भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्याच्या तत्त्वावर आधारलेली आहे. भारताने हे तत्त्व स्वीकारले त्या काळातील राजकीय व सामाजिक परिस्थिती विशेष उल्लेखनीय आहे. १९४७ साली दुर्दैवाने देशाची नुकतीच फाळणी झाली होती आणि त्या काळात सर्व देशभर व विशेषतःउत्तरेकडे जातीय दंगलींचा डोंब उसळला होता. धर्माच्या नावावर एकमेकांची अमानुषपणे कत्तल चालू होती. देशात निर्वासितांचे लोंढे मोठ्या प्रमाणावर येत होते. देशातले वातावरण अशाप्रकारे धर्मान्ध शक्तींच्या दंगलीने कुंद झालेले असताना आपल्या देशात भारतीय राज्यघटनेचे एकेक कलम तयार होत होते. अशा दंगलीच्या काळातही आपल्या देशाची राज्यघटना तयार होत असताना आपण आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्याच्या तत्त्वावरआधारलेली आहे ही अतिशय महत्त्वाची घटना आहे.
विषय «इतर»
सर्वोच्च न्यायालय, हिंदुत्व आणि हिंदुइझमा
-१-
डिसेंबर १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी ‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदुइझम’ या संकल्पनांबाबत काही विवेचन केले आहे. त्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेणे व त्यावर भाष्य करणे हा या लेखनाचा हेतू आहे. न्यायाधीशांनी या विषयाबाबत केलेली विस्तृत मीमांसा डॉ. रमेश प्रभू वि. श्री. प्रभाकर कुंटे आणि बाळ ठाकरे वि. प्रभाकर कुंटे या दोन प्रकरणांत दिलेल्या निकालपत्रात आली आहे. तिचाच मी मुख्यतः उपयोग करणार आहे.
-२-
प्रथम संक्षेपाने न्यायालयाचे प्रतिपादन काय आहे ते पाहू. सारांशाने ते अशा शब्दांत मांडता येईल: ‘‘हिंदुत्व’ किंवा/ आणि हिंदुइझम’ या संज्ञांना एक व्यापक अर्थ आहे आणि एक संकुचित अर्थ आहे.
हिंदुत्ववाद्यांची दिशाभूल करणारा निकाल
डिसेंबर १९८७ मध्ये दाखल केलेल्या निवडणूकर्याहचिकेचा निकाल डिसेंबर १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालय देते ही मोठी चिंतेची बाब आहे. भारतातील विधिमंडळाची मुदत (राष्ट्रीय
आणिबाणीचा अपवाद वगळता) जास्तीत जास्त पाच वर्षे आहे. याचा अर्थ निकाल लागण्याच्या वेळी सदर विधिमंडळ अस्तित्वात नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला फक्त शैक्षणिक मूल्य उरते. अर्थात् “हिंदुत्व’ हा भारतातील राजकारणातील आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या राजकारणातील केंद्रबिंदू राहणार असल्याने या निर्णयाला वेगळे महत्त्व प्राप्त होते.
सर्वोच्च न्यायालयाने बाळासाहेब ठाकरे, रमेश प्रभू, सूर्यकांत महाडिक यांच्यावर ठपका ठेवणारा, तर मनोहर जोशींसह राम कापसे, प्रमोद महाजन, मयेकर, मोरेश्वर सावे, त्रातभरादेवी इत्यादींना दोषमुक्त करणारा निर्णय ११ डिसेंबर १९९५ रोजी दिला.
