विषय «इतर»

मराठी, तरीही अभिजात!

खरे तर असा नियमच हवा की प्रत्येक मराठी कवीने आयुष्यातून एकदा तरी महाराष्ट्र-गीत लिहायलाच हवे. म्हणजे शेलीच्या म्हणण्याप्रमाणे कवी – जर का कायदेमंडळाचे अनभिषिक्त. सभासद असतील किंवा ज्ञानेश्वरांच्या म्हणण्याप्रमाणे ते जर का ‘शब्दसृष्टीचे ईश्वर’ असतील तर आपापल्या काळाच्या इतिहासातली एक नोंद म्हणून तरी का होईना पण प्रत्येक कवीने महाराष्ट्र-गीत लिहायलाच हवे. आधीच्या कवींनी तसा पायंडा पाडलाच होता नि गोविंदाग्रजांपर्यंत तो पाळला पण जात होता. पुढे मात्र ही परंपरा तुटलेली दिसते नि त्यामुळे मराठी लोक आपल्या देशाला, भाषेला, संस्कृतीला काय समजतात ते कळायची आपल्याला फारशी सोयच राहिलेली नाही.

पुढे वाचा

मराठीचा विकास – दशा आणि दिशा

मराठी भाषेसंबंधी सध्या खूप चिंता व्यक्त केली जात आहे, परंतु त्यासाठी आवश्यक तें चिंतन मात्र केले जात नाही ही वस्तुस्थिति आहे. 20 वें शतक संपल्यानंतर जागतिकीकरणाची जी लाट आली तीमध्ये सर्वच भारतीय भाषा पाचोळ्यासारख्या उडून जाताहेत की काय अशी भीति भाषाप्रेमीच्या मनात आहे आणि ती रास्त व सार्थ आहे. तथापि, मराठीच्या संदर्भात तरी या दुरवस्थेची बीजें फार पूर्वीच पेरली गेली आहेत.
1960 सालापर्यंत मराठी भाषेचा प्रवास.निर्विघ्नपणे व अप्रतिहतपणे चालला होता. 1960 सालीं स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला.

पुढे वाचा

आजचा सुधारक ने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना ह्या राजकीय पक्षांना पाठवलेली प्रश्नावली

1. महाराष्ट्रराज्यनिर्मितीच्या वेळी संपूर्ण मराठी जनतेने पाहिलेले संपन्न, समर्थ व कष्टकऱ्यांच्या राज्याचे स्वप्न साकार का होऊ शकले नाही? 2. महाराष्ट्रराज्यनिर्मितीच्या 51 वर्षांनंतरही त्यात मराठीपण कुठे दिसत नही, उलट मराठी भाषा दीनवाणी झाल्याचेच चित्र दिसते, ह्याला जबाबदार कोण? सरकारने जबाबदारी टाकली असे मानले, तरी सर्व राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे व मराठी माणूस यांनी आपली जबाबदारी पार पाडली असे आपल्याला वाटते का?
3. आपल्या पक्षाने मराठी अस्मितेचे राजकारण केले. पण मराठी माणसासाठी काहीएक केले नाही असा आक्षेप घेण्यात येतो, याविषयी आपले काय म्हणणे आहे?

पुढे वाचा

मराठीकारण : एक सांस्कृतिक पुनरुत्थान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली ही घटना मी घरच्या दूरदर्शन संचावर पाहिली. त्या दिवशी मी पक्षात नव्हतो. मात्र त्यानंतर काही दिवसांनी मी पक्षाचा सर्वसाधारण सभासद झालो. जवळ जवळ तीन दशके संपूर्णपणे बिगर राजकीय भूमिका घेऊन काम केल्यानंतरही मला एखाद्या राजकीय पक्षाशी जोडून घ्यावे असे वाटले, ही माझ्या व्यक्तिगत आयुष्यातली एक महत्त्वाची आणि आयुष्याला कलाटणी देणारी घटना आहे असे मी मानतो.
माझे व्यक्तिगत सोडा, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापनादेखील आत्ताच्या महाराष्ट्राच्या आयुष्यातली एक महत्त्वाची आणि राज्याच्या राजकारण, समाजकारणाला कलाटणी देणारी घटना आहे असे माझे मत आहे.

पुढे वाचा

मराठी भाषेचे ‘अर्थ’कारण आणि राजकारण

मानवी समाज म्हटला म्हणजे नीतिनियम आले. पण माणसाला नियम, नीती पाळणे मोठे संकट वाटते. त्याला स्वैर वागणे, स्वातंत्र्य उपभोगणे आवडते. पण माझ्या स्वैर वागण्यामुळे इतरांना उपद्रव होतो याचे भान नसते. तरीपण नीतिनियमांच्या बंधनात राहाण्याचे सामाजिक भान बऱ्याच लोकांना असते, हेही खरे आहे. यांच्यामुळेच सामाजिक स्वास्थ्य टिकून राहाते.
भाषा व्यवहाराबाबतही असेच आहे. भाषाविषयक नियमांच्या कामात मला अडकून राहायचे नाही, असे अनेकांना वाटते. विशिष्ट समाज विशिष्ट भाषासूत्रात बांधलेला असतो. ज्ञानभाषा, प्रमाणभाषा, बोलीभाषा, वाङ्मयाची भाषा. अर्थकारणाची भाषा-प्रशासकीय भाषा, राष्ट्रभाषा, अशी अनेक अंगे भाषेला असतात.

