विषय «इतर»

विज्ञानाने श्रद्धेशी बोलावे का?

क्राऊसःतुम्ही आणि मी दोघेही या विश्वाबद्दलच्या आपापल्या वैज्ञानिक आकलनासंबंधी आणि लोकांना विज्ञानात रस यावा या हेतूने बरेच बोलत-लिहीत असतो. यामुळे वैज्ञानिक धर्माबद्दल मते व्यक्त करताना त्यांचे उद्दिष्ट काय असते, हा प्रश्न विचारणे योग्य ठरते. कशाला जास्त महत्त्व द्यावे याबद्दल माझा जरा गोंधळ आहे, विज्ञान आणि धर्म यांच्यातला फरक सांगताना विज्ञानाबद्दल काही शिकवावे, की धर्माचे स्थान ठरवून द्यावे, ह्यांमध्ये. बहुधा माझा भर विज्ञान समजावून देण्यावर असतो, तर तुमचा धर्माची जागा दाखवून देण्यावर.
मी असे का म्हणतो ते सांगतो. लोकांना काही शिकवायचे असेल तर त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या भूमिका, धारणा समजून घ्याव्या लागतात, आणि मगच त्यांना आपल्या भूमिकेकडे आकर्षित करून घेता येते.

पुढे वाचा

झापडबंद ‘विज्ञान’

डॉ. जॉन स्नो हा लंडनमध्ये काम करणारा वैद्य आणि पॅथॉलजिस्ट (विकारवैज्ञानिक) होता. कॉलरा (पटकी, हैजा) हा रोग पिण्याच्या पाण्यातील जंतुदोषातून पसरतो, हे त्याने दाखवून दिले. मध्य लंडनच्या नकाशावर त्याने रोगाचे प्रभाग व मारकता जास्त असलेली क्षेत्रे रेखली, आणि त्यातून निष्कर्ष निघाला की ब्रॉड स्ट्रीट पंप हा भूमिगत पाणी उपसणारा पंप रोगाचे मूळ होता. आपण सुचवत असलेले पाणी व रोग यांच्या संबंधाबाबतचे तत्त्व सुस्थापित करण्यासाठी स्नोने प्रत्येक आणि प्रत्येक विसंगत उदाहरण तपासून त्याचे स्पष्टीकरण शोधले. दूरवरचे रोगी, रोगाच्या प्रसारातले चढउतार, सारे मूळ तत्त्वाच्या मदतीने स्पष्ट करत आकडेवारीच्या गोंधळातून व्यवस्थित चित्र रेखले.

पुढे वाचा

सेक्युलॅरिझमचा भारतीय तोंडवळा: भाग-३

उद्देशपत्रिकेतील एक अंश पश्चात्बुद्धी

युरोपातील सामाजिक आणि सांस्कृतिक संचित आणि ऐतिहासिक घडामोडी ह्यांच्यामधून सेक्युलॅरिझम ह्या संज्ञेने तेथे जसा आपला अर्थ उचलला तसाच भारतातही, त्याच कारणांनी ह्या संज्ञेला स्वतःचा एक खास स्वदेशी स्वाद लाभला आहे. असा की जो कोणत्याही व्याख्येत मावूच नये. घटनेच्या शब्दसंहितेच्या चौकटीत बंदिस्त होताना ती कल्पना आपले चापल्य गमावून बसली असती. कधी कधी शब्द असे नेमकेपणा नसलेले, निराकार असल्यागत मोकळे सोडणे बरे असते. त्यांच्यातला लवचीकपणा अनुभवांनी, स्थळा-काळाच्या संदर्भांनी आपोआप आकार घेऊ लागते. ‘सेक्युलर’ हा शब्द बेचाळिसाव्या दुरुस्तीद्वारा घटनेच्या उद्देशपत्रिकेत प्रविष्ट होऊन ना तिची संकल्पनात्मक अस्मिता (Conceptual Concept) वाढली, की कमी झाली!

