Monthly archives: मे, 2016

इतर

लोकं उद्धट व्हायला लागली आहेत
पाणी मागतात – पिण्याकरता, शेतीकरता
ठोकून काढलं पायजे साल्यांना

साहेबांनी म्हटलं- अहो, जलनीती घ्या
कायदे करू, नियम करू
येगळं प्राधिकरनच देतो की
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात …च्यायला

सायबांनी असंबी म्हटलं
नदीजोड व्हायला पायजेल आहे
कोर्टाचा आदेशच आहे तसा
पश्चिमेच्या नद्या फिरवू की पुर्वेला
ह्ये अशी वळवायची नदी अन ह्यो उचलायची
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात …च्यायला

कान इकडं करा तुमाला म्हणून सांगतो
साहेब म्हनाले- इन्टरनल शिक्युरिटिला लै धोका आहे
आता टॅंकरवर काम भागणार नाही, राजेहो
साहेब तर म्हनतात- आता टॅंकच बोलवा
टॅंक.

पुढे वाचा

दस्तावेज -गोहत्याबंदी आणि गांधीजी

गोहत्याबंदी, गांधीजी
———————————————————————————————-
गोहत्याबंदीच्या प्रश्नावर आपल्या देशात नुकतेच रण माजले होते. अजूनही हा वाद शमला नाही. ह्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीच्या भल्यासाठी गोसंगोपन आणि गोसेवेचा आग्रह धरणारे गांधीजी धार्मिक स्वातंत्र्याच्या आधारावर गोहत्याबंदीच्या मागणीला ठाम विरोध करतात हे समजून घेऊ या त्यांच्याच शब्दांतून.
—————————————————————————-
राजेंद्रबाबूनी मला सांगितले की त्यांच्याकडे गोहत्याबंदीची मागणी करणारे सुमारे ५०,००० पोस्टकार्ड्स, २५,०००-३०,००० पत्रे व हजारो तारा येऊन पडल्या आहेत. मी तुमच्याशी ह्यापूर्वी ह्या विषयावर बोललो होतो. हा पत्र आणि तारांचा पूर कशासाठी? त्यांचा काहीही परिणाम झालेला नाही.
मला एक तार मिळाली ज्यात सांगितले आहे की एका मित्राने ह्या प्रश्नावर उपोषण सुरू केले आहे.

पुढे वाचा

दुष्काळ – चांगल्या कामांचाही

दुष्काळ,राजस्थान, पारंपरिक जलव्यवस्थापन
—————————————————————————–
कमी पाऊस म्हणजे दुष्काळहे समीकरण खोडून काढणारा, सामूहिकता, पारंपरिक शहाणपण व बंधुभाव म्हणजे काय हे समजावून सांगणारा स्वानुभव.
—————————————————————————–

आज टेलिव्हिजन कुठे नाही? आमच्याकडेही आहे. आमच्याकडे म्हणजे जैसलमेरपासून सुमारे शंभर किमी पश्चिमेला पाकिस्तानच्या सीमेवर. आता हेही सांगून टाकतो की आमच्याकडे देशातील सर्वात कमी पाऊस पडतो. कधीकधी तर पडतच नाही. तशी लोकसंख्या कमी आहे म्हणा, पण तेवढ्या लोकांनाही जरूरीपुरते पाणी तर लागतेच. त्यातूनही येथे शेती कमी व पशुपालन अधिक आहे. येथील लाखो बकऱ्या, गाई, उंटांसाठीही पाणी पाहिजे.
तर, ह्या टेलिव्हिजनमधून आम्ही गेल्या कोणजाणे किती काळापासून, देशातील काही राज्यांत पसरलेल्या दुष्काळाच्या भयानक बातम्या पाहत आहोत.

