विषय «इतर»

परमसखा मृत्यूः किती आळवावा…

“तुला अगदी शंभरावर पाच वर्ष आयुष्य!” मैत्रिणींच्या संमेलनात पोचायला मला थोडा उशीर झाला काय अन् सगळ्यांनी हे असे उस्फूर्त स्वागत केले माझे. ऐकले अन् अंगावर सरसरून काटा आला. मनात म्हटले, माणसाची ‘अधिकाची भूक कधी संपणारच नाही आहे का? पूर्वी नाव काढताच हजर होणाऱ्याला ‘शंभर वर्षे’ आयुष्य बहाल केले जायचे, आता ‘शंभरावर पाच’ ! साहजिकच चर्चा या ‘शंभरावर पाच’ आणि त्यावरून अंगावर उठणारा काटा अशीच सुरू राहिली.
नुकतीच कोणीतरी वयाची ११७ वर्षे पूर्ण केलेल्या रांगड्या शेतकयाची बातमी वाचली होती. त्यावरून आपल्या पुराणकथांमधल्या सात चिरंजीवांची आठवण झाली.

पुढे वाचा

आधुनिक युगात जाहिरातीचे महत्त्व

मात लक्षणीय सखा पहिल्या वृता विविध संवाद
आज जाहिरात हा प्रकार आपल्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. दिवसाचे चोवीस तास आणि वर्षांचे तीनशे पासष्ट दिवस विविध माध्यमाद्वारे ग्राहकांवर जाहिरातीचा सातत्याने भडिमार होत असतो. जाहिरातीतून माहिती आणि ज्ञानप्रसारणाचे काम उत्तम रीतीने होत असल्याने आधुनिक काळात जाहिरातीला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. व्यापार आणि उद्योग-जगतात जाहिरातीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अर्थात वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात जाहिरात ही अपरिहार्य बाब बनून राहिली आहे .
भारतीय संस्कृतीत चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचा अभ्यास करण्याची प्राचीन परंपरा आहे.

पुढे वाचा

परंपराच नव्हती

कम्युनिस्टांचे दुय्यम-तिय्यम नेते गिरणीच्या गेटावर पिंजारलेल्या केसांनी ‘मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटचे भडवे’ यांना शिव्या देत; पण भांडवलशाहीबद्दल बोलत नसत. धर्म ही अफूची गोळी आहे असे सांगणाऱ्या कम्युनिझमचे हे सेनापती गिरणीत सत्यनारायणाला परवानगी दिली नाही म्हणून एक दिवसाचा संप करीत. कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली कामगारांना बोनस मिळाला; पण बोनस म्हणजे काय आणि त्याच्यासाठी का भांडायचे हे कधी कळले नाही. पगाराच्या वर पैसे मिळाले म्हणून बिचारे खुष झाले. इंदिरा गांधीच्या कारकीर्दीत ८.३३ टक्के बोनस झाला तेव्हा हात स्वर्गाला लागल्यासारखे वाटले.
नेतृत्वाच्या सर्वांत वरच्या थराच्याखाली अंतिम उद्दिष्टांबाबत जे अज्ञान होते ते पुढे कामगारांना नडले.

पुढे वाचा

आरक्षणाला एक पर्यायःएलीट शिक्षणसंस्थांसाठी

आरक्षणाच्या धोरणावरील महत्त्वाचा आक्षेप म्हणजे त्यामुळे शिक्षण व रोजगारात शंकास्पद गुणवत्तेच्या व्यक्तींना संधी मिळतात, तर खात्रीलायक गुणवत्तेच्या व्यक्तींना त्या नाकारल्या जातात. याने समाजव्यवहारातील गुणवत्ता ढासळते. उच्चतम दर्ध्याच्या शिक्षणसंस्थांमध्ये, एलीट (elite) संस्थांमध्ये हा प्रश्न सर्वांत तीव्र मानला जातो, कारण या संस्था गुणवत्तेतला क्रीमी लेअर निवडून त्यातील व्यक्तींना समाजव्यवहारात महत्त्वाचे स्थान देत असतात. २००७ साली जेव्हा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खखढ, खखच या संस्थांमध्ये प्रवेशात आरक्षण देण्याची घोषणा झाली तेव्हा हा प्रश्न नव्याने चर्चेत आला.
सतीश देशपांडे (दिल्ली विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक) व योगेंद्र यादव (दिल्लीच्या सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज मध्ये ज्येष्ठ संशोधक) यांनी या प्रश्नावर एक लेख लिहिला, तो २२ व २३ मे २००७ च्या द हिंदू मध्ये प्रकाशित झाला.

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्था

स्वयंसेवा या संकल्पनेतील ‘स्वयं’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे; हा ‘स्वयं’ या क्षेत्रातील ऊर्मी, स्फूर्ती, प्रेरणा व जोश यांचा स्रोत आहे. खाजगी क्षेत्रातील ‘प्रेरणा’ व सार्वजनिक क्षेत्रातील ‘सेवा’ यांचा संयोग जुळवते ती स्वयंसेवा. कालमानानुसार, सेवेच्या स्वरूपात अनेक बदल झाले आहेत. परंतु सध्या ‘स्वयं’चे ही रूप झपाट्याने बदलत आहे हे निश्चित. या बदलांचे आकलन मात्र विविध पातळ्यांवरून होऊ शकते.
सर्वसाधारण मीमांसा स्वयंसेवी संस्थाना त्यांच्याच प्रतिमानांनी आजमावते. या कार्याला एक स्वतंत्र विश्व मानते. साहजिकच या दृष्टिकोनातून केलेल्या चिकित्सेला दिसतात त्या या ‘शुद्ध’ क्षेत्रात शिरलेल्या विकृती.

