आपण अश्रद्ध आहोत याचा पराकोटीचा अभिमान-बहुतांशी गर्वच अस-लेल्या बऱ्याच माणसांशी माझी गाठ पडली आहे. प्रत्यही पडते —-श्रद्धेला शास्त्रीय प्रमाण किंवा शास्त्रीय आधार नाही—- शास्त्रीय कसोट्यांवर श्रद्धा घासून पाहताच येत नाही यासारखी घासून गुळगुळीत झालेली विधाने तोंडावर फेकून सगळे अश्रद्ध लोक उरलेल्यांना गप्प करताना दिसतात. हजारो वर्षांपासून ज्यांना कुठल्याही टोप्या फिट्ट बसतात अशी भाबडी सश्रद्ध जनता हे निमूटपणे ऐकून घेते. ह्या विषयावर काही वेगळा विचार माझ्यापरीने मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. मुळात, लॉजिकल आणि रॅशनल या दोन शब्दांचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर, लॉजिकल (1) of, relating to, involving, or being in accordance with logic.
विषय «इतर»
सक्षम मेंदूला डोळस अनुभवाची गरज
आपल्या सर्वांचाच मेंदू सक्षम असतो, फक्त त्याला डोळस अनुभव द्या. (We all have same hardware but only different software.) स्थळ आहे ऐने. वांगणीस्टेशन पासून १५-२० कि. मी. अंतरावर असलेले एक आदिवासी छोटेसे गाव. ग्राममंगल संस्थेच्या चवथीपाचवीतल्या १४-१५ मुला-मुलींचा गट. नीलेश गुरुजींनी ३-४ दिवस आधी या मुलांना पोष्ट ऑफीस पाहून यायला सांगितले होते. आणि मुलेमुली काय काय पाहिले ते सांगत होती : कोणाला शिक्के मारण्याचे काम आवडल, काही जणांनी पत्त्यांप्रमाणे पत्रांचे गढे कसे तयार करतात ते पाहिले. असे चालले होते. इतक्यात एका मुलाला प्रश्न पडला —
गुरुजी नदी आडवी आली तर टेलीफोनची तार कशी नेतात?
जागतिकीकरण व मानवसमूह
माणूस हा एक सस्तन प्राणी आहे. म्हणून जीवशास्त्राचे मूलभूत नियम माणसाला लागू पडतातच. जीवशास्त्राच्या अभ्यासात पुढील नियम आपल्याला आढळतात :–
१) पर्यावरणाची विविधता प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या जाती-प्रजातींच्या उत्क्रांतीस व टिकून राहण्यास आवश्यक असते. ही विविधता नष्ट केल्यास, सरसकट सारखे पर्यावरण निर्माण केल्यास, अनेक जाती प्रजाती जैविक चढाओढीत मागे पडून नष्ट होतात. पर्यावरणाच्या स्थानिक वैशिष्ट्यांमुळे केवळ काही विशिष्ट जाती प्रजाती शिरजोर ठरत असतात. उदाहरणार्थ डोंगराच्या शिखरावर, मध्य-उतारावर, घळीमध्ये, खालच्या उतारावर, सपाटीवर वेगवेगळ्या झाडांच्या जाती आढळतात. पूर्व दिशेच्या उतारावर व पश्चिम बाजूच्या उतारावर देखील वेगवेगळ्या जातींचे प्राबल्य आढळते.
निष्ठा : दोन पैलू
अॅरिस्टॉटल हा प्रकांड ग्रीक पंडित होता हे त्याच्या ग्रंथ-निर्मितीवरून चटकन कोणाच्याही लक्षात येईल. मानसशास्त्र, तर्कशास्त्र, शरीरविज्ञान, नाट्य-शोकांतिका व इतर विषयांवर त्याने लिहिलेली विद्वत्ताप्रचुर पुस्तके हे त्याच्या पांडित्याचे पुरावे म्हणून देता येतील. प्लेटोचा तो अत्यंत आवडता शिष्य. प्लेटोने “अकॅडमी’ची स्थापना करून जनतेच्या ज्ञानलालसेला जशी चालना दिली तसाच प्रयत्न अॅरिस्टॉटलने “लायसेयम’ही ज्ञानवर्धिनी संस्था निर्माण करून आपली गुरुपरंपरा पुढे चालविली होती.
