विषय «इतर»

विवेक म्हणजे काय?

‘विवेक’ हा शब्द ‘reason’ या इंग्लिश शब्दाचा पर्याय म्हणून आम्ही वापरत आहोत हे आमच्या वाचकांना माहीत आहे. Reason’ या इंग्रजी शब्दाला पर्याय म्हणून ‘बुद्धि’ हा संस्कृत शब्द वापरला जातो हे खरे आहे. पण ‘बुद्धि’ या शब्दाचे अनेक अर्थ असल्यामुळे तो शब्द वापरणे आम्हाला गैरसोयीचे वाटते. शिवाय आगरकरांनी ‘Rationalism’ ला समानार्थी म्हणून ‘विवेकवाद’ हा शब्द वापरला होता. त्यामुळे ‘विवेकवादी म्हणजे rationalist’ हे आम्हालाही अभिप्रेत आहे याचे वाचकांना स्मरण देऊन या लेखाच्या विषयाकडे वळतो.
या लेखाचा विषय आहे ‘विवेक म्हणजे काय?’ याचे उत्तर विवेक म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये “reason” म्हणतात ते’ हे उत्तर वर येऊन गेले आहे असे कोणी म्हणेल.

पुढे वाचा

फिटम् फाट: तस्लीमा नासरीनची कादंबरिका

तस्लीमा नासरीनमुळे या कादंबरिकेकडे आपले लक्ष जाते, अपेक्षाभंग मात्र होत नाही. जेमतेम ८७ पानांचा विस्तार, तोही प्रकाशकांनी बळेबळेच वाढवलेला. पण विचारांचा ऐवज लहान नाही. किंबहुना तेच या कादंबरिकेचे बलस्थान.

तस्लीमा ‘लज्जा’मुळे प्रकाश झोतात आली. पण ‘शोध’ ही तिच्याही आधी ६ महिने प्रकाशित झालेली. ‘फिट्टे फाट’ हे या ‘शोध’चे भाषांतर. बंगालीत ‘शोध’चा अर्थ संस्कृत ‘प्रतिशोध’ला जवळचा. ‘बदला’–‘सूड’ ‘परतफेड’ असा काहीसा. अशोक शहाण्यांनी अनुवादात बोलभाषेचा सहजपणा राखायचा बुद्ध्या प्रयत्न केलेला आहे. तो नावात आला. ऑगस्ट ९२ मध्ये ‘शोध’ आली. जुलै ९३ मध्ये ‘लज्जा’वर बंदी येईपर्यंत ‘शोध’च्या ५ आवृत्त्या निघाल्या होत्या.

पुढे वाचा

विल देअर बी एनी होप फॉर द पुअर?

(२२ मे २००० च्या ‘टाईम’ साप्ताहिकाचे सूत्र आहे ‘व्हिजन २१ — आपले काम, आपले जग.’ या अनुषंगाने लिहिलेल्या लेखांमध्ये एक लेख अमर्त्य सेन यांचा आहे, ‘विल देअर बी एनी होप फॉर द पुअर?’, नावाचा. या वाक्यातील काळाबाबतचे व्याकरण मजेदार वाटले —- “आशा ‘असेल’ का?’, असा प्रश्न आहे, “आहे का?” असा प्रश्न नाही ! सेन यांचा लेखही ठामपणे आशावादाला थारा देणारा नाही.)

प्रगती होते आहे की नाही हे तपासायला तुटवड्यांचा विचार करणे, तुटवड्यातली घट मोजणे, हे गर्भश्रीमंतीत होणाऱ्या वाढीच्या विचारापेक्षा जास्त चांगले.

पुढे वाचा

कांहीही न करणारा ईश्वर

ईश्वरावरील श्रद्धा हा एक प्रकारचा पोरखेळ आहे. मनुष्यजातीच्या बाल-पणांत ही श्रद्धा शोभली असती, परंतु प्रौढ वयांत बाललीला शोभत नाहीत. ईश्वराचा मुख्य उपयोग म्हणजे पाप केले तर ते कृष्णार्पण करतां येतें, संकट आले तर जेथे स्वतःचे कांही चालत नाही तेथे ईश्वरावर हवाला ठेवून समाधान मानतां येते, आणि ईश्वराची प्रार्थना केल्याने आपल्या मनासारखे होईल अशी आशा बाळगतां येते, पण या फोल आशेचा उपयोग काय? युद्धांत दोन्ही बाजूच्या लोकांनी ईश्वराची प्रार्थना केली तर तो जय कोणाला देणार? हे देखील समजण्याची ज्यांना अक्कल नाही तेच ईश्वरावर विश्वास ठेवतात.

पुढे वाचा

प्रिय वाचक

प्रिय वाचक
आपल्या प्राचीन संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगताना गुस्माहात्म्य आणि पूर्वज-पूजा यांचा उल्लेख या आधी आम्ही केला. शुद्धीचे अतोनात स्तोम हे असेच एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. चित्तशुद्धीशिवाय ब्रह्मज्ञान नाही. देहशुद्धीशिवाय चित्तशुद्धी नाही अन्नशुद्धीशिवाय देहशुद्धी नाही. या अन्नशुद्धीच्या समजुतीत पोषक आहाराच्या शास्त्रीय चिकित्सेपेक्षा कल्पनारम्य भागच अधिक. उदा. अन्न शिजवणाऱ्याची तन-शुद्धी, पावित्र्य फार महत्त्वाचे. त्यासाठी त्याची जात तुमच्याइतकी किंवा जास्त शुद्ध हवी, काम शुद्ध हवे. जितके जास्त मेहनतीचे काम तुम्ही करता तेवढी तुमची जात खालची, कमी शुद्ध. म्हणून वरच्या जातीच्यांनी खालच्या जातीच्या हातचे अन्न भक्षण करू नये हा संकेत.

