विषय «इतर»

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग २)

वाक्यांविषयीची वाक्ये
गेल्या अंकात प्रसिद्ध झालेला या लेखमालेचा पहिला पाठ ज्यांनी वाचला असेल अशा वाचकांपैकी अनेक वाचकांचे त्याने समाधान होणार नाही. ते म्हणतील : ‘तत्त्वज्ञान म्हणून तुम्ही दुसरेच काहीतरी आमच्या गळी उतरवीत आहात. आम्हाला तत्त्वज्ञानाची फारशी माहिती नसेल, पण आम्हाला इतके नक्की माहीत आहे की तुम्ही सांगता ते तत्त्वज्ञान नव्हे. तत्त्वज्ञान म्हणजे दृश्य जगाच्या मागे किंवा पलीकडे असणारे अदृश्य किंवा अतींद्रिय सत् त्याचे ज्ञान असे आम्ही ऐकले आहे. तसेच आम्ही हेही ऐकले आहे की तत्त्वज्ञान म्हणजे ज्याला अध्यात्म म्हणतात तेः म्हणजे आपल्या आत्म्याच्या खच्या स्वरूपाविषयीचे ज्ञान.

पुढे वाचा

चर्चा – ‘धारणात् धर्म इत्याहुः।’ – दुसरी बाजू

‘आजचा सुधारक’च्या नोव्हें-डिसें. ९२ च्या अंकात ‘धारणात् धर्म इत्याहुः ।’ ह्या शीर्षकाखाली प्रा. मा.गो. वैद्य यांच्या पुस्तकातील ‘धर्म’ कल्पनेला विरोध करणारा प्रा. दि.य. देशपांडे यांचा लेख आला आहे. प्रा. वैद्य धर्म म्हणजे religion नव्हे असे म्हणतात, तर प्रा. देशपांडे यांचा आग्रहअसा की गेली दीडशे वर्षे धर्म म्हणजे religion हेच समीकरण अस्तित्वात आहे.
इंग्रजी भाषेत ‘धर्म’ शब्दाला पर्यायी शब्द नसल्यामुळे त्याकरिता जवळचा असा इंग्रजी religion हा शब्द रूढ झाला आहे हे खरे आहे. परंतु धर्म शब्दातील संकल्पना religion च्या संकल्पनेहून वेगळी आहे हे जर कोणाच्या लक्षात आले तर त्याने तसे म्हणू नये काय?

पुढे वाचा

प्रा. काशीकरांना उत्तर

माझ्या ‘धारणात् धर्म इत्याहुः’ या लेखावरील प्रा. काशीकरांची प्रतिक्रिया वर दिली आहे. ती वाचून माझ्या लेखातील एकाही प्रतिपादनाचे खंडन झाले असे मला वाटत नाही. उलट त्यांनी दिलेला म.म. पां.वा. काणे यांचा हवाला माझ्याच म्हणण्याला पोषक ठरणारआहे.
मी माझ्या लेखात असे प्रतिपादले आहे की गेल्या दीडशे वर्षांहून अधिक काळ ‘धर्म आणि ‘religion’ हे शब्द परस्परांचे पर्याय म्हणून रूढ आहेत. हे माझे म्हणणे प्रा. काशीकरांना मान्यच आहे. परंतु त्यांचे म्हणणे असे आहे की जर धर्माची मूळ संकल्पना religion च्या संकल्पनेहून वेगळी आहे असे कोणाच्या लक्षात आले तर त्याने तसे म्हणू नये काय?

