लोकसभेने भारताकरिता रोजगार हमी योजनेचा कायदा करू घातला व भारतातील सर्व गरजूंना रोजगाराची हमी देण्याचे ठरविले. त्यासाठी मोठीच रक्कम मंजूर झाल्याचे समाधान लाभले. परंतु याच सुमारास सोलापूर जिल्ह्यात ९.१ कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने भारताची हजारो कोटींची रक्कम अशीच उधळली जाण्याची कोणालाही भीती वाटल्याशिवाय राहिली नाही व आज गेल्या तीस वर्षे महाराष्ट्रात चालू असलेल्या रोहयो कडे इतर राज्यांना धडे देण्याची कितपत कुवत आहे याकडे लक्ष वेधले गेले.
महाराष्ट्रात रोहयो १ मे १९७२ सालीच राबविण्याचे ठरले होते. राज्यात जलसिंचन विशेष मर्यादित असल्याने शेतीचा विकास होत नव्हताच.
विषय «इतर»
विवेकवाद-भाग १०ः (प्रथम प्रकाशन मार्च१९९१ अंक १.१२, लेखक : दि. य. देशपांडे)
श्रद्धेचे दोन प्रकार विधानांवरील आणि मूल्यांवरील
‘श्रद्धा’ किंवा ‘विश्वास’ हा शब्द दोन वेगळ्या अर्थांनी वापरण्यात येतो. एका अर्थी श्रद्धा म्हणजे एखादे विधान सत्य आहे असा दृढविश्वास, तर दुसऱ्या अर्थी श्रद्धा म्हणजे एखाद्या मूल्यावरील निष्ठा. ह्या दुसऱ्या अर्थी ‘श्रद्धा’ या शब्दाऐवजी ‘निष्ठा’ हा शब्द वापरणे श्रेयस्कर आहे, कारण तो व्यर्थी नसल्यामुळे त्याच्याविषयी गैरसमज होण्याची भीती नाही. अमुक गोष्ट मूल्य आहे म्हणजे ती स्वार्थ १. वांछनीय आहे अशी दृढनिष्ठा. याच्या उलट पहिल्या प्रकारची श्रद्धा म्हणजे एखादे विधान सत्य आहे अशी पक्की खात्री. या विश्वासाला ‘श्रद्धा’ म्हणण्याचे कारण असे की त्याला पुराव्याचा आधार नसतो.
विवेकवाद-भाग ९(ब): नीतिविचार धर्मविचाराहून निराळा (प्रथम प्रकाशन फेब्रुवारी १९९१ अंक १.११, लेखक : दि. य. देशपांडे)
याच अंकात, अन्यत्र, स्वामी धर्मव्रत यांचे पत्र छापले आहे. नवा सुधारक च्या नोव्हेंबर अंकात मी प्रा. श्याम कुलकर्णी यांच्या पत्राला जे उत्तर दिले त्याच्या संदर्भात स्वामी धर्मव्रत यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की मी एक फार मोठी चूक करतो आहे, आणि केवळ मीच नव्हे, तर सर्वच आंग्लविद्याविभूषित तत्त्वज्ञानी आत्मविचाराच्या बाबतीत ती चूक करतात. आमच्या विवेचनात एक प्रचंड घोटाळा आहे. हा घोटाळा काय आहे, आणि आम्ही काय करीत असलेली चूक कोणती हे समजून घेण्याचा आणि स्वामी धर्मव्रतांच्या आक्षेपांना उत्तर देण्याचा येथे विचार आहे.
