विषय «जीवनशैली»

कलयुग की दहलीज, अज्ञान का रास्ता

बचपन से ही पढ़ने-सुनने में आता है – “अमुक विषय पर विद्वानों में मतभेद है।” बारंबार कही हुई बात सच लगने लगती है। ऐसा आभास होता है कि विद्वानों का काम अपने और दूसरों के ‘मत’ में ‘भेद’ करना ही होता है! 

फिर जब उम्र चुनाव में भाग लेने लायक हो जाती है, तब पता चलता है कि मत में भेद करना ही पर्याप्त नहीं! पाँचेक साल में जिम्मेदार नागरिक को अपने ‘मत’ का ‘दान’ करना होता है। और अगर अपने काम के लिए किसी तरह का शोध करना हो, तो कुछ ऐसा सिखाया जाता है – “अपना मत (‘ओपिनियन’) नहीं दो!

पुढे वाचा

अन्नसुरक्षा, अन्नस्वराज्य आणि तुटलेली नाती

अन्नसुरक्षेची चर्चा होताना बहुतेक वेळा उत्पादन, उपलब्धता आणि किंमत ह्या तीन मुद्द्यांभोवती विचार फिरताना दिसतो. एखाद्या देशात पुरेसे धान्यउत्पादन होते का, लोकांना अन्न परवडते का, आणि कुपोषणाची पातळी कितपत आहे, ह्या प्रश्नांच्या आधारे अन्नसुरक्षेचे मूल्यमापन केले जाते. ह्या प्रश्नांचे महत्त्व नाकारता येणार नाही; परंतु अन्नसुरक्षेचा विचार केवळ ह्या चौकटीत मर्यादित राहिल्यास काही मूलभूत प्रश्न दुर्लक्षित राहतात. आज जगभरात अन्नधान्य उत्पादनाच्या विक्रमी पातळ्या गाठल्या गेल्या असतानाही मातीच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जाते, शेतकऱ्यांचे अर्थकारण अस्थिर राहते, अन्नातील रासायनिक अवशेषांबाबत प्रश्न उपस्थित होतात आणि ग्राहकांचा त्यांच्या अन्नाच्या उगमाशी असलेला संबंध दिवसेंदिवस कमकुवत होत जातो.

पुढे वाचा

आपणच आपल्या नद्यांचे सर्वात मोठे प्रदूषक आहोत का?

दैनंदिन जीवनातील रसायनांचा अदृश्य प्रवास आणि ‘इको लेबल’ची नव्याने गरज

नदी प्रदूषण म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम कारखान्यांचे सांडपाणी, शहरांतील मैला, प्लास्टिकचा कचरा किंवा धार्मिक विसर्जन ह्यांची चित्रे उभी राहतात. पण, आपण स्वतःकडे कधी बोट दाखवले आहे का?

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण वापरत असलेली टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, डिटर्जंट, सौंदर्यप्रसाधने, स्वच्छता उत्पादने, कीटकनाशके, औषधे, आणि इतर अनेक वस्तूंमधील रसायने अखेरीस कुठे जातात?

मी अनेक वर्षांपूर्वी मांडलेला हा प्रश्न आज अधिक तीव्र झाला आहे. हवामानबदल, वाढते शहरीकरण, औषधांचे अवशेष, मायक्रोप्लास्टिक्स, आणि हजारो कृत्रिम रसायनांच्या वाढत्या वापरामुळे आपल्या नद्यांवरील ताण पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक वाढला आहे.

पुढे वाचा

आमची इयत्ता कोणती?

आपल्याला स्वतंत्र होऊन अठ्ठ्याहत्तर वर्षे होत आहेत. खूप ढोलताशे वाजवून नुकताच आम्ही ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला. पण स्वातंत्र्याचा जमाखर्च मांडून पाहिला तर चित्र फारसे सुखावह नाही, असेच दिसते. देश म्हणून आपल्या उपलब्धींचा आपण उदो-उदो करू शकतो. आर्थिक पातळीवरही बऱ्यापैकी प्रगती दिसते. पण समाज म्हणून मात्र आमची फारशी प्रगती झालेली नाही.

सरंजामशाहीच्या काळात किंवा पारतंत्र्यात आपण प्रजा होतो, आता नागरिक झालो आहोत. मात्र, ह्या बदललेल्या भूमिकेमुळे आमच्यात जो गुणात्मक फरक व्हायला हवा होता, तो झालेला दिसत नाही. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मध्यरात्री युनियन जॅक उतरवून तिरंगा फडकावणे किंवा माऊंटबॅटनच्या हातून सूत्रे काढून नेहरूंच्या हाती येणे, असे नव्हते.

पुढे वाचा

कला, संस्कृती आणि एआयचे डिजिटल भावविश्व

अतार्किक बोलण्यातून किंवा कृतीतून विनोद निर्माण होत असतो. असंबद्ध बोलणे, कृती करणे, हे विनोदनिर्मितीतील प्रमुख तंत्र आहे. आपण दररोजच्या धकाधकीच्या धबडग्यात विनोद निर्माण करून थोडा विसावा शोधत असतो. व्यक्तीला कामाच्या ताणतणावात तेवढाच विरंगुळा आणि त्यातून आनंद मिळत असतो. कला, सांस्कृतिक कार्यक्रमांतून होणारी आनंदनिर्मिती मनाला स्वस्थता आणि शांतता मिळवून देते. ह्याच आनंदाचा, सुखाचा निरंतर शोध पुढे नकळत काही गोष्टी घडवून आणत असतो. आनंद ह्याचा अर्थ नेहमी काहीही विचार न करणे, दु:ख विसरणे होय. दु:ख अगदी समोर दिसत असतानाही आनंद घेण्याच्या प्रक्रियेत, त्याचा विसर पडू लागतो.

