आता आहे तेच पाणी वापरून नवीन सिंचन-तंत्रज्ञानाने जास्त जमीन पाण्याखाली आणता येईल असे तंत्रज्ञ म्हणतात. ते त्यांनी नमुना शेते घेऊन शेतकऱ्यांना दाखवून दिले पाहिजे. अशा नमुना शेतांची संख्या प्रत्येक जिल्ह्यात 2-3 तरी पाहिजे. आता जैन कंपनीची ठिंबक सिंचनाची सध्या खपणारी यंत्रणा संख्येने जास्त आहे. त्यांना जिल्हे वाटून देऊन त्यात शेते करायला आग्रह केला पाहिजे. त्याच्या शेतावरच मिळतील, अशी व्यवस्था केली पाहिजे. नुसते ड्रिपने पाणी वाचते असे म्हणण्यापेक्षा अशा नमुना शेतांमधून तो विषय जास्त लवकर लक्षात येऊ शकतो. समजा शेतकऱ्याला पटले की अशा सिस्टमचा पाणी वाचायला फायदा आहे, तरी त्याच्या छोट्या छोट्या अनेक शंका असतात.
विषय «इतर»
पाटबंधारे प्रकल्प पूर्वतयारी
[ एखादा पाटबंधारे प्रकल्प जमिनीवर उभा राहण्याआधी कायकाय विचार केला जातो, व त्यांमागील तत्त्वे कोणती असतात, याचा हा धावता आढावा.]
मानवास पिण्याकरता, पिकांकरता, उद्योग व कारखान्यांकरता नियमितपणे पाणी लागते. हे पाणी आपणास पाऊस पडून मिळते. पाऊस दररोज नियमितपणे सम प्रमाणात, आपल्या गरजेनुसार पडत नाही. तो फक्त वर्षांतील काही महिने जोरदार पडतो, व इतर महिने कोरडे जातात. म्हणून या कोरड्या काळात लागणारे पाणी साठवणे जरूर असते. हे पाणी नद्यांवर धरणे बांधून साठविले जाते.
पाऊस समुद्रकिनारी डोंगराळ भागात जास्त पडतो. सखल भागात, समुद्रापासून दूर पाऊस कमी-कमी होत जातो.
नागरी जलपुरवठ्याचे आव्हान
जलव्यवस्थापनेचा आढावा
पुणे, औरंगाबाद, नाशिक इत्यादी शहरांमध्ये पुढील आठवड्यापासून (एप्रिल 2011) पाणी-कपात सुरू होत आहे. पाणी-कपात ही नेहमीच चिंतेची बाब असते. घरातील पाण्याच्या गरजा पुरवताना सर्वांचीच तारांबळ उडते. या वर्षीची पाणी-कपात आणखीनच चिंताजनक आहे. कारण अगदी नोव्हेंबरपर्यंत आपण याच विश्वासात होतो की आपल्याकडील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. या वर्षी पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील दुष्काळीक्षेत्रावरसुद्धा सरासरी एवढा अथवा सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला. असे असतानादेखील पाणी-कपातीची वेळ आली, यामागे दोन मोठी कारणे आहेत. 1. सर्व शहरांतील वाढती लोकसंख्या, 2. वाढत्या लोकसंख्येच्या दरासमोर नतमस्तक झालेली जलव्यवस्थापनाची यंत्रणा.
डाळरोटी
एकूण घरखर्चापैकी किती प्रमाण अन्नावर खर्च होते, या अंगाने काही देशांची आकडेवारी यूनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चरने तपासली. या प्रमाणानुसार चार वर्ग पाडले गेले.
ज्या देशांत अन्नखर्च एकूण घरखर्चाच्या 15% किंवा कमी असतो, ते सुस्थित देश. या वर्गात कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, इंग्लंड, स्पेन, आयर्लंड, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, जर्मनी, बेल्जियम, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, दक्षिण कोरिया व थायलंड येतात. अमेरिका सर्वांत सुस्थित आहे. तेथील लोकांच्या घरखर्चात केवळ 7% खर्च अन्नावर होतो.
यांच्याखाली घरखर्चाच्या 16% ते 25% भाग अन्नावर खर्च करणारे देश येतात.
संस्कृतीची जादू
संस्कृतीची जादू
औद्योगिकीकरणाने जन्माला घातलेली स्थलांतराची प्रक्रियाही इंग्लंडमध्ये अनपेक्षित होती. त्याचे सामाजिक परिणाम तीव्र होते.
औद्योगिक नगरांनी औद्योगिक कामगार घडविले खरे, पण त्यांचे पालनपोषण, संगोपन करण्याची काहीच व्यवस्था तेथे निर्माण झाली नव्हती. अपत्यसंगोपनाचा काहीच अनुभव नसलेल्या बाईला ज्या गोंधळजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्याचा अनुभव त्या गावातील प्रशासकांना येत असावा. त्या काळातील नागरी परिस्थितीचे वर्णन अॅलेक्सी डी तॉकव्हिल या फ्रेंच प्रवाशाने अतिशय भेदकपणे केले आहे. तो म्हणतो:
“माणसाच्या कर्तृत्वामुळे जग सुपीक होते आहे. येथे घाणीने भरलेल्या गटारातून सोने वाहते आहे. येथे मानवाने विकासाचे परमोच्च शिखर गाठले आहे.
संपादकीय खरे वृत्त शोधपत्रकारिता?