पुढे वाचा

सॉलिप्सिझममधले धोके

[आधुनिकोत्तरवादी विचारांचे दुष्परिणाम कधीकधी आत्यंतिक व्यक्तिनिष्ठेच्या रूपात असतात. त्यामुळे आत्यंतिक व्यक्तिनिष्ठा धोकादायक का, हे दाखवायचा हा प्रयत्न तुला भीती ही कसली वाटते रे?: (चित्रपट: नई देहली)
“तुला जर भविष्याचं चित्र हवं असेल, तर एका मानवी चेहेऱ्याला चिरडणारा बटाचा पाय नजरेपढे आण नेहेमीसाठी.”
ओब्रायन विन्स्टन काहीतरी बोलेल अशा अपेक्षेने थांबला. विन्स्टन स्ट्रेचरमध्ये शिरायचा प्रयत्न करत असल्यासारखा आक्रसला. काही बोलू शकला नाही. हृदय थिजल्यासारखे झाले होते, त्याचे. ओब्रायन पुढे बोलायला लागला. “आणि लक्षात ठेव नेहेमीसाठी. बुटाला चिरडायला नेहेमीच चेहेरा असेल. पाखंडी, समाजाचा शत्रू नेहेमीच असेल आणि त्याला वारंवार लाचार करून हरवलं जाईल.”

पुढे वाचा

‘मर्द’, अमानुष हिंसेचे पोषण

माझ्या येऊ घातलेल्या पुस्तकाचा गाभा असा संस्कृतींमधला खरा संघर्ष आजच्या सर्व लोकशाह्यांमधला अंतर्गत संघर्ष आहे. आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांचा आदर करत त्यांच्यासोबत राहायला तयार असलेले लोक आणि झडझडून वेगळ्या लोकांवर प्रभुत्व गाजवू इच्छिणारे लोक, यांच्यातला संघर्ष. किंवा गांधींच्या भाषेत मी असे म्हणेन की इतरांबाबतची आस्था आणि सहानुभूतीची भावना, आणि इतरांवर सत्ता गाजवायची इच्छा, यांच्यातला हा व्यक्तींच्या आत्म्यातला संघर्ष आहे. मी २००२ साली पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हा मला वाटत होते की भारतातली लोकशाही कोलमडण्याची ही कटुकठोर कहाणी असेल. पण ती लवचीकपणाची कहाणी झाली.

पुढे वाचा

विश्वरूपदर्शन आणि ईश्वराचा शोध

तुमचा सगळा कटाक्ष आमच्यावरच का?
आज गीतेतील नीतिमीमांसेची मीमांसा करण्याचा विचार आहे. पण त्याला आरंभ करण्यापूर्वी एका अक्षेपाला उत्तर द्यायला हवे. हा आक्षेप आमच्या वाचकांपैकी अनेकांनी प्रत्यक्ष बोलून दाखविला आहे, आणि त्याहून कितीतरी अधिक वाचकांच्या मनात तो वारंवार उद्भवत असावा यात संशय नाही. हा आक्षेप असा आहे : ‘तुमचा सारा रोख आम्हा हिंदूंवरच का? आमच्यापेक्षा अधिक, निदान आमच्याइतकेच अंधश्रद्ध, शब्दप्रामाण्यवादी, आणि तुम्ही दाखविता त्या सर्व दोषांनी युक्त असे अनेक धर्म किंबहुना सगळेच धर्म आहेत. असे असताना तुम्ही इतर कोणत्याही धर्माचे नावही उच्चारीत नाही, आणि आमच्या धर्माला मात्र तुम्ही निर्दयपणे झोडपत सुटला आहात याला काय म्हणावे ?’

पुढे वाचा

आंबटशौकिनांसाठी ?

ही एक सत्यघटना आहे. स्थळ: पुण्यातल्या एका स्त्री-रोगतज्ज्ञाचा दवाखाना. वेळ: संध्याकाळची
… तो (आणि ती) दोघंही कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती… ओळखीतून सहवास.. प्रेम या पायऱ्या त्यांनी ओलांडल्या होत्या…. दरम्यान एक भलताच पेच उभा राहिला. आपल्याला दिवस गेले आहेत अशी या मुलीची समजूत झाली… आपला हा जीव संपवणं हाच एकमेव मार्ग असं मानण्यापर्यंत तिची मजल गेली. … डॉ. नी तिला एकच प्रश्न विचारला, “तुझा आणि त्याचा संबंध कधी आला होता?” तिला तो प्रश्न समजला नाही. अधिक फोड करून सांगताच ती तिरीमिरीनं म्हणाली, “हे काय भलतंच विचारणं डॉक्टर ?