अॅरिस्टॉटल एकदा आपल्या विद्यार्थ्यांशी वर्गात तत्त्वज्ञानाची चर्चा करीत असताना एका विद्यार्थ्याने प्लेटोचे विधान त्याच्या तोंडावर फेकून अॅरिस्टॉटलला पेचात आणण्याचा प्रयत्न केला. पण प्रथम त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.
पत्र-संवाद
श्याम कुळकर्णी
‘यमाई’, तंत्रनगर, औरंगाबाद — ४३१ ००५
खाजगी शिकवणी वर्ग
संदर्भ : आजचा सुधारक च्या जुलै २००० चे संपादकीय
शिकवणीवर्गाचे समर्थन विवेकवादात बसत नाही. आ. सु.च्या डिसेंबर १९९१ च्या ‘विवेकवाद’च्या १७ व्या भागात युक्त व अयुक्त कर्म तसेच कर्माची नैतिकता या चर्चेतील दोन उदाहरणे देतो. कारखानदार, व्यापारी इ. मंडळींच्या उद्योगामुळे देशाची समृद्धी वाढते, बेकारांना काम मिळते आणि सर्वांचेच राहणीमान उंचावते हे खरे आहे, पण म्हणून तेवढ्याकरिता त्यांचे उद्योग नैतिकदृष्ट्या प्रशंसनीय आहेत असे म्हणता येत नाही, ही सर्व मंडळी केवळ स्वार्थाने प्रेरित झालेली असल्यामुळे त्यांची कर्मे नैतिक या पदवीस पात्र होत नाहीत असे तेथे म्हटले आहे.
तर्क अप्रतिष्ठित कसा?
“तर्क अप्रतिष्ठित आहे म्हणून दुसऱ्या रीतीने म्हणजे वचनप्रामाण्याने अनुमान करावे असे तुमचे (म्हणजे पूर्वपक्षाचे) म्हणणे असेल तर ते चूक आहे. कारण ह्याप्रमाणे देखील तुमची (म्हणजे पूर्वपक्षाची) ह्या अप्रतिष्ठितत्वाच्या आक्षेपा-तून सुटका होत नाही. शब्दप्रामाण्य मानल्यास शब्द अनेकांचे आहेत व त्यांचे अर्थही अनेक करता येतात. म्हणून शब्दप्रामाण्यच अप्रतिष्ठित आहे. म्हणून तर्क अप्रतिष्ठित मानू नये आणि तर्काने सिद्ध होईल तेच ब्रह्माचे ज्ञान ग्रहण करावे”. “दृश्यते त्वग्र्यया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः” (ब्रह्म सूक्ष्मबुद्धि मनुष्यांच्या श्रेष्ठ बुद्धीने पाहिले जाते) असे उपनिषदाने कंठरवाने सांगितलेही आहेत. “श्रुतेस्तु शब्दमूलत्वात्’ २।१।२७ ह्या सूत्राचा अर्थ श्रीशंकराचार्य करतात तसा नाही.
प्रिय वाचक,
ऑक्टोबर ‘९९ मध्ये आ. सु. च्या संपादकीय नेतृत्वात खांदेपालट होऊन ती जबाबदारी आमच्याकडे आली. येत्या ऑक्टोबर २००० पासून आम्ही ती सूत्रे खाली ठेवत आहोत. गेल्या एका वर्षात आम्ही काय करू शकलो, जे काही केले त्याच्या मागे कोणते विचारसूत्र होते त्याचा हा धावता आढावा.
