विषय «इतर»

डार्विनचा उत्क्रांतिवाद व मार्क्सवाद’

चार्ल्स डार्विन याचा ऑरिजिन ऑफ स्पीशीज हा ग्रंथ १८५९ साली प्रसिद्ध झाला. जीवनावर सखोल भाष्य करणारी अनेक पुस्तके त्याकाळीही प्रसिद्ध होऊ लागली होती. अजून माध्यमक्रांती झाली नव्हती. शिक्षण सार्वत्रिक वा सामुदायिक झाले नव्हते. युरोपमध्येही साक्षरतेचा प्रसार होऊ लागला असला तरी तो बहुशः अक्षरओळखीपुरताच मर्यादित होता. वाचनसंस्कृती अभिजनवर्गापुरतीच मर्यादित होती. गहन विचारांचा प्रसार व प्रभाव अर्थातच सीमित होता. (सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार १८७० नंतर सुरू झाला. १८५० मध्ये निदान ३०% वर व ४५% वधू इंग्लंडमध्ये लग्नाच्या नोंदणीवहीत सह्या करू शकत नव्हत्या. १८५० पूर्वी ही परिस्थिती अधिकच वाईट होती.

पुढे वाचा

संधिकाळातील घालमेल

इंग्रजी वाययाचा अभ्यास करताना त्या वाययाची आवश्यक पार्श्वभूमी म्हणून इंग्लंडच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाचे काही कालखंड वाचले होते. ते वाचत असताना सगळ्यांत ज्या गोष्टींनी प्रभावित केले ती होती नोंदींची उपलब्धता. तथ्ये, घटना, घटनांवरच्या अनेक टीकाटिप्पणी काळाच्या ओघात नाहीशा होऊनही एवढ्या प्रमाणात शिल्लक राहिल्या ह्याचे आश्चर्य वाटल्याचे आजही आठवते. चर्चच्या रजिस्टरमधील जन्म, मृत्यू, विवाह ह्या अटळपणे होणाऱ्या नोंदी वगळल्या तरी पत्रव्यवहार, डायऱ्या, संस्थांच्या व्यवहारांची रेकॉर्डबुक्स, कवी, नाटककार, कादंबरीकार वगैरेंच्या कलाकृती, वृत्तपत्रांतील बातम्या ह्या सगळ्यांमधून उमटलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा पाहताना फार मजा आली.

१९९६ च्या आसपास पॅन्डिमोनियम नावाचे हम्फ्री जेनिंग्ज ह्या सिनेमा आणि नाटकाशी प्रामुख्याने संबंधित असलेल्या लेखकाचे पुस्तक वाचनात आले.

पुढे वाचा

उत्क्रांतीचा वेग, माणूस आणि चिंपांझी

उत्क्रांतीच्या चर्चेत जरी परिस्थितीशी अनुरूप गुण आणि तो गुण पुरवणारा जीन अशी भाषा भेटत असली, तरी प्रत्यक्षात गुणसंच, जीनसंच हेच परिस्थितीशी अनुरूप असतात किंवा नसतात. परिस्थितीशी अनुरूप असणे, हा एकसंध गुण नाही. त्यात विभाग आणि अवयव असतात. उदा. एखादा वाघ पाहा. त्याचा वेग जास्त असणे हे परिस्थितीशी अनुरूप असते. पण जास्त वेगाने पळता यायला स्नायू आणि हाडांची रचना, रक्ताचे अभिसरण व त्यातील पेशींची ऑक्सिजन वाहण्याची क्षमता, असे बरेच काही आवश्यक असते. तो सारा गुणांचा संच जमल्यानंतरच वेगाने पळणे, जास्त भक्ष्य कमावणे, सुपोषित होणे, सुदृढ होणे, जास्त प्रजा घडवणे वगैरे नैसर्गिक निवडीत टिकणारी साखळी घडून गुणसंच पुढील पिढ्यांमध्ये पसरून वाघ उत्क्रांत होतात.