पुढे वाचा

गांधी, मार्क्स, आंबेडकर: परस्परपूरकता शोधू या

गांधी, मार्क्स, आंबेडकर, परस्परपूरकता
—————————————————————————–
मार्क्स, गांधी, आंबेडकर तसेच अन्य महामानव यांच्या वैचारिक समन्वयाचा आग्रह न धरता त्यांच्यातील परस्परपूरकत्व शोधणे व त्या पायावर व्यापक एकजुटीचा कार्यक्रम आखून आपल्या संविधानातील प्रगत मूल्यांना आव्हान देणाऱ्या शक्तींना पराभूत करणे कसे आवश्यक आहे ह्याची अभिनिवेशहीन मांडणी
—————————————————————————–

गांधी-आंबेडकर-मार्क्स हे त्रांगडे अजून काही सुटत नाही. उलट ते अधिकच तीव्र होते आहे की काय, असे वाटावे, असे पुरोगामी चळवळीतले सध्याचे वातावरण आहे. रोहित-कन्हैया प्रकरणाने तर आंबेडकर-मार्क्स वादाला नवी फोडणी बसली. या सगळ्या चळवळीकडे सजगपणे पाहणारा व त्यात सक्रिय सहभाग घेणारा एक कार्यकर्ता म्हणून या वादाकडे पाहताना मला काही केल्या कळत नाही की, आजच्या टप्प्यावर या वादाचे प्रयोजन काय?

पुढे वाचा

मिल्ग्रम प्रयोग – विघातक आज्ञाधारकपणा

मिल्ग्रम प्रयोग, आज्ञाधारकता
—————————————————————————-
आपणसर्वजणविघातकआज्ञाधारकतेचेबळीठरण्याचीशक्यताआहे. व आपल्यालात्याबद्दलखूपचकमीजाण आहे हे भान जागविणारा सामाजिक मानसशास्त्रातील एका महत्त्वाच्या पैलूची ओळख करून देणारा लेख
—————————————————————————-

जाहीरसूचना
एकातासासाठी४डॉलरकमावण्याचीसंधी – स्मरणशक्तीच्याअभ्यासासाठीलोकहवेआहेत.
* आम्हालास्मरणशक्तीआणिशिक्षणासंदर्भातीलवैज्ञानिकअभ्यासासाठीन्युहॅवनयेथीलपाचशेपुरुषांचीमदतहवीआहे. हाअभ्यासयेलविद्यापीठातकरण्यातयेणारआहे.
* सहभागीहोणाऱ्याप्रत्येकव्यक्तीससाधारणएकातासासाठी४डॉलर (अधिककारभत्त्यापोटी५०सेंटस) दिलेजातील. आम्हालातुमचाफक्तएकतासहवाआहे – अजूनकाहीहीनको. तुम्हीयेण्यासाठीचीवेळ – संध्याकाळी, सोम-शुक्रकिंवाशनि-रवि – तुमच्यासोयीनेनिवडूशकता.
* शिक्षण, प्रशिक्षणकिंवाअनुभवाचीकुठलीहीअटनाही. आम्हालाकारखान्यातीलमजूर, शहरीनोकरदार, मजूर, न्हावी, व्यापारी, व्यावसायिक, कारकून, बांधकाम-मजूर, टेलिफोनलाईनवरीलमजूर, विक्रेते, पांढरपेशेकर्मचारीकिंवाइतरहीचालतील.
* सहभागीव्यक्तीचेवय२०ते५०च्यामध्येअसावे. शाळेतीलकिंवाकॉलेजमधीलविद्यार्थ्यांनासहभागीहोतायेणारनाही.
* जरआपणयाअटींचीपूर्तताकरूशकतअसालतरआम्हालाखालीलकूपनभरून प्रा. स्टॅन्लेमिल्ग्रम, मानसशास्त्र-विभाग, येलविद्यापीठ, न्युहॅवनयापत्त्यावरपाठवा. तुम्हालाअभ्यासाच्यानेमकादिवसआणिवेळेबद्दलनंतरकळवण्यातयेईल. कुठलाहीअर्जनाकारण्याचाहक्कआम्हीराखूनठेवतआहोत.
* तुम्हाला४डॉलर (अधिक५०सेंटस) प्रयोगशाळेतआल्याआल्यादिलेजातील.

