देव ही एक संकल्पना आहे, धर्म ही एक संकल्पना आहे, असे असेल तर मग ‘देव भेटला’ असे संत का सांगतात ? प्रत्येक धर्माचा देव आहेच. आजकाल ‘देवाचा अवतार’ म्हणवून घेणारे ‘महाराज’ अवतरले आहेत. ‘देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता’ असे म्हणत धार्मिक अनुभव घेणाऱ्या लाखो भक्तांचा हा अनुभव म्हणजे नेमके काय असावे ? ते मानणारे भ्रमात असतात काय?
देव डोक्यात असतो असे समजले जायचे. पण मग मेंदूत त्याचे अस्तित्व सापडावयास हवे. किमान अनुभवांची मेंदूत काही क्रिया होत असेल तर ती दिसावयास हवी.