे मी विषद करतो. मी लहान असताना आमच्याकडे ‘घोड्यावरचा देव’ नावाचा एक प्रकार असायचा. तर त्यासाठी आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावरती जायचो. ‘सासनकाठी’ नावाचा एक प्रकार इकडे असतो. म्हणजे काय? तर काहीतरी एक उत्सव असतो. त्यात गुलालामध्ये बुडवलेलं खोबरं असतं. ते खोबरं मंदिरावरती टाकायचं आणि तिथून ते खाली पडलं की उचलून खायचं, असा तो प्रकार असतो.
परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास
समविचारी लोक आजूबाजूला हवेत
मी उज्ज्वला परांजपे. मुद्दाम सांगते. म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की मी कुठल्या बॅकग्राऊंडमधून आले आहे. सदाशिवपेठी, पुणेकर, टीपिकल टीपिकल टीपिकल! त्यामुळे घरामध्ये कर्मठ वातावरण. सर्व सण, उत्सव, समारंभ, व्रत-वैकल्य याच्यामध्ये मी लहानपणापासून आहे. मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये शिकले. या शाळा अतिशय कर्मठ असतात. या शाळांच्या ‘अ’ आणि ‘ब’ तुकड्या अशा झापड लावून घडवल्या जातात की, तुम्हाला साधी दुसऱ्या जातीतील मैत्रीणसुद्धा करायची संधी मिळू नये. अशा कडक आणि स्ट्राँग वातावरणात मी वाढले. पण त्याच वयात प्रत्येक गोष्टीला आपण ‘का?’
परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास
नास्तिक्य मिरवलं तर बिघडलं कुठे?
नमस्कार,
हिंदू धर्मात जन्माला आल्यामुळे सगळ्यांवर साधारणपणे जे संस्कार होतात तसे माझ्यावरसुद्धा झाले. लहानपणी आपल्याला योग्य अयोग्याची तशी समज नसते. आई-वडील सांगतात त्यावर आपला विश्वास असतो. ते सांगतात तसेच आपण करत असतो. माझंही तसंच होतं. पण वाढत्या वयात काही काही गोष्टी निरीक्षणात यायला लागल्या आणि प्रश्नही पडायला लागले. आजूबाजूचे लोक कोणाच्याही आणि कशाच्याही पाया पडतात हे दिसायला लागलं. प्रश्न पडू लागला की गावाच्या वेशीवरची एखादी दगडाची मूर्ती देव कसा काय होऊ शकेल? गणपतीच्या बाबतीत तर विशेषच. त्या मूर्तीत जर देवत्व आहे तर ती मूर्ती काढून नवीन मूर्ती कशी बसवता येईल?