* कूपनचेतपशील
१९७४सालीवरीलजाहिरातएकावर्तमानपत्रातप्रकाशितझाली. ज्याव्यक्तीयाअभ्यासातसहभागीझाल्यात्यांनाविशिष्टवेळीयेलविद्यापीठातीलमानसशास्त्रविभागातबोलवण्यातआले. तिथेत्यांचीअजूनएकाव्यक्तीसोबतगाठपडली. प्रयोगकाने (प्रयोगकरणारा, experimenter) समोरयेऊनत्यादोनव्यक्तींनाप्रयोगाबद्दलथोडक्यातमाहितीदिली.
“स्मरणशक्तीआणिशिक्षायासंदर्भातआम्हीअभ्यासकरतोआहोत.

पुढे वाचा

सुरांचा धर्म (२)

भारतीय संगीतपरंपरा, सूफी, हिंदू-मुस्लीम संबंध
—————————————————————————–
धार्मिक उन्मादाच्या आजच्या वातावरणात भारताची ‘गंगा-जमनी’ संस्कृती, सर्व धर्मीयांचा सामायिक वारसा म्हणजे काय हे नीट उलगडून दाखविणाऱ्या, मुस्लीम संगीतकारांनी व राज्यकर्त्यांनी भारतीय संगीताला नेमके काय योगदान दिले हे साधार नमूद करणाऱ्या करणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध –
—————————————————————————–

इब्राहिम आदिलशाह अकबर बादशहाचा समकालीन होता. अकबर शेख सलीम चिश्तीचा भक्त होता. पुढे तो सूर्यपूजक झाला. फक्त वीस वर्षांचे असताना अकबराने रीवा संस्थानचे राजे रामचंद्रांच्या पदरी असलेल्या तानसेनाला मोगल-दरबारात आणले. तानसेनाला त्याने `कण्ठाभरणवाणीविलास’ ही उपाधी देऊन त्याचा सन्मान केला.

पुढे वाचा

असलेपण – नसलेपण

रा. स्व. संघ, डावा विचार, गांधी
——————————————————————————–
अलिकडे डावे-उजवे ह्यांच्यातील वैचारिक संघर्ष हातघाईवर आला आहे. अशा वेळी स्वतःला ‘डावा’ समजणाऱ्या एका तरुण कार्यकर्त्याने स्वतःशी व विरोधी विचारांशी संवाद करून आपली जडणघडण तसेच भारतीय समाजाची मानसिकता ह्यांचा शोध घेण्याचा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न––
——————————————————————————–

मी अलीकडे पुष्कळच विचार करतो. म्हणजे मी नक्की कसा आहे? माझ्याशी मतभेद असणारा नक्की कसा आहे? मी जे आग्रह धरतो ते आग्रह धरणं योग्य आहे का? ‘मला हे पटतं’ म्हणजे काय? ‘पटत नाही’ म्हणजे काय? मुळात योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे या ‘डेंजर’ प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं आहे का?

पुढे वाचा

संपादकीय

दिवस चर्चांचे आहेत. शेकडो माध्यमांतून हजारो विषयांवर चर्चा झडत आहेत व लाखो लोक त्यांत हिरीरीने भाग घेतानाही दिसत आहेत. पण त्यातील बहुतेक चर्चा त्याच त्या रिंगणात अडकल्याचे आपल्याला जाणवते. दुष्काळासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर बोलतानाही मुळात अवर्षण आणि दुष्काळ यांचा संबंध, माती व पाण्याचे नियोजन, समाजातील विविध घटकांचे परस्परसहकार्य व समन्वयन, पीकपद्धतीत बदल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे चर्चा सरकत नाही. लातूरला पाण्याची ट्रेन नेली जाते ह्याचे माध्यमांतून प्रचंड कौतुक केले जाते. पण अशी ट्रेन आपण किती ठिकाणी नेऊ शकतो, किती काळ असे पाणी पुरवू शकतो, कानाकोपऱ्यांत विखुरलेल्या खेड्यापाड्यांत पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठीच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था कशी करायची ह्या प्रश्नांची चर्चा घडतच नाही.

पुढे वाचा