श्री बाळ ठाकरे यांच्या मृत्यूनंतर मुंबईत पाळल्या गेलेल्या बंदमुळे वैतागलेल्या एका तरुणीने त्याबद्दलची नाराजी फेसबुकवर लिहिली आणि त्या माध्यमाच्या पद्धतीने तिच्या एका मैत्रिणीने ‘मला पटतं’ म्हटले. या साध्याश्या, खरे म्हणजे अगदी निरुपद्रवी कृतीची फार मोठी किंमत या मुलींना आणि अनेकांना भरावी लागली आहे. या दोन मुलींना अटक करून अर्ध्या रात्रीपर्यंत पोलीसचौकीत डांबण्यात आले. एकीच्या नातेवाईकांच्या इस्पितळाचे सुमारे पंचवीस लाखांचे आणि दुरुस्त करून घेण्यासाठी लागणाऱ्या अनंत तासांचे नुकसान झाले. त्यावेळी इस्पितळात असलेल्या रुग्णांचे काय झाले; त्यांना मार बसला असेल, लावलेले सलाईन उघडले असेल.
विषय «संपादकीय»
मेंदू-विज्ञान विशेषांक
ज्ञानाची आस विज्ञानाच्या प्रत्येक शास्त्रशाखेची विचार करायची पद्धत थोडी थोडी वेगळी असते, स्वतंत्र असते. त्या त्या ज्ञानशाखेशी सुसंगत असते.
डीएनएचा शोध लावणारा फ्रान्सिस क्रिक हा मुळातला भौतिकीतज्ज्ञ. त्याने जेव्हा जैवविज्ञानात संशोधन करायला सुरुवात केली तेव्हा त्याला भौतिकविज्ञानाची विचारपद्धती सोडून देऊन जैवविज्ञानाची विचारपद्धती अंगीकारावी लागली होती. माझ्यासाठी हा जणू पुनर्जन्मच होता, असे त्याने आपल्या आत्मचरित्रात लिहूनच ठेवले आहे!
विज्ञानाच्याच दोन शाखांमध्ये विचार करायच्या पद्धतीत जर एवढे वेगळेपण तर ललितसाहित्याची विचारपद्धती किती निराळी असेल ते सांगायलाच नको. तत्त्वज्ञानाची विचारसरणी तर आणखीच वेगळी असणार.
मेंदू-विज्ञान विशेषांकाविषयी
मेंदू-विज्ञान ह्या विषयावरचा सुदीर्घ विशेषांक आजचा सुधारक च्या वाचकांच्या हातात देताना विशेष आनंद होत आहे.
मेंदू-विज्ञान हे शरीरशास्त्र व मानसशास्त्र (वर्तनशास्त्र ह्या अर्थाने) दोन्ही दृष्टींनी महत्त्वाचे शास्त्र आहे. अलिकडच्या काळात ह्या शास्त्राने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. अनेक ज्ञानशाखांमध्ये क्रांती घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली आहे. तत्त्वज्ञान ही तर सर्व शाखांची जननी मानली जाते. मेंदूविज्ञानाच्या प्रगतीने तत्त्वज्ञानावर कसा प्रभाव पाडला आहे हा आज जगभरच्या शास्त्रज्ञांच्या कुतूहलाचा विषय आहे. तसा तो आसु च्या संपादक मंडळालाही वाटला. म्हणून या विषयावर अंक काढायचे आम्ही ठरवले होते.
संपादकीय
मेंदू-विज्ञानाचा तत्त्वज्ञानावर झालेला किंवा होऊ घातलेला परिणाम या विषयावरील ‘आजचा सुधारक’चा विशेषांक वाचकांच्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे. या विशेषांकामध्ये लेखनसाहाय्य करणाऱ्या लेखकांचे मनःपूर्वक आभार.
गेल्या काही वर्षांत मेंदू-विज्ञानात लागलेल्या शोधांमुळे मेंदूचे कार्य कसे चालते त्याबद्दल अधिकाधिक माहिती जमा होत आहे. आत्तापर्यंत जे फक्त तर्काने जाणणे शक्य होते त्याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळू लागले आहे. पूर्वापार चालत आलेल्या काही समजांना बळकटी मिळू लागली आहे, तर काही कल्पना मोडीत निघाल्या आहेत. या उलथापालथीचा परिणाम तत्त्वज्ञानाच्या संकल्पनांवर होणे स्वाभाविक आहे. अश्या संकल्पना कोणत्या?
संपादकीय
सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण ह्या सूत्राभोवती ह्या विशेषांकातील लेख गुंफलेले आहेत. हा विशेषांक एरवीच्या अंकांपेक्षा काहीसा वेगळा आहे.
बालकांना निःशुल्क आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क देणारा अधिनियम एप्रिल 2010 पासून लागू झाला. ह्या अधिनियमाच्या कलम 8 व कलम 29 नुसार भारतातील प्रत्येक मुलाला आता चांगल्या गुणवत्तेच्या शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. मात्र, हा अधिनियम लागू होऊन 18 महिने झाले असले तरी त्यात उल्लेख असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या उद्दिष्टाबाबत राज्यात पुरेसे विचारमंथन होताना दिसत नाही. अशाप्रकारचे मंथन व्हावे ह्या हेतूने 14 व 15 जानेवारी 2012 रोजी ‘सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण’ हे दोन दिवसांचे निवासी संमेलन सेवाग्राम, वर्धा येथे आयोजित केले गेले होते.