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्थाः सद्यःस्थिती आणि आह्वाने

राजकीय पक्षसंघटनाबाह्य स्वयंसेवी संस्थांची गरज पूर्वीही होती व आजही आहे. नव्याने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रबांधणीचे व उभारणीचे महाकाय काम होते. हे काम शासनसंस्थेच्या आवाक्याबाहेरचे होते. ते यंत्रणेच्या आवाक्याबाहेरचे होते तसेच शासनाच्या आर्थिक क्षमतेच्याही आवाक्याबाहेरचे होते. १९५०-५१ साली राष्ट्रीय उत्पन्न रु.९८९३ कोटी होते ते २००१-०२ साली २२.८३ लाख कोटीवर गेले आहे. १९९३-९४ च्या किंमतीनुसार १९५०-५१ चे राष्ट्रीय उत्पन्न रु. १.४७ लाख कोटी होते जे २००१ ०२ साली १३.७० लाख कोटीवर गेले आहे. म्हणजे प्रचलित राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त १० टक्के एवढेच उत्पन्न १९५०-५१ साली होते.

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्थाः काही निरीक्षणे, काही अनुमाने

गेली काही वर्षे मी स्वयंसेवी संस्थांना जवळून पाहतो आहे. त्यांच्यासोबत काम करतो आहे. त्यांच्यासोबत काम करत असताना काही गोष्टी पाहण्यात आल्या, काही कानावर पडत गेल्या, काही वाचनात आल्या. अशा कामाच्या जवळ जाण्यापूर्वी स्वयंसेवी संस्थांबद्दल मराठी बुद्धिजीवींमध्ये कोणते प्रवाद आहेत ; या संस्थांची जनमानसात, विचारवंतांत, कोणती प्रतिमा आहे, याची मला सुतराम कल्पना नव्हती. किंबहुना, मेधा पाटकर, सुरेखा दळवी, आदींची कामे जवळून पाहिल्यानंतरही ‘एनजीओ’ ही संज्ञा मला माहीत झालेली नव्हती. म्हणजे, अगोदर तपशील माझ्यासमोर आले; नंतर इतिहास, ऐतिहासिक प्रवाह माहीत झाले आणि त्याहीनंतर फॉरिन फंडिंग व त्याला जोडून येणारे प्रवाद, आक्षेप, वगैरे कळले.

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्था: एक भांडवली षडयंत्र विलास सोनावणे संकलन:

स्वयंसेवी संस्थांचा विचार करताना त्यांच्या चांगल्या बाजू कोणत्या व वाईट बाजू कोणत्या किंवा त्यावरचे आक्षेप काय आहेत असा विचार करून चालणार नाही. त्याऐवजी प्रस्थापित व्यवस्था मान्य आहे की अमान्य, यासंदर्भात याचा विचार करावा लागेल. कारण स्वयंसेवी संस्था चांगल्या की वाईट हा प्रश्न ज्यावेळी आपण करतो, तेव्हा ही व्यवस्था हवी की नको हा प्रश्न बाजूला पडतो. त्यामुळे ही व्यवस्था मान्य केली तर त्यामध्ये स्वयंसेवी संस्थांचे स्थान काय असेल व जर व्यवस्था अमान्य केली तर त्यामध्ये स्वयंसेवी संस्थांचे स्थान काय असेल असा विचार केला पाहिजे.

पुढे वाचा

स्वयंसेवी संस्थाः काही विचार

गेली तीस वर्षे मी स्वयंसेवी क्षेत्रात काढली, त्यातल्या शेवटच्या पाच वर्षांत फार उद्विग्नता वाट्याला आली आणि ‘अर्थ काय स्वयंसेवी संस्थांचा ह्या विश्वचक्रीं?’ असे वाटू लागले.
संपूर्णपणे पुन्हा पहिल्यापासून स्वच्छ, साधा आणि मोकळा विचार करावा असे जाणवू लागले. तसा विचार सुरू केला पण अजूनही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे ‘स्वयंसेवी संस्था : सद्यःस्थिती आणि आह्वाने’ ह्यावर काही लिहिण्याइतपत आपला विचार पूर्ण झालेला आहे, असे अगदी खरोखरच वाटत नाही. दिवसेंदिवस मी जसा जसा विचार करतो आहे आणि अनुभव करतो आहे, तेव्हा वाटते, काय ह्या स्वयंसेवी क्षेत्रांनी स्वतःची वाट लावून घेतली.

पुढे वाचा

जागतिकीकरणाच्या युगात ‘स्वयंसेवी’: संस्था आणि चळवळ

‘स्वयंसेवी क्षेत्र अथवा संस्था ही “एकजिनसी” बाब नाही’, म्हणजे, सर्व स्वयंसेवी संस्थांना ‘सब घोडे बारा टक्के’ असे एका मापाने मोजू नये, अथवा त्यांची विभागणी ‘चांगल्या’ व ‘वाईट’ अशी केली पाहिजे अशा बाळबोध अर्थाने अथवा सद्भावनेने आलेले हे वाक्य नाही. किंवा, यात असेही गृहीत नाही की मुळात सद्भावनेने प्रेरित असलेल्या या क्षेत्रात आता काही ‘विकृती’ शिरल्याने नवे भेद तयार झाले आहेत!
तर मुद्दा असा, की ‘स्वयंसेवी’ या पाटीखाली संस्थात्मक/संघटनात्मक अर्थी अनेक प्रकार येतात, ते वेगवेगळ्या भूमिका अदा करतात, त्यांचे कार्य व स्वरूप यांतही फरक आहेत.

पुढे वाचा