पुढे वाचा

वृद्धांसाठी निवडीचा हक्क

मराठीतील सन्मानाने मरण्याचा हक्क’, ‘इच्छामरण’, ‘स्वेच्छामरण’ आणि इंग्रजीतील Euthanasia या शब्दांनी या विषयाचा उल्लेख करण्यात येतो. त्यामुळे या विषयाचा फक्त मरणाशीच संबंध आहे असा गैरसमज होतो. हा प्रश्न मरणाशी नव्हे तर जगण्याशी म्हणजे जीवनाच्या गुणवत्तेशी अधिक निगडित आहे. म्हणून निवडीचा हक्क (जगणे आणि मरणे यांपैकी कशाचीही निवड करण्याचा माणसाचा हक्क) हे शब्द या विषयाचा निर्देश करण्यासाठी मी अधिक पसंत करतो. माणसाला जगण्याचा हक्क आपल्या देशाच्या घटनेने दिला आहे, पण जीवनाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने जर आपण विचार करू लागलो तर आपल्या हे सहज लक्षात येते की हा जगण्याचा हक्क केवळ कागदावरच आणि वरपांगी आहे.

पुढे वाचा

चर्चा -आरोपाची आक्षेपार्हता पुराव्यांवर असते!

ग्रंथावरील परीक्षणात्मक टीकालेख वाचला. (आजचा सुधारक, नोव्हें. डिसे.९२) या ग्रंथाबद्दलचा त्यांचा अभिप्राय जाणून घेण्यास आम्ही अगोदरच उत्सुक असल्यामुळे त्यांच्या या परीक्षणाने आम्हाला साहजिकच आनंद झाला.
परीक्षणकर्त्याने आपल्या ग्रंथाचे कौतुक करावे अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. आमच्यापुरते बोलायचे तर आमच्या ग्रंथावर टीकाकारांनी कठोर टीका करावी असे आम्हाला वाटत असते. ‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’ या आपल्या १९८८ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथावर अशी कठोर टीका कुणीही केली नाही याचे आम्हाला दुःखच वाटत आले आहे. मोघम कौतुकापेक्षा कठोर टीका विचारप्रवर्तक व म्हणूनच उपयुक्त असते.

पुढे वाचा

चर्चा – पण पूर्वग्रह पुराव्यांपेक्षा प्रबळ होऊ नयेत

प्रा. शेषराव मोरे यांनी वाचकांचा त्यांच्याविषयी गैरसमज होऊ नये म्हणून केलेला खुलासा माझे आक्षेपच अधिक बळकट करणारा आहे. माझ्या परीक्षणाचा एकूण रोख जाणीवपूर्वक लक्षात न घेता त्यांनी आत्मसमर्थनार्थ बरीच मखलाशी केली आहे. जाणीवपूर्वक हा शब्द मी मूळ परीक्षणातही मुद्दाम दुहेरी अवतरणचिन्हांत टाकला होता। (आजचा सुधारक – १९९२ पृ. २७६). फडके-पळशीकरादी टीकाकार फक्त सावरकरांची बदनामी करण्यासाठीच किंवा त्यांच्यावर खोटीनाटी टीका करण्यासाठीच लिहितात अशा आशयाची डझनोगणती वाक्ये प्रा. मोरे यांच्या ग्रंथात आहेत. माझा प्रश्न एवढाच की या संशोधकांचे हे हेतू’ एवढ्या ठाम शब्दांत मांडण्याजोगे कोणते पुरावे लेखकापाशी आहेत?

पुढे वाचा

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग-१)

तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे?

तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे? या प्रश्नाला सामान्यपणे पुढील उत्तर दिले जाईल. ‘तत्त्वज्ञान शिकण्याची काहीच आवश्यकता नाही. तत्त्वज्ञान म्हणजे घटपटाची निरर्थक झटापट करणारा उद्योग. रिकामटेकड्या लोकांनी वेळ घालविण्याकरिता निर्माण केलेला एक खेळ. त्याचा जीवनात कसलाही उपयोग नाही. जीवनाच्या कोणत्याही समस्येशी त्याचा कोणताही संबंध नाही. ज्याला हिंदीत ‘बाल की खाल निकालना’, म्हणजे केसाची साल काढणे, म्हणतात, ते करणारा व्यवसाय. केस ही मुळात किती बारीक वस्तु, तिची साल काढल्यावर शिल्लक काय उरणार? म्हणजे जिथे कसलाही भेद नाही तिथे भेद उकरून काढणारा हा विषय आहे.’