प्रस्तावना
‘प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे’ या विधानाबद्दल भारतात एकमत आहे, अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून! ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे नेमके काय?’ या प्रश्नावर चर्चा करताना मात्र मतभेद सुरू होतात. ‘किमान साक्षर झाले तर पुरे’, ‘अमेरिकेतील सर्वोच्च विद्यापीठात प्रवेश मिळविला पाहिजे’, ‘भारतीय समाजातील विषमतेवर मात करता येईल असे दमदार शिक्षण प्रत्येक बालकाला मिळाले पाहिजे’ अश्या निरनिराळ्या कसोट्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला लावल्या जातात. शासकीय धोरणेही या विविध टोकांच्या अधेमधे कोठेतरी फिरत राहतात, हा आपला गेल्या 65 वर्षांचा अनुभव आहे.
दुसऱ्या बाजूने पाहावे तर महाराष्ट्रात शिक्षणाच्या बाबतीत खूप मूलभूत विचार झालेला आहे.
संपादकीय सक्षम नागरिकतेसाठी
भारतीय संविधानाचे हे साठावे वर्ष. या संविधानाने आपल्या देशाच्या प्रगतीच्या आणि उन्नतीच्या भव्य स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्यासाठीचा अवकाश प्राप्त करून दिला. कायदा व सुव्यवस्था यांपलिकडची जबाबदारी राज्यकर्त्यांना दिली. म्हणूनच सामाजिक सुरक्षा, सामाजिक न्याय मिळवून देणारे कायदे आपल्या संसदेने आपल्याला दिले. वंचित घटकांकडे विशेष लक्ष देण्यासाठीही अनेक तरतुदी केल्या गेल्या. या संकल्पनांना धोरणात्मक स्वरूप देऊन त्यातून कायदे, योजना अंमलात आणल्या, आणि त्या सामान्य जनतेपर्यंत पोहचाव्यात, गरजू घटकांपर्यंत पोहचाव्यात म्हणून सार्वजनिक संस्था (Institutions) निर्माण झाल्या. खरेतर राज्य या संकल्पनेचे स्वरूप आपल्याला मूलभूत संस्थांतून; जसे, संसद, न्यायालये, निवडणूक आयोग, पोलिस, लोकसेवा आयोग, विद्यापीठ, अशा उत्तुंग संस्थांतून दिसे.
संपादकीय तुमच्याशिवाय नाही (भाग २)
शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीचे प्रश्न हे शब्दप्रयोग भेटले रे भेटले, की तपशिलांचा भडिमार व्हायला लागतो. शेतांचे इकॉनॉमिक आकार. सघन शेती. सिंचन आणि त्याचा अभाव. अतिसिंचन. माती अडवा-पाणी जिरवा. सेंद्रिय खते विरुद्ध रासायनिक खते. देशी वाणे-बियाणे. बीटी व तत्सम जीनपरिवर्तित वाणे-बियाणे. कीटकनाशके व त्यांचा अतिवापर. मित्रकिडी व मित्रपिके. सहकारी चळवळ. दलालांच्या चळती. सार्वजनिक वितरण. शेतमालाचे भाव आणि त्यातला शेतकऱ्यांचा वाटा. अनुदाने. अमेरिकन व युरोपीय अनुदाने. भारतीय शहरी प्रजेला मिळणारी अघोषित अनुदाने. अनुदान म्हणजे पांगुळगाडा. अनुदान म्हणजे बुडत्याला हात. दहा गुंठे. अडीच एकर. वनशेती.
संपादकीय
बरेचदा विवेकवादी माणसाला जागोजाग पसलेल्या अंधश्रद्धेचा प्रश्न बिनमहत्त्वाचा वाटतो. याचे कारण अंधश्रद्धेचे मूळ भोळसरवृत्ती हे आहे. जगातल्या अंधश्रद्धा एके दिवशी संपल्या तरी भोळेपणा चालूच असल्याकारणाने नव्या अंधश्रद्धा निर्माण होतील. शिवाय जुन्या व नव्या अंधश्रद्धांमध्ये समाजहितास घातक असण्याच्या बाबतीत डावे उजवे करता येणार नाही. मग अंधश्रद्धांचा प्रश्न गैरमहत्त्वाचा ठरतो. अंधश्रद्धांचे मूळ बरेचदा भोळेपणात असले तरी त्यांचा प्रचार हा त्यातला नाही. अंधश्रद्धेचे प्रचारक, मग ते पारंपरिक अंधश्रद्धेचे असोत वा आधुनिक अंधश्रद्धेचे असोत, काही हेतू ठेवून हे काम करतात. खूपदा हा हेतू आपली पोळी भाजण्याचा असतो.
संपादकीय मिलिंद मुरुगकर, अश्विनी कुलकर्णी
जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने स्वतंत्र भारताच्या इतिहासातील उच्चांक गाठला आहे. या महागाईला देशातील कोट्यवधी गरीब लोक कसे तोंड देत असतील. याचा विचारही हृदयद्रावक आहे.
१९९० नंतरच्या अर्थव्यवस्थेने घेतलेल्या नवीन वळणानंतर देशाचा अर्थिक विकासाचा दर झपाट्याने वाढता राहिला. या विकासाचा फायदा अतिशय विषम पद्धतीने जनतेपर्यंत पोहचला. त्यामुळे समृद्धीची काही बेटे तयार झाली. पण फार मोठ्या जनसंख्येला विकासाचा अत्यल्प लाभ मिळाला. इतर मोठ्या संख्येला तो काहीच मिळाला नाही. जागतिकीकरणाच्या रेट्याबरोबर झालेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या स्फोटामुळे समृद्धीच्या चकचकीत बेटांच्या प्रतिमा आपल्यासमोर वारंवार नाचत राहिल्या. या प्रतिमांमुळे देशातील अफाट दारिद्र्य मात्र झाकोळले गेले.