पुढे वाचा

सेक्युलॅरिझमचा भारतीय तोंडवळा: भाग-२

निधार्मिकता नाही की नास्तिकता

भारताची राज्यघटना १९ नोव्हेंबर १९४९ रोजी प्रथमतः स्वीकृत करण्यात आली. तिच्या उपोद्घातात (झीशरालश्रश) भारताच्या सेक्युलरपणाचा उल्लेख नाही. सेक्युलर हा शब्द ४२ व्या घटनादुरुस्तीने घातला गेला. ही दुरुस्ती १ सप्टेंबर १९७६ पासून अमलात आली. दुरुस्ती बिलासोबत जेथे उद्दिष्टे आणि कारणे ह्यांचे विधान असते तेथेही हा शब्द समाविष्ट करण्याचे प्रयोजन काय ह्याचा काही खुलासा नाही. किंवा ह्याचे औचित्यसूचक काही निवेदन नाही. सेक्युलर हा शब्द ४२ वी घटनादुरुस्ती लागू होण्यापूर्वी घटनेत फक्त एकदा आला आहे, कलम २५ (२) (र) मध्ये, ते राज्याला आर्थिक वित्तविषयक, राजकीय अथवा धर्मव्यवहारांशी निगडित पण तद्भिन्न जे आचार असतात त्यांविषयी कायदे करण्याचा अधिकार प्रदान करते.

पुढे वाचा

मुलगा की मुलगी ?

‘मला मुलगाच हवा’ या हट्टापायी आपल्या देशात हजारो स्त्रीभ्रूणहत्या होत आहेत. मुलगा हवा यासाठी सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक वा आर्थिक कारणे काहीही असोत, उत्क्रांती व विज्ञान मात्र यासंदर्भात फार वेगळे चित्र उभे करत आहे. मुलीपेक्षा मुलगा त्याच्या आईला फार तापदायक ठरू शकतो. जन्माच्या वेळचे मुलाचे वजन, पुरुषजातीतील टेस्टोस्टेरॉन ग्रंथिस्रावाचा वाढता प्रभाव, वा मुलांमधील जन्मतःच असलेला व्रात्यपणा इत्यादी गोष्टी मुलाला जन्म देणाऱ्या आईच्या जिवावर उठू पाहत असतात. शेफील्ड विद्यापीठात पुनरुत्पादन वर्तणूक या विषयावर संशोधन करत असलेल्या विपी लुम्मा या प्राध्यापिकेच्या मते जन्माला घातलेला प्रत्येक मुलगा सामान्यपणे आईचे आयुष्य चौतीस आठवड्यांनी कमी करत असतो.

पुढे वाचा

धक्का देणारी विधाने

पूर्वीच्या काळी वंशावरून माणसांना कमी दर्जाचे ठरवून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. आजदेखील तसे अजून चालू असेल. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी समता, स्वातंत्र्य व बंधुता यांना मानवी व्यवहाराचे मानदंड म्हणून स्वीकारण्यात आले. कोणताही मानव-समूह समता, स्वातंत्र्य व बंधुता यांना लायक आहे असे सिद्ध करण्यासाठी मग विविध देशांत राहणारे मानवसमूह हे बौद्धिक, वैचारिक व नैतिक क्षमतेच्या बाबतीत समान आहेत असे गृहीत धरण्यात आले. या गृहीत कृत्यालाच पुढे एक प्रकारचे नैतिक वलय प्राप्त झाले. खरे म्हणजे असे गृहीत धरण्याची काही आवश्यकता नव्हती. प्रत्येक माणूस-मग तो कोणत्याही वंशाचा, देशाचा असो, तो केवळ माणूस आहे म्हणूनच समता, स्वातंत्र्य व बंधुता यांना पात्र आहे या विधानाला कोणताही बाह्य आधार देण्याची आवश्यकता नाही.

पुढे वाचा