मे १९९७ च्या ‘आजचा सुधारक’च्या कव्हरवर बर्ट्रॅंड रसेल यांचा ‘इतरांच्या मताबद्दल आदर’ हा उतारा, तर पहिल्या पानावर दि. य. देशपांडे यांच्या लेखात माझ्या नावाच्या आसपास असलेले उद्गारवाचक चिन्ह हा विरोधाभास गंमतीशीर वाटला.
वैज्ञानिक म्हणजे विज्ञान नव्हे हे देशपांडे यांचे मत. ‘देश म्हणजे देशातील माणसे’हे माझे त्याला उत्तर.
दि. य. देशपांडे ह्यांना कोणता ईश्वर अभिप्रेत आहे? आइन्स्टाइन-बोर-एकल्स ह्यांच्या परमेश्वराच्या संकल्पना कोणत्या? ईश्वराची व्याख्या कोणती? दि. य. देशपांडे ह्यांना अभिप्रेत असलेला ईश्वर हा सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वसाधु आहे. ह्या काटेकोर चौकटीत मी नास्तिक आहे.