हिंदुत्वविषयक निवाडे
सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिसंबधी आणि तिच्या विरोधात लोकमत प्रबुद्ध करायला निघालेल्या फार मान्यवर अधिवक्त्यांनी हिंदुत्वविषयक निवाड्यांमधील सगळी गुंतागुंतच धूसर करून टाकली आहे. टीकाकारांनी केवळ मनोहर जोशींच्या खटल्यावरच, आणि त्यातही हिंदुधर्म (हिंदुइझम्) व हिंदुत्व यांच्यातील संबंधाच्या संदर्भातच, लक्ष केंद्रित केले आहे. खरे तर या निवाड्याने कायदा आणि वस्तुस्थिती यासंबंधी काही गुंतागुंतीचे वादमुद्दे उपस्थित केले आहेत. एकशे एकवीस दिवस उच्च न्यायालयापुढे या खटल्याची सुनावणी सुरू होती. त्यानंतर त्यावर पाचशे एकावन्न फूलस्कॅप पानांचा निकाल न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयासमोर एकूण सात अपीले होती, त्यात किमान सब्बीस तरी पक्षकार होते, आणि सात स्वतंत्र पण संबंधित निर्णय देण्यात आले.
धर्मनिरपेक्षता आणि सर्वोच्च न्यायालय
‘सेक्युलरिझम’ या शब्दाचा पर्यायी मराठी शब्द कोणता?प्रा. अ. भि. शहा यांनी ‘इहवाद’ असा शब्द पर्यायी म्हणून वापरला. इहवादी असणे म्हणजे या जीवनातील बाबतीत विचार आणि आचार ठरवताना कुठल्याही पारलौकिकाचा विचार न करणे, माणसाच्या आचारविचारांना फक्त माणसा-माणसांतील व्यवहारांबाबतच्या नीतिनियमांचा संदर्भ असणे, हे नीतिनियम माणसाचे कल्याण कशाने होईल याचा विचार करूनच ठरवलेले असणे. अशा नीतिनियमांना अर्थातच धर्म, ईश्वर या संकल्पनांचा स्पर्श होता कामा नये. माणसाने दुसऱ्यानला लुबाडू नये, कुणाच्या अडचणीचा फायदा घेऊ नये हा नियम जर आपण मान्य केला तर त्याने असे का करू नये या प्रश्नाचे उत्तर इहवादी पद्धतीने द्यायचे तर तसे करणे अन्यायाचे आहे म्हणून, एवढेच होईल.
स्वच्छतेसाठी घाणेरडा विषय
रोग्याचे कल्याण चिंतणार्याा खर्यार बैद्याने जसे पाहिजे तसले घाण काम करण्यास तयार असले पाहिजे तसे समाजहितचिंतक सुधारकाने पाहिजे त्या प्रकारचा विषय हाती घेण्यास सिद्ध असले पाहिजे. अमुक वस्तूचे किंवा अमुक अवयवाचे चारचौघात नाव घेणे किंवा त्याला स्पर्श करणे हा असभ्यतेचा किंवा अमंगलपणाचा प्रकार होय असे पाहिजे तर सामान्य लोकांनी मानावे. भिषग्वर्यांना तो निर्बध लागू करता येत नाही;आणि तसे न करणे जर प्रशस्त असेल तर सामाजिक सुधारकांना तरी तुम्ही अमुक प्रकारच्या विषयावर लिहिणे बरोबर नाही असे कसे म्हणता येईल? ज्या गोष्टीपासून लोकांना तोटा होत असेल ती त्यांना कितीही नाजूक किंवा अस्पृश्य वाटत असली तरी सुधारकाला तिचे उघडपणे दोषाविष्करण करणे भाग आहे.
अध्यात्म आणि तत्त्वज्ञान
लेखाचे शीर्षक पाहिल्याबरोबर अनेक वाचक बुचकळ्यात पडतील. अध्यात्म आणि तत्त्वज्ञान?’ ते उद्गारतील. म्हणजे ती दोन आहेत की काय?आमची तर अशी माहिती आहे की त्या दोन गोष्टी नाहीतच; एकाच गोष्टीची दोन नावे आहेत. आणि अशी समजूत आपल्या समाजात प्रसृत झालेली आहे हे मान्य केले पाहिजे. एखादा ग्रंथ तत्त्वज्ञानाचा आहे असे ऐकल्याबरोबर त्यात अध्यात्माविषयी, आत्म्याविषयी, त्याचा बंध आणि मोक्ष यांविषयी विवेचन असणार हे गृहीत धरले जाते. पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर तत्त्वज्ञानाची पुस्तके हवीत अशी मागणी केल्याबरोबर विक्रेता आपल्यापुढे अध्यात्माची पुस्तके टाकील हे खरे आहे.
