विषय «शहरीकरण»

ग्राम-नागरी संबंध आणि विकासाची परस्परावलंबी प्रक्रिया (भाग १)

प्रास्ताविक:
आजपर्यंत विकासासंबंधीच्या सैद्धान्तिक आणि धोरणात्मक विचारांचा रोख एकतर ग्रामीण विभाग नाहीतर नागरी विभाग असतो. ग्राम-नागरी परस्परावलंबी संबंधांचा विचार क्वचितच केला जातो. याउलट प्रत्यक्ष अभ्यासांमधून मात्र ग्राम-नागरी विभागांमधील लोकांचे स्थलांतर, सामानाची, मालाची देवाणघेवाण, आणि भांडवलाची हालचाल (शिाशपी) या प्रक्रिया महत्त्वाच्या असलेल्या दिसतात. या दोन्ही भौगोलिक वस्त्यांमध्ये सामाजिक देवाणघेवाण महत्त्वाची असते, ज्यायोगे ग्रामीण आणि नागरी विभागांमधील संबंध सतत बदलत असताना दिसतात. अर्थव्यवस्थांचा विचार करता अनेक नागरी उत्पादनांचे ग्राहक हे ग्रामीण भागात असतात. या उलट नागरी ग्राहकांना अन्नधान्य, शेतीमधील कच्चा माल, तसेच नागरी सेवांचा पुरवठा करण्यासाठी ग्रामीण शेतीक्षेत्राची गरज असते.

पुढे वाचा

नागरी-जैविक विविधता (भाग १)

१. प्रस्तावना:
जगाची ५० टक्के लोकसंख्या आता नगरांमध्ये राहते. पुढील तीस वर्षांत हे प्रमाण ६१ टक्के होईल. (युनो अहवाल १९९७). विकसित देशांमधील ८० टक्के लोक नागरी विभागात राहतात. असे असूनही एकविसाव्या शतकात मात्र सर्वांत मोठी लोकसंख्येची नगरे विकसनशील देशांमध्येच असतील. गेल्या शतकात नगरांचे आकारमान प्रचंड वाढले. ३०० नगरांत १० लाखांपेक्षा, तर १६ नगरांत १ कोटीपेक्षा जास्त लोक राहतात. मानवी समाजाच्या/लोकसंख्येच्या रेट्यामुळे जगाच्या भूगोलाची रचनाच बदलून गेली आहे.

नागरीकरणाचे पर्यावरणावर मोठे परिणाम होतात. नागरी जमीनक्षेत्र जगाच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ २ टक्के आहे.

पुढे वाचा

नागरी प्रश्नांचे स्वरूप

“सर्व प्रकारच्या कृतींसारखेच विचार करण्याचेही डावपेच असतात. प्रश्नांच्या प्रकारानुरूप विचार करूनच त्यांची उत्तरे मिळू शकतात. आपल्याला कसा विचार करायला आवडेल यापेक्षा विषयाचे स्वरूप काय आहे त्यावरच विचारांची, उत्तरे शोधण्याची पद्धत ठरत असते.
विसाव्या शतकातल्या अनेक क्रांतिकारक बदलांमध्ये जगाच्या तपासासाठी वापरायच्या विचारपद्धतींमध्ये खूप महत्त्वाचे बदल झाले.

विश्लेषणाच्या आणि विचारांच्या नवनव्या धोरणांचा शोध मुख्यतः वैज्ञानिक पद्धतींमधून घेतला गेला. या जागृतीचे परिणाम इतरही क्षेत्रांत पसरले. पूर्वी नाठाळ वाटणारे प्रश्न नवनव्या दिशांनी सुटण्याजोगे वाटू लागले. तर काही प्रश्न आधी वाटले होते तसे नाहीतच असे आढळून आले.

पुढे वाचा

तीन स्वप्निल आदर्शवादी आणि त्यांची आदर्श नगरे

एबक्झर हॉवर्ड
व्यवसायाने कारकून असणारे एबक्झर हॉवर्ड हे तसे सामान्य गृहस्थ, पण त्यांच्या ‘गार्डन सिटी’ या आदर्शवादी नगररचनेच्या संकल्पनेच्या सहाय्याने त्यांनी खरे तर जगाचाच चेहरा-मोहरा बदलून टाकला. त्यांच्या या उद्याननगराच्या कल्पनेला सामाजिक सुधारकांच्या गटाने तर उचलून धरलेच, पण त्यामुळे नागरी नियोजनाचे आयामच मुळी बदलून गेले. औद्योगिक शहरांच्या गर्दी, गोंधळ, काजळी ह्यांनी भरलेल्या १९ या शतकातील लंडनच्या अनुभवावर उमटलेली ती तीव्र प्रतिक्रिया होती. त्या काळातील स्वप्निल समाजसुधारकांच्या विचारांचे प्रतिबिंब त्यात पडले होते. मोठ्या नगरांना पर्याय म्हणून तीस हजार वस्तीच्या लहान लहान उद्याननगरांची साखळी-रचना हॉवर्ड यांनी कल्पिली.