आ.सु.तले लिखाण एकसुरी असते. तेच ते लेखक, तेच ते विषय, अनु-क्रमणिका पाहिली तरी पुरते, पुढचे न वाचता आतील मजकूर कळतो; इतकी कडक आलोचना ऐकून मन खिन्न होई. ती टीका मनावर घेऊन थोडी विविधता आणायचे ठरवले. विचारणीयतेबरोबर वाचनीयता काहीशी वाढवण्याचा प्रयत्न केला.
विवेकवादी नीती
आतापर्यंत आपण सत्य-असत्याच्या प्रांतात होतो. पण नीतीचा प्रांत म्हणजे सत्य-असत्याचा नव्हे, तर चांगल्यावाइटाचा किंवा साधु-असाधु गोष्टींचा प्रांत. जिला reason म्हणतात, आणि जिचा पर्याय म्हणून आपण ‘विवेक’ हा शब्द वापरतो, त्याच्या प्रांतातून वेगळ्या प्रांतात प्रवेश करतो आहोत. हे कटाक्षाने सांगावे लागते, कारण reason चे, विवेकाचे क्षेत्र म्हणजे सत्य-असत्याचे क्षेत्र हे मत अठराव्या शतकात डेव्हिड ह्यूम (१७११ ते १७७९) या तत्त्वज्ञाने व्यक्त केले असून ते बरोबर असावे असा माझा समज आहे. ह्यूमनंतर आलेल्या कांट (१७२४-१८०४) या जर्मन तत्त्वज्ञाने दोन reasons आहेत असे मत मांडले, Theoretical Reason (औपपत्तिक विवेक) आणि Practical Reason (व्यावहारिक विवेक).
लैंगिक वाङ्मय — एक तुलना (पूर्वार्ध)
(२२ व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या वाङ्मय प्रकाशन मंडळाच्या विनंतीवजा लिहिलेला लेख)
या अवाढव्य विषयाचे समर्पक विवेचन करण्यास जरूर तितकें वाचन आम्ही केलेले नाही, हे प्रथमच सांगणे बरें. असे असूनहि असा विषय लिहावयास घेतला याचे कारण इतकेंच, की या विषयावर लेख लिहिण्याचे विनंतीला दुसऱ्या कोणीही मान दिला नाही. तेव्हा तो अपुरा वाटल्यास तो आमचा दोष नाही.
वाङ्मयांत सामान्यतः जरी फक्त लिखाणाचाच समावेश करण्याची पद्धत आहे, तरी त्या शब्दाचा मूल अर्थ पाहिल्यास त्यांत भाषणाचाही समावेश करणे जरूर आहे आणि कामविषयक बाबतींत याला महत्त्व आहे.
नीतीला धर्माकडून प्रेरणा कशी मिळत राहील?
[रिचर्ड पी. फाईनमन हा या शतकातला एक अग्रगण्य भौतिकीतज्ज्ञ. विज्ञानाची चुकतमाकत, तात्पुरती मते बनवत, थोड्याशाच पण अत्यंत भरवशाच्या ज्ञानाकडे जाणारी पद्धत वारंवार इतर अ-वैज्ञानिकांसमोर मांडण्यासाठीही त्याची ख्याती. या पद्धतीवरच्या आग्रहानेच सतत ‘हे मला माहीत नाही’, ‘हे मला समजायला अवघड वाटते’, असे तो म्हणतो — सामान्य माणूस ज्या ठामपणाने ‘हे चूक आहे’, ‘हे तर्कविसंगत आहे’, असे म्हणतो, त्या ठामपणाला फाईनमन हट्टाने सौम्य करतो. त्याने १९६३ साली दिलेल्या तीन ‘जॉन डान्झ व्याख्यानां’चे ‘द मीनिंग ऑफ इट ऑल’ या नावाने पुस्तक निघाले आहे (पेंग्विन, १९९८).