पुढे वाचा

अळीमिळी गुपचिळी

मी एक सामान्य उद्योजक. अर्थातच, एका उद्योगप्रधान घराण्यात जन्मल्या-मुळे पिढ्यान् पिढ्या वारसातून आणि संस्कारांतूनच उद्यमशीलता जोपासली गेलेली, त्यामुळे प्रथितयश! पण तरीही समाधानी मात्र नाही! सतत समोर प्रश्न असतात आणि त्यांची उत्तरे सुचत नाहीत त्यामुळे बेचैन असतो. आपण कोण आहोत? कशासाठी हे सारे करत आहोत? यातून नेमके साध्य काय करणार आहोत? नाहीतरी एक दिवस आपण मरणारच आणि त्यानंतर आपण जे काही, ज्या कशासाठी करत होतो, त्या कशाकशाला काही अर्थच उरणार नाही. मग हे सारे आपण करायचे तरी कशासाठी? या प्रश्नांचा भडिमार स्वतःवरच स्वतःहून करून घेत असतो.

पुढे वाचा

प्रवाही कुटुंब – एक मिथ्यकथा!

आजचा सुधारकच्या एप्रिल २००० च्या अंकातील र. धों. कर्वे यांचा प्रवाही कुटुंब हा पुनर्मुद्रित लेख वाचला. प्रवाही कुटुंब असे शीर्षक असले तरी त्यात कुटुंबाबाबत नवीन विचार मांडलेला दिसत नाही. व्यक्तीच्या अनिर्बंध, मुक्त, लैंगिक आचार-स्वातंत्र्याबाबतच सर्व मांडणी दिसते. लैंगिक प्रेरणेविषयी भारतात जी उपेक्षा व त्यातून निर्माण झालेले ढोंग सर्वत्र दिसते त्याची चीड या लेखात प्रतिक्रियात्मक स्वरूपात व्यक्त होते आहे. ती स्वागतार्ह आहे पण व्यवहार्य मात्र नाही.
| कुटुंब प्रवाही असावे हाच नवीन विचार आहे. संपा.]
मुळात नियमनाशिवाय समाज अशक्य असतो. अगदी लेखात पुरस्कार-लेल्या स्वैर-समागम-संघातसुद्धा, ‘प्रत्येक सदस्याने दुसऱ्याची समागमाची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे’ असा नियम आहेच.

पुढे वाचा

बाळ : एक अज्ञातवासी ज्ञानोपासक

लहान मुलांना टी.व्ही.वरचा WWF म्हणून कार्यक्रम आहे, तो फार आवडतो. ज्यांना कोणाला तरी ठोकून काढायची इच्छा असते पण शक्य नसते अशी ही मुले असतात बहुधा. ज्ञानाच्या क्षेत्रात पुष्कळ तथाकथित मल्ल ठोकून काढायच्या लायकीचे आहेत, किंबहुना अशांचीच संख्या जास्त आहे. त्यांना सर्वांसमोर एक्स्पोज केले पाहिजे ही बाळची एक ख्वाईश होती. अधूनमधून विद्येचे असे स्वयंमन्य दिग्गज समर्थ ज्ञानोपासकांकडून चीत झालेले पाहिले की बाळला फार आनंद होत असे. त्याने स्वतःही क्वचित् संधी आली असता अशा तोतयांचे पितळ उघडे पाडले आहे. पण एकूणच असे प्रसंग त्याला कमी आले.

पुढे वाचा

मनात आलं ते केलं

‘मनात आलं ते केलं’ हे हलके -फुलके तत्त्वज्ञान बाळगणारी व्यक्ती केवढे भरीव काम करू शकते हे शकुन्तलाबाई परांजपे यांनी दाखवून दिले आहे.
“मी बहुधा फ्रान्समध्ये असताना वडिलांना लिहिले की मी आज सिग्रेट ओढली.” वडिलांनी उत्तर दिले, की “हे मला आवडले नाही. पण तू आता मोठी झाली आहेस. तुझ्या मनाप्रमाणे वाग.” पुढे जन्मभर, मनात आले ते केले असे ब्रीद ठेवून वागणाऱ्या शकुन्तला परांजपे ३ मे २००० रोजी वारल्या. दिवंगत झाल्या हे म्हणणेही येथे साजायचे नाही कारण मेल्यावर काहीच राहत नाही मग स्वर्गवास काय नि दिवंगत होणे काय, सारखेच निरर्थक असे मानणाऱ्या पंथाच्या त्या होत्या.

पुढे वाचा

घोंगे यांच्या संशोधनातील भकासपणा

१. प्रा. ह. चं. घोंगे यांचा गोमांसभक्षण : एक ऐतिहासिक वास्तविकता या शीर्षकाचा आजचा सुधारकमध्ये (मार्च २०००) प्रसिद्ध करण्यात आलेला लेख वाचून बरीच करमणूक झाली. त्यामुळे सध्या काही विद्वानांचे प्राचीन इतिहासाचे संशोधन आणि त्याची अभिव्यक्ती कोणत्या दर्जेदार रीतीने चालते याचा एक नमुना उपलब्ध झाला आहे. प्रस्तुत लेख घोंगे यांनी ‘मित्रवर्य’ डॉ. भाऊ लोखंडे यांच्या ब्राह्मणांचे गोमांसभक्षण या लेखाच्या समर्थनार्थ लिहिला आहे. परंतु, तो मूळ प्रतिक्रिया समजून न घेता ‘पूर्ण ग्रंथ पाहिल्यावीण’ लिहिला आहे.
[१. आपली करमणूक व उद्बोधनही झाले असावे. आपण एकच कबूल केले तरी दुसरे झाकत नाही.

पुढे वाचा