पुढे वाचा

नागर क्रांतीचा उगम: दोन प्रवाह

इ.स. पूर्व ४००० च्या सुमारास मेसोपोटेमिया येथे जगातील पहिले नगर उदयाला आल्याचे पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी मांडले. गॉर्डन चाइल्ड यांच्या सिद्धान्तानुसार अश्मयुगाच्या अखेरच्या पर्वात शेतीचा शोध लागला. या कृषिक्रांतीच्या विस्तारासोबत आणि परिणामी भटक्या, अन्नशोधक मनुष्यप्राणी ग्रामीण वस्त्यांमध्ये स्थिरावला. कृषिक्रांतीच्या काळात विपुल होत गेलेल्या अन्नसाठ्यांमुळे काही गावांचे नगरांत रूपांतर होणे सुरू झाले. ह्या नागरी क्रांतीचा पहिला उच्च बिंदू म्हणजे मेसोपोटेमियामधील ऊरूक हे नगर. पुढे ही नागरीकरणाची प्रक्रिया वेगवान होत गेली. जागतिक नागरी क्रांतीचे स्वरूप विसाव्या शतकात अधिक स्पष्ट झाले. ग्रामीण भागातून नागरी प्रदेशांत होणाऱ्या लोकसंख्येच्या जागतिक स्थलांतराचा अनुभव या सिद्धान्ताला पोषक असाच होता.

पुढे वाचा

नगरे आणि आर्थिक विकास

आर्थिक दृष्टीने बघता छोट्या भौगोलिक परिसरात मोठी लोकसंख्या एकवटण्याची प्रक्रिया ही सर्व समाजाकराता फायदेशीर असते. नागरीकरणाची प्रक्रिया आर्थिक कारणांमुळेच घडत असते हे उघड आहे. या प्रक्रियेमुळे संपत्ती निर्माण झाली नसती तर ही प्रक्रिया कधीच वाढली नसती. जेव्हा लोकांची दाटी वाढते तेव्हा उत्पादनही वाढते. या दाटीवाटीमुळे काही लोकांच्या अंगभूत वैशिष्ट्यांना प्रगट व्हायची संधी मिळते. ज्या माणसांकडे काही विशेष कसब असते त्याचा वापर करून त्यांना त्यात प्रावीण्यही मिळवता येते. माणसांच्या आकांक्षापूर्तीसाठी मोठा परिसर उपलब्ध होतो, आणि अशाच ठिकाणी व्यक्तींच्या क्षमता उजेडात येतात. सत्ताधाऱ्यांना व्यापारी नगरांमधून खूप कर मिळतो याची चांगली जाणीव असते.

पुढे वाचा

नागरीकरणः स्वरूप, समस्या आणि धोरण

“भारत खेड्यांत राहतो’ हे महात्मा गांधींचे वचन आपण सर्वांनीच वाचले असेल. ते कोणत्या संदर्भात केले होते हे अर्थातच सर्वसामान्यपणे माहीत नसते. परन्तु ह्या वाक्याचा परिणाम स्वातंत्र्योत्तर कालातील अनेक धोरणांवर नक्कीच झाला. नागरीकरण आणि शहरे यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही बऱ्याच अंशी नकारात्मकच आहे. शहरे ही साम्राज्यवादी पिळवणुकीची प्रतीके म्हणून डाव्यांना अप्रिय. शिवाय मार्क्सने असे म्हटलेले आहे की साम्यवादाच्या अंतिम टप्प्यात ग्रामीण व शहरी असा भेदच राहणार नाही. शहरांत पूर्वीपासून राहणाऱ्यांना नव्याने शहरात येणाऱ्या गरीब स्थलांतरितांमुळे होणारी शहरी वाढ अप्रिय. साहित्यप्रेमींना चाल डिकन्सच्या कादंबऱ्यांतील शहरांची वर्णने किंवा १९५० वा १९६० च्या दशकातील मराठी साहित्य वाचूनही शहरांबद्दल अप्रियता, तर खेड्यांबद्दल रोमँटिक ओढ निर्माण झाली होती.