पुढे वाचा

तीन टिपणे

शॉर्ट में निपटाओ! डार्विनच्या उत्क्रांतीच्या तत्त्वाचे एक त्रोटक वर्णन पाहा एखादी सजीव रचना टिकून राहते, कारण ती तिच्या परिस्थितीशी अनुरूप असते. ती परिस्थितीशी अनुरूप असण्याचा पुरावा हा, की ती टिकून राहते.

वरच्या परिच्छेदातले वर्णन हे वर्तुळाकार युक्तिवादाचे (circular argument) उदाहरण आहे. ते तर्कदुष्ट आहे. मुख्य म्हणजे वेगवेगळ्या जीवजाती कशा घडल्या यावर ते काहीही प्रकाश टाकत नाही. पण थोडक्यात उत्क्रांती म्हणजे अशा प्रस्तावनेसकट ते बरेचदा पुढे केले जाते. कार्ल पॉपर हा विज्ञानामागचे तत्त्वज्ञान तपासणारा खंदा तत्त्वज्ञही एका यासारख्या युक्तिवादाने चकून म्हणाला, की डार्विनचे नैसर्गिक निवडीचे तत्त्व हा एक आधिभौतिक संशोधन प्रकल्प (a metaphysical research program) आहे.

पुढे वाचा

उत्क्रांतिवाद, जाणीव आणि ब्रह्म 

प्रथम काही गोष्टी स्पष्ट करणे योग्य ठरेल. 

1. उत्क्रांतिवाद आणि ब्रह्माबाबतचा विचार (आणि अनुभव?) या दोहोंतही मी तज्ज्ञ नाही. 

2. मी उत्क्रांतिवाद मानतो, किंबहुना सर्वच आधुनिक विज्ञाने मानतो. 

3. एका वेगळ्या पातळीवर मी अद्वैत तत्त्वज्ञानही मानतो. हे मानणे श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांना अनुसरून आहे. म्हणजे त्यात सगुण ब्रह्माला व ईश्वरालाही स्थान आहे. अनेक मार्गांनी आपल्याला ब्रह्माचा व ईश्वराचा साक्षात् अनुभव घेता येतो. 

4. अद्वैताचे हे रूप आणि उत्क्रांतिवाद यांचा परस्परसंबंध हाच खरा या लेखाचा विषय असायला हवा. परंतु हे विवेचन एका लेखात होणार नाही व मी ते करू शकणार नाही.. 

पुढे वाचा

“धक्कातत्त्व”: पुस्तक-परिचय

एखाद्या राजवटीत जाणता अजाणता झालेल्या जुलमांसाठी व अन्यायांसाठी त्या राजवटीमागच्या विचारधारेला जबाबदार धरणे योग्य की अयोग्य? बरे, सर्वच राजवटी, त्यांमागच्या विचारधारा, वगैरेंची आर्थिक अंगे महत्त्वाची असतात. कौटिल्याच्या राज्य कसे चालवावे याबाबतच्या ग्रंथाचे नाव अर्थशास्त्र असे आहे. अॅडम स्मिथच्या पुस्तकाचे नाव द वेल्थ ऑफ नेशन्स आहे. मार्क्सच्या पुस्तकाचे नाव भांडवल असे आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या नावात पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे. सगळीकडे जाणवते हे, की राजवटी आणि त्यांच्या अर्थव्यवहाराच्या नीती, यांना सुटे करणे शक्य नाही.

पण राजवटींच्या आर्थिक-राजकीय विचारधारा आणि राजवटींमधले अन्याय यांची सांगड घालताना माणसे भेदभाव करतात.

