विषय «कृषी-उद्योग»

रानवस्ती

मी अनिल दामले. पांढरपेशा शहरी. जन्म मुंबईतला. पुण्यात वाढलो. शिकलो. पुण्यातील सुप्रसिद्ध प्रभात फिल्म कंपनीच्या दामल्यांचा मी नातू. सिने सृष्टीच्या आणि शहराच्या झगमगाटांत वावरलो. त्याचबरोबर रानोमाळ हिंडायचो. दऱ्याखोऱ्या, गड, किल्ले, वने पाहिली. शेतीवाडीवर राहिलो. झाडझाडोरा, नदी, तळी, ऊन, वारा, पावसाचे शिंतोडे, पक्ष्यांचे बोल. ह्या सगळ्या निसर्गरूपांवर भाळलो. निसर्गसान्निध्यात राहावे, मनसोक्त, मनमुराद आयुष्य जगावे. शहरी चाकोरी रुळलेली वाट सोडून काहीतरी नवलाईचा मार्ग पत्करावा असे वाटत होते. घरच्यांचे पाठबळ होते. शेती करायची ऊर्मी होती, ध्यास होता. १९७६ साली खामगाव तलावाकाठी एक पडीक रान शेलारवाडीच्या ‘हडवळ्यांत’ विकत घेतले.

पुढे वाचा

पेराल ते उगवेल

[कॉलिन टज् आपल्या सो रॉल वुई रीप, (पेंग्विन, २००३) या पुस्तकात अन्न आणि शेतीबद्दलचे दूरदृष्टीचे विश्लेषण करतो. पुस्तकाचे उपशीर्षक आहे, येत्या दहा हजार वर्षांत जन्मणारे सारे जण छान, पोटभर जेवू शकतील; पण प्रत्यक्षात आपली नजीकची पिढीच कशी धोक्यात येऊ शकेल’ पुस्तकाच्या काही भागाचा हा संक्षेप.]

दूरदृष्टीने पाहता . .
माणूस हा एक थोराड आणि खादाड प्राणी आहे, हे आपण विसरलो. ही आपली गेल्या काही हजार वर्षांतली सर्वांत मोठी चूक आहे. पूर्वीचे काही समाज आपल्या परिसराचा नाश करून स्वतःही नष्ट झाले आहेत.

पुढे वाचा

माती व पाणी : निविष्टांचे मूल्यांकन

प्रास्ताविकः
जगाच्या इतिहासात एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे ज्या ज्या प्रदेशात कृषि-उत्पादकता उत्तम होती, त्या ठिकाणी संपन्नता आली. त्याबरोबरच मानवी संस्कृतीचा विकास झाला. माया संस्कृती, मोहिंजोदारो (सिंधु), ईजिप्त, ग्रीस या भूतकाळात मानवी संस्कृती विकसित झाल्या याचे एक कारण म्हणजे तेथे कृषि-उत्पादन उत्तम होते. कृषि-उत्पादनात दोन महत्त्वाचे नैसर्गिक घटक आहेत माती आणि पाणी. त्यांची उपलब्धी, प्रकार, गुणवत्ता, आकारमान यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मातीचा ह्रास म्हणजे संस्कृतीचा विनाश हा धडा आपणास गतइतिहास सांगतो व शिकवतो. पण आपण काय धडे गिरविले आहेत ते पाहू.

पुढे वाचा

अवर्षणप्रवण भागासाठी मेंढपाळ (कुरणी) संस्कृतीला भविष्यात महत्त्व

१. लोकशाहीचे मूल्यमापन करताना कमी जास्त काळाचे तीन टप्पे आढळतात. पहिल्या टप्प्यात नेतृत्व तत्त्वांशी एकनिष्ठ आणि वाहून घेतलेले असते. दुसऱ्या टप्प्यात नेतृत्व संधीसाधू होते आणि त्याच प्रकारच्या नोकरशहांना हाती धरून समाजाची लूटमार चालू करते. अडाणी, अशिक्षित जनतेच्या हे काहीच लक्षात येत नाही. ती आपली मिळालेल्या चारदोन अनुदानाच्या (subsidies) तुकड्यांवरच संतुष्ट असते. हळूहळू समाज सुशिक्षित होतो. लोकशाहीची त्याची समज प्रगल्भ होत जाते आणि नेतृत्वाकडून तो देशहिताची मागणी करू लागतो. व्यापक देशहिताचा विचार करणारे सरकार त्याला हवे असते. सध्याचा काळ दुसऱ्या अवस्थेकडून तिसऱ्या अवस्थेकडे सरकतानाचा दिसतोय.

पुढे वाचा