विषय «इतर»

कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग ३)

आपल्या भारतीय नागरित समाजामध्ये कुटुंबाची किंवा कुटुंबप्रमुखाची मुख्य जबाबदारी त्रिविध आहे हे आपण जाणतो. ती म्हणजे (१) मुलांचे आणि नातवंडांचे शिक्षण करणे, (२) त्यांना नोकरी लावून देणे व (३) त्यांची शक्य तितक्या थाटामाटात लग्ने लावून देणे ही होय. बाकीच्या सगळ्या जबाबदार्या( ह्यांच्यापुढे गौण किंवा तुच्छ मानल्या जातात. त्या जबाबदार्यांसमुळे पर्यायाने त्यांसाठी बसविलेल्या आपल्या समाजाच्या घडीमुळे आपल्या शिक्षणक्षेत्रावर जे अनेक परिणाम होतात त्यांपैकी काही आपण आतापर्यंत पाहिले. तसेच ते मुलांना नोकरी लावून देण्याच्या आणि त्यांची लग्ने लावून देण्याच्या बाबतींतही अधिक सविस्तरपणे पाहता येतील, पण मला त्याची गरज वाटत नाही.

पुढे वाचा

बुद्धि उपयुक्त, की भावना?

अति शहाणा, त्याचा बैल रिकामा” अशी एक जुनी म्हण प्रचलित आहे. या म्हणीची पाश्र्वभूमी ग्रामीण महाराष्ट्र ही असली तरी तिचा वापर ग्रामीण तसेच नागरी संदर्भात होत आलेला आहे. एक शेतकरी फार बुद्धिमान होता व आपण आपल्या शेतीची दैनंदिन कामे फार हुशारीने करतो अशी त्याची समजूत होती. शेतीच्या मशागतीसाठी त्याच्याजवळ एक बैल होता. पण इतर सामान्य शेतकर्‍यांप्रमाणे औताला बैल जुंपण्यापूर्वी हा बुद्धिमान शेतकरी खूप सूक्ष्म विचार करी. त्यामुळे रोज त्याचे काम लांबणीवर पडत जाई व बैल रिकामाच राही. असे होता होता शेतीच्या कामाची वेळ टळल्याने या बुद्धिमान शेतकर्याकची अतोनात हानी झाली आणि बैल मात्र सदैव रिकामाच राहिला!

पुढे वाचा

मराठी बाणा (एड्सग्रस्त महाटी भाषा)

मराठी अस्मिता उर्फ मराठी बाणा नामक एकेकाळी पालखीतून वाजत गाजत मिरवणारी चीज आता दुर्मिळ झाली असून, मराठी भाक्किांना वेळीच जाग आली नाही तर ती नामशेष होईल, याबद्दल विचारवंतांत तरी एकमत दिसते. प्रश्न असा की जरूर पडेल तेव्हा अमृतातें जिंकण्याची पैज मारणारी, सुबत्तेच्या काळात नूपुरात रंगणारी, प्रसंग ओळखून डफ तुणतुण्याची वीरश्रीने साथ करणारी मराठी भाषा आजच अशी मृतप्राय का व्हावी? सात कोटी लोकांच्या मुखी, निदान घरात तरी, असणार्याा या भाषेला स्वतःचे सरकार आहे. म्हणजेच ती केवळ लोकभाषा नसून राजभाषाही आहे. मग आजच तिला अशी घरघर का लागावी?

पुढे वाचा

दिवाळीतील आनंद (भाग २)

अनिल अवचटांची भेट हे दिवाळी अंकांचे एक आकर्षण असते. यावर्षी ‘मौजेत ते ‘तेंदूपानांच्या प्रश्नावर काय म्हणतात हे वाचायची उत्सुकता होती. त्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी त्यांच्या ज्या चकरा झाल्या त्यात एकदा ते आ. सुधारकच्या कार्यालयात येऊन गेले होते. अवचट संशोधक अधिक, कार्यकर्ते अधिक की लेखक अधिक असा प्रश्न पडतो. त्यांचे लिखाण वाचल्यावर विवेकशील मानवता हे जे मानवी जीवनाचे साध्य ते त्यांच्या शब्दाशब्दांतून दिसते.
बिडी उद्योगावर लाखो गरीब लोक पोट भरतात. चाळीस लाख नुसते विड्या वळणारे आहेत. विडीचे वेष्टण तेंदूपान असते. ते गोळा करणारे लाखो.

पुढे वाचा

नियति, दैव, विधिलिखित, नशीब, प्रारब्ध, इत्यादि

नियति, विधिलिखित, दैव, नशीब, प्रारब्ध या सर्व गोष्टी एकाच कुटुंबातील आहेत. पण त्यांपैकी काहींचे संदर्भ आणि अर्थ काहीसे भिन्न आहेत.
नियति (Fate). भविष्यात केव्हा काय घडणार आहे हे पूर्णपणे पूर्वनिश्चित आहे. मनुष्याने काहीही केले त्यापासून त्याची सुटका नाही. उदाहरण म्हणून पुढील गोष्ट देता येईल.
एका मनुष्याला दुपारी बाजारात मृत्यू भेटला आणि म्हणाला : ‘आज रात्री बारा वाजता येतो आणि तो नाहीसा झाला. तो मनुष्य स्वाभाविकच घाबरला, पण काहीतरी हातपाय हलवायचे म्हणून त्याने आपले घोडे काढले आणि त्यावर बसून तो भरधाव वाट फुटेल तिकडे जात राहिला.