एकास एक, एकास दोन
आज प्रत्येक ग्रामीण व्यक्ती स्वतःसोबतच एका शहरी व्यक्तीपुरतेही अन्न पिकवते आणि जगभरात शेतीची कामे मुख्यतः स्त्रिया करतात. जर शहरांमध्ये परसबागांची पद्धत सार्वत्रिक झाली नाही, तर पन्नास वर्षांच्या आत प्रत्येक ग्रामीण व्यक्तीला स्वतःसोबत दोन शहरी माणसांपुरते अन्न पैदा करावे लागेल. शहरे अन्नाची मागणी उत्पन्न करतील आणि नवे तंत्रज्ञान पुरवतील. जर ग्रामीण शेती जास्त सघन झाली तर या मागणी-तंत्रज्ञान जोडीने शेतकरी दारिद्र्यातून बाहेर पडेल श्रीमंत देशांत आज हे झाले आहे. पण जर ‘सघन शेती’ याचा अर्थ फक्त रासायनिक खते आणि तृण-कीटकनाशके असा करून शेतीची उत्पादकता वाढवायचा प्रयत्न झाला, तर पर्यावरणावर प्रचंड ताण येतील.
धर्म आणि विज्ञान
मानवजातीच्या हातून ज्या कृती व विचार घडून आलेले आहेत त्या सर्वांचा संबंध सदोदित खोलवर जाणवणाऱ्या मानवी गरजांचे समाधान करणे व वेदनांचे शमन करणे यांच्याशी निगडित राहिलेला आहे. पारमार्थिक चळवळी व त्यांची वाढ समजून घ्यायची असेल तर ही गोष्ट आपण सतत ध्यानात ठेवली पाहिजे. मानवाचे सर्व कष्ट व सर्जनशीलता यांच्यामागील मूलस्रोत हा मानवी भावना व इच्छा-आकांक्षामध्ये आहे, भले मग कितीही तरल व उच्च स्वरूपात ती सर्जनशीलता आपल्यापुढे प्रकट होवो.
व्यापक अर्थाने धार्मिक विचार व श्रद्धा यांच्याकडे माणसाला नेणाऱ्या या भावना व गरजा कोणत्या आहेत ?
आइनस्टाईन: उत्कट साहसवीर
‘ते आमचे प्राध्यापक आइनस्टाइन’ टॅक्सीचालकाने ममत्वपूर्ण अभिमानाने सांगितले. उर्मटपणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या अमेरिकन टॅक्सीचालकांच्या जातीत हे दुर्मिळच होते. डिसेंबर १९४८ मधील एका मरगळलेल्या दुपारी प्रिन्स्टनमधील पदपथावरून उत्साहाने चालत असेल्या व्यक्तीकडे त्याचा रोख होता. आता पांढरी आणि विरळ झालेली ती सुप्रसिद्ध केसांची आयाळ त्या हवेतही हॅटखाली झाकलेली नव्हती. अंगावर शर्ट-आणि-टायऐवजी खलाशी वापरतात तशी विणलेली जर्सी होती, आणि बूट मोज्यांशिवायच घातलेले होते.
ज्याच्या सिद्धांतांनी चेष्टा आणि टिंगलटवाळीपासून ते परमोच्च स्तुतीपर्यंत सर्वप्रकारच्या प्रतिक्रिया ओढवून घेतल्या होत्या त्या माणसाचे कधीही न विसरण्याजोगे पहिले दर्शन हे असे होते.
वास्तव म्हणजे हेच – चेतापेशींचे व्यवहार
[कॅलिफोर्निया विद्यापीठ (सॅन दिएगो) येथील मेंदू व बोधन (लेसपळींळेप) संशोधन केंद्रा चे संचालक डॉ. व्ही. एस. रामचंद्रन यांची इंडियन एक्सप्रेस चे मुख्य संपादक शेखर गुप्ता यांनी १८ सप्टें. २००५ रोजी एनडीटीव्ही २४ ७ या वाहिनीच्या वॉक द टॉक कार्यक्रमात मुलाखत घेतली. तिचा काही भाग २० सप्टें. ०५ च्या इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रकाशित झाला. त्याचे हे भाषांतर.]
शेखर गुप्ताः मला मज्जाशास्त्राची (neuroscience) काहीच माहिती नाही….