पुढे वाचा

विवाहाविषयी आणखी थोडे

श्री संपादक, आजचा सुधारक, यांस,
आपल्या ऑक्टोबर १९९२ च्या अंकामध्ये विवाह आणि नीती ह्या विषयावर आपण आपली स्वतःची भूमिका मांडली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरच्या अंकात स्त्री उवाच ह्या वार्षिकाचा परिचय अनुराधा मोहनी ह्यांनी करून दिला आहे, त्यात विवाह हा विषय आहे, आणि त्याच अंकात श्री. गं.र. जोशी ह्यांचे ‘समतावादी कुटुंब!’ ह्या शीर्षकाचे पत्र त्याच विषयावर आपण प्रकाशित केले आहे. त्यांपैकी श्री गं.र. जोशी ह्यांच्या पत्राविषयी माझे मत.
लग्न ह्या विषयाचा आवाका फार मोठा आहे. त्याचे अगणित पैलू आहेत. ती आपल्या सध्याच्या कुटुंबसंस्थेची आधारशिला असल्यामुळे तो संपूर्ण मानवजातीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

पुढे वाचा

संभ्रमात टाकणारे इतिहास-संशोधन

‘श्रीरामाची अयोध्या उत्तरप्रदेशात नसून अफगाणिस्थानात असावी’ असा दावा बंगलोर येथील इन्डियन इन्स्टिस्टूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सचे डॉ. राजेश कोछर यांनी केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इन्डियाच्या दि. २० ऑक्टोबर १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. दुसरी अशाच प्रकारची बातमी नागपूरच्या हितवाद च्या दि. २३ नोव्हेंबर १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. त्या बातमीत म्हटले आहे की, डॉ. आर.के. पाल नावाच्या हौशी प्राच्यविद्या संशोधकाने गौतम बुद्ध हा मेसोपोटेमियात होऊन गेला, असा शोध लावला. दोन्ही शोध निश्चितच पारंपरिक मताला धक्के देणारे आहेत. जुनी कागदपत्रे, शिलालेख वा पुरातत्त्वीय अवशेष यांच्या नवीन उपलब्धीमुळे नवीन प्रमेये मांडली जातात आणि इतिहासावर नवा प्रकाश पडतो.

पुढे वाचा

आगरकर-चरित्राच्या निमित्ताने

राष्ट्रीय चरित्रमालेसाठी गोपाळ गणेश आगरकर यांचे एक संक्षिप्त चरित्र प्रख्यात विचारवंत, लेखक आणि समाजविज्ञान-कोशकार श्री स. मा. गर्गे यांनी लिहिले आहे. आजचा सुधारक गेली दोन अडीच वर्षे आगरकरांनी पुरस्कारलेल्या विवेकवादाचा प्रसार आपल्या मगदुराप्रमाणे करीत आहे. तेव्हा त्याने या अल्पचरित्राची ओळख आपल्या वाचकांना करून द्यावी म्हणून श्री गर्गे यांनी ते आमच्याकडे धाडले. त्या चरित्राच्या निमित्ताने आगरकरांना आदरांजली वाहण्याची ही संधी आम्ही घेत आहोत.
टिळक आणि आगरकर या दोघांचाही जन्म १८५६ चा. धाकट्या शास्त्रीबुवांनी निबंधमालेतून आधुनिक शिक्षितांस केलेल्या विज्ञापनेने भारावून गेलेले हे दोघेही तरुण या हतभाग्य भारतभूच्या चरणावर आपली जीवनकुसुमे वाहण्यासाठी शास्त्रीबुवांच्या उद्योगात सामील झाले.

पुढे वाचा