पुढे वाचा

आनंदाचा मापदंड : हसरे चेहरे मोजायला मोडक्या पट्ट्या

भारताचा वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समधला क्रमांक जेव्हा जाहीर होतो, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेल्या दिसतात. एक गट मोठ्याने म्हणतो – “हे सगळं खोटं आहे, आपण इतके दुःखी नसतो!” दुसरा गट एका डोळ्याने रडत आणि एका डोळ्याने हसत म्हणतो – “पाहा, पाहा, हेच तर आपल्या रोजच्या वास्तवाचं चित्र आहे.” तिसरा गट मात्र शांतपणे डोकं खाजवत विचारतो – “खरंच हे आकडे सांगतात ते आणि तेवढंच सत्य आहे का? की हा फक्त आकड्यांचा खेळ आहे?” सोशल मीडियावर मीम्स लगेच तयार होतात : गर्दीने गच्च भरलेली लोकल, आणि कॅप्शन – “World Happiness Report, India Edition.” 

पुढे वाचा

कोऽहं!

आस्तिक्य किंवा नास्तिक्याविषयी विचार करताना एकंदर माझ्या असे लक्षात येते की एखाद्या व्यक्तीचे नास्तिक असणे हे आस्तिकांना तर खटकतेच, पण नास्तिकांना तिच्या नास्तिकपणाच्या खरेपणाविषयी येताजाता टिका करणे, त्याहून जास्त आवडते. 

‘नास्तिक म्हणवते आणि हिच्याकडे देवघर आहे’

‘नास्तिक म्हणवते आणि ही दररोज दारात रांगोळी काढते’ 

‘नास्तिक म्हणवते आणि ही दिवाळीला दिवे लावते’ 

‘नास्तिक म्हणवते आणि ही सणासुदीला झेंडूच्या माळांनी घर सजवते’ 

ह्या आणि अशा टीका सतत एका प्रकारचे नास्तिक दुसऱ्या प्रकारच्या नास्तिकांवर करत असतात. 

मला वाटते मूळात ‘नास्तिक’ ह्या शब्दाचा अर्थ त्यांना कळलेला नसतो. 

पुढे वाचा

सुखाचा शोध

सुखाच्या मागे मागे आपण धावत रहावे का?
कदाचित हा प्रश्न अत्यंत मूर्खपणाचा वाटेल. परंतु सुखी माणसाचा सदरा सापडणे व वाळवंटातील मृगजळ पकडणे दोन्ही सारखेच ठरतील. सुखाचा शोध घेण्याचा मार्ग फारच खडतर आहे याची जाणीव बहुतेकांना आहे व या मार्गावरील खड्ड्यात पडणार्‍यांची, टक्के टोणपे सहन करत राहणार्‍यांची संख्यासुद्धा कमी नाही. या मार्गाच्या शेवटच्या टप्प्यात परमसुख मिळणार आहे या आशेने आपण मार्गक्रमणातील दु:ख, वेदना, त्रास, विसरून पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो. भरपूर पगाराची नोकरी, मुबलक (अतिरिक्त!) पैसा (disposable income), प्रशस्त घरात वास्तव्य, आवडत्या संगातीबरोबरचे कौटुंबिक सौख्य, आरोग्यमय जीवन, इत्यादीत अडकून घेतल्यामुळे आयुष्यात या व्यतिरिक्त काही गोष्टी असू शकतात, त्यातूनही मानसिक समाधान मिळू शकते, हे आपण विसरत आहोत.

पुढे वाचा

सुखाचा शोध आणि आधुनिक आव्हाने

“सर्वेपि सुखिनः संतु” ही संकल्पना भारतीय परंपरेत खोलवर रुजलेली आहे. चारही वेद, उपनिषदे, गीता तसेच संतसाहित्य यात सर्वत्र “सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय” ही भावना कमीजास्त प्रमाणात आढळते. सुख केवळ वैयक्तिक नाही, तर सामूहिक असावे, ही धारणा प्राचीनतम आहे. भारतीय परंपरेतील पुरुषार्थचतुष्ट्य – धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष – ह्यांतूनही सुखाची कल्पना व्यक्त होते. येथे अर्थ आणि काम हे ऐहिक सुखाशी निगडित आहेत, पण त्यांना धर्म हा नियंत्रक घटक व मोक्ष हा अंतिम परिपाक आहे. म्हणजेच सुखाचा शोध वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीशी बांधलेला आहे.

पुढे वाचा

ग्रामस्वराज्याचा शिल्पकार

उन्नत आदर्शांचे आकर्षण करोडो लोकांना असते. पण आयुष्यात उतरवणे अशक्य वाटून ते आदर्श केवळ पुस्तकी आहेत, असे ठरवून ते त्या आदर्शांचा पिच्छा करणे सोडून देतात. त्या आदर्शांवर जगण्याची इच्छा बाळगून त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणारेदेखील लाखो असतात. संपूर्ण जग ज्या दिशेने जात आहे, त्या प्रवाहाच्या विपरीत पोहतांना नाकातोंडात पाणी जाऊन दमछाक झाल्यामुळे, कालांतराने प्रवाहासोबत वाहू लागणारेही अनेक असतात. पण काही मोजकेच, कितीही संकटे आली, तरी आपल्या आदर्शांवर ठाम विश्वास ठेवून त्या दिशेने मार्गस्थ होतात. अशाच एका दुर्मिळ ध्येयवेड्याने शतकभरापूर्वी आपल्या ह्या जिद्दीमुळे जगभरातील अनेकांना वेड लावले.

पुढे वाचा