‘महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास’ -काही विचार
प्रा. दि. य. देशपांडे ह्यांनी आजचा सुधारक, मार्च १९९६ च्या अंकात ‘महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास’ ह्या लेखातून प्रस्तुत विषयाची चर्चा पुन्हा उपस्थित केलेली आहे. पुन्हा म्हणण्याचे कारण असे की ह्या विषयाची चर्चा ह्यापूर्वीही केली गेलेली आहे. ह्या विषयाशी सततसंपर्क ठेवणाच्या व्यक्तींना डॉ. प्रदीप गोखले ह्यांच्या परामर्श, नोव्हें. १९८८ मधील ‘तत्त्वज्ञान-एक स्वदेशी विलापिका’ ह्या लेखाची सहज आठवण होईल. ह्या लेखात डॉ. गोखल्यांनी व्यक्त केलेली व्यथा वेगळ्याच प्रकारची आहे. आपल्या विद्यापीठांमधून पाश्चात्त्य तत्त्वज्ञान शिकविण्यावर भर दिला जातो. ह्या तत्त्वज्ञानाचा आपल्या जीवनाशी काहीही संबंध नसतो.
श्री मधुकर देशपांडे यांच्या पत्राला (मार्च ९६) उत्तर
माझा बडगा फक्त भारतीय व आशियातील पुरुषांवर पडतो व पाश्चात्त्य पुरुष अतिशय उदारमतवादी असतात अशी कुणाची समजूत झाली तर त्यांची मी माफी मागते. स्त्रियांचे स्थान सर्व जगात दुय्यमच आहे. दुय्यमतेच्या पातळीत कमीअधिकपणा आहे एवढेच.
माझ्या मते अमेरिकेत अविवाहित स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य आहे. विवाहपूर्व संबंधांमुळे स्त्रियांची लग्ने अडत नाहीत. बलात्कारित स्त्रियांवर अमेरिकेत कोर्टात अन्यायच होतो.
डोमेस्टिक व्हायोलन्स’मुळे, नवर्याकने, बॉय फ्रेंडने वा घटस्फोटित नवयाने केलेल्या मारहाणीमुळे बॉस्टनच्या परिसरात दर आठवड्याला एक स्त्री मृत्युमुखी पडते.
ज्या समाजात स्त्रिया अधिक प्रमाणात मुक्त आहेत तिथे पुरुष वेश्या असतात.
हिंदुत्वः ह. चं. घोंगे यांना उत्तर
एप्रिल १९९६ च्या आजचा सुधारक च्या अंकांत “हिंदुत्व : प्रा. आचार्यांच्या प्रश्नांना उत्तरे’ हा श्री. घोंगे यांचा लेख आला आहे. त्याला हे उत्तर आहे.
प्रारंभी ‘‘हिन्दुत्व, अन्वेषण (उत्तरार्ध)” डिसेंबर १९९५ या त्यांच्या लेखातील अवतरणे असून त्या खाली मी फेब्रुवारी १९९६ मधील आजचा सुधारकमधील त्यांना विचारलेले प्रश्न आहेत. त्या खाली एप्रिल १९९६ च्या मासिकांतील श्री. घोंगे यांनी मला विचारलेले प्रश्न आहेत व त्यांना मी दिलेली उत्तरे आहेत.
आरंभीच फेब्रुवारी १९९६ मधील लेखात मी स्पष्टपणे लिहिले होते की, आक्षेप त्यांच्या प्रतिपाद्य विषयाबाबत नसून त्यांत जे ऐतिहासिक उल्लेख आले आहेत त्याबद्दल आहेत.