स्वतःचे विचार, भावना, येणारे अनुभव आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबाबतच्या प्रतिक्रिया, अशा अनेक गोष्टी माणसं नोंदत असतात. मित्रांना, सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांमधून विचारांची देवाण-घेवाण करत असतात. अनेक पाश्चात्त्य लेखकांच्या, विचारवंतांच्या अश्या डायऱ्या, जर्नल्स, पत्रसंग्रह नंतर प्रकाशित झाले आहेत. अमेरिकन कादंबरीकार जॉन स्टाइनबेक तर त्याची ग्रेप्स ऑफ राथ ही कादंबरी लिहीत असताना बरोबरच एक डायरीदेखील लिहीत असे. गाणारा गायक जसा बैठकीच्या आधी गळा मोकळा करतो तसा स्टाइनबेक आधी डायरी लिहून हात मोकळा करत असे.
व्हर्जिनिया वूल्फ, कॅथरीन मॅन्सफील्ड ह्या लेखिकांच्या डायऱ्या, पत्रे वाचताना फार मजा वाटली होती.
Category «इतर»
पुस्तक-परिचय : द प्रेग्नंट किंग
डॉ. देवदत्त पट्टनाईक यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे (पेंग्विन, 2008).
पुस्तकाच्या नावात जितका सरळपणा आहे तितक्याच सरळ भाषेत लिहिलेली, महाभारताच्या काळातली आणि महाभारताला समांतर जाणारी ही कथा आहे. कथेत काही महाभारतातली पात्रे गोवलेली आहेत.
कथा दोन पातळ्यांवर लिहिली आहे. एक म्हणजे मुख्य कथेचा धागा जो पुढे सरकतो आणि दुसरी म्हणजे, मुख्य कथेच्या अंगाने येणाऱ्या अनेक उपकथा, दंतकथा आणि त्या काळातल्या संस्कृतीतल्या संकल्पनांची लेखकाची स्पष्टीकरणे.
थोडे कथेबद्दल
इलवृत्त नावाच्या राज्याच्या युवनाश्व नावाच्या राजाची ही गोष्ट आहे. युवनाश्वाचे वडील प्रसेनजित त्याच्या जन्माच्या आधीच मरतात.
अभिप्राय : लिहावे नेटके
माधुरी पुरंदरे ह्यांचे नाव वाचू आनंदे ह्या अद्वितीय पुस्तकाच्या कर्त्या म्हणून आपणाला माहीत आहे. आता लिहावे नेटके हे पुस्तक त्यांच्या लेखणीतून उतरले आहे. वाचनामध्ये गोडी निर्माण झाली की लेखनाला सुरुवात करावी आणि त्यामध्ये सर्वांनी प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची इच्छा त्यांच्या ह्या उपक्रमांतून आपणाला दिसून येते. त्या नुसती इच्छा मनात बाळगून स्वस्थ बसल्या नाहीत तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी अपार कष्ट उचलले आहेत. त्यांच्या ह्या दोनही प्रयत्नांची प्रशंसा करावी तितकी थोडीच आहे.
लिहावे नेटके हे पुस्तक वाचताना त्यांनी केलेल्या व्यासंगाचे जे दर्शन आपल्याला होते त्याने आपण दिपून जातो.
पुस्तक-परिचय: स्वातंत्र्याचा सौदा (भाग 2)
पुस्तक-परिचय:
स्वातंत्र्याचा सौदा (भाग 2)
[“आम्ही तुम्हाला सुरक्षित, सुखवस्तू आयुष्याची हमी देतो, पण त्या मोबदल्यात तुम्हा प्रजाननांना तुमच्या काही स्वातंत्र्यांचा संकोच होणार, हे मान्य करायलाच हवे.” असे सत्ताधीश सांगतात व प्रजा ते मानते. या अघोषित करारांची तीन रूपे आपण पहिल्या भागात पाहिली. सिंगापूर, चीन व यूएसए या त्या तीन आवृत्त्या होत्या. जॉन कॅफ्नरच्या फ्रीडम फॉर सेल, (पॉकेट बुक्स, 2009) चा आता पुढचा भाग. ]
भारत
लोकशाहीच्या लक्षणांच्या खानेपूर्तीत भारत जवळपास पूर्ण गुण मिळवून उत्तीर्ण होतो. विशेषतः निवडणुका नेमाने घेणे, त्या मुक्त असणे, त्यांचे निर्णय सत्ताधारी व प्रजेने मानणे, या साऱ्या अंगांत भारतात खरीखुरी लोकशाही आहे असे दाखवता येते.
