[ज्यावर काहीच वेगळी टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही अशा बोलक्या चालू-घडामोडींकडे वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी हे सदर ह्या अंकापासून सुरू करीत आहोत. वाचकांच्या प्रतिसादाची व सहभागाची अपेक्षा आहे. – संपादक]
१. ‘ओपन सोसायटी जस्टिस इनिशिएटिव्ह’ ही न्यूयॉर्क येथील एक स्वयंसेवी संघटना आहे. ह्या संघटनेतर्फे नुकताच ‘ग्लोबलायज़ींग टॉर्चर’ नावाचा एक २१६-पानी अहवाल प्रकाशित करण्यात आला. सी आय ए. मानवी हक्कांचे उल्लंघन सातत्याने कानी आली आहे, हे सर्वविदित आहे. परंतु, आता सी आय ए ने ह्या ‘कामांची’ व्याप्ती वाढवली आहे. संशयावरून कोणाही व्यक्तीला ताब्यात घेणे, कोणतीही कायदेशीर मदत मिळू न देता तिला अज्ञात ठिकाणी अडकवून ठेवणे, तिचा विविध पद्धतीने छळ करणे ही सारी कृत्ये सी आय ए आता ५४ देशांच्या सरकारांच्या संगनमताने करीत असल्याचा गौप्यस्फोट ह्या अहवालात करण्यात आला आहे.