पुढे वाचा

नगर व नागरद्वेष्टी मते

इसवी सनापूर्वी ६०० वर्षांपासून ते आजपर्यंत भारतीय विचारांत वारंवार भेटणारे एक मत शहरांना वाईट मानते व नागर जीवनशैलीला दुष्ट मानते. पण नागर जीवनशैली हे सुसंस्कृत माणसांचे एक लक्षण आहे, असे मतही साधारण तितक्याच (इ.स.पूर्वी ६००) प्राचीन काळापासून व्यक्त केले जात असे. ‘अर्थशास्त्रा’त कौटिल्याने आणि ‘कामसूत्रा’त वात्स्यायनाने नागर जीवनाची भलावण केली आहे.
हे नागर पक्षाचे द्वेष्टे दृष्टिकोन. इ.स. पूर्व आठव्या ते चौथ्या शतकांमधील काळात आर्यसमाजातील तीन प्रमुख वर्णांमधील सत्ता व प्रभावाबाबतच्या संघर्षातून घडले आहेत. ब्राह्मण नेहमीच नगरविरोधी असत आणि वेद व उपनिषदांसारखे ब्राह्मणी ग्रंथ नागर जीवनाच्या विरोधात ग्रामीण जीवनशैलीचे गुणगान करतात.

पुढे वाचा

नगरांचा निरंतर विकास: (Sustainable Development) — काळाची गरज

१. कमी लोकसंख्या असणाऱ्या वसाहतींचा आकार वाढणे किंवा त्यांची संख्या वाढणे याला नागरीकरण म्हणतात. स्वातंत्र्यानंतर नागरीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सध्या नगरांमध्ये असलेल्या लोकांची लोकसंख्या एकूण देशाच्या लोकसंख्येच्या जवळजवळ ३२ टक्के आहे व यात निरंतर वाढ होत आहे. नगरामध्ये उपलब्ध असलेल्या नवीन रोजगाराचे मार्ग, उच्च शिक्षणासाठी असलेल्या सोई, आरोग्याबाबत असलेल्या सोई, दळणवळण व इतर गावांना जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या सोई, खेड्यांच्या मानाने बऱ्याच चांगल्या व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया वेगाने वाढत आहे. खेड्यातील अनेक लोक आता शहराकडे येऊ लागले आहेत. अशा नगरांसाठी मूलभूत सोई म्हणजेच चांगले रस्ते, मुबलक पाणीपुरवठा, सांडपाण्याची विल्हेवाटीची व्यवस्था, घनकचऱ्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन, आरोग्य सेवा, प्राथमिक व उच्च शिक्षणाच्या सोई अशा विविध मूलभूत सोई पुरेशा व चांगल्या दर्जाच्या निर्माण करणे गरजेचे आहे.

पुढे वाचा

नागरी प्रकल्पविकासाचे वास्तववादी धोरण

“नगरांमध्ये विविध सुधारणा कश्या करायच्या याबद्दल तज्ज्ञांमध्ये अजिबात एकमत दिसत नाही. काहींना ‘पैसे’ हे सर्व नागरी समस्यांवरचे उत्तर आहे असे वाटते. काहींना नागरी राजकारण महत्त्वाचे वाटते तर काहींना सामाजिक संघर्षात नागरी प्रश्नांना उत्तरे सापडतात असे वाटते. एकंदरीत नागरी नियोजनाबाबतचा भ्रमनिरास मात्र सार्वत्रिकपणे (अमेरिकेत) दिसतो.

‘असे असतानाही नागरी नियोजनांची काही उदाहरणे मात्र यशस्वी ठरलेली दिसतात. ज्या सार्वजनिक नागरी धोरणांना खाजगी बाजारव्यवस्थेकडून सातत्याचा, सकारात्मक, कृतिशील प्रतिसाद मिळतो अशीच धोरणे यशस्वी ठरतात.

“खाजगी बाजारातन मिळणाऱ्या प्रतिसादाचे अंदाज करणे नेहमीच अवघड असते. पण ज्या प्रकल्पांत असे अंदाज बरोबर ठरतात ते यशस्वी होतात.”

पुढे वाचा