गांधीनंतरचे गांधी
मोहनदास करमचंद गांधी (1761-1948) यांच्या मृत्यूला साठ वर्षे उलटून गेल्यानंतर चार गांधी आजही जीवित आहेत. ह्या चौघांची ओळख प्रस्थापित करणे आवश्यक ठरते कारण मायबाप इंग्रजी सरकारने त्यांच्या जमान्यात हे काम नक्कीच नेकीने केले असते.
हे चारही गांधी त्रासदायक आहेत, पण त्यांचा त्रास वेगवेगळ्या व्यक्तींना, अवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. समकालीन सार्वजनिक आयुष्यात आवेगळ्या कारणांसाठी हे चौघेजण उपयुक्तदेखील आहेत. हे मी दुःखाने बोलत नसून आदराने बोलत आहे कारण आपल्या जन्मानंतर एकशेपन्नास आणि मृत्यूनंतर साठवर्षांनंतरही लोकांना त्रासदायक किंवा उपयुक्त ठरणे ही काही साधीसुधी बाब नव्हे.
पुस्तक-परिचय : पुकारा
श्री. नानक रामटेकेंनी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत काम करताना आलेले अनुभव ‘पुकारा’ या पुस्तकात लिहिले आहेत. 1965 ते 2001 ह्या 36 वर्षांच्या कालावधीत त्यांनी ज्या वेगवेगळ्या पदांवर काम केले त्यात जिल्हाधिकारी (वर्धा), आयुक्त (नागपूर महानगरपालिका) ह्या मुख्य नेमणुका आहेत. 1965 ला ते उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले व 1983 ला ते आय.ए.एस. झाले.
विदर्भाच्या ग्रामीण भागात काम करताना, ते बौद्धधर्माचे असूनदेखील त्यांची पूर्वीची हिंदु-महार जात नेहमीच त्यांच्या आड आली. कुठे त्यांना घर मिळेना, कुठे त्यांना पाण्याची टंचाई सोसावी लागली, तर कुठे त्यांची भांडी घासणारी बाई काम सोडून गेली.
पुस्तक-परिचय समृद्धीची उत्क्रांती
प्रत्येक जातीमधील प्राणी बालपण, तारुण्य आणि म्हातारपण ह्या स्थितींमधून जाताना केवळ त्याच्या निसर्गदत्त क्षमतांचा वापर करतो. मनुष्य हा एकच प्राणी असा आहे की त्याच्या आयुष्याच्या काळात व्यक्ती आणि मानवजात ह्या दोन्ही पातळ्यांवर तो विकसित होत असतो. माणसाची प्रत्येक नवीन पिढी ही आधीच्या पिढ्यांनी रचलेल्या पायावर नवीन रचना करीत असते.
– अॅडम फर्ग्युसन
ॲन एसे ऑन द हिस्ट्री ऑफ सिव्हिल सोसायटी
आवडलेल्या पुस्तकाची सुबुद्ध मराठी वाचकांना ओळख करून द्यावी म्हणून लिहायला सुरुवात केली. परंतु पुस्तकाच्या शीर्षकाचे मराठी भाषांतर काय करावे येथपासून अडचण सुरू झाली.
अरब जगाताल उठाव : वादळ की वावटळ?