पुढे वाचा

हिन्दुत्व-अन्वेषण (उत्तरार्ध)

आजचा सुधारक मासिकाच्या ऑक्टो. ९५ च्या अंकातील लेखातून हिंदुत्व या धार्मिक संज्ञेचा ऐतिहासिक शोध निष्फळ ठरतो याविषयीचा विचार मांडला आहे. राजकीय स्वार्थासाठी हिन्दुत्वाचा जयकार केला जात असेल तर प्रस्तुत लेखकाला या । विषयाची चर्चा करण्याची गरज नाही. पण ज्यावेळी जनजागृतीसाठी धर्मप्रचाराचा अभिनिवेश असतो त्यावेळी असे जाणवते की प्रचाराची माध्यमे ज्यांच्याजवळ आहेत ते कर्मठ आहेत, आणि या कर्मठांनी कोणत्याच समस्येचा अभ्यास केला नसतो. विचारही केला नसतो. कारण धर्मप्रचाराचे नाटक वठविण्यात ते स्वतःला धन्य समजतात. त्यांना मंदिरांविषयी आस्था नसते. कीर्तन-प्रवचनांचा त्यांना कंटाळा असतो.

पुढे वाचा

खरंच, पुनर्जन्म आहे? (उत्तरार्ध)

शारदेच्या माहेरच्या माणसांची तिने सांगितलेली नावे
शारदेने तिच्या खापरपणजोबा, पणजोबा, आजोबा, वडील, दोन काका आणि दोन सावत्रभाऊ यांची नावे सांगितली आणि त्याप्रमाणेच (पणजोबा सोडून) नावे असणारी वंशावळ प्रा. अकोलकरांनी सादर केली आहे. या महत्त्वाच्या मुद्द्याची नीट छाननी होणे जरूर आहे. याबाबत प्रा. अकोलकरांना श्री. आर. के. सिन्हा यांच्याकडून त्यांनी मिळविलेली वंशावळ मिळाली आहे. याशिवाय डॉ. स्टीव्हन्सनना प्रो. पॉल यांच्याकडून वंशावळ मिळाली. श्री. सिन्हा व प्रो. पॉल यांचा शारदा केसशी कसा संबंध आला, ही माणसे कोण, त्यांनी कोणत्या प्रकारे आणि कोणत्या माहितीच्या आधारे तपास केला, अशा प्रकारच्या संशोधनात तपास करताना ज्या काळज्या घ्याव्या लागतात त्याची त्यांना जाण होती का, याची काहीच माहिती प्रा.

पुढे वाचा

दिवाळीतला आनंद (भाग १)

माझी जॉर्ज गिसिंगशी ओळख झाली त्याला पुष्कळ वर्षे लोटली. नतर तो कुठेच भेटला नाही. इंटरच्या ‘हायरोड्स आफ इंग्लिश प्रोज मध्ये ‘माय बुक्स च्या रूपने झालेली पहिली अन् शेवटची भेट. पण काही ओळखी जन्मभर लक्षात राहतात तशी ही राहिली. एखाद्या आईने ‘माय चिल्ड्रेन या विषयावर जितक्या ममतेने बोलावे तितक्या जिव्हाळ्याने त्याने ‘माय बुक्स ची ‘कवतुकें सांगितली होती. माणूस अर्धबेकार-फटिचर पण ऐट अशी की पुस्तक वाचायचे ते विकत घेऊनच. धंदा लेखनाचा. नियमित उत्पन्न नाही. आहे ते अपुरे अशा स्थितीत पठ्ठा मैलोगणती अंतर पायी तुडवायचा.

पुढे वाचा

चर्चा

श्री. संपादक,
आजचा सुधारक यांस,
डॉ. र. वि. पंडित ह्यांच्या सप्टेंबर ९५ च्या पत्राला हे प्रत्युत्तर.
डॉ. पंडित लिहितात की त्यांच्या मूळ लेखात (मे ९५) भारतीयांच्या लैंगिकतेचा उल्लेख नव्हता.
त्यांची मे ९५ च्या लेखातली पुढील विधाने मला भारतीयांच्या लैंगिकतेबद्दलची वाटली.“थायलंड वगळता सर्व आशिया व चीन यामध्ये लैंगिक स्वातंत्र्य बरेच मर्यादित आहे.”“लैंगिक सुख हवे तेवढे हव्या त्या प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे असा विचारप्रवाह अमेरिकेत निर्माण झाला आहे. भारतात आज जरी अशा प्रवृत्तीकडे तिरस्काराने व तुच्छतेने पाहिले जात असले तरी…”
थोडक्यात डॉ. पंडितांचे म्हणणे भारतात अमेरिकेसारखा स्वैराचार सध्या नाही.

पुढे वाचा

आगरकरांचे अर्थचिंतन

प्रस्तावना
प्रस्तुत निबंधाचे तीन भाग पाडले आहेत. पहिल्या भागात आगरकरांच्या अगोदरच्या काळात महाराष्ट्रात आर्थिक चिंतनाची स्थिती काय होती हे दर्शविले आहे. दुसन्या भागात आगरकरांच्या निबंधांमधून प्रकर्षाने दिसून येणारे विचारांचे पैलू दिग्दर्शित केले आहेत. निबंधाच्या तिसऱ्या भागात त्यांच्या एकूण आर्थिक चिंतनाचे समालोचन करण्याचा प्रयत्न
केला आहे.
(१) आगरकरपूर्व आर्थिक चिंतन
१८२० च्या सुमारास पेशवाईचे पतन झाल्यानंतरही ब्रिटिशांशी लढाया करून आपले उरलेसुरले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचे व ब्रिटिशांना घालवून देण्याचे प्रयत्न चालू होते. उत्तर भारतात हे प्रयत्न बराच काळ चालू होते. १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम, उत्तरप्रदेश व बिहारमधील उठाव ही त्या प्रयत्नांची काही उदाहरणे आहेत.

पुढे वाचा