पुढे वाचा

आपल्या भाषा पुरेश्या विकसित आणि समर्थ आहेत

कित्येक लोकांच्या मनात असा भ्रम आहे की आपल्या भाषा पुरेश्या समर्थ नाहीत आणि आजच्या जमान्यात सर्व व्यवहार आपल्या भाषेत चालू शकणार नाहीत. हा भ्रम पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. हे मी आपल्या भाषेच्या अभिमानामुळे केवळ सांगत नाही; परंतु हीच खरोखर वस्तुस्थिती आहे.
खरे पाहता आपल्या भाषा खूपच विकसित भाषा आहेत. शेकडो वर्षांपासून आपल्या सर्व भाषांचा विकास होत आला आहे. आजपर्यंत त्यांचा खूपच विकास झाला आहे व पुढेही तो होणार आहे. पाहा, कन्नड भाषेत एक हजार वर्षांपासून उत्तम साहित्य लिहिले जात आहे. त्यांत ज्ञान काही कमी नाही.

पुढे वाचा

पत्रसंवाद

आशुतोष दिवाण, कोल्हापूर
मी आपला एक नियमित वाचक आहे. आजकाल मला एक अडचण जाणवत आहे ती आपणास कळवतो. माझ्या असे लक्षात आले आहे की बरेचसे लोक (जवळजवळ सगळेच) सामाजिक, राजकीय, वैचारिक चर्चामध्ये वेगवेगळ्या संज्ञा फारच अंदाजे आणि भोंगळ स्वरूपात वापरत असतात. म्हणजे समजा, समतावादी लोक म्हणजे कोण? ते मार्क्सवादी लोकांपासून वेगळे कसे? समाजवादी विचार म्हणजे काय? तो गांधीवादा पासून वेगळा कसा? मार्क्सवादी आणि कम्युनिस्टांत फरक काय? परवा एक डावे विचारवंत दुसऱ्या एका डाव्या विचारवंतांबद्दल कडवट तुच्छतेने “तो मासिस्ट नाही, समाजवादी आहे!”

पुढे वाचा

गुणवत्तापूर्ण शिक्षण व वैज्ञानिक पद्धत

प्रत्येक मूल शिकले पाहिजे व प्रत्येक मुलाला चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण मिळाले पाहिजे ह्याची चर्चा शिक्षण हक्क कायदा येण्याआधीच अनेक वर्षे शिक्षणक्षेत्रात चालू होती. शिक्षण हक्क कायद्यामुळे ह्या चर्चेला एक नवीन चौकट मिळाली. माध्यमांमधून चर्चा होऊ लागल्या, लेख छापून येऊ लागले.

ह्या कायद्याचे अनेक पैलू आहेत. वेगवेगळ्या चर्चा व लेखांमध्ये ह्या पैलूंपैकी वेगवेगळ्या पैलूंवर भर दिला गेला आहे. खाजगी शाळांमध्ये २५% जागा गरिबांच्या मुलांसाठी ठेवणे कितपत परवडू शकेल ह्यावर कोणी भर दिला, पालकांचा सहभाग असलेल्या व्यवस्थापन समितीकडे नक्की कुठले अधिकार असायला हवेत ह्याचा ऊहापोह काही ठिकाणी मुख्यतः झाला.

पुढे वाचा

कॉलरा, भ्रष्टाचार आणि लोकपाल

माणसांमध्ये नैसर्गिकरीत्या, कॉलऱ्याविरुद्ध प्रतिकारशक्ती जवळपास नसतेच. कॉलऱ्याचे जंतू असलेले पाणी, मग ते विहिरीचे असो, तळ्याचे असो किंवा नदीचे असो; प्यायल्यानंतर जवळपास सर्वांनाच कॉलरा होतो. कॉलरा सहसा कधी एकट्या-दुकट्याला होत नाही. त्याची साथच येते. व्यक्तिशः रुग्णांवर उपचार करून कधी कॉलऱ्याची साथ आटोक्यात येत नाही. प्रथम त्यासाठी माणसांनी कॉलरा-जंतुयुक्त पाणी पिणेच बंद करावे लागते व नंतर आसमंतातच काय, तर सर्व जगातच कॉलरायुक्त पाणी कोणालाच प्यायला मिळणार नाही, यासाठी धडपडावे लागते. जगात कोठेही कॉलरादूषित जलस्रोत अस्तित्वात असला तर पुन्हा कॉलऱ्याची साथ येण्याची शक्यता राहतेच!

पुढे वाचा

भ्रष्टाचारविरोधावर राष्ट्रवादाचे सावट

राष्ट्रवादात विधायक क्षमता नसतेच असे नाही. ती निश्चितच असते. पण राष्ट्रवादाचे एक मोठे दुबळेपण असे की तो शत्रुकेंद्री असतो. कोणाला तरी शत्रू मानण्याकडे राष्ट्रवादाचा कल असतो. तो शत्रू कोणीही असू शकतो : दुसरे राष्ट्र, काही व्यक्ती, आपल्यापेक्षा वेगळी संस्कृती असणारे समूह इत्यादी. राष्ट्रवादाच्या अतिशय उदारमतवादी स्वरूपात दारिद्र्य, विषमता हेदेखील शत्रू असू शकतात आणि अश्यावेळी हा राष्ट्रवाद या शत्रूविरुद्ध लढण्यासाठी लोकांच्या ऊर्मी विधायकरीत्या एकत्र करू शकतो. पण बहतेकवेळा राष्ट्रवादाचे स्वरूप इतके विधायक नसते. कोणाला तरी शत्रू मानून आपल्यासमोरील जटिल समस्येचे आपले आकलन बाळबोध ठेवण्याकडे राष्ट्रवादाचा रेटा असतो.

पुढे वाचा