पृथ्वीमंथनः जागतिकीकरणात भारतीय विकास धोरण
(मूळ इंग्रजीः ‘चर्निंग द अर्थ, द मेकिंग ऑफ ग्लोबल इंडिया)
जागतिकीकरण आणि त्यानुसार बदलणाऱ्या भारतीय विकासनीतीचे निसर्ग, पर्यावरण, कृषी, ग्रामीण व आदिवासी जाति-जमातींच्या अस्तित्वावर व भवितव्यावर झालेल्या आणि होणाऱ्या परिणामांची सखोल व शास्त्रीय चर्चा करणारा हा मौलिक ग्रंथ आहे. देश-विदेशांतील १४ विद्वान व लोकजीवनाशी जुळलेल्या समाजशास्त्रज्ञांचे, शास्त्रज्ञांचे प्रकाशनपूर्व गौरवोद्गार ह्या पुस्तकात आहेत. लेखकद्वय सामाजिक चळवळींशी संबंधित असल्यामुळे हा ग्रंथ केवळ संदर्भ गोळा करून संपन्न झालेला नसून लोकजीवनातील कार्यकारणभाव दाखविणाऱ्या घडामोडींचा जिवंतपणा त्यात आहे. जागतिकीकरण सुरू झाल्यापासून (१९९०) पाश्चात्त्य जगात त्याचे परिणाम काय झाले हे दर्शविणारे अनेक ग्रंथ प्रकासित झाले.