रामचंद्रनः ते नवे आणि झपाट्याने वाढणारे शास्त्र आहे. गेल्या दहापंधरा वर्षांत कल्पना व प्रयोग यांचा त्या क्षेत्रात स्फोटच झाला आहे.
पॉपरचे ‘विश्व-तीन’
विज्ञानाच्या ज्ञान कमावण्याच्या पद्धतीचे पारंपरिक वर्णन पॉपरने बदलले. निरीक्षणे व प्रयोग, त्यातून विगमनाने सामान्य सूत्र ठरवणे, तपासाला योग्य असे “उमेदवार’ तत्त्व मांडणे, ते प्रयोगांनी सिद्ध करायचा प्रयत्न करणे, त्यातून सिद्धता असिद्धता ठरवणे, या प्रक्रियेतून ज्ञान मिळते; अशी विज्ञानाबद्दलची पारंपरिक मांडणी होती. पॉपरने त्याऐवजी सुचवलेल्या शोधपद्धतीची रूपरेषा अशी १) उद्भवलेला प्रश्न २) नव्याने तत्त्वातून सुचवलेले उत्तर ३) नव्या तत्त्वातून निगामी पद्धतीने काढली गेलेली प्रयोगांमधून तपासता येतील अशी उत्तरे किंवा विधाने, ४) निरीक्षणे, प्रयोग वा इतर पद्धतींनी या विधानांचा खरेखोटेपणा तपासणे एका अर्थी हा नवे तत्त्व खोटे पाडायचाच प्रयत्न.
अळीमिळी गुपचिळी
भारतात लोक कामव्यवहाराबद्दल बोलतच नाहीत. पाश्चात्त्य दृष्टिकोनात भारतीय उपखंड हे चित्रविचित्र इंद्रियानुभव घेणाऱ्यांचे आगर भासू शकते. त्या भागाच्या इतिहासात कामसूत्रही आहे, आणि आजचे पॉप स्टार्स ज्याचा उदोउदो करतात ते तांत्रिक व्यवहारही आहेत. भारतीयांना मात्र भारत हा पाश्चात्त्यांच्या लघळपणाविरुद्धच्या आणि चावट साहित्याविरुद्धच्या लढाईतील किल्ल्यासारखा वाटतो. हे बदलते आहे. चित्रपटातली चुंबने आणि कॉस्मॉपॉलिटन सारखी सचित्र मासिके आता भारतातही मान्य झाली आहेत. मध्ये दिल्लीत दोन समलिंगी स्त्रियांचा विवाहही झाला. पण पारंपरिक स्थितिवादी मूल्ये आजही जास्त प्रबळ आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच वर्षी समलिंगी व्यवहारांवरील बंदी अधोरेखित केली, आणि आजही भद्रकुटुंबातील भारतीय स्त्री मिनिस्कर्ट किंवा बिकिनी पेहरत नाही.
अमेरिकन आरक्षण!
भारतीय लोक परदेशांत इतके यशस्वी कसे झाले? विशेषतः अमेरिकन संघराज्यात? इन्फोसिस, विप्रो आणि तसल्यांना येवढे महत्त्व कसे मिळाले ? ‘ग’, गुणवत्तेचा, हा उत्तराचा एक भाग झाला. पण सोबतच तो अनुल्लेखित ‘आ’, आरक्षणाचा, हाही भाग आहे हो आरक्षणाची अमेरिकन आवृत्ती! ऐकताना विचित्र वाटेल, पण अमेरिकेतल्या १९५०-७० या दशकांमधल्या नागरी हक्क चळवळीतच (Civil Rights Movement) भारतीयांच्या यशाची मुळे आहेत.
शतकानुशतके गुलामगिरी आणि पिळवणूक अमेरिकन काळ्यांनी भोगली, भारतातल्या अनुसूचित जातीजमातींसारखेच ते. त्यांनी त्याविरुद्ध लढा दिला, कधी प्राणाचे मोलही दिले. यातून १९६४ चा नागरी हक्क कायदा घडला.