गेले काही महिने प्रसारमाध्यमांतून वेगवेगळे घोटाळे गाजत आहेत. यांपैकी 2 जी घोटाळा या नावाने ओळखला जाणारा, तो सगळ्यांत थोर. पावणेदोन लाख कोटी रूपये महसूल या घोटाळ्यामुळे बुडला, असे सांगितले जाते. हे नुकसान किती काळात झाले, हे मात्र कुठेही नोंदले गेलेले नाही. महसूल नेहेमी विशिष्ट काळात कमावला जात असतो. जर असा काळ नोंदला गेला नसेल, तर तो आकडा निरर्थक ठरतो. पण पावणेदोन लाख कोटी हा आकडा मोठा तर खराच; आजच्या भारतातील प्रत्येक माणसामागे सुमारे दीड हजार रुपये येवढा तो आकडा आहे. किती काळात हे पैसे बुडले, हे मात्र स्पष्ट नाही.
एका विचारवंताची रोजनिशी
स्वतःचे विचार, भावना, येणारे अनुभव आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबाबतच्या प्रतिक्रिया, अशा अनेक गोष्टी माणसं नोंदत असतात. मित्रांना, सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांमधून विचारांची देवाण-घेवाण करत असतात. अनेक पाश्चात्त्य लेखकांच्या, विचारवंतांच्या अश्या डायऱ्या, जर्नल्स, पत्रसंग्रह नंतर प्रकाशित झाले आहेत. अमेरिकन कादंबरीकार जॉन स्टाइनबेक तर त्याची ग्रेप्स ऑफ राथ ही कादंबरी लिहीत असताना बरोबरच एक डायरीदेखील लिहीत असे. गाणारा गायक जसा बैठकीच्या आधी गळा मोकळा करतो तसा स्टाइनबेक आधी डायरी लिहून हात मोकळा करत असे.
व्हर्जिनिया वूल्फ, कॅथरीन मॅन्सफील्ड ह्या लेखिकांच्या डायऱ्या, पत्रे वाचताना फार मजा वाटली होती.
पुस्तक-परिचय : द प्रेग्नंट किंग
डॉ. देवदत्त पट्टनाईक यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे (पेंग्विन, 2008).
पुस्तकाच्या नावात जितका सरळपणा आहे तितक्याच सरळ भाषेत लिहिलेली, महाभारताच्या काळातली आणि महाभारताला समांतर जाणारी ही कथा आहे. कथेत काही महाभारतातली पात्रे गोवलेली आहेत.
कथा दोन पातळ्यांवर लिहिली आहे. एक म्हणजे मुख्य कथेचा धागा जो पुढे सरकतो आणि दुसरी म्हणजे, मुख्य कथेच्या अंगाने येणाऱ्या अनेक उपकथा, दंतकथा आणि त्या काळातल्या संस्कृतीतल्या संकल्पनांची लेखकाची स्पष्टीकरणे.
थोडे कथेबद्दल
इलवृत्त नावाच्या राज्याच्या युवनाश्व नावाच्या राजाची ही गोष्ट आहे. युवनाश्वाचे वडील प्रसेनजित त्याच्या जन्माच्या आधीच मरतात.
अभिप्राय : लिहावे नेटके
माधुरी पुरंदरे ह्यांचे नाव वाचू आनंदे ह्या अद्वितीय पुस्तकाच्या कर्त्या म्हणून आपणाला माहीत आहे. आता लिहावे नेटके हे पुस्तक त्यांच्या लेखणीतून उतरले आहे. वाचनामध्ये गोडी निर्माण झाली की लेखनाला सुरुवात करावी आणि त्यामध्ये सर्वांनी प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची इच्छा त्यांच्या ह्या उपक्रमांतून आपणाला दिसून येते. त्या नुसती इच्छा मनात बाळगून स्वस्थ बसल्या नाहीत तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी अपार कष्ट उचलले आहेत. त्यांच्या ह्या दोनही प्रयत्नांची प्रशंसा करावी तितकी थोडीच आहे.
लिहावे नेटके हे पुस्तक वाचताना त्यांनी केलेल्या व्यासंगाचे जे दर्शन आपल्याला होते त्याने आपण दिपून जातो.
स्मिथ, मार्क्स आणि गांधी
अर्थशास्त्राचा जनक अॅडम स्मिथ याला नुसते अर्थशास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा अर्थतत्त्वज्ञ म्हणणे जास्त उचित ठरेल. राजसत्ता आणि अर्थकारण यांचा अन्योन्यसंबंध तपासण्याची त्याला अठराव्या शतकातच गरज भासली. त्याच्या दूरदर्शीपणाचा हा पुरावा आहे.
अँडम स्मिथ ग्रेट ब्रिटनचा नागरिक होता आणि ‘औद्योगिक क्रांती’चे जन्मस्थान इंग्लंड मानले जाते. याच इंग्लंडात पुढे कार्ल मार्क्स हाही अर्थतत्त्वज्ञ येऊन राहिला होता आणि भांडवलाची चिकित्सा करणारा आपला ग्रंथ त्याने औद्योगिक क्रांतीच्या वाढत्या पडछायेत लिहिला. ज्या लंडन शहरात अॅडम स्मिथ आणि कार्ल मार्क्स यांनी आधुनिक संस्कृती आणि अर्थकारण यांचे परस्परसंबंध मांडण्याचा प्रयत्न केला, त्याच लंडन शहरात मोहनदास करमचंद गांधी ह्या – महात्मा म्हणून ओळखल्या गेलेल्या – भारतीयाला पाश्चात्त्य संस्कृतीचे जवळून दर्शन घडले.