डिसेंबर 2010 च्या उत्तरार्धात उत्तर आफ्रिकेच्या टोकावर वसलेल्या लहानशा ट्यूनिशिया देशातल्या जनतेने त्या देशावर 23 वर्षे सत्ता गाजविणारे अध्यक्ष झिने अल अबिदिन बिन अली यांच्याविरुद्ध उठाव केला, तेव्हा पुढे घडणाऱ्या महाभारताची ती नांदी आहे असे फारच कमी लोकांना वाटले असेल. पण ट्युनिशियापाठोपाठ शेजारच्या लिबिया आणि इजिप्तमध्येही या उठावाची लागण झाली. 17 जानेवारी 2011 रोजी ट्युनिशियाचे अध्यक्ष बिन अली पायउतार झाले. महिन्याभराच्या आतच, 11 फेब्रुवारीला, इजिप्तच्या जनतेने सुमारे 32 वर्षे सत्तेवर असलेल्या अध्यक्ष होस्नी मुबारक यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. लिबियामध्ये राजधानी त्रिपोलीपाठोपाठ पूर्वेकडील बेनगाजी शहरातही अध्यक्ष मुअम्मर गडाफी यांच्याविरोधात प्रचंड मोठे आंदोलन सुरू झाले.
पुस्तक-परिचय : विदर्भ राज्य संकल्पना
‘स्वतंत्र विदर्भ राज्य’ हे शब्द पश्चिम महाराष्ट्रात उच्चारले गेले, तर प्रतिसाद कपाळावर आठ्यांचा तरी असतो, किंवा तुच्छतेने हसण्याचा तरी हे प्रतिसाद बहुतेककरून प्रश्नाच्या अपुऱ्या आकलनातून येतात. मुळात विदर्भ राज्य ही संकल्पना कोणत्या आधारावर मांडली जाते, हे स्पष्ट करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी नरेंद्र लांजेवारांना एक मुलाखत दिली. ही मुलाखत विदर्भ राज्य संकल्पना नावाच्या पुस्तिकेतून प्रकाशित केली गेली (विसा बुक्स, veesabooks@gmail.com, रु.50/-).
सुरुवातीला एका प्रस्तावनेतून लेखकद्वय विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवाची तोंडओळख करून देतात. हे आवश्यक आहे, कारण “महाराष्ट्रालाच इतिहास आहे तर इतर प्रांतांना केवळ भूगोल आहे” असे गर्वाने सांगणाऱ्यांनाही बहुधा शिवाजीच्या आधीचा इतिहास सुचलेला नसतो.
विकीलीक्स : धोकादायक पण सुंदर
28 नोव्हेंबर 2010 रोजी जगभरातल्या अमेरिकी दूतावासांच्या अडीच लाख केबल्समधली गोपनीय माहिती प्रसारमाध्यमांतर्फे जगासमोर उघड होऊ लागली. अनेकांना ‘विकीलीक्स’च्या अस्तित्वाचा तेव्हा शोध लागला, पण विकीलीक्सचा सर्वेसर्वा असणाऱ्या ज्यूलिअन असांज याने 2006 पासून विकीलीक्समार्फत विविध प्रकारची गोपनीय माहिती उघड केलेली आहे. पाश्चात्त्य देशांनी, विशेषतः अमेरिकेने त्याची वेळोवेळी दखलही घेतलेली आहे. आताच्या परिस्थितीत पूर्वीपेक्षा एक फरक मात्र दिसतो आहे : असांजला गौप्यस्फोट करता येऊ नये यासाठी अनेकांनी आता कंबर कसलेली आहे. असांजला आणि त्याच्या विकीलीक्सला जगभरात मिळालेली प्रसिद्धी आणि त्यांना संपवण्याचे होणारे प्रयत्न, यांमुळे या सर्व प्रकाराविषयी विविध मते आणि विचार मांडण्याची अहमहमिका लागलेली आज सर्वत्र दिसते आहे.