पुढे वाचा

‘मी’ आणि ‘माझे

विवेकी स्वार्थ हा कार्लचा धर्म आहे. तो मुक्त बाजारपेठेच्या वेदीवर पूजा करतो. फ्रॉईड जसे सर्व काही सुरत (Sex) आहे, असे मानायचा, तसे कार्ल सर्व सामाजिक व्यवहार, मग ते कितीही व्यामिश्र असोत, सोडवायला त्यांवर किंमतीचे लेबल लावतो, नागरी गृहसमस्या, शिक्षण. स्पर्धा आणि नफ्याची आशाच सर्व प्रश्न सोडवू शकते. मोठी थिअरी आहे, ही. सर्वांना प्रवाहातून त्यांचे त्यांचे बादलीभर पाणी घेण्यासाठी झगडू द्या, आणि त्या पाण्याचा हवा तो वापर करू द्या. काहीजण त्या पाण्यापासून वाफ बनवतील, काही पाणी पितील, काही आंघोळ करतील. उद्योजकता फोफावेल आणि लोक सुखी होतील.

पुढे वाचा

ई!

२६ फेब्रुवारी ‘०९ च्या लोकसत्ता मध्ये प्रशांत मोरे यांचा मराठी मासिकांची ग्लोबल स्पेस! हा लेख आहे. त्याचा मुख्य भाग असा.
निरनिराळी प्रसारमाध्यमे वरकरणी एकमेकांना मारक ठरत असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात ती परस्परपूरक असतात. माध्यमांचे हे “एकमेका साह्य करू’ धोरण सध्याच्या बदलत्या काळात काहीशा मागे पडलेल्या मराठी भाषेतील मासिक स्वरूपात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांना अनुकूल ठरल्याचे दिसत आहे. पुणेस्थित साची वेबनेट प्रा. लि. या कंपनीने ‘मायईमॅगझिन्स डॉट कॉम’ नावाचे संकेतस्थळ इंटरनेटच्या महाजालात मराठी मासिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यानिमित्ताने माध्यमांच्या कोलाहलात कसेबसे तग धरून राहिलेल्या मराठी मासिकांना चक्क ग्लोबल स्पेस मिळाली आहे.

पुढे वाचा

एक क्रान्तीः दोन वाद (भाग ५)

[एक क्रान्तीः दोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. दुसऱ्या भागात आपण इंग्लंडच्या लोकसंख्येवर व कायद्यांवर झालेले परिणाम तपासले. सोबतच आदिम समाजवादी विचार, मार्क्सचे विचार व अमेरिकेतील व्यवस्थापित भांडवलवाद तपासले. तिसऱ्या भागात आपण क्यूबा व स्वीडन या दोन देशांमधील समाजवादाच्या आवृत्त्या तपासल्या. गंमत म्हणजे स्वीडन हे चांगला समाजवाद व चांगला भांडवलवाद या दोन्हींचे उदाहरण मानले जाते! यानंतर आपण काही देशांचा इतिहास तपासून पुढे पुनर्बाजारीकरणाचे प्रयत्न व त्यानंतरचे प्रश्न पाहिले. आपण जवळजवळ आजपर्यंत आलो आहोत !

पुढे वाचा

पवित्रतेची बदलती व्याख्या

प्रभाकर नानावटी नवीन संस्कृती
आर्थिक व्यवहारांचे व माहिती-संवाद तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकीकरण होत असलेल्या या कालखंडात सर्वस्वी वेगळी वाटणारी संस्कृती मूळ धरू पाहत आहे. ही नवीन संस्कृती मानवी हिताची असेल किंवा नसेलही. आता अस्तित्वात असलेल्या संस्कृतीच्या उलथापालथींची अनेक कारणे असू शकतील. पृथ्वीतलावरील प्रत्येकाला हवामानबदलाचा फटका बसत आहे. आपल्यातील सर्वांना पेट्रोलियम पदार्थ संपून जाण्याच्या भीतीने त्रस्त केले आहे. ऊर्जास्रोतांची कमतरता/अभाव या भीतीमुळे आपल्या सर्वांनाच आर्थिक अरिष्टांना सामोरे जावे लागेल की काय अशी धास्ती वाटत आहे. हीच धास्ती पाण्यासाठी, अन्नासाठी, ऊर्जास्रोतांसाठी ठिकठिकाणी युद्ध पेटवत आहे.

पुढे वाचा